शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कुमार सर आणि देवकी.

@देवकी इंटरनेट वरुन नाव शोधले होते. भारतीय हिंदू नाव म्हणून ठेवले. अर्थ पण आवडला होता.

passion साठी मला एक सुंदर मराठी शब्द - अगदी चपखल- एका पुस्तकात वाचायला मिळाला.
गुगल भाषांतर सोडल्यास तुम्हाला यासाठी कुठला मराठी शब्द माहित आहे ते सांगा.

एकच शब्द लिहा. ( २ ची जोडी नको)
नंतर मी माझा सांगतो.

उत्कटता

एखाद्या गोष्टीची आवड असते , एखादा गोष्टीची उत्कटता असते. (अधिक तीव्र)

सुरेख वर्षाव केलात सर्वांनी.
आता मी वाचलेला :
असोशी

अर्थात हा शब्द सतीश काळसेकरांनी पुस्तकांच्या संदर्भात वापरलेला आहे.
(Passion for books)

असोशी हा शब्द का कोण जाणे, पण उगीचच क्लिष्ट वाटला मला. अभिलाषा हा जास्त आवडला.
जाता जाता: असोशी म्हणजे allergic, वावडं असलेला असा पण एक अर्थ मिळाला.

असोशी >>>>
बरोबर. एका शब्दाचे अगदी भिन्न अर्थ कित्येक वेळा बुचकळ्यात टाकतात. या शब्दाच्या जरा मुळाशी जाऊन पाहिले तर :
‘असोस’चे २ अर्थ आहेत:
१. उत्कट प्रेम आणि
२. ( प्राकृत मधून) सहन न होणारे. ( अ +सोस)

आता पूर्ण उलगडा झाला

६ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक =अक्षरक्रम)

१२ - हगवण
३४ - नळकांडे
५६ - मेंढपाळास हाक मारली

संपूर्ण
शब्द - वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन

12... .. ... ढाल.....मोबाईलवरून लिहिता येत नाहीये

देवकी
दोन्ही नाही.
१२ वेगळा आहे.

१२ - हगवण ---- ढाळ, रेच, आव, दस्त ( हा हिंदी आहे पण २ अक्ष्ररी म्हणून लिहीला)

३४ - नळकांडे ---- नळी, नळा, बांबू, पावा, वेणू

५६ - मेंढपाळास हाक मारली >>>> कोणी? माणसाने, मेंढ्यांनी, दुसर्‍या धनगराने ( खुणेचा कुकारा वगैरे) ?

कारवी
छान प्रयत्न पण एकही नाही.
दुसऱ्या अर्थाची भर :

१२ - हगवण / झाडाशी संबंधित
३४ - नळकांडे / नस
५६ – मेंढपाळास कुणीही हाक मारली / एक बैठा खेळ

१२ झड .. झड लागणे सारखं
३४शीर.. नळकांडे कसं ते माहिती नाही पण नस म्हणून.
५६ गोट्या... ठोकून देत आहे.

Pages