राष्ट्र म्हणजे त्याच्या लोकांच्या मनात असलेल्या चांगल्या जीवनासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव. देश त्यांच्या लोकांनी घेतलेल्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य निर्णयांनी उन्नती व अवनती करतात. एखाद्या देशात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला योग्य आणि अयोग्य दोन्ही मार्ग आहे. आपण सगळे चुका करतो. अज्ञानातून किंवा समाजघातक स्वार्थातून अयोग्य मार्ग घेतला जातो. प्रत्येक अयोग्य निर्णय त्या देशाच्या प्रजातंत्रावर कर्ज चढवतो. हे कर्ज त्या अयोग्य निर्णयाला एकतर दुरुस्त करून आणि निर्णय घेणाऱ्यांचे अज्ञान असेल तर शिक्षित करून आणि समाजघातक स्वार्थ असेल तर शिक्षा करूनच परत फेडू शकतो. अन्यथा इटरेटेड प्रिझनर डिलेमा नुसार असा समाज हळू हळू रसातळाकडेच जातो. प्रत्येक अयोग्य निर्णय हे कर्ज वाढवतो आणि पुढील पिढ्यांसाठी हे कर्ज फेडणे अधिकाधिक कठीण होत जातेय.
प्रत्येक देशात अशी योग्य आणि अयोग्याची जाणीव असेलेले लोक किती आहेत यावर तो देश कुठे जाणार हे ठरते. असे लोक बहुसंख्य होणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. आजचा दिवस हा पूर्वसुरींनी घेतलेल्या चांगल्या निर्णयांना आठवायचा. ज्या काही चुका झाल्या असतील त्या समजावून घेऊन त्या दुरुस्त करायच्या दिशेने पहिले पाऊल टाकायचा.
In simple words - progression
In simple words - progression or regression of any society/country is equally proportionate to the collective consciousness & collective intelligence of it's subjects.
मला नीट कळले नाही. प्रजातंत्र
मला नीट कळले नाही. प्रजातंत्र म्हणजे काय?
प्रजातंत्र व कर्ज या दोन गोष्टीं एकमेकाला पर्याय म्हणुन आहेत का? तुम्ही दोघांना "का" ने जोडल्यामुळे नक्की काय ते कळत नाहीये.
कृपया सुधारणा करुन परत योग्य मराठीत लिहा. धन्यवाद.
हिंदी शीर्षक दिलंय. संपादित
हिंदी शीर्षक दिलंय. संपादित केले आहे
हिंदी शीर्षक दिलंय. संपादित
हिंदी शीर्षक दिलंय. संपादित केले आहे
Submitted by चिडकू on 27 January, 2021 - 11:49
>>
का बरे? मराठीत शीर्षक दिल्याने योग्य तो संदेश पोहोचणार नाही का? मराठी वेबसाईटवर हिंदीसारख्या भाषेत लिहिण्याची वेळ का यावी?
सगळ्या मराठी भाषिकांना हिंदी कळत नाही, त्यांना तुम्ही काय लिहिता ते कसे कळेल?
सगळ्या मराठी भाषिकांना हिंदी
सगळ्या मराठी भाषिकांना हिंदी कळत नाही, >>> या स्थळावर येणार्या प्रत्येकाला हिन्दी समजत असावे असे वाटते कारण ते शाळेत हिन्दी नक्की शिकले असतील.
प्रत्येक अयोग्य निर्णय हे
प्रत्येक अयोग्य निर्णय हे कर्ज वाढवतो आणि पुढील पिढ्यांसाठी हे कर्ज फेडणे अधिकाधिक कठीण होत जातेय.
>>
यात उदाहरण द्यायला हवे होते, जसे की नोटाबंदी, जीएसटी वगैरे, मग धागा धावला असता.. शीर्षक हिंदी असो वा चाईनीज
प्रत्येक देशात अशी योग्य आणि
प्रत्येक देशात अशी योग्य आणि अयोग्याची जाणीव असेलेले लोक किती आहेत यावर तो देश कुठे जाणार हे ठरते. असे लोक बहुसंख्य होणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. >>>>
असे लोक आधी होते यावर आता विश्वास राहिलेला नाही, ते भविष्यात बहुसंख्येने होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही.
कलयुग सुरू आहे, यात प्रत्येक पाऊल विनाशाकडे जाणार, सर्वच क्षेत्रात.
पुढील पिढ्यांना कर्ज
पुढील पिढ्यांना कर्ज फेडण्यासाठी शुभेच्छा.
यात उदाहरण द्यायला हवे होते,
यात उदाहरण द्यायला हवे होते, जसे की नोटाबंदी, जीएसटी वगैरे, मग धागा धावला असता.. शीर्षक हिंदी असो वा चाईनीज Happy
>>>
उद्देश पळवणे नसून शांत बसून विचार करणे आहे. पण खरंय हे विषय आले कि लोक तुटून पडतात.
असे लोक आधी होते यावर आता विश्वास राहिलेला नाही, ते भविष्यात बहुसंख्येने होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही.
कलयुग सुरू आहे, यात प्रत्येक पाऊल विनाशाकडे जाणार, सर्वच क्षेत्रात.
>>>
सध्याची परिस्थिती पाहता प्रयत्न करावे कि नाही हाच प्रश्र्न पडतो. देवाने अवतार घ्यावा असे वाटणे याच अगतिकतेमधून वाटतंय.
पुढील पिढ्यांना कर्ज फेडण्यासाठी शुभेच्छा.
>>>
खरंच शुभेच्छांची गरज आहे!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाचा आणि लष्करी
प्रजासत्ताक दिनाचा आणि लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी परेडचा काय संबंध आहे हे आजवर समजलेले नाही. १४ जानेवारीला आर्मी डे असतो. तो का नाही सेलिब्रेट केला जात ?
प्रजासत्ताक दिनी प्रजेची सत्ता आली आहे हे दाखवणारे कार्यक्रम असायला हवेत ना ?
अगदी योग्य प्रश्न
अगदी योग्य प्रश्न.
प्रजासत्ताक नाव असले म्हणजे प्रजेची सत्ता असते हे साफ चूक आहे.
सैन्य दल ,आणि सशस्त्र दल ह्यांच्या जीवावर राज्य करता येते सत्ता गाजवता येते.
म्हणून सैन्य प्रदर्शन असते
सैन्य दल ,आणि सशस्त्र दल
सैन्य दल ,आणि सशस्त्र दल ह्यांच्या जीवावर राज्य करता येते सत्ता गाजवता येते. >>> हे प्रजासत्ताकाच्या बरोब्बर उलटे होईल
सैन्याच्या जीवावर युद्धात देश/स्वातंत्र्य अबाधित ठेवता येते. पण सत्ता गाजवायला/चालवायला सैन्य वापरत नाहीत. भारतात सत्ता राबवण्यात सैन्याचा वापर करत नाहीत.
फिबांचा प्रश्न बरोबर आहे. आता एक प्रथा म्हणून ती छान वाटते. पण त्याचे मूळ काय आहे माहीत नाही. विकीवरही जरा अगम्य माहिती आहे.