१ १/२ वाटी : पपनसाचा गर
१/२ वाटी : ओलं खोबरं
१ चमचा : बारीक कापलेली हिरवी मिरची
चवीनुसार मीठ, साखर, चाट मसाला
पपनस सोलून त्याच्या फोडीची सालं काढून गर सुटा करून घ्यावा. पपनस हे फळ संत्र्-मोसंब्याच्या जातीचं असलं तरी त्याचा गर तुलनेने टणक असतो. आपण डाळींबाचे दाणे काढतो तसे पपनसाचे दाणे रस न गळता निघतात. दिड वाटी पपनसाच्या गरात अर्धी वाटी ओलं खोबरं, बारीक कापलेली हिरवी मिरची, मीठ, साखर आणि थोडा चाट मसाला मिसळून खाण्यास द्यावे.
फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यास ह्याचा स्वाद अजूनच खुलतो.
हिरवी मिरची शक्यतो कमी तिखट आणि पोपटी रंगाची घ्यावी.
चाट मसाला घातला नाही तर ही ट्रीट उपासालाही चालेल.
तेला-तुपाच्या फोडणीशिवायचा हा पदार्थ आहे आणि शिवाय कुठलीही प्रक्रिया न केलेला त्यामुळे हेल्थ कॉन्शस लोकांसाठी अगदी योग्य न्याहारी ठरू शकेल.
मसाल्याच्या जेवणात कोशिंबीर म्हणूनही ही ट्रिट करता येईल.
मंजु मस्त
मंजु मस्त आहे ग रेसीपी. अमेरिकेमधे पपनस पमेलो (Pamelo) म्हणुन मिळते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
छान
छान
पपनस म्हणजे ग्रेपफ्रुटना?
पपनस म्हणजे ग्रेपफ्रुटना?
छान आहे.
त्याला चिकोत्रा , बंपर असेही
त्याला चकोत्रा , बंपर असेही म्हणतात
http://www.clever-storage.com
पपनस आणि ग्रेपफ्रुट फरक
ओके
ओके
मस्त! ही 'कोशिंबीर' आजी
मस्त! ही 'कोशिंबीर' आजी हरतालिकेला करायची.
पपनस = pomello
पपनस = pomelo
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
मस्त! पपनस आवडीचे. संत्रे
मस्त! पपनस आवडीचे. संत्रे मोसंबी मी खात नाही, पण पपनस त्याच्या वेगळ्या दाण्यांमुळे आवडते. पाकृमधील प्रकारही आवडेल असे वाटते.
पण खूप काळ झाला, पपनस खाल्ले नाही. तसेही आधी ही वर्षातून दोनचार वेळाच खाणे व्हायचे. त्यातही गणपतीत हमखास खाणे व्हायचे.
ईंग्लिश नावे ईथे पहिल्यांदा समजली
छान आहे!
छान आहे!
पपनस ज्याने सोललं तोच जर आतला गर काढणार असेल तर सालं काढून झाली की हात स्वच्छ धुवावेत पपनसाचं साल कडू असतं आणि हात धुतले नाहीत तर तो कडवटपणा गरात उतरतो.
ऋ +१ गणपतीत हमखास पपनस खाल्लं जायचं. गर काढून त्यात साखर घालून.
ऋ +१ गणपतीत हमखास पपनस खाल्लं
ऋ +१ गणपतीत हमखास पपनस खाल्लं जायचं. गर काढून त्यात साखर घालून.>> साखर, मीठ आणि मिरपूड टाकून......यम्मी.....
पपनसाचं साल कडू असतं आणि हात
पपनसाचं साल कडू असतं आणि हात धुतले नाहीत तर तो कडवटपणा गरात उतरतो.>>> अच्छा.लहानपणी थोडेसे खाऊन पाहिले होते,पण कडू लागले होते.
दर गणपतीत पपनस आणले जायचे आणि साखर घालून घरातले खायचे.
पपनसाचं साल कडू असतं आणि हात
डप्रकाटा.
पपनस म्हणजे ग्रेपफ्रुटना? <<<
पपनस म्हणजे ग्रेपफ्रुटना? <<< जरी सारखे असले तरी ग्रेपफ्रूट नाही.. पपनस//तोरंजन नीट सोलून गर काढता येतो.. ग्रेपफ्रूट तसे केल्यास दाणे फुटल्यामुळे गळतात...
ग्रेपफ्रूट ची सालही पपनसापेक्षा बरीच पातळ पण चिवट असते. पपनसाची साल जाड पण तितकी चिवट नसते.
बहुतेक एशियन फळांच्या दुकानात पमेलो म्हणुन मिळते..
ग्रेपफ्रूट आणि पपनस सेम नसले
ग्रेपफ्रूट आणि पपनस सेम नसले तरी चव जवळपास असते का ?
तोरंजन नीट सोल.......khoop
तोरंजन नीट सोल.......khoop वर्षानी हा शब्द ऐकला.आजी नेहमी तोरिंजिन म्हणायची.
सगळी आंबट गोड असतात
सगळी आंबट गोड असतात
मोसंबी सगळ्यात गोड आहे , लिंबू आंबट
उरलेली सगळी मध्ये कुठेतरी असतात
पपनस म्हणजे ग्रेपफ्रूट का?
.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/25746
दिनेशदा यांचा पपनस व ग्रेपफ्रुट यावर माहिती देणारा धागा सापडला.
ग्रेपफ्रूट आणि पपनस सेम नसले
ग्रेपफ्रूट आणि पपनस सेम नसले तरी चव जवळपास असते का ? >>> ग्रेपफ्रूट ची चव कडवट असते.. पपनस्/तोरंजन आम्बट/तुरट गोड लागते.
रंगानेही ग्रेपफ्रूट पेक्षा फिक्के असू शकते. आता इतक्या जाती आल्यास की रंग नक्की कसा असेल सांगता येत नाही..
अच्चा पामेलो म्हणतात का? हे
अच्चा पामेलो म्हणतात का? हे माहीत नव्हते मला पपनस म्हणजे पपई वाटे
काय मस्त रेसिपी आहे.