
त्रिभंग - स्टार्रींग काजोल - तन्वी आझमी - मिथिला पालकर
त्रिभंग - माझ्या आईने पाहिलेला काजोलचा शेवटचा(?) चित्रपट
कुठे बघाल - नेटफ्लिक्स
स्पॉईलर अॅलर्ट - चित्रपटाची स्टोरी नाही पण त्यातल्या शिव्या लेखात ऊघड केल्या आहेत!
नवीन वर्षाचे संकल्प केल्याप्रमाणे सध्या रोज रात्री पुर्णी फॅमिली मिळून एखादा चित्रपट बघतो. मुलगी सोबत असेल तर तिच्या आवडीचा चित्रपट बघितला जातो. ती जागी नसते तेव्हा तिने बघायला नको पण आपल्याला बघायचाय असा चित्रपट बघितला जातो. आज ती झोपली असल्याने बायको म्हणाली तांडव लाऊया. पण आई जागी होती. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्याच्या वेब सिरीजमध्ये शिव्यांचा किती सुकाळ असतो. तो देखील बरेचदा अनावशयक. त्यामुळे तांडवला नकोच म्हटले.
पण मग बघायचे काय? दर रोज दर रात्री आमचा अर्धा तास काय बघायचे या चर्चेतच जातो. म्हणून मग मीच पटकन त्रिभंग सुचवला. आज फेसबूकवर काही फेमिनिझम जपणार्या महिलांकडून याची चर्चा ऐकली होती. म्हटले काही नाही तर यावर मायबोलीवर धागाच काढता येईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काजोल माझ्या आईची आणि एकूणच आमच्या घरात शाहरूख ईतकीच आवडीची हिरोईन आहे. तसेच ती आहे तर चित्रपटात फुकटच्या फाकट शिव्या नसणार याची खात्री होती. म्हणूनच लावला आणि फकलो !
म्हणजे सुरुवातीच्या एका दृश्यात तीने ड्रायव्हरच्या शेजारी बसून भोसडीके शिवी घातली ती फ्लो मध्ये आईला कळली नाही. पण नंतर कोमामध्ये गेलेल्या आपल्या आईला बघायला ती हॉस्पिटलला जाते तिथे बयेने "फ" ची बाराखडीच सुरू केली. फक, फकर, झाटू, चुतिये, आलटून पालटून दर दुसर्याही नाही तर दर वाक्यात शिवी गुंफत गेली आणि माझ्या आईला ईथे जेवताना दर दुसर्या नाही तर दर घासाला ठसके बसू लागले. ईथे आमची पोजिशन ऑकवर्ड. अरे देवा, मध्येच हे काजोलचे काय रुप दाखवले हिला. उगाच आईच्या मनातील अंजलीच्या आठवणी तुरट झाल्या असतील.
आईने चपात्या संपवल्या आणि भात खायला आत गेली. म्हटले झाले, आईला बघवल्या नाहीत काजोलच्या तोंडी शिव्या. पण पिक्चर तिला आवडला होता. जनरली बायकांच्या स्टोरया बायकांना आवडतात. त्यामुळे भात संपवून आली पुन्हा बघायला. एका अर्थी बरेच झाले, आमचा ऑकवर्डनेस आणि आलेले गिल्ट जरा कमी झाले.
काजोलचे मात्र चालूच होते. नवर्याला शिवी देते, आईला शिवी देते, येणार्या जाणार्यांना शिवी देते. जो डिजर्व्ह करतो त्यालाही देते, जो नाही करत त्यालाही देते. रागाने देते, प्रेमाने देते. आणि मग एका दृश्यात काजोल आपण ईतके फकफकाट का करतो याचे सुंदर विश्लेषण करते. ताजमहाल समोर उभे राहून लव्ह बोलण्यापेक्षा फक बोलणे कसे रोमांचकारी आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यातही लव्ह पेक्षा फक कसे जास्त महत्व राखून आहे हे समोरच्या सहकलाकाराला पटवून देते. हे करताना देखील ती आपली फक बोलायची हौस वीस-बावीसवेळा त्या शब्दाचा उल्लेख करून भागवून घेते. गंमत म्हणजे ज्या सहकलाकाराला हे पटवते तो शिवीला अपशब्द आणि स्माईलला मुस्कुराईये बोलणारा तहजीबप्रेमी दाखवला आहे. त्याचे खरे नाव मला माहीत नाही, चित्रपटातलेही आठवत नाही, कारण अख्खा चित्रपट काजोल त्याचा उल्लेख झाटू असाच करते. गंमत म्हणजे क्लायमॅक्सला तो देखील काजोलसारखेच फक बोलत तिला सहभागी होतो आणि तिथेच या चित्रपटाचा शेवट होतो.
बाकी या शिव्यांच्या जोडीला जी तीन स्त्रियांची कहाणी दाखवलीय ती मला छान वाटली. म्हणजे फेसबूकवर जे उगाच काही बायकांनी यातल्या फेमिनिझमवर हल्लाबोल केलेला ती चर्चा चुकीची वाटली. पण हल्ली हे आढळतेच. प्रत्येकीची आपली एक बिनधास्त स्वतंत्र आयुष्य जगायची फेमिनिझमची व्याख्या असते आणि तीच सर्वांची असावी असा हट्ट आढळतो. त्यामुळे मी तरी चित्रपट बघताना यातल्या बायकांचे फेमिनिझम काय दाखवलेय, तेच योग्य की अयोग्य याचा विचार न करता त्यांना एक स्वतंत्र कॅरेक्टर म्हणूनच बघितले आणि चित्रपट आवडला. विशेष म्हणजे जिथे संपायला हवा असे मला वाटले तिथेच तो संपला.
काजोलच्या शिव्या थोड्या कमी चालल्या असत्या, तिला ड्रेसेस जरा आणखी चांगले दिलेले आवडले असते, ती लाऊड जरा कमी झाली असती तरी रुचली असती पण कदाचित तीच तिची स्ट्रेंथ असल्याने तिने त्यावरच बॅटींग केली असावी.. तन्वी आझमीला जरा जास्त बघायला आवडले असते, चित्रपट आणखी अभिनयसंपन्न झाला असता. मिथिला पालकरचा वावर नेहमीच सुखावतो, ती जेवढी दिसेल तेवढ्यातच मी सुख मानून घेतो. ईथेही तिने निराश नाही केले.
तीनही महिलांचे आपल्या मराठी मायबोलीशी कनेक्शन आहे हि चर्चा चित्रपट बघताना करणे कंपलसरी आहे, आम्हीही ती केली. चित्रपटात आलेले सारेच मराठीचे संवाद चांगले वाटले. काजोलच्या भावाच्या भुमिकेतही वैभव तत्ववादी या मराठी कलाकाराला घेतलेले. हिंदी चित्रपटात मराठी मालिकांतला ओळखीचा कलाकार दिसला की आमच्या आईला फार आनंद होतो. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच शिव्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या आईने चित्रपट पुर्ण बघितला. हा चित्रपट रेणुका शहाणेचा आहे हा शोध आम्हाला शेवटीच लागला. सर्व मराठी माणसांनी एकदा बघायला काही हरकत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
तेवढे ते त्रिभंगचा अर्थ कोणाला माहीत असेल तर सांगा. म्हणजे एका दृश्यात काजोल आपल्या आईला अभंग, मुलीला समभंग, आणि स्वत:ला सेक्सी त्रिभंग म्हणवते. पण त्यातून झाट काही कळले नाही
आईला अभंग, मुलीला समभंग, आणि
आईला अभंग, मुलीला समभंग, आणि स्वत:ला सेक्सी त्रिभंग म्हणवते. - ह्या ओडीसी नृत्यातील स्थिती (पोझेस, पोश्चर्स) आहेत. ती ओडीसी नृत्यांगना असते म्हणून त्या उपमा देते व त्यातून आईचा, मुलीचा व स्वतःचा स्वभाव/मानसिकता दर्शवते.
https://www.youtube.com/watch?v=uTB3EHxRWBM
लिस्ट ऑलरेडी फुगत चाललीय.
लिस्ट ऑलरेडी फुगत चाललीय.
नंतर बघितल्यावर येईन इकडे.
ह्या ओडीसी नृत्यातील स्थिती
ह्या ओडीसी नृत्यातील स्थिती (पोझेस, पोश्चर्स) आहेत. ती ओडीसी नृत्यांगना असते म्हणून त्या उपमा देते व त्यातून आईचा, मुलीचा व स्वतःचा स्वभाव/मानसिकता दर्शवते.>>
बरोबर
त्रिभंगचा शब्दश: अर्थ होतो. तीन ठिकाणी भंगलेले. ओडिसी नृत्य करताना नर्तकी शरीर तीन ठिकाणी मान्, कमर आणि गुडघे वाकवून जी स्थिति घेते त्याला त्रिभंग म्हणतात. (ओडिसी नृत्य शिकत असताना गुरुजी (केलूचरणजी) मात्र त्रिभंग ही मानवी मनाची सहज स्थिती आहे असे सांगत असंत)
बोलताना फकफकाट केला नाही तर
बोलताना फकफकाट केला नाही तर नेफ्लि, prime वगैरे लोक चित्रपट/मालिका दाखवत नाहीत म्हणे.
अपल्या सेन्सॉरच्या एकदम उलटे असते तिकडे... आपले सेन्सॉर आवश्यक तेही कापते आणि तिकडे अनावश्यक तेही दाखवतात.
15 ला तांडव पाहिला. त्यात विद्यार्थीनी, प्रोफेसर, कॉलेज डीन आणि तिच्या सोबतचा राजकीय नेता या चौघांचीही भाषा एकच, तीच ती- फकाफकाटी.... निदान चाळीशीचा प्रोफेसर व त्याची पूर्व पत्नी व आताची डीन पदाला शोभेशी भाषा वापरतील ही अपेक्षा होती.
बहुतेक सगळे जग आता उठताबस्ता फकफकाटी भाषा वापरत असणार असे वाटतेय. बाहेरील जगाशी माझा आता फारसा संबंध येत नाही त्यामुळे अपडेटेड ज्ञान नाही.
त्रिभंग पाहणार नाही, काजोल कधीच आवडली नव्हती.
मॉडर्न असण्याची लक्षणे आहेत
मॉडर्न असण्याची लक्षणे आहेत शिव्या घालणे, न्यूड सीन्स दाखवणे.
ती फुलराणीचा रिमेक केला तर त्यात सभ्य भाषेत बोलणाऱ्या मुलीला शिव्यांची लाखोली वाहणारी मुलगी करून दाखवण्याची पैज दाखवावी लागेल , xx इसकी xxx की तो. (मी पण मॉडर्न आहे बरं नाही तर समजाल ....)
ती फुलराणी म्हणजे तीच ना...
ती फुलराणी म्हणजे तीच ना... तुझ्या पापाचा भरलाय घडा.. तुला लावेन चांगलाच घोडा
तुझ्या पापाचा भरलाय घडा..
तुझ्या पापाचा भरलाय घडा.. तुला लावेन चांगलाच घोडा
>> तीच
थोडे अवांतर पण आवश्यक -
थोडे अवांतर पण आवश्यक - तुझ्या पापाचा भरलाय घडा स्वगताचे शब्द खालीलप्रमाणे आहेत. हे स्वगत मराठी नाट्यसृष्टीत अभिनयाचा एक 'माईलस्टोन' आहे. विनोद म्हणून शब्द बदलणे समजू शकते पण मूळ स्वगत अगदी गोड आहे.
तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा !
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा !
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठं ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप....हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !
मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !
मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां (हसते )
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. "
फुलराणी म्हणजे तीच ना...
फुलराणी म्हणजे तीच ना... तुझ्या पापाचा भरलाय घडा.. तुला लावेन चांगलाच घोडा Happy >>>> हा विनोदाचा प्रयत्न होता की मुळ वाक्य खरंच माहीत नाही?
Back to त्रिभंग, मला मुव्ही अतिशय आवडला. कथा आणि दिगदर्शन छान आहे. मलाही रेणुका शहाणेचं नाव वाचुन आश्चर्य वाटलं आणि आंनदही.
बाकी काजोलचं कॅरेक्टर - अनु रिबेल दाखवलं आहे, त्यामुळे तिच्या तोंडातल्या शिव्या मला ऑड वाटल्या नाहीत. तिचं तणावग्रस्त बालपण, sexual amusement, सिंगल मदर असणं या सगळ्याचा परिणाम म्हणुन ती एवढी अग्रेसीव आणि लाऊड असणं मला तार्किक वाटलं. मराठी कानांना एवढ्या शिव्या झेपत नाहीत आणि बाईच्या तोंडुन आल्या तर जास्तच त्रास होतो, त्यामुळे त्रिभंग बद्दल जिथे तिथे वाचलं ऐकलं तर काजोलच्या भाषेबद्दल जास्त चर्चा आहे. पण मुव्ही उत्तम आहे. एकदा अवश्य पहावा असा आहे.
थोडे अवांतर पण आवश्यक -
थोडे अवांतर पण आवश्यक - तुझ्या पापाचा भरलाय घडा स्वगताचे शब्द खालीलप्रमाणे आहेत. हे स्वगत मराठी नाट्यसृष्टीत अभिनयाचा एक 'माईलस्टोन' आहे. विनोद म्हणून शब्द बदलणे समजू शकते पण मूळ स्वगत अगदी गोड आहे. >> +११११
ऋन्मेऽऽष चे लेख आणि प्रतिसाद फारसे मनावर घेत च नाही कधी..नुसतं वाचनमात्र असते. पण विनोद करण्यासाठी केलेला मूळ स्वगतामधला बदल अजिबातच आवडला नाही .
असो बाकी चालुद्या.
त्रिभंग बघताना काजोलवर
त्रिभंग बघताना काजोलवर डायरेक्टरचा काहीही कंट्रोल नव्हता हे स्पष्टपणे जाणवतं.
त्यामुळे इतरांचा अभिनय आणि तिची ओव्हरऍक्टिंग असे दोन वेगळेवेगळे भाग आहेत असं वाटतं.
आणि ज्या ओडिसी नृत्यातून नाव घेतले आहे त्या नृत्याचे ३० सेकंदही सिनेमात नसावेत, नुसता पोशाख घालून फॅन्सी ड्रेस असावा हे काही पटले नाही.
काजोल वगळता, कथानक आणि त्यामागे असलेले अनेक विचार फार आवडले. नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
बघायचाय अजुन. लिस्टीत आहे.
बघायचाय अजुन. लिस्टीत आहे.
शिव्यांशिवाय वेबसिरीज, शॉफि पुर्ण होत नाहीत.
कमी लाउड काजोल कधी नव्हती आणी नसेल.
कोणीविनोद करतो तेव्हा त्यात
कोणीविनोद करतो तेव्हा त्यात आपल्यामुळे लोकांना आनंद व्हावा हा पोझिटिव्ह हेतू असतो. मुद्दाम needle करण्यामागे लोकांना त्रास होऊन विकृत आनंद मिळवण्याचा हेतू असतो. विकृत लोक असे का वागतात यामागे नैसर्गिक कारणं असू शकतात त्यामुळे कोणाला दोष देण्यात अर्थ नसतो.
त्रिभंग बघताना काजोलवर
त्रिभंग बघताना काजोलवर डायरेक्टरचा काहीही कंट्रोल नव्हता हे स्पष्टपणे जाणवतं >>>>
खरंच.
आणि ज्या ओडिसी नृत्यातून नाव घेतले आहे त्या नृत्याचे ३० सेकंदही सिनेमात नसावेत, नुसता पोशाख घालून फॅन्सी ड्रेस असावा हे काही पटले नाही.>>>> हो हे मलाही नाही आवडलं. आता काजोल कडून ही अपेक्षा नव्हतीच तशी पण तरीही एखादा सीन चालला असता.
बाकी तन्वी आझमी अन् मिथिलाला अजून फुटेज द्यायला हवं होतं.
आणि तो कोणी जो झाटू आहे काजोलच्या भाषेत, त्याला बंदीश बॅंडीट मधे लई शिव्या घातलेल्या दिसताय लोकांनी
म्हणून इथे मुद्दाम असा रोल केलाय असं वाटलं. किती गुदमरला असेल नाही बिचारा
.
स्माईलला मुस्कुराईये बोलणारा
स्माईलला मुस्कुराईये बोलणारा तहजीबप्रेमी दाखवला आहे. त्याचे खरे नाव मला माहीत नाही
>>>
कुणाल रॉय कपूर आहे तो. सिद्धार्थ आणी आदित्य रॉय कपूरचा भाऊ.
तन्वी आझमी आणि शमा राज कि
तन्वी आझमी आणि शमा राज कि देशपांडे दिसाय्ला जरा सारख्या आहेत का / ना.
फुलराणी म्हणजे तीच ना...
फुलराणी म्हणजे तीच ना... तुझ्या पापाचा भरलाय घडा.. तुला लावेन चांगलाच घोडा Happy >>>> हा विनोदाचा प्रयत्न होता की मुळ वाक्य खरंच माहीत नाही?
>>>
लोकहो,
वरची मानव यांची पोस्ट वाचा,
>>
ती फुलराणीचा रिमेक केला तर त्यात सभ्य भाषेत बोलणाऱ्या मुलीला शिव्यांची लाखोली वाहणारी मुलगी करून दाखवण्याची पैज दाखवावी लागेल , xx इसकी xxx की तो. (मी पण मॉडर्न आहे बरं नाही तर समजाल ....)
Submitted by मानव पृथ्वीकर on 19 January, 2021 - 09:36
>>>>
त्यामुळे मी त्याचे अपशब्द वर्जनाची पहिली ओळ लिहिली.
लगेच तलवारी उपसायची गरज नाही. वेबसिरीजमुळे खरेच समाज बदलतोय
बाकी एका गाण्यातले शब्द बदलल्याने लोकांच्या भावना दुखावल्या पण सई शाहरूख स्वप्निल यांच्यावर खालच्या पातळीची टिका होताना कधी त्याविरुद्ध कोणाला काही बोलावेसे वाटले नाही हे खेदजनक आणि दुटप्प्पीपणाचे नाही का
स्माईलला मुस्कुराईये बोलणारा
स्माईलला मुस्कुराईये बोलणारा तहजीबप्रेमी दाखवला आहे. त्याचे खरे नाव मला माहीत नाही
>>>
कुणाल रॉय कपूर आहे तो. सिद्धार्थ आणी आदित्य रॉय कपूरचा भाऊ.
>>>>
ओके धन्यवाद,
पण मला सिद्धार्थ आदित्य रॉय हे कपूरही ठाऊक नाहीत. गूगल करावे लागेल
काजोल आवडत असल्यास हेलिकॉप्टर
काजोल आवडत असल्यास हेलिकॉप्टर ईला पाहा.
बाकी हे त्रिभंग नाव वाचून पस्तीस वर्षांपूर्वी पाहिलेला रटाळ त्रिकाळ आठवला.
माझ्या मते, काजोलला अजुनही
माझ्या मते, काजोलला अजुनही अभिनय झेपत नाही. तिने आपला जोहर कंपू टाईप मूवीच करावे.
विषय अतिषय सुंदर, खुपच क्लिष्ट अश्या नात्यातील गोष्टी दाखवणे/उलघडणे/समजणे कठिण काम आहे. त्यात नटीकडे , अश्या भावना दाखवायला अभिनय दारिद्र्य असेल तर ते पोहचतच नाही.
आई आणि मुलीच्या नात्यात कित्येक पैलु असतात, जर ती दरी वाढलीच असली तर आणखीच... का दरी वाढते?
आई सुद्धा माणूस आहे हे विसरलेच असतात.. आणि ...बरेच काही आहे पण ह्या मूवीत काहिच दिसले नाही... फक्त काजोलची ओरड...
एकलेपण, नकारलेपण आलेली व्यक्ती असेलही त्रागिक पण एकच भाव ... छ्या...
बाकी हे त्रिभंग नाव वाचून
बाकी हे त्रिभंग नाव वाचून पस्तीस वर्षांपूर्वी पाहिलेला रटाळ त्रिकाळ आठवला. >>>> त्रिमुर्ती नाही का आठवला ?
त्रिकाल तेव्हा आवडला होता.
त्रिकाल तेव्हा आवडला होता.
हो झंपी तेच फिलिंग आले मलाही.
हो झंपी तेच फिलिंग आले मलाही. विषय चांगला असूनही मांडणी उथळ वाटली. कजोलचा लाऊड अभिनय आहे वन ऑफ द रीझन. आणि आई मुलीचं नातं समजण्याच्या वेळी पर्यंत आईच ऑफ. त्यामुळे गुंडाळल्या सारखं वाटतं शेवटी. श्रीदेवीचा जसा मॉम होता फक्त तिच्यासाठी बनवलेला, तसा हा काजोलचा आहे.
पिक्चर बरा आहे, एकदा(च)
पिक्चर बरा आहे, एकदा(च) पाहण्यासारखा !
काजोल आणि तिच्या शिव्या संपूर्ण चित्रपट व्यापून आहेत. तिचीच कथा almost चित्रपट भर आहे, जे एकांगी वाटतं. तिच्या भावाची बाजू, त्याचं मतही दाखवायला हवं होतं.
मिथिला पालकर गोड आहे, तिचं अजून थोडं काम चाललं असतं , फक्त ते strate केस तिला सूट होत नाहीत, curls मस्त वाटतात.
पिक्चर आवडला. इन्टेन्स विषय
पिक्चर आवडला. इन्टेन्स विषय आहे. आई व मुलीचे नातेसंबंध दर्शविणारे क्षण, बोलके आहेत. काजोल आवडते.
फारसा नाही आवडला .. काजोलची
फारसा नाही आवडला .. काजोलची overacting आणि सारखे शिव्या देणे डोक्यात जाते .
तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांचा वावर अगदीच कमी आहे .
कुणाल रॉय कपूर याला सध्याच TVF Tripling या वेबसीरीज मध्ये पाहिल्यामुळे लक्षात आहे .
मस्त आहे हि वेबसीरीज आणि त्याचा अभिनय सुद्धा !!
श्रेया, कुठे पाहिली.
श्रेया, कुठे पाहिली.
श्रेया, कुठे पाहिली >> TVF
श्रेया, कुठे पाहिली >> TVF Play , दोन Season आहेत
वाईट बालपण गेलेले दाखवायचा
वाईट बालपण गेलेले दाखवायचा सोपा उपाय म्हणजे त्या पात्राला खंडीभर शिव्या देत बोलायला लावणे. तोच इथे वापरण्याऐवजी ती गोष्ट अजुन काही परिणामकारक पद्धतीने व्यक्त केलेली दाखवली असती तर खूप आवडले असते. सिनेमा वाईट नाही पण खोली नाही दाखवली जास्त त्यामुळे मनाशी पोचत नाही, दूरदूरच रहातो.
तुम्ही लोक शिव्या देत नाही का
तुम्ही लोक शिव्या देत नाही का? सगळेच शिव्या देतात... काही जास्त काही कमी...
प्रत्येक शिवी अपमान करण्यासाठी नसते रे, आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहचवण्याचं माध्यम आहे ते आयघाल्या...
- अभिजित (बाबा) चव्हाण. (स्ट्रगलर साला )
Pages