नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .
मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/ आवड आहे .
गेली ४ वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे , आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.
ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक https://youtu.be/7KwhDAbhBG0
चॅनेलची लिंक https://www.youtube.com/channel/UCdL9VHNN43PeoJoW2u0Y3cA
मराठी प्लेलिस्टची लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLyRWSjr-0OBCey0DLCg-4a9ahm59PbiOz
आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे , जी सामान्यांना परवडणारी नाही, अन खेडयांत आणि छोट्या शहरांतही असे क्लासेस नाहीत .
दुसरे म्हणजे सहसा जर्मन ही इंग्रजीमधून शिकवली जाते .त्यामुळे बर्याच जणाना ती अवघड वाटते . त्याउलट मराठी आणि जर्मन भाषेमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत , त्यामुळे आपण मराठीतून जर्मन सोप्या पद्धतीने शिकू शकतो , आणि म्हणूनच मी हे चॅनेल सुरू केले आहे .
सध्या मी पहिले ९ व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि दर आठवड्याला नवे १ ते २ व्हिडीओ मी अपलोड करणार आहे. जर्मन भाषेतील अत्यंत महत्वाच्या बी १ ( तिसर्या) परीक्षा लेव्हल पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करण्याचा माझा मानस आहे .
तरी माझी विनंती आहे की तुम्ही वरील चॅनेलला SUBSCRIBE करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्यांना ज्याना जर्मन शिकायची इच्छा आहे त्याना हा मेसेज फॉरवर्ड करा . आणि जर तुम्ही एखाद्या शाळेचे किंवा कॉलेजचे शि़क्षक / प्रतिनिधी असाल तर तुम्ही मला WhatsApp वर +49 17673915195 या क्रमांकावर संपर्क साधू शकता , मी तुमच्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून एक छोटा ऑनलाईन क्लास विनामूल्य घ्यायचा प्रयत्न करेन.
पुन्हा एकदा , ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि ते साध्य करण्यास तुम्ही माझी मदत करावी अशी माझी विनंती आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप : जर हा धागा मायबोलीच्या नियमात बसत नसेल तर क्षमस्व . मी तो काढून टाकेन .
अभिनंदन केदार आणि शुभेच्छा!
अभिनंदन केदार आणि शुभेच्छा!
खूप छान!! तुम्हांला शुभेच्छा!
खूप छान!! तुम्हांला शुभेच्छा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
एक नंबर काम केदार.
एक नंबर काम केदार.
केदारच्या एका बॅचची मी विद्यार्थिनी असल्याने गेले वर्षभर त्याच्या शिकवण्याची पद्धत बघते आहे. सोपे करुन, समोरच्याला जिथे अडतय तिथे मदत करत, वेळोवेळी कॉन्फिडन्स बुस्ट करत तो जसे शिकवतो ते अनुभवणे हाच एक सोहळा आहे. त्याची पॅशन, चिकाटी आणि पेशन्स यासाठी तर त्याला ११० मार्क १०० पैकी.
केदार तुझ्या या ही उपक्रमाला मनःपुर्वक शुभेच्छा!!
कविन, तुझ्या प्रतिसादाला मम
कविन, तुझ्या प्रतिसादाला मम म्हणते. तू परफेक्ट लिहिलं आहेस. मला व्यवस्थित शब्दांत मांडता येत नव्हते.
मलाही केदारच्या उपक्रमाबद्दल मायबोलीवरूनच कळाले होते.
https://www.maayboli.com/node/72334 - हा तो धागा.
अभिनंदन आणि शुभेच्छा केदार !
अभिनंदन आणि शुभेच्छा केदार !
अभिनंदन केदार. तुम्ही लहान
अभिनंदन केदार. तुम्ही लहान मुलांचे जर्मन भाषेचे क्लास घेता का?
धन्यवाद रूपाली , वावे ,
धन्यवाद रूपाली , वावे , हर्पेन , सियोना !!
धन्यवाद कविन आणि शैलजा ,
धन्यवाद कविन आणि शैलजा ,
I am lucky to have you as my Students and now Friends !!
सियोना , हो , मी किड्स बॅचेस
सियोना , हो , मी किड्स बॅचेस ही घेतो , पण आता सगळे क्लासेस YouTube वर Shift करत आहे.
अतिशय स्तुत्य उपक्रम केदारजी
अतिशय स्तुत्य उपक्रम केदारजी ,तुमचे खूप खूप धन्यवाद , मी पण जॉईन होतो मला हि शिकायचे आहे
मी पण केदारची स्टुडंट.
मी पण केदारची स्टुडंट. तुझ्या या उपक्रमाला माझ्याही मनापासून शुभेच्छा, केदार!!
खुपच स्तुत्य उपक्रम केदार. हे
खुपच स्तुत्य उपक्रम केदार. हे व्हिडीओज नक्की फॉलो करणार.
अरे वा !! अभिनंदन आणि
अरे वा !! अभिनंदन आणि शुभेच्छा केदार !
धन्यवाद Angelica
धन्यवाद Angelica
धन्यवाद भाग्यश्री१२३ ,
धन्यवाद भाग्यश्री१२३ , anjali_kool
अतिशय स्तुत्य हेतूने चालवलेला
अतिशय स्तुत्य हेतूने चालवलेला उपक्रम!
Stutya upaKram shubheccha
Stutya upaKram
shubheccha
मी ,माझा मुलगा आणि नवरा
मी ,माझा मुलगा आणि नवरा तिघेही जण शिकणार आहोत.अतिशय सोपे करून सांगत आहात. खूप धन्यवाद !
यानिमित्ताने एक तरी परदेशी भाषा शिकण्याची माझी इच्छा पूर्ण होते आहे!
फारच छान! तुमच्या युट्यूब
फारच छान! तुमच्या युट्यूब चॅनलला भरघोस प्रतिसाद मिळो ही शुभेच्छा!
भारीच भावा !!!!!! अभिनंदन नी
भारीच भावा !!!!!! अभिनंदन नी खुप खुप शुभेच्छा. मी पण शिकणार...नक्कीच.
ग्रेट ! अभिनंदन आणी शुभेच्छा
ग्रेट ! अभिनंदन आणी शुभेच्छा !
धन्यवाद हरचंद पालव , Manu2009
धन्यवाद हरचंद पालव , Manu2009 , Prajakta Y
धन्यवाद जिज्ञासा , जेम्स
धन्यवाद जिज्ञासा , जेम्स बॉन्ड , रश्मी
शुभेच्छा नक्की बघणार चॅनल.
शुभेच्छा
नक्की बघणार चॅनल.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
पहिला व्हिडिओ बघितला . खुप सोप्या भाषेत. समजावले आहे.
तुमच्या युट्यूब चॅनलला भरघोस
तुमच्या युट्यूब चॅनलला भरघोस प्रतिसाद मिळो ही शुभेच्छा!
माझी पण केव्हाची इच्छा आहे जर्मन शिकण्याची !
निवडक १० त
अरे वा! लै भारी!!
अरे वा! लै भारी!!
मी जर्मन ए२ पर्यंत क्लासमध्ये शिकलोय बी१ ची तयारी स्वतःच करतोय. तुमच्या युट्युब चॅनेलची मला फार मदत होईल. तुमच्याशी संपर्क नक्की साधेन.
Pages