Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55
नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मीच तेलुगु/तामीळ चित्रपट
मीच तेलुगु/तामीळ चित्रपट थेटरला बघत असताना, तेलुगु/तामीळ भाषिक शेजा-यानेच मला विचारले की हा कोणता पिक्चर आहे म्हणुन. >> Exactly! हेच माझ्यासोबत एकदा हिंदी चित्रपट पाहायला गेलो असताना झाले, ते ही लखनौमध्ये, हिंदी भाषिकानेच मला विचारले कोणता चित्रपट आहे या स्क्रीनवर? मी म्हणालो तुम्हाला कोणता बघायचाय तर त्याने नाव सांगितले, मी म्हणालो तो नाहीय इथे, तुम्ही गेटकिपरला विचारून जा नक्की कोणता स्क्रीन ते. थोडक्यात याचा आणि चित्रपटात कुठल्या भाषेत नाव दाखवतात याचा संबंध नाही. तुम्हालाही तामिळ/तेलुगु भाषेतच्या चित्रपटावेळी त्याच भाषिक शेजाऱ्याने विचारले, आणि मलाही हिंदी चित्रपटाच्यावेळी हिंदी भाषिकानेच.
काही इंग्रजी शब्द मराठी आणि
काही इंग्रजी शब्द मराठी आणि हिंदीत वेगळ्या प्रकारे लिहिले जातात. बैंक, कोलेज, मैन, माइ, स्टूडेंट, शोर वगैरे.
तसेच काही संस्कृत शब्द मराठी आणि हिंदीत वेगवेगळ्या नियमांनुसार लिहिले जातात. उदा. मराठीत भीती, नीती, मती, कृती, गुरू, साधू वगैरे. ह्या सर्व शब्दांत शेवटचा स्वर हिंदीत ऱ्हस्व होतो.
>>>मी हिंदी चित्रपट बघत नाही.
>>>मी हिंदी चित्रपट बघत नाही. त्यामुळे धाग्याच्या विषयावर बोलु शकत नाही, पण कॉमी, ते मूळ लेखातील, जर-तर तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केले की तुमची मराठी वाचनाची समज कमी आहे?
तुम्ही सुद्धा माझा प्रतिसाद नीट वाचला नाही की तुम्हाला तर्कबुद्धीची कमी आहे ?
सिनेमे आणि गृहपाठाच्या वह्या संपूर्ण खाजगी मालमत्ता असतात. त्यात कोणी काय लिहावे आणि लिहू नये सांगण्याचा हक्क
१. नियामक व्यक्ती (शिक्षक/सेन्सर)
२. पैसे घालणारा (प्रोड्युसर/पालक)
३.संबंधित व्यक्ती (पाल्य,दिगदर्शक)
यांनाच आहे. तेव्हा या पुरोगाम्याने याबद्दल मत बाळगण्यात काही हरकत नसली, पण ती मतं खिजगणतीत घेतली जातीलच, याबद्दल शंका आहे.
विक्रीसाठी ठेवलेले उत्पादन
विक्रीसाठी ठेवलेले उत्पादन पूर्णपणे खाजगी मालमत्ता म्हणता येत नाही. तसेही सिनेमा थियेटर/मॉल ही पब्लिक प्लेस आहे.
तसेच हे पूर्ण पणे ग्राहकाकडुन मिळणा-या नफ्यासाठी बनवले असल्यामुळे, ग्राहकाचे मत काय आहे, काय आवडते , कल काय आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. तेव्हा अशा उत्पादनाचे नाव कसे असावे यावर मत व्यक्त करण्याचा व तशी अपेक्षा करण्याचा पूर्ण अधिकार ग्राहकाला आहे. अंतिम निर्णय अर्थात निर्मात्याचा असेल.
मला वाटते की आजकाल
मला वाटते की आजकाल चित्रपटांची नांवे उर्दूत नसतात, फक्त हिंदी आणि इंग्रजी मध्ये असतात. चित्रपट हिंदीत असल्याने नाव हिंदीत देत असावेत
अहो, म्हणून तर आज पाश्चात्य
अहो, म्हणून तर आज पाश्चात्य देश आपल्या पेक्षा कैकपटीने पुढे आहेत
One nation , One Language, One Ambition, One Desire, One Path, One Leader & One People
हाच अजेंडा कायम राहिलेला आहे!
कितीही डेमोक्रसि च्या नावाने डंका वाजवाला
तरीही देश हा याच गोष्टीनवर वासलेला आहे...
दुर्दैवाने आपल्याकडे काही कलंकित कार्टे जन्माला आले आणि देशाचे काय
पुढच्या साठ सत्तर पिढ्यांचे नुकसान होईल अशी व्यवस्था करून गेले!
का?
तर फक्त त्यांच्या स्वत:च्या जाती धर्माना त्यांना सो कॉल्ड न्याय द्यायचा होता
Pages