
मी गेले काही महिने मी सातत्याने शेअर मार्केट मध्ये वेगवेगळ्या कालावधी साठी गुंतवणूक कशी करावी या विषयी वाचन आणि अभ्यास करत आहे. सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने दीर्घकालीन गुंतवणूक कशी आणि कुठे करावी. त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे चांगले fundamental असलेली कंपनी अभ्यास करून निवडणे आणि त्यात दर महिन्याला काही रक्कम टाकत राहणे. पण स्ट्रॉंग fundamental असलेली कंपनी निवडणे आणि त्यात उतार चढाव होत असताना संयम बाळगून शांत बसून राहणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही.
मग माझ्या सारख्या fundamental analysis चा गंध नसलेल्या माणसाला जे काही पर्याय शिल्लक राहतात त्यातला well known म्हणजे म्युच्युअल फंड. आजमितीला भारतात साधारण ८६५ म्युच्युअल फंड ( Equity+debt+hybrid, ETFs not included) आहेत. त्यातले फक्त ४९७ फंड्स १० वर्षांपेक्षा जुने आहेत. जर ९ सप्टेंबर २०२० रोजी चा डेटा पाहिला तर गेले दहा वर्षे अस्तित्वात असलेल्या ४९७ फंडस् पैकी फक्त १९० फंडस ने निफ्टी पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. म्हणजे आता परत कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा याचा सुदधा अभ्यास करणे आले. पण परत एवढे कष्ट माझ्याच्याने होत नाहीत आणि माझ्याकडे तेवढे ज्ञान पण नाही.
यावर काय करता येईल हे शोधत असतानाच मी Nifty Indices ची वेबसाईट पाहात होतो. तो पर्यंत मला निफ्टीच्या broad based indices आणि sectoral indices विषयी थोडीफार माहिती होती पण strategy indices विषयी काहीच माहिती नव्हती. ती वेबसाईट नीट पाहताना मला लक्षात आले कि त्यातल्या काही इंडेक्सने कित्येक म्युच्युअल फंड पेक्षा आणि निफ्टी ५० सारख्या broad based indices पेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. पण आपलया सारख्या कमी भांडवल असणाऱ्या, SIP करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदाराला जर इंडेक्स मध्ये गतवणूक करायची असेल ईंडेक्स फंड किंवा ETF हवेत. पण आजमितीला भारतात इंडेक्स फंड आणि त्यात पण ETF फार कमी आहेत. शिवाय जे फंड आहेत ते मुख्यतः broad based indices वर आधारित आहेत. Sectoral किंवा thematic फंड फारच कमी आहेत.
हा सगळा अभ्यास मी साधारण जुलै मध्ये केला तेव्हाच्या डेटा नुसार आलेले रिटर्न्स खालील प्रमाणे.

यातील काही इंडेक्स या रीसेंटली लाँच केलेल्या आहेत. पण NSE वर दिलेल्या डेटा नुसार वरील प्रमाणे रिटर्न्स मिळतात.
यातील
1. Nifty FMCG
2. Nifty Consumer Durable Goods
3. Nifty Alpha 50
4. Nifty 100 Alpha 30
5. Nifty Alpha Low Volatility 30
या indicesने सातत्याने निफ्टी ५०, आणि मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.
या ५ इंडेक्सचे निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्स्ट ५० यांच्यासोबत तुलना केल्यास फरक लगेच लक्षात येतो.

यातील 1. Nifty FMCG 2. Nifty Consumer Durable Goods या दोन Sectoral indices आहेत. त्या मी थोडावेळ बाजूला ठेऊन फक्त Strategy Indices वर लक्ष केंद्रित केले. कारण त्यात आपल्याला अपेक्षित असे diversification मिळते. त्यांचे गेल्या १५ वर्षातील प्रत्येक वर्षाचे रिटर्न खालील प्रमाणे. यात Nifty Alpha 50, Nifty 100 Alpha 30 यांचा drawdown जास्त आहे. पण Nifty Alpha Low Volatility 30 हि बऱ्यापैकी स्टेबल इंडेक्स आहे.


ईंडेक्स फंड मध्ये आणि त्यात पण Nifty Alpha 50, Nifty 100 Alpha 3, Nifty Alpha Low Volatility 30यात गुंतवणूक करणे म्युच्युअल फंड पेक्षा जास्त सुरक्षित आहे, असे माझे मत झाले आहे.
पुढच्या भागात आपण Sectoral आणि काही strategic इंडेक्सचे थोडे जास्त विश्लेषण करू.
मागच्याच महिन्यात ICICI Prudential ने Nifty Alpha Low Volatility 30 वर ETF लाँच करून माझा बराच त्रास वाचवला आहे. त्यात तर मी गुंतवणूक सुरु केलीच आहे आणि आता मी बाकी इंडेक्सवर आधारीत फंड किंवा ETF लाँच वाट बघतोय होण्याची वाट बघत बसलो आहे. 
Why Warren Buffett says index funds are the best investment
https://www.cnbc.com/2018/01/03/why-warren-buffett-says-index-funds-are-...
नोट:- इंडेक्स वरील सर्व analysis , रिटर्न्स हे १६ जुलै च्या दिवसाअखेर केले आहेत.
माहितीचा स्रोत:-
https://www.niftyindices.com/ वरील डेटा आणि ईतर माहिती.
Disclaimer:-
मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वरील सल्ल्यावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
NIFTY ALPHA QUALITY VALUE LOW
NIFTY ALPHA QUALITY VALUE LOW-VOLATILITY 30 आणि NIFTY MID SELECT या दोन इंडेक्स वरती काही फंड उपलब्ध आहे का?
पहिल्या इंडेक्स्मध्ये एकाच वेळेला ४ फॅक्टर्स मिळतात आणि ती NIFTY ALPHA LOW-VOLATILITY 30 पेक्षा चांगली परफॉर्म करते आहे.
दुसरी इंडेक्स NIFTY MIDCAP 150 पेक्षा जास्त स्टेबल आहे आणि मिडकॅपचे फायदे पण आहेत.
माधवदा,
माधवदा,
सध्या तरी या दोन्ही ईंडेक्सवर कोणतेही म्युच्युअल फंडस/ ETF दिसत नाहीत.
मी मध्यंतरी फॅक्टर/ स्मार्ट
मी मध्यंतरी फॅक्टर/ स्मार्ट बीटा ईंडेक्स व पोर्टफोलिओ वर काही पुस्तके वाचली.
त्यात सगळी कडे एक समान निष्कर्ष आहे की एकाच फॅक्टरवर आधारीत गुंतव्णूक करण्यापेक्षा मल्टिफॅक्टर पोर्ट्फोलिओ तयार केल्यास रिटर्न जास्त कमी होत नाहीत पण रिस्क बरीच कमी होते.
त्यानंतर व्हॅल्यूपिकर फोरम वर https://forum.valuepickr.com/t/factor-investing-available-passive-instru... हा लेख पण लिहिला होता.
मल्टिफॅक्टर पोर्ट्फोलिओ तयार करायचे अनेक मार्ग आहेत. पण मला किंवा सामान्य गुंतवणूकदाराला लिमिटेड कॅपिटल मधे ते सगळे करणे अवघड आहे.
त्यामुळे मी त्यातल्या त्यात चांगले risk adjusted return मिळू शकतील असा खालील चार ईंडेक्स वर आधारीत Monthly rebalanced equal weighted portfolio तयार केला आहे.
Nifty 200 Momentum 30
S&P BSE Enhanced Value Index
S&P BSE Quality index
S&P BSE Low Volatility Index
सध्या मार्केट जोमात असल्याने या पोर्टफोलिओचा CAGR 50% आहे.
त्यामुळे मी त्यातल्या त्यात
त्यामुळे मी त्यातल्या त्यात चांगले risk adjusted return मिळू शकतील असा खालील चार ईंडेक्स वर आधारीत Monthly rebalanced equal weighted portfolio तयार केला आहे. <<<>>>> म्हणजे ह्या इन्डेक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट न करता ह्यातले स्टॉक्स तुम्ही निवडले आहेत असंच ना ?
इंटरेस्टींग आहे.
म्हणजे ह्या इन्डेक्समध्ये
म्हणजे ह्या इन्डेक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट न करता ह्यातले स्टॉक्स तुम्ही निवडले आहेत असंच ना ? >>> असे करणे आपल्या सारख्या ममवला खूप कठीण आणि जास्त खर्चिक असते. इंडेक्सला फॉलो करणे म्हणजे त्यातले सगळे स्टॉक्स खरेदी करणे / विकणे. समजा इंडेक्स मध्ये ३० स्टॉक्स आहेत तर ते सगळे घावे लागतील (कमीतकमी प्रत्येकी एक) आणि यात अनेक अडचणी असतात जसे की -
१. ३० स्टॉक्स एकाच वेळी घेण्याइतके पैसे उपलब्ध नसणे. (ब्लूचिप्स असतील तर किंमत सहज लाखाच्या आसपास जाऊ शकते)
२. इतके स्टॉक्स घेण्याची प्रक्रिया कटकटीची असू शकते (आता बरेच ब्रोकर्स बास्केटची सुविधा पुरवतात. त्याने ही कटकट वाचू शकते)
३. ब्रोकरेज आणि इतर कर यांचे ओझे.
हे टाळण्याकरता सहसा इंडेक्स फंड किंवा इटीएफ यांच्यापैकी एक पर्याय निवडला जातो. दोन्ही पर्यायांचे आपापले फायदे तोटे आहेत.
@अतरंगी (तुमची आयडी बदला बुवा. मायबोलीच्या एडीटरला ती आवडत नाही
)क्रॉस एक्सचेंज इंडेक्सची तुलना कशी करता?
माधव, तुम्ही लिहीलेले सगळे
माधव, तुम्ही लिहीलेले सगळे मुद्दे मला माहिती आहेत. त्यांनी लिहीलं आहे त्यावरुन मला तसं वाटतंय
ह्या सगळ्या इन्डेक्सचा पोर्टफोलीओ पाहीला. मोअर ओर लेस स्टॉक्स सारखेच आहेत.
म्हणजे ह्या इन्डेक्समध्ये
म्हणजे ह्या इन्डेक्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट न करता ह्यातले स्टॉक्स तुम्ही निवडले आहेत असंच ना ? >>>
नाही धनश्री. मला कळालं की त्या वाक्याचे interpretation तसेही निघू शकते.
मी त्या चारही ईंडेक्स फंड्स मधे समान गुंतवणूक केली आहे.
दर महिन्याला तो equal weight रिबॅलेन्स करतो.
क्रॉस एक्सचेंज इंडेक्सची
क्रॉस एक्सचेंज इंडेक्सची तुलना कशी करता?>>>
मी खरे तर फार तुलना केलीच नाही. कारण करुन तरी काय करणार? मला BSE चा momentum based index fund उपलब्धच नव्हता.
त्यातल्या त्यात Nifty 200 momentum 30चे स्टॉक युनिव्हर्स व weightage बाकी गुंतवणूक केलेल्या ईंडेक्स फंडच्या तुलनेत कसे आहे ते पाहिले होते.
BSE च्या momentum index वर अजून कोणताच फंड नाही. तो आला की Nifty 200 momentum 30 मधली सगळी गुंतव्णूक तिकडे शिफ्ट करणार.
@अतरंगी, तुमचा व्हॅल्यूपिकर
@अतरंगी, तुमचा व्हॅल्यूपिकर वरचा लेख वाचला. स्टॉक युनिवर्स म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते नीटसे कळले नाही. मी फॅक्टर इंडेक्सची बेस इंडेक्स असा अर्थ घेतला - कारण NSE वर फॅक्टर इंडेक्सच्या बेस इंडेक्स वेगवेगळ्या आहेत. पण तो एका अर्थाने फायदाच नाही का? कारण एकच बेस इंडेक्स (समजा NIFTY 200) असेल तर त्याच त्याच २०० स्टॉक्सनाच फॅक्टरची चाळणी लावली जाईल. एखादा स्टॉक जो त्या २०० मध्ये नाहीये पण त्यात एखादा फॅक्टर खूप ठळकपणे दिसतोय तो कधीच निवडला जाणार नाही. वेगवेगळ्या बेस इंडेक्स असतील तर डायव्हर्सिफिकेशन वाढेल.
त्यामुळे तुमचे BSE Indices निवडण्यामागचे कारण समजू शकले नाही.
स्टॉक युनिवर्स म्हणजे
स्टॉक युनिवर्स म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते नीटसे कळले नाही. मी फॅक्टर इंडेक्सची बेस इंडेक्स असा अर्थ घेतला>>>>
हो, मला स्टॉक युनिव्हर्स म्हण्जेच बेस ईंडेक्स म्हणायचे आहे.
वेगवेगळ्या बेस इंडेक्स असतील तर डायव्हर्सिफिकेशन वाढेल >>>
पण त्याच सोबत overfitting ची शक्यता पण वाढेल ना माधवदा.
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला
1.Nifty 200 Momentum 30/Nifty Midcap 150 Momentum 50
2.Nifty 100 Quality 30 /Nifty Midcap 150 Quality 50 /Nifty Smallcap250 Quality 50
3.Nifty 100 Low Volatility 30
4.Nifty 50 Value 20/Nifty 500 Value 50
यातले हवे ते कॉम्बिनेशन करुन पण पोर्ट्फोलिओ बनवता आला असता. या सर्व ईंडेक्स वर फंड आहेत.
पण मग एकाच स्टॉक युनिव्हर्स मधल्या, same number of stocks असलेल्या ईंडेक्स नसल्या मुळे, त्यांनी भरपुर बॅकटेस्ट केल्या आणि त्यातल्या ज्या ईंडेक्सचा रिझल्ट चांगला मिळाला त्याच फक्त लाँच केल्या का, असा प्रश्न डोक्यात राहतो. शिवाय Nifty 50 Value 20 आणि Nifty 500 Value 50 या दोन्ही व्हॅल्यू फॅक्टर वर आधारीत ईंडेक्स असून दोन्हीच्या eligibility criteria मधे पण बहुतेक फरक आहे. आणी बॅकटेस्ट करताना मला या सर्व ईंडेक्सच्या डेटा मधे missing dates पण सापडल्या.
BSE. ने चारही फॅक्टर ईंडेक्सचा फॅक्टर्स सोडून सगळा eligibility criteria सारखाच ठेवला आहे. डेटा पण क्लीन आहे.
त्यामुळे मग मी तो पोर्ट्फोलिओ BSE factor indices वर ठेवला.
समजला तुमचा मुद्दा, धन्यवाद.
समजला तुमचा मुद्दा, धन्यवाद.
Pages