लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?

Submitted by वेलांटी on 17 January, 2021 - 06:32

मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
काॅपी राईट कसे घेतात?
एखाद्यांच कथा किंवा कवितेचे घेता येते का?
त्यासाठी काही शुल्क लागते का?
यासंबंधी माहितीची देवाणघेवाण झाली तर अनेक जणांना लाभ होईल. त्यामुळे काॅपीराईटबद्दल शक्य ती सर्व माहिती द्यावी अशी विनंती आहे.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काॅपी राईट कसे घेतात?
त्यासाठी काही शुल्क लागते का?
काॅपीराईटबद्दल शक्य ती सर्व माहिती >>>>>
इथे सविस्तर आणि अधिकृत माहिती मिळू शकेल -- https://copyright.gov.in/
वैयक्तिक चौकशीसाठी Helpdesk नंबरही दिलेला आहे.

धन्यवाद bkackcat, कारवी.
वरील साईटवर बरीच माहिती आहे परंतू क्लिष्ट स्वरूपात आहे. नेमकी काय प्रोसिजर असते, कुणी सोप्या भाषेत सांगेल काय?

चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?

मागे इथे एक लेख आलेला की कोणाकोणाचे साहित्य दुसरीकडे प्रकाशित आहे ते. ती साइट जाहिराती वापरते. म्हणजेच तुमच्या फुकटच्या साहित्यावर पैसे कमावते.

आता तुम्ही कसे काय करणार? खटला करून भरपाई मिळवण्यासाठी वकिलांना किती द्यावे लागतील?