शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by केया on 2 February, 2021 - 09:55 >>>
धन्यवाद केया. सोडवत गेले की सरावाने येत जाईल.
एक दुरूस्ती फक्त --- शूळपाणि, पाणी नव्हे. पाणी = प्यायचे; पाणि = हात तसेच शूळ = भाला, किंवा वेदना
म्हणून शोधसूत्रातल्या २ अर्थांना मिळून एक शब्द शूळपाणि.

विलायती वस्त्र म्हणजे grass >>>>
३ हे शोधसूत्र वाचण्यावर होते सगळे. म्हणून मी कन्या ओळखा सांगत होते.
भाग १ --- थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य ---
(कोणीतरी = चंद्र) सूर्याला थोडासा ओलांडून थांबलाय = खंडग्रास ग्रहण स्थिती

भाग २ ---- थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर ---
वाचताना घ्यायचे : थांबलाय + सूर्यकन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
थांबणे = खंड
सूर्यकन्या = पृथ्वी;
तिचे मखमली वस्त्र = शालू वगैरे कवितांमधून असते = गवत / हिरवळ
विलायती गवत / हिरवळ = ग्रास

क्ल्यू द्यायला मला काही प्रॉब्लेम नसतो. शेवटी खेळ आहे ना परीक्षा नव्हे. ३ तासाची मुदत येते ते लिहा नि पेपर टाका.
मागेपुढे, चूक-बरोबर, हे की ते करत असताना अचानक उत्तर हातात आल्यावर 'येस्स' वाटते त्या मजेसाठी कुछ भी. Happy

सुधारित अक्षरसांगड खेळ

खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे १३ मराठी शब्द बनवा. अशा प्रत्येक शब्दात ‘ह’ हे अक्षर असलेच पाहिजे. त्यापैकी निदान ४ पाच अक्षरी आणि १ चार अक्षरी असावेत.
खेळ सादर केल्यापासून ४ तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.

उ ग र
अ ह प
ण र्व दा
क न सो

लक्षात ठेवा : प्रत्येक शब्दात ‘ह’ हवेच.

कारवी , छान रचले होते कोडे . मी पण वाचनमात्र होते 2 दिवस . कारण अशी उकल करणे मला अजून जमत नाही . त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण दिल्यावर असा विचार करायचा हे समजले .

अश्वीनी, मी पण वाचनमात्र असते मजा येते .
पाच अक्षरी : सोदाहरण , उदाहरण , गर्वहरण , अपहरण
चार अक्षरी : दाहपर्व , हकदार
तीन अक्षरी : पहर, नहर, कहर, हरण, दाहक , गहन, हरदा,सोहदा, सोहन,

मं ता,
छानच.
फक्त ..
हरदा,सोहदा, सोहन, ही विशेष की सामान्यनामे ?
विशेष असल्यास आपण घेत नाही.

उ ग र अ ह प
ण र्व दा क न सो
उदारहण, सोदारहण, अपहरण , गर्वहरण
दाहपर्व, दाहकर, दाहकपण, हकदार
हरण, दाहक, गहन, नहर, पहर
(सोहन ?)

छान.
सोहन विशेषनाम.
दाहकर ?
दाहकपण >>> की पणा असते ?
दाहक हेच विशेषण असल्याने त्याला अजून पुढे ...कर इ. लावत नसावेत.
संदर्भ असल्यास जरूर सांगा.

रानी, स्वागत.
तुम्ही पुन्हा तपासा. तुमच्या शब्दांत न दिलेली अक्षरे आलीत.
जेवढी आणि जशी अक्षरे दिलीत तशीच घ्यायची असतात.
परिवहन,रसग्रहण.... रि, ग्र ... हे दिलेले नाहीत.

बाकी सगळे शब्द आलेले आहेत.
दाहकर, उरदाह सुचलेत.
सोनहरण = कांचनमृग या अर्थी ( असाच स्वरचित लिहीलाय, संदर्भ शोधला नाही)
उरदाह = रागाने होणारी मनाची लाही, हृदयसंताप (काव्यात) किंवा heart burn, acid reflux चा त्रास (वैद्यकीय).

बाकी, बहुतेक असे असावे ---
ते दाहकपण, तो दाहकपणा, ती दाहकता --- वाक्याच्या गरजेनुसार घ्यायचे.

दाहक = दाह उत्पन्न करणारा असा कोणी जो स्वतःसुद्धा उष्ण / तीक्ष्ण आहे ( सूर्य, अग्नी, आम्ल).
दृश्य / बाह्यपरिणाम. चटका करपणे भाजणे या स्वरूपात.

दाहकर = दाह उत्पन्न करणारे असे काही जे अंगभूत उष्ण (तापमान) नाही पण परिणामाने उष्णता, जळजळ, रसरस निर्माण होते. अंतर्गत परिणाम. जो जाणवतो. मोजता येत नाही. दिसत नाही. (हल्ली दिसतो ग्राफी / स्कोपीमुळे)
मिरची, तंबाखू, मद्य, चहा, मानसिक ताण, प्रेमभावना, बाहेर न जाणवणारा ताप इत्यादि --- अति झाले की दाहकर ठरतात. मिरची कापल्यावर होणारी हाताची भगभग, भाजताना / कुटताना नाका-डोळ्याला होणारा त्रास.

छान आहेत.
दाहक हे नाम व विशेषण दोन्ही आहे.
अजून २ तासांनी माझी अतिरिक्त यादी व समारोप.

सर्वांनीच ५ अक्षरी उत्तम ओळखले.
माझे अतिरिक्त (अर्थासह) :

हरप (अक्षर)
दाहन (दहन)
हरक (चोर)

(रत्नाकर व बृहदमधून)
.....
धन्यवाद !

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
शोधसूत्र : सुशिक्षिताचा छंद
............................

ईशस्तवनासाठी
ग्रहमालेबाहेरच्या
विसंगतीनुरूपता

सत्तीअठ्ठीनववी
कालपुरुषाचापाय
आवाहनशून्यता

सुकरकमलाद्वारे
अनावृत्तपत्रामुळे
......................

१२३४५संग्रह?
१२पुस्तकसंग्रह?

मानव,
एक्दम मस्त !
........
समाप्त.

गूढ शब्दकोडी: उत्तरासोबत / नंतर थोडक्यात स्पष्टिकरण अपेक्षीत.

१. गाभ्यामागे बकरा ठेवल्यास येणारा प्राणी? (४)
२. पातळ बदलून ठेवलेली नजर. (३)
३. मधला नाद यमक जुळवतो. (५)
४. सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४)
५. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)
६. वायुमधील अज्ञात तारकापुंज? (३)
७. रोखठोक सूर घेउन आकाशाभोवती केलेली पिरपिर. (४)
८. एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस दिलेला क्रमांक. (३)
९. हातात प्रत्येकवेळी सकस पदार्थ. (४)
१०. कामाला पर्याय देणारा कीटक? (३)

9 कसदार
कर हात मध्ये सदा सतत
अर्थ पौष्टिक

थोडक्यात स्पष्टिकरणाचा नमुना:
चांगले अंत:करण असणारे फुल. (३)
उत्तर: सु मन (एकाचा अर्थ सु आणि एकाचा मन मिळुन बनलेले असे समजल्या जाईल.)

सवलतीत सूर द्या खूप वेगात. (३)
उत्तर: सु(सा)ट (सुट मध्ये सा हे समजल्या जाईल)

मला माळा (३)
उत्तर: मजला (श्लेष)

श्वान रमे साय घुसळुनी (४)
उत्तर: सारमेय* (* = अक्षरांची अदलाबदल हे समजले जाईल.)

9 कसदार
कर हात मध्ये सदा सतत
अर्थ पौष्टिक
Submitted by punekarp on 3 February, 2021 - 14:55

२. पातळ बदलून ठेवलेली नजर. (३) >> पाळत (नजर, अक्षरपालट)
नवीन Submitted by कुमार१ on 3 February, 2021 - 14:55

1) अजगर ? अज - बकरा , गाभा - गर
नवीन Submitted by अश्विनी११ on 3 February, 2021 - 14:56

वरील सर्व बरोबर ! छान!

3 मध्यममार्ग
मधला नाद म (सात स्वरांमधला)
मध्य मार्ग हे यमक

४. सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४)>> भेद + भेद (सम) = भेदाभेद >>
नाही. एका शब्दाला काना जरी द्यायचा असेल तर तशी सूचना शोधसूत्रात असेल.

3 मध्यममार्ग
मधला नाद म (सात स्वरांमधला)
मध्य मार्ग हे यमक

Submitted by punekarp on 3 February, 2021 - 15:02
१०. कामाला पर्याय देणारा जीव. (३) >>> श्रमिक
श्रम = काम

नवीन Submitted by कुमार१ on 3 February, 2021 - 15:07
नाही.
तिन्ही मध्ये दिशा चुकतेय.

Pages