मी गेले काही महिने मी सातत्याने शेअर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कालावधी साठी गुंतवणूक कशी करावी या विषयी वाचन आणि अभ्यास करत आहे. सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक कशी आणि कुठे करावी. त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे चांगले fundamental असलेली कंपनी अभ्यास करून निवडणे आणि त्यात दर महिन्याला काही रक्कम टाकत राहणे. पण स्ट्रॉंग fundamental असलेली कंपनी निवडणे आणि त्यात उतार चढाव होत असताना संयम बाळगून शांत बसून राहणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही.
मग माझ्या सारख्या fundamental analysis चा गंध नसलेल्या माणसाला जे काही पर्याय शिल्लक राहतात त्यातला well known म्हणजे म्युच्युअल फंड. आजमितीला भारतात साधारण ८६५ म्युच्युअल फंड ( Equity+debt+hybrid, ETFs not included) आहेत. त्यातले फक्त ४९७ फंड्स १० वर्षांपेक्षा जुने आहेत. जर ९ सप्टेंबर २०२० रोजी चा डेटा पाहिला तर गेले दहा वर्षे अस्तित्वात असलेल्या ४९७ फंडस् पैकी फक्त १९० फंडस ने निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. म्हणजे आता परत कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा याचा सुदधा अभ्यास करणे आले. पण परत एवढे कष्ट माझ्याच्याने होत नाहीत आणि माझ्याकडे तेवढे ज्ञान पण नाही.
यावर काय करता येईल हे शोधत असतानाच मी Nifty Indices ची वेबसाईट पाहात होतो. तो पर्यंत मला निफ्टीच्या broad based indices आणि sectoral indices विषयी थोडीफार माहिती होती पण strategy indices विषयी काहीच माहिती नव्हती. ती वेबसाईट नीट पाहताना मला लक्षात आले कि त्यातल्या काही इंडेक्सने कित्येक म्युच्युअल फंड पेक्षा आणि निफ्टी ५० सारख्या broad based indices पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. पण आपलया सारख्या कमी भांडवल असणाऱ्या, SIP करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदाराला जर इंडेक्स मध्ये गतवणूक करायची असेल ईंडेक्स फंड किंवा ETF हवेत. पण आजमितीला भारतात इंडेक्स फंड आणि त्यात पण ETF फार कमी आहेत. शिवाय जे फंड आहेत ते मुख्यतः broad based indices वर आधारित आहेत. Sectoral किंवा thematic फंड फारच कमी आहेत.
हा सगळा अभ्यास मी साधारण जुलै मध्ये केला तेव्हाच्या डेटा नुसार आलेले रिटर्न्स खालील प्रमाणे.
यातील काही इंडेक्स या रीसेंटली लाँच केलेल्या आहेत. पण NSE वर दिलेल्या डेटा नुसार वरील प्रमाणे रिटर्न्स मिळतात.
यातील
1. Nifty FMCG
2. Nifty Consumer Durable Goods
3. Nifty Alpha 50
4. Nifty 100 Alpha 30
5. Nifty Alpha Low Volatility 30
या indicesने सातत्याने निफ्टी ५०, आणि मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.
या ५ इंडेक्सचे निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्स्ट ५० यांच्यासोबत तुलना केल्यास फरक लगेच लक्षात येतो.
यातील 1. Nifty FMCG 2. Nifty Consumer Durable Goods या दोन Sectoral indices आहेत. त्या मी थोडावेळ बाजूला ठेऊन फक्त Strategy Indices वर लक्ष केंद्रित केले. कारण त्यात आपल्याला अपेक्षित असे diversification मिळते. त्यांचे गेल्या १५ वर्षातील प्रत्येक वर्षाचे रिटर्न खालील प्रमाणे. यात Nifty Alpha 50, Nifty 100 Alpha 30 यांचा drawdown जास्त आहे. पण Nifty Alpha Low Volatility 30 हि बऱ्यापैकी स्टेबल इंडेक्स आहे.
ईंडेक्स फंड मध्ये आणि त्यात पण Nifty Alpha 50, Nifty 100 Alpha 3, Nifty Alpha Low Volatility 30यात गुंतवणूक करणे म्युच्युअल फंड पेक्षा जास्त सुरक्षित आहे, असे माझे मत झाले आहे.
पुढच्या भागात आपण Sectoral आणि काही strategic इंडेक्सचे थोडे जास्त विश्लेषण करू.
मागच्याच महिन्यात ICICI Prudential ने Nifty Alpha Low Volatility 30 वर ETF लाँच करून माझा बराच त्रास वाचवला आहे. त्यात तर मी गुंतवणूक सुरु केलीच आहे आणि आता मी बाकी इंडेक्सवर आधारीत फंड किंवा ETF लाँच वाट बघतोय होण्याची वाट बघत बसलो आहे.
Why Warren Buffett says index funds are the best investment
https://www.cnbc.com/2018/01/03/why-warren-buffett-says-index-funds-are-...
नोट:- इंडेक्स वरील सर्व analysis , रिटर्न्स हे १६ जुलै च्या दिवसाअखेर केले आहेत.
माहितीचा स्रोत:-
https://www.niftyindices.com/ वरील डेटा आणि ईतर माहिती.
Disclaimer:-
मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वरील सल्ल्यावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
व्वा, चांगला अभ्यासपूर्ण लेख.
व्वा, चांगला अभ्यासपूर्ण लेख.
अभ्यासपुर्ण लेख !
अभ्यासपुर्ण लेख !
चांगला माहितीपूर्ण लेख
चांगला माहितीपूर्ण लेख
चांगली माहिती.
चांगली माहिती.
नुकतीच SIP आणि MF मधे
नुकतीच SIP आणि MF मधे गुंतवणूक चालू केली आहे. त्यामुळे खूप उपयोगी धागा.
धन्यवाद आणि पुभाप्र.
इंटरेस्टिंग माहिती. निफ्टि
इंटरेस्टिंग माहिती. निफ्टि इंडेक्स फंड जन्माला आला तेव्हा त्यात इन्व्हेस्ट केले होते. सेक्टरल इंडायसेस पाहिले जातात. सेक्टर फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेन्ट केली आहे. पण हे लो व्होलॅटिलिटी , अल्फा इ. स्ट्रॅटेजी इंडायसेस माहीत नव्हते.
खूप चांगली माहिती.
खूप चांगली माहिती.
अभ्यासपूर्ण लेख.
अभ्यासपूर्ण लेख.
चांगली माहिती.
चांगली माहिती.
चांगली माहिती . जर index
चांगली माहिती . जर index etf नसेल तर प्रत्येक stock घ्यावा लागेल का?
जर index etf नसेल तर प्रत्येक
जर index etf नसेल तर प्रत्येक stock घ्यावा लागेल का?>>>>>>>
हो.
Index ETF किंवा fund नसल्यास त्यातील प्रत्येक स्टॉक Index मधल्या त्याच्या weightage प्रमाणे घ्यावा लागेल.
अजून खणून पाहिले तर volume
अजून खणून पाहिले तर volume कमी आहे त्यावर काय म्हणणे आहे ? लागले तर विकले जातील का?
सध्याचा व्हाॅल्यूम बघता
सध्याचा व्हाॅल्यूम बघता त्यात niftybees, bankbees सारखे शाॅर्ट टर्म ट्रेडिंग करता येणे अवघड आहे.
Index Investing, long term investment, SIP या कमीत कमी पाच ते सात वर्षाच्या कालावधीसाठी नियोजन करून करायला हव्यात.
लागले तर विकले जातील का?>>>>> लागले तर म्हणजे?
कशासाठी लागणार असतील, लागू शकतील, कोणत्या तरी ऊद्देशाने साठवलेले जे पैसे असतील, ते मार्केट मधे टाकणे रिस्की आहे. शेअर्स मधील पैसा आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा, हवा तेवढा रिटर्न देईल याची काही शाश्वती नाही.
लागले तर म्हणजे नफा दिसतो आहे
लागले तर म्हणजे नफा दिसतो आहे तो काढण्यासाठी. बाकी उद्देश असणारे फंड वेगळे आहेत ते तसेच राहातील. जास्तीचे पैसे यात गुंतवणूक करणार.
बाकी या प्रकाराबद्दल बिलकुल माहिती नव्हती त्यामुळे परत एकदा धन्यवाद.
नफा दिसतो आहे तो काढण्यासाठी>
नफा दिसतो आहे तो काढण्यासाठी>>>>
ईतक्या लवकर या ETF मधे ईतका व्हॉल्युम येईल असे वाटत नाही. काही महिने/ वर्षे वाट बघावी लागेल असे वाटत आहे.
NSE ने ऑगस्ट मधे Nifty 200
NSE ने ऑगस्ट मधे Nifty 200 Momentum 30 ही index लाँच केली आहे.
त्याचा २००५ पासूनचा डेटा उपलब्ध करुन दिलेला आहे. मी बाकी indices चे रिटर्न १६ जुलै च्या बंद भावावर मोजले होते त्यामुळे याचे ही त्याच तारखेला मोजून पाहिले.
चांगले रिटर्न आहेत.
UTI Mutual Fund ने लगोलग यावर ETF लाँच करायची तयारी केली आहे.
https://www.thehindubusinessline.com/markets/stock-markets/uti-mutual-fu...
यात केलेली गुंतवणूक पण जास्त फायदेशीर ठरु शकेल.
अल्फा ३० , अल्फा ५० आणि
अल्फा ३० , अल्फा ५० आणि मूमेंटम ३० चं लॉजिक काय आहे?
मागच्या मंदीत फार्मा आणि आय टी सेक्टर चांगली कामगिरी करत होते. आताही तेच चित्र आहे.
अल्फा:- Jason's Alpha.
अल्फा:- Jensen’s Alpha. https://www.investopedia.com/terms/j/jensensmeasure.asp
Nifty 100 Alpha 30:- Nifty 100 मधले जास्त अल्फा असलेले ३० स्टॉक्स.
Alpha 50:- NIfty मधले सर्वात जास्त अल्फा असलेले ५० स्टॉक्स.
NIfty 200 Momentum 30:- Nifty २०० मधले ईंडेक्स पेक्षा जास्त रिटर्न असणारे ३० स्टॉक्स.
मागच्या मंदीत फार्मा आणि आय टी सेक्टर चांगली कामगिरी करत होते. आताही तेच चित्र आहे.>>>>
मागच्या मंदीत मी मार्केट मधे नव्हतो. पण प्रत्येक सेक्टरची cycle असते. ती ओळखता आली तर नक्कीच चांगले रिटर्न मिळू शकतात. निफ्टीच्या sectoral indices पाहिल्या तर हे लगेच लक्षात येते. प्रत्येक सेक्टरने विशिष्ठ कालावधीमधे चांगले रिटर्न दिले आहेत. पण ह्या cycles माझ्या सारख्या नवख्या आणि छोट्या गुंतवणूकदाराला ओळखता येणे अवघड आहे. म्हणून जर अश्या Index Investment केल्या तर आपोआप जे स्टॉक्स/ सेक्टर ईंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत त्यात गुंतवणूक केली जाते.
धन्यवाद.
धन्यवाद.
मी खूप आधी अनेक सेक्टर फंड्समध्येही इन्व्हेस्ट केले आहे. त्यामुळे सायकल्सचा फायदा घेण्यासाठी एका सेक्टरमधून दुसरीकडे उड्या मारत नसे. फक्त बॅलन्सिंग करत असे. त्यामुळे उलट प्रॉफिट बुकिंग आणि बॉटम पिकिंग होई.
शेअर ट्रेडिंगमात्र सेक्टर स्पेसिफिक केले होते.
https://www.loksatta.com/desh
छान
उत्तम लेख.
उत्तम लेख.
माझा एक प्रश्न आहे. एन. पी .एस. सुद्धा इंडेक्स फंड समजावा काय?
त्याचे होल्डींग आणि एक्स्पेंस रेशो बघितल्यावर तरी तसंच वाटतं.
माफ करा मी नवखा असल्याने हि
माफ करा मी नवखा असल्याने हि शंका साधी वाटू शकते. आपण नमूद केलेला icici pru चा अल्फा लो वोलॅटिलिटी 30 हा etf आहे कि etf फंड आहे ? म्हणजे ha niftybees प्रमाणे मार्केट मधून घ्यावा लागतो कि इंडेक्स फंड प्रमाणे ?
एन. पी .एस. सुद्धा इंडेक्स
एन. पी .एस. सुद्धा इंडेक्स फंड समजावा काय?>>>
तुम्ही पेंशन फंडस बद्दल बोलत आहात का?
icici pru चा अल्फा लो
icici pru चा अल्फा लो वोलॅटिलिटी 30 हा etf आहे कि etf फंड आहे ? म्हणजे ha niftybees प्रमाणे मार्केट मधून घ्यावा लागतो कि इंडेक्स फंड प्रमाणे ?>>>>>
ICICIALPLV हा niftybees सारखा etf आहे. मार्केट मधून घेता येतो.
एका वेळेस १८००० युनिट्स घ्यायची तयारी असेल तर AMC कडून डायरेक्ट घेता येतील.
New White paper by Nifty
New White paper by Nifty
Nifty Alpha Low Volatility 30:- https://www.niftyindices.com/docs/default-source/indices/nifty-alpha-low...
Nifty 200 Momentum 30:- https://www.niftyindices.com/docs/default-source/indices/nifty200-moment...
to purchase icici pru alpha
to purchase icici pru alpha vol 30 did we need DEMAT account? this is not showing in ICICI MF website...
to purchase icici pru alpha
to purchase icici pru alpha vol 30 did we need DEMAT account?>>>
Yes.
this is not showing in ICICI MF website...>>>>
https://www.icicipruamc.com/mutual-fund/other-funds/icici-prudential-alp...
फार चांगली माहिती.
फार चांगली माहिती. अभ्यासपूर्ण लेख.
आपShare मार्केट बद्धल पण लिहिता का ?
मी Nifty Alpha Low Volatility
मी Nifty Alpha Low Volatility 30 आणि Mirae Large Cap या दोघान्मध्ये तुलना केल्यानन्तर दिसून आल कि गेल्या वर्षि Alpha Low Volatility 30 या Index चा Return कमी आहे. आपण यावर प्रकाश टाकावा.
आपShare मार्केट बद्धल पण
आपShare मार्केट बद्धल पण लिहिता का ?>>>
नाही.
मी Nifty Alpha Low Volatility 30 आणि Mirae Large Cap या दोघान्मध्ये तुलना केल्यानन्तर दिसून आल कि गेल्या वर्षि Alpha Low Volatility 30 या Index चा Return कमी आहे. आपण यावर प्रकाश टाकावा.>>>>
माझा कल शक्यतो ५ ते १० वर्षाचे रिटर्न बघण्याकडे असतो. फार कमी म्युच्युअल फंड्सनी Nifty Alpha Low Volatility 30 पेक्षा जास्त परतावा दिला आहे. काही म्युच्युअल फंड्स शॉर्ट आणि लाँग टर्म मधे म्युच्युअल फंड्स पेक्षा जास्त परतावा देतीलही, पण तरीही मी ईंडेक्स मधेच गुंतवणूक करेन. का त्याची कारणे मी दुसर्या भागात विस्तृतपणे लिहिली आहेत.
Pages