आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.
ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का?
या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं.
दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो.
कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू.
कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात.
संजीव
http:\\vastuclass.blogspot.com
वैद्यमाहाराज आपण C8H9NO2
वैद्यमाहाराज आपण C8H9NO2 फारमुला वापरुन रुगणाचे दु:खणे कमी करण्याचे प्रयत्न करत होता. आताच्या आधुनिक काळात C8H9NO2 ह्या ऐवजी C14H11Cl2NO2 हा फारमुला वापरता.
गुरुजी, हे कसले फॉर्मुले हो? आणि वैद्यकशास्त्र आज फॉर्मुले बदलते याचा आणि अतीपूर्वीच्या काळातही ते असणारच याचा काय संबंध? मी रोज कपडे बदलतो, या वाक्यातून काही करोड वर्षापूर्वी माणूस टी शर्ट घालत होता हा निष्कर्ष कसा काय निघतो बुवा?
एक चमचा मद्य? मुलांनाही?
एक चमचा मद्य? मुलांनाही? तुम्हाला नक्की मद्यच म्हणायचे आहे का?
एक चमचा मद्य दिले तर पती
एक चमचा मद्य दिले तर पती सुधारतो...?
उगीच विनोद करू नका जामोप्या. C2H5OH मधील हैड्रोक्सील ग्रुपमधल्या हैड्रोजन मधला प्रोटॉन आणि हायड्रोकार्बन ग्रुपमधल्या एच फाईव्ह मधल्या तिसर्या हायड्रोजनमधल्या प्रोटॉन यांच्या एनर्जी लेव्हलच्या फ्रेक्वेन्सीज मॅच होऊन त्याचा जो रेझोनन्स येतो त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर पक्षी इमोशन्सवर शक्य आहे. अगदी ह्याच शब्दात नाही पण थोडेसे अप्रत्यक्षपणे नेबुशडनेझरने त्याच्या' अल- दिन -हिलाल' या ग्रंथात म्हटले आहे. म्हणून तर इजिप्तमधील ममीत मद्याच्या कुप्या ठेवण्याची प्रथा सुरू झाली. परलोकात जाताना चमचाभर मद्या ऐवजी कुपीभर मद्य सोबतीला असणे पुढच्या जन्मीच्या सुख्शान्तीच्या दृष्टीने श्रेयस्करच, . सापताहिक सकाळच्या दिवाळी अंकात डॉ. अनिल अवचट म्हणतात की ममीतील पाच हजार वर्षांपूर्वीचा मध सापडला आहे . खरे तर त्याना 'मद्य' म्हणायचे असावे.
तुम्हाला नक्की मद्यच म्हणायचे
तुम्हाला नक्की मद्यच म्हणायचे आहे का?
>>
मद्य शब्द कधी ऐकला नाहीस काय पूनम ? उगीच काही तरी खुसपटे काढून विषयान्तर करू नकोस. हे जामोप्या नाही का खोकल्याचे औषध म्हणून एथिल अल्कोहोल देत पेशन्टला. शास्त्राची खिल्ली उडवू नका. त्यासाठी वेगळा बीबी उघडा
रॉबीनगुरुजी.... आपले म्हनने
रॉबीनगुरुजी.... आपले म्हनने म्या अडान्याने मान्य केले आहे... आता न्हाई चुकी होनार......... म्या पन आता चालु करेन हे........ एकच चमचा! प्रभु आजि गमला मनी तोषला........
पूनम पहिल्यादा मुलाचे वय
पूनम
पहिल्यादा मुलाचे वय वर्षे पाहा व नंतर द्या नाहीतर मला पाठवाल जेल मध्ये हवा खाण्यास
नक्की सर्वाना. मद्याचा गुणाधर्म खुप चांगला आहे.
मद्य माशी आपल्या सर्व पिल्लासाठी मद्य गोळाकरण्यास १ ते ५ किलो मिटरचा पल्ला निवडत असते. ते ती आपल्या कुंटूबासाठी करत असते. मद्याची अविटगोडी साधारण १ ते २ तास जिभेंवर रेगाळत असते. त्या वेळी प्रत्येक क्षणाला मायेची उब जाणवत राहील व घरातील कुंटूब संबधात आणखीण गोडी येईल .
असाच प्रयोग आपल्या रक्तातील नात्यामधील व्यक्तिवर करुण बधा. आपली रक्तातील नात्यातिल व्यक्ती जेव्हा आपणास फार दिवसानी भेटाण्यास येईल त्यावेळी आपण जाताना एक चमचा मद्य देऊन बधा.
आणि आपला अभिप्राय कळवा
नमस्कार
संजीव
मागे एका कवितेवर (कविसकट)
मागे एका कवितेवर (कविसकट) टवाळगिरी चालू होती तेव्हा रॉबिनहूड यानी तिथे येऊन सर्वानाच औचित्याबद्दल बरेच काही ऐकवले होते. आज त्याची प्रकर्षाने आठवण होत आहे!!
एथिल अल्कोहोल खोकल्याला? एथिल
एथिल अल्कोहोल खोकल्याला? एथिल काय आणि तेथील काय.. आज कोणताच डॉ. मद्य देत नाही.... आणि हे जे वर लिवले आहेत, ते काय एथिल अल्कोहोल चे फोर्मुले थोडेच आहेत?
मद्य
मद्य माशी............?????????????????????????????????????
ही कुठली माशी..............!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अहो, त्यान्ना मध म्हणायचे आहे
अहो, त्यान्ना मध म्हणायचे आहे बहुतेक. सन्जिव, मध म्हणा हो. शिन्चि, मद्यात कुठलि माशि शिन्कलि तर मधमाशि. असो.
मद्य माशीच कशाला? तुम्ही पण
मद्य माशीच कशाला? तुम्ही पण तुमच्या घरात जे जे करता ते मायेच्या उबेने करता... मग तुमच्या घरातील एखादी गोष्ट त्या मद्य माशीने नेली तर.........? आता घरफोड्या लोकानाही मायेने गोळा केलेल्या लोकांच्या घरांवर डल्ले मारावे लागतील.......
माझी लिहण्यात चुक झाली मध
माझी लिहण्यात चुक झाली मध ऐवजी मद्य असेलिहले गेले आहे चुक दुरुस्त करा
क्षमस्व
संजीव
असुदे हो........ मध काय आणि
असुदे हो........ मध काय आणि मद्य काय.......... प्रेमाने गोळा केले आहे, ते महत्वाचे आहे.......
श्या ..मला ती रंगित पाण्याची
श्या ..मला ती रंगित पाण्याची ऑर्डर रद्द करावी लागेल आत्त्ता
पहिल्यादा मुलाचे वय वर्षे
पहिल्यादा मुलाचे वय वर्षे पाहा व नंतर द्या नाहीतर मला पाठवाल जेल मध्ये हवा खाण्यास
नक्की सर्वाना. मद्याचा गुणाधर्म खुप चांगला आहे.
>>
या या लिम्बाजी राव या.
अहो त्याना मद्यच म्हणायचे आहे. त्याची त्याना पूर्ण जाण आहे. म्हणून तर त्यानी जेल मध्ये जाण्याच्या गोष्टी केल्या आहेत. चमचाभर मध मुलाना पाजल्यावर कुठे जेलमध्ये पाठवतात का? त्याना मद्यच म्हणायचे आहे.
हे ज्योतीष शास्त्र कोण आहेत हे चाणाक्षांच्या लक्षात आलेच असेल....
मद्य माशी = मध माशी ? हर हर,
मद्य माशी = मध माशी ?
हर हर, किती मने खट्टू झाली असतील. दरवाज्यांचे ठीक आहे Windows चे काय ? माझ्या कडे XP आहे. चार रंगाच्या वेगळ्या वेगळ्या खिडक्यांचे दूरगामी परीणाम काय होतील ?
माय गॉड! घाबरवलं होतंत की हो!
माय गॉड! घाबरवलं होतंत की हो! ते 'मद्य' नसून 'मध' आहे होय?
(पण मला जरा बरं वाटलं होतं हो. )
सन्जिव, मध म्हणा हो. शिन्चि,
सन्जिव, मध म्हणा हो. शिन्चि, मद्यात कुठलि माशि शिन्कलि तर मधमाशि.
>>
लिम्बाजीराव , तुमच्या इनन्तीला मान देऊनशान त्यानी मद्याचं 'मध' केलं बर्का. मानावा लागंन तुम्हाला बी.
न्हाय तं उंद्यापसून सगळ्या मायबोलीकरांची कार्टी ५-५ एम एल 'घिऊनशान' भाईर पल्डी अस्ती.
बरं बरं ज्योतिष गुरुजी, तुमची उतारल्यावं आपल्या मूळ शास्त्राकडं वळू या.
माझी लिहण्यात चुक झाली मध
माझी लिहण्यात चुक झाली मध ऐवजी मद्य असेलिहले गेले आहे चुक दुरुस्त करा
>>>>>>>>>>
शिंच्या आम्हालाच सांगतो दुरुस्त करायला. संपादन कर ना तुझ तुच.
मी पण दोन साधे प्रशन विचारले
मी पण दोन साधे प्रशन विचारले होते.
एकच दरवाजा असेल तर काय करायचे
Poornima चे Pournima करावे का त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल का.
संजीवः ही फॅमिली वेब्साइट आहे, मुलाना दारू पाजण्याच्या गोष्टी का करता बरे.
बीबी वर विनोद होणॅ थोडे विष्यांतर होणे हे येथील राइट ऑफ पॅसेज आहेत. नंतर गाडी मुळ रुळावरूनच
जाते. टीआर्पी वाढ्ला की नाही! मद्य म्हणे. त्याना ध टायपता येतो की. आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
( आता याच्या पुढे काय येणार,
( आता याच्या पुढे काय येणार, त्याची झलक....
लतादीदीना भारतर्त्न मिळाले तेंव्हा मी त्याना बोललो होतो..
दीदी, पुढचा नंबर पंडीतजींचा बरं..
तुम्हाला हो काय माहीत? आशाताईंचा कांदापोह्याचा चमचा तसाच थबकला...
तुमच्या दारात उजव्या हाताला मोगर्याचा वेल आहे. तसेच त्यांच्याही घराजवळ आहे.. अगदी सेम! पण त्याच्याजवळ एक वाळूचा ढीग असल्याने नकारात्मक परिणाम घडत होता.. मी पाच वर्षापूर्वीच त्याना बोललो होतो... मी हलक्या आवाजात कुजबुजलो...!
इतके आपले शास्त्र महान आहे आणि तो नारळ्या उगाचच याला थोतांड म्हन्तो!! उगाच नाही, आपला १५ वर्शांचा अनुभव आहे!)
जाम करमणूक झाली ह्या बीबी
जाम करमणूक झाली ह्या बीबी वर...
चौकटींप्रमाणे पोरं होत असतील तर झोपडीत राहणार्याना इतकी मुलं कशी काय होतात?
त्यांच्या घराला तर चौकट सोडाच दरवाजाच नसतो...
दक्षिणा..!!!
दक्षिणा..!!!
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
>>
भद्राचलम नरसिंहलु यानी असे कुठे म्हटलेय मामी?
मागे एका कवितेवर (कविसकट) टवाळगिरी चालू होती तेव्हा रॉबिनहूड यानी तिथे येऊन सर्वानाच औचित्याबद्दल बरेच काही ऐकवले होते. आज त्याची प्रकर्षाने आठवण होत आहे!!
>>>
होना , आपण इथल्या औचित्यपूर्ण मद्यचर्चेत भाग घ्या ना. तुमच्याकडे अजून फुले उमललेली नाहीत. नाहीतर मद्यसल्ल्याच्या औचित्याबद्दल आपली मते ऐकायला आनन्द झाला असता.
जाम करमणूक झाली ह्या बीबी
जाम करमणूक झाली ह्या बीबी वर...
>>
दक्षे , हा करमणुकीचा बी बी नाही. इथे शास्त्रीय चर्चा चालू आहे. अॅडमिन, कृपया अशास्त्रीय पोस्ट्स उडवा पाहू.
<< त्यांच्या घराला तर चौकट
<< त्यांच्या घराला तर चौकट सोडाच दरवाजाच नसतो...>>
त्यांना त्याचा विधिनिषेधही नसतो.
<< त्याना ध टायपता येतो की. >>ते मध प्राशनापूर्वी, नंतर नाही.
संजीवः ही फॅमिली वेब्साइट
संजीवः ही फॅमिली वेब्साइट आहे, मुलाना दारू पाजण्याच्या गोष्टी का करता बरे.
>>
मामी, कोणत्या जमान्यात आहात तुम्ही? छे छे फारच बुरसटलेले विचार ?
बाकी ' स्त्रीपीडा' हा अत्यन्त समुचित शब्द हजारो वर्षानन्तर मराठी भाषेला मिळाला ही तर खरी आजच्या दिवसाची कमाई.
""रोज सकाळी मुले व आपले
""रोज सकाळी मुले व आपले पतीराज घराबाहेर जाताना त्यांना एक चमचा मद्य देऊन बघा. ""
एक चमचा मध असे म्हणायचे आहे का तुम्हाला संजीव साहेब ?
आपला
अमोल केळकर
---------------------------------------------------------------------
मला इथे ही भेटू शकता
एक चमचा मध असे म्हणायचे आहे
एक चमचा मध असे म्हणायचे आहे का तुम्हाला संजीव साहेब ?
>>
अगदी बरोबर. तशी त्यानी नन्तर दुरुस्तीही केली आहे. आता ते लवकरच 'मुख्य दरवाजा हे घराचं मुख आहे' या मुख्य विषयाकडे वळतील अशी विनन्ती आणि आशा करू या...
मुख्य दरवाजा हे घराचं मुख
मुख्य दरवाजा हे घराचं मुख आहे
खिडक्या हे घराचे नेत्र आहेत.
exhaust fan?
Pages