भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
४० चे श्रेय केयांना !
४० चे श्रेय केयांना !
दुभाजक / विभाजक / विभाजन/
दुभाजक / विभाजक / विभाजन/ द्विभाजक ?
नाही डॉ. कुमार.
नाही डॉ. कुमार.
एवढे क्लु देउनही चार पाच सोडवणारे (आणि काही न अजून उत्तर न देता प्रयत्न करणारे) यांच्या लक्षात येत नाहीये जी सूचना शोधसूत्रातून देउ इच्छीतो मला ती म्हणजे नीट देता आलेली नाहीये.
कोड्याची आता सांगता करतो.
मी मुद्दाम सविस्तर स्पष्टीकरण देत आहे, उत्तरे समजावीत म्हणुन नव्हे तर कोडी रचण्यास मदत होईल म्हणुन:
उत्तरे:
१. गाभ्यामागे बकरा ठेवल्यास येणारा प्राणी? (४) अज गर
गाभा = गर
बकरा = अज
गर मागे अज ठेवल्यास: अजगर
येणारा: वाक्य पूर्ण करण्यास अनावश्यक शब्द.
प्राणी: कोड्याचा अर्थ.
शोधसूत्रात एक अनावश्यक शब्द
२. पातळ बदलून ठेवलेली नजर. (३) पाळत*
बदलून: अक्षर अदलाबदल सूचक
"पातळ" या अक्षरांची अदलाबदल करुन: पाळत
ठेवलेली नजर: कोड्याचा अर्थ.
एकही अनावश्यक शब्द नाही.
३. मधला नाद यमक जुळवतो. (५) मदनायक*
जुळवतो: अक्षर अदलाबदल सूचक
"नाद यमक" या अक्षरांची अदलाबदल करुन: मदनायक
मधला: कोड्याचा अर्थ.
एकही अनावश्यक शब्द नाही.
४. सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४) ता र त म्य
सम "....." बाळगणारी हे उद्धृत अक्षरांमधून सम क्रमांकाची अक्षरे बाळगण्यास सुचवते. (? सुचवते का?)
"वातावरणात साम्य" यातील सम अक्षरे घेउन: तारतम्य
विषमता: कोड्याचा अर्थ.
एकही अनावश्यक शब्द नाही.
५. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४) मु(बल)क
न बोलणारा= मूक
जोर = बल
मूक मध्ये बल = मुबलक
पुष्कळ: कोड्याचा अर्थ.
लावतो: कोड्याचे वाक्य पूर्ण करण्यास अनावश्यक शब्द.
एक अनावश्यक शब्द.
६. वायुमधील अज्ञात तारकापुंज? (३) न(क्ष)त्र
वायु = नत्र
अज्ञात: क्ष
नत्र मध्ये क्ष = नक्षत्र
तारकापुंज: कोड्याचा अर्थ.
एकही अनावश्यक शब्द नाही.
७. रोखठोक सूर घेउन आकाशाभोवती पिरपिर. (४) प र{ख}ड
सूर: प
आकाश = ख
पिरपिर = रड
ख भोवती रड: र{ख}ड.
परखड
रोखठोक: कोड्याचा अर्थ.
घेउन: कोड्याचे वाक्य पूर्ण करण्यास अनावश्यक शब्द.
एक अनावश्यक शब्द. आधी दोन अनावश्यक शब्द होते, सोडवणायांचा गोंधळ होतोय दिसले, एक काढला.
८. "एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस" दिलेला "क्रमांक" (३) चाळीस (श्लेष)
एकाच नमुन्याच्या घरांची पट्टी = चाळ
"एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस" हे रुप: चाळीस
क्रमांक: कोड्याचा अर्थ
दिलेला: कोड्याचे वाक्य पूर्ण करण्यास अनावश्यक शब्द.
एक अनावश्यक शब्द.
९. हातात प्रत्येकवेळी सकस पदार्थ. (४) क(सदा)र
हात = कर
प्रत्येकवेळी = सदा
कर मध्ये सदा = क(सदा)र
सकस पदार्थ: कोड्याचा अर्थ.
एकही अनावश्यक शब्द नाही.
१०. कामाला पर्याय देणारा कीटक? (३) काज वा
काम = काज
पर्याय: वा (अथवा या अर्थी पर्याय दर्शवणारा)
कीटक: कोड्याचा अर्थ
देणारा: अनावश्यक शब्द
एक अनावश्यक शब्द.
शोधसुत्रात सुचना देण्यास नेमके शब्द वापरणे, अनावश्यक शब्द कमीत कमी वापरणे हे पाळले जाते.
अधिक अनावश्यक शब्द असल्यास, अथवा एकच अर्थ दर्शविणारे एकापेक्षा अधिक शब्द वापरल्यास सोडवणार्यांचा गोंधळ होउ शकतो.
या करता शोधसूत्रातील प्रत्येक शब्दाचा हिशेब आणि अनावश्यक शब्दांची संख्या दिली आहे,
तरी कोड्यात काही त्रुटी जाणवल्यास / मतभेद असल्यास जरुर निदर्शनास आणावे.
मानव , छान स्पष्टीकरण . चाळीस
मानव , छान स्पष्टीकरण . चाळीस शब्द सुचला होता , पण मला उकल देता येत नव्हती म्हणून सांगितले नाही . 4 चे तारतम्य हे थोडे अजून स्पष्ट करून सांगता येईल का ?
मी आधी
मी आधी
विषम हवामानामध्ये आढळणारा उखळ (३)
हे कोडे दिले होते ते क्लू विना सुटले.
उत्तर: विषम अक्षरे घेऊन: हमाम (म्हणजे उखळ)
याच धर्तीवर सम चा प्रयत्न केला.
अश्विनी, "वातावरणात साम्य" यातील सम अक्षरे: तारतम्य
तारतम्य चा अर्थ विषमता हा सुद्धा आहे.
विषमता: कोड्याचा अर्थ. >>
मी तारत ...असे करून सोडून दिले.
घरांची पट्टी >>> ?? यावरून
घरांची पट्टी >>> ?? यावरून घरपट्टी / एखाद्या खेळ पटावरील ओळ असे वाटत राहिले
(No subject)
घरांची पट्टी >>> ?? यावरून
घरांची पट्टी >>> ?? यावरून घरपट्टी / एखाद्या खेळ पटावरील ओळ असे वाटत राहिले
होय, ते तुम्ही कर लिहिल्यावर लक्षात आले.
तिथे पट्टी ऐवजी रांग / समूह शब्द योग्य आहे.
छान रचना व विश्लेषण !
छान रचना व विश्लेषण !
मजा आली
सम वातावरणात साम्य बाळगणारी
सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४)>> तारतम्य. सम अक्षरे
झालं का कोडं... छान. एकदम साठ
झालं का कोडं... छान. एकदम साठ प्रतिसाद दिसले. धागा धावतोयं. खेळायला वेळ नाही मिळाला तरी जमेल तेव्हा येऊन वाचते. त्यात सुद्धा मजा आहे बरं.
अर्र तारतम्य झाल होत का. पण
अर्र तारतम्य झाल होत का. पण मला तसच आल. खाली न पहाता.
तुमच्या सगळ्यांचे पाय ओढण्यासाठी मला एक चांगल गूढ्कूट सुचलय. पण मला सतत यायला जमत नाही. मी कधी तरी देइन. तुम्ही सोडवा पण तुमचा खेळ चालूच ठेवा.
सम वातावरणात साम्य बाळगणारी
सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४)>> तारतम्य. सम अक्षरे
विक्रमसिंह मस्त.
द्या तुम्ही गूढ कोडं.
मजा आली, सगळ्यांना धन्यवाद.
१. मी एक गंधर्व मग उलट मला
१. मी एक गंधर्व मग उलट मला बाजूला हो काय म्हणता. (३+१)
२. असेल माझा विकार उलटलेला पण बदललेला. (३)
३. हो, मी आणि तुम्ही सुद्धा इथलेच. (३, ४)
४. आहेच मी खराखुरा राजा, राजा जंगलचा (५)
५. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी दुखावते बरका. (३)
६. त्या सूर्यचंद्रीला एक टीम द्या. (३+२)
७. या केसांमधे उलटी बटवाली.
८. या अभिमानी गावचा मी पितो मात्र विलायती. (८)
मी बाकी काहिही सोलून देणार नाही. पण एक मोठ्ठा क्लू. एक सुटले की सगळे सुटेल आणि तुम्हीही सुटाल.
उत्तरे नेहमी सारखी असतीलच असे नाही. असलं गूढ्कूट दिल्याबद्दल आधिच माफी मागतो. पण जरा गंमत.
बहुतेक सगळे सुटलेय.
सगळी सुटली.
बघुया मजा आता.
८. आठ अक्षरी आहे पण. आणखी एक फरक आहे त्यात, पण तो सांगायला गेलो तर तोच मोठा क्लू होईल, म्हणुन राहू दे.
इतरांना तसेही कळेलच.
विक्रमसिंह, मस्त. दिशा कळली
विक्रमसिंह, मस्त. दिशा कळली
आणि भावना पोचली
मानव, punekarp तुम्हाला सुटलय
मानव, punekarp मस्त, तुम्ही सुटलाय, तुम्हाला सुटलय. पण मजा बघा.
मानव , धन्यवाद स्पष्टीकरण
मानव , धन्यवाद स्पष्टीकरण दिल्याबद्दल
कोणीतरी वरच्याचे उत्तर लिहा
कोणीतरी वरच्याचे उत्तर लिहा किंवा विक्रम तुम्ही येऊन उलगडा करा.
सध्या धागा अडखळलाय
उत्तरे:
उत्तरे:
१. मी एक गंधर्व मग उलट मला बाजूला हो काय म्हणता. (३+१)
१ कुमार >> कुमार१
२. असेल माझा विकार उलटलेला पण बदललेला. (३)
कारवी*
३. हो, मी आणि तुम्ही सुद्धा इथलेच. (३, ४)
मानव पृथ्वीकर साधे कोडे
४. आहेच मी खराखुरा राजा, राजा जंगलचा (५)
विक्रम सिंह साधे कोडे
५. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी दुखावते बरका. (३)
अस्मिता साधे कोडे.
६. त्या सूर्यचंद्रीला एक टीम द्या. (३+२)
अश्विनी११ साधे कोडे
७. या केसांमधे उलटी बटवाली.
केया [T]<-
८. या अभिमानी गावचा मी पितो मात्र विलायती. (८)
punekarp
८. गावची आणि पिते असे हवे.
मस्त होते हे कोडे विसिं
मस्त होते हे कोडे विसिं
अरे कसलं भारी होत हे कोड..
अरे कसलं भारी होत हे कोड...मस्त विक्रम जी...
धमाल होते !
धमाल होते !
अरे कसलं भारी होत हे कोड.....
अरे कसलं भारी होत हे कोड......+1.
धमाल होते की कोडे... लक्षात
धमाल होते की कोडे... लक्षात सुद्धा आले नाही
विक्रमसिंह , खूपच छान कोडे .
विक्रमसिंह , खूपच छान कोडे . काहीतरी मजा असेल असे वाटले होते , पण हे अनपेक्षित .
थोडे अजून कोड्याबद्दल
थोडे अजून कोड्याबद्दल
१. मी एक गंधर्व मग उलट मला बाजूला हो काय म्हणता. ...>> मला बाजूला हो काय म्हणता.>> कुमारजी तुम्हाला लोकं सर म्हणतात. :}
६. त्या सूर्यचंद्रीला एक टीम द्या. >> रविचंद्रन अश्विन - अश्विनी११
मला वाटल होत सगळ्यांनाच येइल. पण सगळ्यांना मजा तर आली ना.
८. गावची आणि पिते असे हवे. : ओके सॉरी. punekarinp.
मानव आणि punekarp अभिनंदन.
मानव आणि punekarp अभिनंदन. तुम्हाला लगेच सुटल. पहिला शब्द कोणता आला. एक उत्सुकता म्हणून विचारतोय.
सर म्हणतात हे लक्षात नव्हते
सर म्हणतात म्हणून बाजूला हे लक्षात नव्हते आले. छान.
Pages