Learn German with Kedar Jadhav : मराठीतून जर्मन शिकण्यासाठी माझे YouTube channel !!

Submitted by केदार जाधव on 4 January, 2021 - 04:47

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/ आवड आहे .

गेली ४ वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे , आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .

पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक https://youtu.be/7KwhDAbhBG0

चॅनेलची लिंक https://www.youtube.com/channel/UCdL9VHNN43PeoJoW2u0Y3cA

मराठी प्लेलिस्टची लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLyRWSjr-0OBCey0DLCg-4a9ahm59PbiOz

आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे , जी सामान्यांना परवडणारी नाही, अन खेडयांत आणि छोट्या शहरांतही असे क्लासेस नाहीत .

दुसरे म्हणजे सहसा जर्मन ही इंग्रजीमधून शिकवली जाते .त्यामुळे बर्याच जणाना ती अवघड वाटते . त्याउलट मराठी आणि जर्मन भाषेमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत , त्यामुळे आपण मराठीतून जर्मन सोप्या पद्धतीने शिकू शकतो , आणि म्हणूनच मी हे चॅनेल सुरू केले आहे .

सध्या मी पहिले ९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि दर आठवड्याला नवे १ ते २ व्हिडीओ मी अपलोड करणार आहे. जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या बी १ ( तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे .

तरी माझी विनंती आहे की तुम्ही वरील चॅनेलला SUBSCRIBE करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना ज्याना जर्मन शिकायची इच्छा आहे त्याना हा मेसेज फॉरवर्ड करा . आणि जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक / प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू शकता , मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.

पुन्हा एकदा , ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि ते साध्य करण्यास तुम्ही माझी मदत करावी अशी माझी विनंती आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप : जर हा धागा मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर क्षमस्व . मी तो काढून टाकेन .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव्ह खूपच छान. काही महिन्यांसाठी जर्मनीत होतो तेव्हा पुस्तक विकत घेऊन प्राथमिक जर्मन भाषा शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तुमच्या या उपक्रमात नक्की सहभागी होणार. तुम्हाला व्हाटसअप संदेश पाठविला आहे.

केदार, तुमच्या लेखाची लिंक भाच्याला पाठवली जो जर्मनीत मास्टर्स करतोय. त्याने युट्युब व्हिडीओज पाहून ए१ लेवलचेच क्लासेस आहेत का असं विचारलंय. सध्या तो बी१ लेवलला आहे.

सायो , सध्या A1 चे व्हिडिओ टाकले आहेत , दर आठवड्याला पुढचे असे B1 पर्यंत पोचायला ४ महिने होतील .

एकदम मस्त व्हीडिओ
मी घरी सगळ्यांना दाखवला
अतिशय सुंदर पद्धतीने समजवून सांगितले आहे
मीही आता यामुळे जर्मन शिकेन
खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ साठी

केदार... अतिशय स्तुत्य उपक्रम! या तुझ्या उपक्रमाला भरघोस यश येण्यासाठी शुभेच्छा!

माझ्यापुरता.. तुझा हा उपक्रम खुप जवळचा वाटतो .. कारण माझ्या मुलाचे अमेरिकेत जर्मन शिकण्याचे हे दुसरे वर्ष चालु आहे. तो मला नेहमी सांगत असतो की बाबा.. जर्मन व मराठीच्या व्याकरणात खुप साम्य आहे. हायस्कुल सिनिअर यिअरपर्यंत त्याची जर्मन शिकण्याची ५ वर्षे झाली असतील व सिनिअर यिअरमधे.. तो एक्चेंज स्टुडंट म्हणुन ड्युसेलडॉर्फ ला जाणार आहे. त्याला ( व इतरांनाही) आजच तुझ्या या सुंदर उपक्रमाबद्दल सांगतो.

आत्ताच उत्सुकतेने पहिला व्हिडीओ बघितला. खूप छान, सोप्या पद्धतीने शिकवले आहे. तुमच्या या मेहनतीचे खरंच खूप कौतुक आहे. यूट्यूब चॅनेलसाठी शुभेच्छा.

खूपच भारी ..मी ही एखादी भाषा शिकायचा विचार करत होते आणि नेमका हा धागा दिसला.. खुप मस्त वाटलं...खुप शुभेच्छा आणि अभिनंदन...

अरे वाह! केले मी पण सबस्क्राईब!
मला असंच फन म्हणून शिकायला आवडेल. माझ्या भाचीला पण सांगते तिला ईंट्रेस्ट आहे खूप. तुम्ही सर्टीफिकेट वगैरे पण देता का? तिला समजा शाळेसाठी वगैरे पाहिजे असेल तर?

झेलम , चिमु, अंजली धन्यवाद !!

अंजली , नाही . खर तर सर्टिफिकेट फक्त गोएथे चे देऊ शकते . बाकी सर्टिफिकेटना फारसा अर्थही नाही.

अभिनन्दन केदार आणी भरघोस शुभेच्छा!!

हाच मेसेज मला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर फॉरवर्ड म्हणून आलाय. तूच तो पाठवला असशील आणी व्हायरल झाला असेल असं धरून चालतो.

अभिनंदन आणि शुभेच्छा केदार.
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. सवडीने व्हिडीओ बघून त्यावर प्रतिसाद देईन.

केदार
खूप स्तुत्य उपक्रम.
पहिला व्हीडीओ पूर्ण बघीतला. एकदम सोप्या भाषेत समजावले आहे. खर तर मराठीत जर्मन शिकणे ही एकदम भन्नाट आणि युनिक आयडिया आहे Happy
फक्त एक सूचना आहे तुम्ही वीडीओ मधे लिहुन दाखवताना जिथे पिवळा किंवा केशरी सारखा जो रंग वापरला आहे त्याने पटकन अक्षरे नीट वाचता येत नाहीत तिथे एखादा गडद रंग वापरला तर फरक पडेल.
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा

अत्यंत स्तुत्य उपक्रम. व्हिडियो पाहिला. पाहिल्यावर , तुमच्याकडून तरी, जर्मन शिकणं सोपं असेल असं वाटलं, यातच तुमचं यश आहे.

११०० विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलंय , आता यू ट्यूबवरही फुकट शाळा उघडताय हेही ग्रेट आहे.

अभिनंदन आणि शुभेच्छा!

Pages