शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी, धन्यवाद.
.......................
फोक m A twig. Used enhancingly, implying supple and strong.

वझे शब्दकोश
पु. पातळ व पुष्कळ हगणें; रेच;

सुटले का? वा वा !..... धन्यवाद मानव.
मी आता येताना अजून काय शब्द लिहावे याच विचारात होते. खरी हगवणसुद्धा इतकी दमवत नसेल...
फोक आणि फोकनाड दोन्ही माहिती नव्हते. त्यामुळे उलटे जाता नाही आले.
फोक = ओली बारीक बिनपानाच्या फांदीची पातळ लवचिक छडी माहिती होता.

आमच्या गावी थापा मारण्याला " काय फोकनाड्या सोडून राहिला/राहिली" म्हणत. त्यामुळे नाड शब्द पाहून मला तो लगेच आठवला.

हं, बोलीभाषेतला शब्द.... ऐकला असेल तरच सुचतो. चिंच, वेत असा क्ल्यू दिला असता तर फोक आठवला असता.
सरांचे कौतुक, कुठून खणून काढतात.

तुम्हा सर्वांची छान झुंज.
त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
खरी हगवणसुद्धा इतकी दमवत नसेल...
>>>>
हे म्हणजे अगदी अगदी !
......................
मागच्या महिन्यातली एक थोर फोकनाडबाजी आठवते आहे. मानव यांनी मला ह्या बातमीबद्दल कोविड धाग्यावर प्रश्न सुद्धा विचारला होता 10 डिसेंबरला.

खूशखबर! 24 तासांत कोरोनाचा नाश; शास्त्रज्ञांना अखेर प्रभावी औषध सापडलंच.
http://dhunt.in/c73ND?s=a&ss=wsp

तेव्हा २४ तासात याचा खातमा होणार होता !
…… सध्याचं जागतिक चित्र आपण जाणतोच.

खरी हगवणसुद्धा इतकी दमवत नसेल... Lol
थांबली की नाही पाहायला आले.
मला पण फक्त 'फोकाची छडी' ऐकून माहिती आहे.

फोकनाडबाजी.... भारीच शब्द , ऐकायला शिवी सारखा वाटतो.

हरकत नाही.
..........................
नवा खेळ
खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून एक प्रकारची विचारसरणी असलेला ८ अक्षरी शब्द तयार करायचा.

बादरायणात
मधुकरराव
कोकणपट्टीच्या

समरप्रसंगात
आकाशमार्गाने
कालनिर्णयाने

रितीरिवाजामुळे
उत्तरकाशीहून

आधुनिकोत्तर
आधुनिकोत्तर पहिली सहा अक्षरे असावी बहुधा. पण एक दोन शब्दातली अक्षरे यात बसवता आली नाहीत.

हा उतारा श्री कृ कोल्हटकर यांच्या विनोदी लेखातून घेतला आहे.
माझा पहिलाच प्रयत्न आहे.

आपल्या (6) सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या (4) अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करुन त्यांच्या (4) ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ (7) साधी (3) कुलुपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करु लागले.

ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच (5) बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली,(2) किंवा काडी चालत असे. कधी कधी नुसत्या (5) ती उघडत असत.

त्यांची अशी (9) वृत्ती पाहून शेवटी नानांच्या (4) एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशेचे (3) घेऊन पळून गेला.

आपल्या (अखत्यारीतील..6) सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या (जानव्यात..4) अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करुन त्यांच्या (कुटुंबाच्या/बायकोच्या..4) ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ (7) साधी (छोटीशी..3) कुलुपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करु लागले.

ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच (सावधगिरी..5) बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली,(पिन/चावी..2) किंवा काडी चालत असे. कधी कधी नुसत्या (खेचण्यानेही..5) ती उघडत असत.

त्यांची अशी (आवजावघरतुम्हारा..9) वृत्ती पाहून शेवटी नानांच्या (घरातील..4) एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशेचे (बंडल्/पुडके...3) घेऊन पळून गेला.

आपल्या (अधिकारातील) सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या (जानव्यास) अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करुन त्यांच्या (बायकोच्या) ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ (वाचविण्यासाठीच) साधी (लोखंडी) कुलुपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करु लागले.

ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच (विधिनिषेध) बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली,(खिळा) किंवा काडी चालत असे. कधी कधी नुसत्या (हलवण्याने/झटकण्याने) ती उघडत असत.

त्यांची अशी (ठेविलेअनंतेसारखी) वृत्ती पाहून शेवटी नानांच्या (मर्जीतील) एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशेचे (पुडके/डबोले) घेऊन पळून गेला.

आपल्या अतिमहत्त्वाच्या (6) सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या जानव्यात (4) अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करुन त्यांच्या कुटुंबाच्या (4) ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ गुदरल्यानंतर (7) साधी हलकी (3) कुलुपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करु लागले.

ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधीनिषेध (5) बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, पिन (2) किंवा काडी चालत असे. कधी कधी नुसत्या हिसक्यानेही (5) ती उघडत असत.

त्यांची अशी वसुधैवकुटुंबकम (9) वृत्ती पाहून शेवटी नानांच्या मर्जीतील (4) एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशेचे ऐवज (3) घेऊन पळून गेला.

सियोना, जमलं की.... घालत जा अधूनमधून
मी आधीचेच कोडे बघत बसले.... हीरांनी सोडवले ते पाहिलेच नाही. कठीण शब्द असून पटकन आला.

हो, हे बरोबर.... काही ओळखीचे असते लिखाण, नवीन काही असेल तर मात्र नाही समजत.
आणि त्याच पुस्तकातला पुन्हा देणार असाल तर नाव सांगूच नये.

आता 'जानव्यास' हे उत्तर देताना त्या माहितीचा प्रभाव पडला.
फक्त 'विषय' मोघम सांगता येईल.

Pages