शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

१. मनसोक्त खा वारंवार पण नेमलेल्या निरूंद जागीच --- चराचरात
२. सुरेख जागेसी // जडे अभाव चिन्ह // जेथे, प्रज्ञा-सत्त्व-धीर वसे तेथे
३. इवलेसे कुणी // याचा वास येताच / / संशय येऊन // मेले * --- जंतुनाशक
४. ना तेल ना पाणी // ओतून घे // भाजके, रूचकर / ओथंबलेले -- भरभरीत
५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या *
७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल
८. दिसतो तसा नसतो // त्याला याने चोपा // भारीच नखरेल भासेल --- नटमोगरा
९. जर कैदी नाही तर हालचालीवर कडा पहारा का? * --- नजरबंदी
१०. इथे गानरसिक, गानलुब्ध लोक रहातात --- गाणगापूर

४ कोरडवाहू >>>> नाही
करकरीत >>>>> कशाचे? गलबल्याचे? नाही; तसे कशाचेच नाहीये हे उत्तर

शोधसूत्रे योग्य वाचनासाठी तुकडे केलेत
२, ५, १० -- ठिकाणे आहेत
२, १० येथे वर्षातील ठराविक काळी प्र...चंड गर्दी असते;
२ मध्येच अजून एक ठिकाण आहे.
५ एकेकाळी महत्त्वाचे ठिकाण, आता सुनसान
१० चा भारतीय गानपरंपरेशी ( घराणी वगैरे) का ही ही संबंध नाही.

८. दिसतो तसा नसतो ... नट

/ त्याला याने चोपा... मोगरा (हातोडा)

// भारीच नखरेल भासेल... नटमोगरा

बरोबर,
आता २,५ संपवूया की बाकी कशाला अजून क्ल्यू हवेत?
मला मोगरी म्हणजे धुणे धुवायचे चोपणे याअर्थी मिळाला.
३ बघा, सद्ध्या एकदम उड्या पडणारी चीज आहे.
२ मध्ये प्रज्ञा-सत्त्व-धीर हे वसणार्‍याचे वर्णन / गुणविशेष आहेत. प्रज्ञा, सत्त्व, धीर किंवा प्रज्ञा, सत्त्वधीर कसेही घ्या. लागू पडते.

2) मध्ये अभाव म्हणून न, ना, वजा उणे असे घटक शब्द असायला हवेत. त्यादृष्टीने केदारनाथ सुचतो. पण त्यात आणखी एक ठिकाण हवे ते सुचत नाही. दारना असावे का?
ते जालना धरले तर शेवटची चार अक्षरे जालनाथ होतील. मग पहिले अक्षर सुचत नाही.
अंबरनाथ वगैरे इतर नाथ आहेत पण जुळत नाहीत शब्द.

अभाव दर्शक अजून घटक आहेत की. आणि त्याने सुरूवात होतेय.
(अभाव दर्शक --- सुरेख स्थान --- स्थलदर्शक ) = त्या वसणार्‍याचे दर्शक स्थान
प्रज्ञा वरून अक्कलकोट नाहीये.
नावात नाथ नाही पण नाथ शी संबंध मात्र आहे.
जालना सुरेख स्थान आहे? मी पाहिलेले नाही हं..
सुरेख म्हणजे सुरेख. ज्याची वर्णने केली जातात साहित्यात.

नाही केया
(अभाव दर्शक शब्द --- सुरेख स्थान नाव --- स्थलदर्शक ) = आपले उत्तर = त्या वसणार्‍याचे दर्शक गाव
असे तयार होणार उत्तर.

नाही, ४ रसरशीत नाही. पाणी नाही ना... दिलेय शोधसूत्रात.

Happy ३ जंतुनाशक बरोबर. उकल द्याल का?
म्हणजे दिलेल्या शोधसूत्राचा उत्तराशी / त्यातील शब्द-तुकड्यांशी कसा संबंध जोडलात, ते सांगा.

४ खुसखुशीत
फक्त भाजलेले >>>> नाही. शब्दाचे रूपडे बरोबर.
पूर्ण शब्द खाण्याशी निगडीत नाही (पण शब्दाचा भाग मात्र खाद्य आहे)
भाजके, रूचकर / ओथंबलेले हे एकाच शब्द तुकड्यातून दिसेल.
ओतून घे हे क्रिया दाखवते

4) रुख वत. रुखवत ळी
सु का व तळा
कोरडे म्हणजे सुके, सुका
ओत म्हणजे वत, वता
भाजके = तळीव
छे जमत नाही

३. इवलेसे कुणी // याचा वास येताच / / संशय येऊन // मेले
इवलेसे कुणी -- जंतु
संशय येऊन -- (जंतु) ना शक (=संशय)
याचा वास येताच (जंतु) मेले -- जंतुनाशक

ते सुरेख स्थान वाले कोडे का सोडलेत मधेच? अंबरनाथ वरून जवळ पडले असते. ३-४ तास फारतर

नवीन Submitted by हीरा >>>> 4) रुख वत >>>>> नाही
भाजके = तळीव कुठे हो?
ओत म्हणजे वत, वता -- बरोबर पण उत्तर नाही.
पण ओतताना अजून एक कृती सहजच घड्त असते ना.
भाजके, रूचकर / ओथंबलेले हे एकाच शब्द तुकड्यातून दिसेल. या ऋतूची खासियत हो. (हुरडा नव्हे)
ना तेल ना पाणी ही अवस्था आहे.

२ इगतपुरी
नवीन Submitted by कुमार१ >>>> सर !! Happy उकल काय द्याल?
ओके कसारा / नाशिक लाईन नका पकडू. ते गाव येणारच नाही अशाने.
पुरी ला अर्धा मार्क

२ मध्ये प्रज्ञा-सत्त्व-धीर हे वसणार्‍याचे वर्णन / गुणविशेष आहेत. प्रज्ञा, सत्त्व, धीर किंवा प्रज्ञा, सत्त्वधीर
हे बघा कोण ते.... सात्विकता ज्ञान आणि समाजाच्या नकारात्मक रूपाचा धैर्याने सामना --- याचे मानवी प्रतीक

(अभाव दर्शक शब्द --- सुरेख स्थान नाव --- पुरी ) = आपले उत्तर

बरोबर हीरा,
ना तेल ना पाणी ( असे रूक्ष केस / त्वचा) -- भरभरीत
ओतून घे --- भर
भाजके, रूचकर / ओथंबलेले --- भरीत / भरित

टी टैम मग तरतरी आली की ह्यांना उडवा

खूप दिवसांनी एक गूढकोड्याचा प्रयत्न. सगळे शब्द ५ अक्षरी. उत्तराबरोबर त्याची उकलही द्यायची आहे.
* = शब्द वा काही भाग मराठीशिवाय इतर भाषातही आहे / आढळतो.
काही फक्त शोधसूत्रे आहेत; काहीत उत्तरांचा अर्थ / भावही दिलेला आहे.

२. सुरेख जागेसी // जडे अभाव चिन्ह // जेथे, प्रज्ञा-सत्त्व-धीर वसे तेथे -- अलंकापुरी (आळंदी)
५. व गुंतव // नि मागे बघ // काय गदळ उरलय जाळीवर
६. आवडीने घे; + हुशारी आली? // मग चालू लाग की // वटवट्या *
७. गलबल्याचा ल // कौशल्याने हटवा // म्हणजे छान दिसेल

Pages

Back to top