बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

Submitted by सचिन पगारे on 5 December, 2013 - 11:41

गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.

1239998_348853015248860_754311630_n.jpg

शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारतरत्नास त्रिवार अभिवादन.....

भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे. गावातले तळे नदी ह्यावर जनावर पाणी पिल तरी कोणाची काही हरकत नसे. मात्र अस्पृश्य पाणी पिला तर मात्र चालत नसे. थोडक्यात त्यांची समाजात इज्जत हि जनावरापेक्षा कमी होती. शतकानु शतके हि परिस्तिथी सुरु होती. देव,धर्म मानणाऱ्या, रूढी परंपरा जपणाऱ्या अस्पृशांच्या जीवनात काडीचाही फरक पडत नव्हता.ज्या देवाला ते भजत त्याचे गुणगान करत पण ह्यांची परिस्तिथी मात्र जैसे थे होती.समाजातील अमानवी रुढींचा बळी हा समाज होता.

996945_453000638153058_644575964_n.jpg

अशा सामाजिक परीस्तिथीत दलितांचे उद्धारकर्ता भीमराव रामजी आंबेडकर १८९१ मध्ये जन्मास आले. बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा नि मृत्यू १९५६ चा म्हणजे ६५ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तिसाव्या वर्षापासून ते सामाजिक जीवनात सक्रीय झाले म्हणजेच अवघ्या ३५ वर्षात समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. धर्मग्रंथावर चालणारी मनुची व्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्यांचा संदेश देणारी धर्मनिरपेक्ष राज्य घटना त्यांनी व त्यांच्या सहकारयांनी तयार केली. व नव्या भारताचा उदय झाला.

अस्पृश्यता आजही आहे मात्र वेगळ्या स्वरुपात. पूर्वीचे तिचे उघडे-नागडे स्वरूप बदलून आता ती छुप्या रीतीने आजही पाळली जाते. आजही ह्या समाजात खैरलांजी प्रकरण घडते,गावो गावी अत्याचार होतात, बाबासाहेबांचे नाव एखाद्या विद्यापीठाला द्यायचे झाले कि दंगे होतात. ह्या अशा दंग्यामधुनच माणसाचे खरे स्वरूप कळत असते.

1044317_1392502184297102_1519090719_n.jpg

आपण इतके उच्च शिक्षित असूनही आपल्याला हा समाज अशी वागणूक देतो तर गावोगावच्या आपल्या अडाणी बांधवांवर किती अत्याचार होत असतील हि भावना बाबासाहेबांना निराश करत असे. बाबासाहेबांनी जेव्हा अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला प्रारंभ केला तेव्हा पासून हिंदू समाजात ते अत्यंत अप्रिय ठरले. एकीकडे स्वातंत्र्य लढा जोमात सुरु होता महात्माजी त्याचे नेतृत्व करत होते हा लढा इंग्रजा विरुद्ध असल्यानं अख्खा देश त्यांच्या पाठीशी होता. संपूर्ण देशाचा त्यांना पाठींबा होता मात्र बाबासाहेबांचा लढा हा आपल्याच देशातील लोकांविरुद्ध होता. त्यामुळे ते बहुजन समाजात अप्रिय ठरत.

स्वताची गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून इंग्रजाविरुद्ध लढणारे लोक स्वताच्या समाजातील एका मोठ्या लोकसमूहाला मात्र गुलामगिरीत ठेवू इच्छित होते हा विरोधाभास नव्हता का? नैतिकतेच्या पातळीवर दुसर्यांना गुलामगिरित ठेवून स्वताच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हे योग्य ठरेल का? नेमका हाच प्रश्न बाबासाहेबांनी उचलला.

इंग्रजांच्या काळात दलित समाजाला थोडे बरे दिवस आले होते त्यांना काही प्रमाणात का होईना शिक्षण मिळत होते, लष्करात नोकरीची संधी मिळत होती. परंतु जातीयवाद, शिवाशिव, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास मनाई, देवळात प्रवेश करण्यास मनाई असले प्रकार कमी होत नव्हते.परकीय लोकांच्या हातात देश असतानाही आपल्या समाजाचे हे हाल तर उद्या ब्रिटीश गेल्यावर आपल्या समाजावरील अत्याचार कोणत्या थराला जाईल ह्याची बाबासाहेबांना चिंता होती. त्यामुळे ब्रिटीश सरकार असतानाच त्यांनी आपला लढा तीव्र केला. महात्मा गांधीना त्यांनी प्रश्न केला कि स्वतंत्र भारतात आमचे स्थान काय असणार. एकीकडे महात्माजी हे अस्पृश्य हे हिंदू समाजाचे अभिन्न अंग आहे असे सांगत तर दुसरीकडे अस्पृश्यांना हिंदूंच्या देवळात प्रवेश नव्हता. सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पिण्याचा हक्क नव्हता.

बाबासाहेबांनी पहिले काम हे केले कि मनाने मेलेल्या समाजाच्या मनात क्रांतीचे, बंडाचे बीज जागृत केले....
"असे जगणे जगण्यापेक्षा आपल्या आईच्या पोटातच तुम्ही का नाही मरून गेलात?"

"१०० वर्षे शेळी सारखे जगण्यापेक्षा १ दिवस वाघासारखे जगा"

हे बाबासाहेबांचे जळजळीत उद्गार दलित जनतेच्या मनात क्रांतीचा अंगार फुलवत होते. आणि शेवटी ठिणगी उडाली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली माणुसकी मिळवण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा एक महासंग्राम सुरु झाला ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुर्दाड मने झालेल्या दलितांना बाबासाहेबांसारखा अजोड सेनापती लाभला नि एक घमासान युद्ध सुरु झाले आपल्याच देशबांधवा विरुद्ध जे स्वताला जन्माने श्रेष्ठ समजत होते. एक पक्ष माणुसकीच्या हक्कासाठी लढत होता तर एक पक्ष धर्माचे दाखले देत अन्यायाचे समर्थन करत होता. हा लढा काही संपत्ती किंवा सत्ता मिळवण्याचा नव्हता तर माणुसकीचे हक्क मिळवण्याचा होता.निसगार्चे स्तोत्र पाणी ह्यावर आपलाही अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून लढावे लागले हि जगातल्या इतिहासातातील एकमेव घटना असावी.

शतकानु शतके अस्पृश्तेची रूढी सुरळीत चालू होती ती पाळणे हा उच्चवर्णीय आपला हक्क समजत होते तर आपण खालच्या जातीत जन्माला आलोय उच्चवर्णीयांच्या लाथा खाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, परम कर्तव्य आहे असे दलित समजत होते. ह्या सर्वाना तडाखा दिला बाबासाहेबांनी. इतके दिवस अस्पृश्यता पाळणे हा आपला हक्कच आहे ह्या भ्रमात असणाऱ्या समाजाला बाबासाहेबांच्या चळवळीने धक्काच बसला. आता उघड अस्पृश्यता पाळणे आपल्या हिताचे नाही आपल्यालाही प्रतिकार होवू शकतो हि जाणीव त्यांना झाली.

बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही तर ते आहे अन्यायाविरुद्ध बंड करण्याची शक्ती. शतकानु शतकाच्या जातीभेदाला काळाने दिलेले चोख उत्तर म्हणजे आंबेडकर. अन्यायाविरुद्ध मान न झुकवता प्रतिकार करणारा प्रत्येक जण हा आपल्यात एक आंबेडकर घेवून वावरत असतो. मग तो मालकाच्या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला नोकर असो, शासनाच्या अन्याया विरुद्ध उभी ठाकलेली जनता असो तिच्यात आंबेडकरी अंश असतोच. जेथे जेथे अन्याय, अत्याचार असतो तेथे होणारे बंड म्हणजे आंबेडकर. आंबेडकर नावाची एक व्यक्ती इतिहासात होवून गेली पण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक अनमोल ठेव ठेवून गेली ती म्हणजे प्रेरणा. अन्यायाविरुद्ध शरण न जाता लढण्याची प्रेरणा.

946309_440233529416829_330796937_n.jpg

आज साऱ्या जगात बाबासाहेबांचे नाव आहे. त्यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे.. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं… विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं.

बाबासाहेबांचा लढा हा फक्त एक लढा नसून मानवमुक्तीचे प्रतिक ठरला आहे.

आजही दलित समाजावर अत्याचार होतो त्यांच्या झोपड्या पेटवल्या जातात झोपड्यातून येणाऱ्या स्त्रियांच्या लहान मुलांच्या किंकाळ्या थांबलेल्या नाहीत पण कितीही अत्याचार अन्याय झाले तरी ते सहन न करता त्याविरुद्ध लढा देणे बंड करणे हि आंबेडकरी शिकवण दलित जनता विसरणार नाही.

1374129_358891534245008_1533361050_n.jpg

दलित जनतेची बाबासाहेबावर अमाप भक्ती आहे, प्रेम आहे, आदर आहे असे का? तो काही कोणी नवसाला पावणारा देव नाही कि सर्व दुखः दूर करण्याची हमी देणारा कोणी बुवा नाही. पण तो आहे मुकाट्याने अन्याय सहन करणाऱ्या समाजात क्रांतीची ज्वाला पेटवणारा युगपुरुष. पिढ्यान पिढ्या गुलामीत राहण्याची सवय झालेल्या समाजाला स्वतंत्रता देणारा महामानव. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची आपल्या ह्या उद्धारकर्त्याबद्दल एकच भावना असते ती म्हणजे

‘मेरे तन मे हे भीम मेरे मन मे हे भीम अगर मर जावू तो कफ़न पे लिख देना जयभीम! जयभीम’!.

2.jpg

बाबासाहेबांना सादर प्रणाम तुम्ही पेटवलेली क्रांतीची मशाल आम्ही विझून देणार नाही.

जय भीम.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Do you know why Modi ji is unable to take tough decisions anywhere?
In such a situation, what he is able to do is also a big miracle.

If you read below you will know

What cards have been played by the Congress playing the Muslim and Christian cards in the country…!
It is the right of every Indian to know…
After the formation of the Congress government in 2008, the dark acts of Sonia Antonia and Rahul Khan ...
Muslim Christian reservation havoc!

▪️ Total posts in President's Secretariat: 49
Muslim-Christian: 45
Hindu: 4

▪️ Total posts in the Vice President's Secretariat: 7
Muslim-Christian: 7
Hindu: 00

▪️Cabinet Secretary Total posts of ministers: 20
Muslim-Christian: 19
Hindu: 1

▪️ Total posts in Prime Minister's Office: 35
Muslim-Christian: 33
Hindu: 2

▪️Total posts in Agriculture-Irrigation Department: 274
Muslim-Christian: 259
Hindu: 15

▪️Total posts in Ministry of Defense: 1379
Muslim-Christian: 1331
Hindu: 48

▪️ Social Health Ministry Total Posts: 209
Muslim-Christian: 192
Hindu: 17

▪️Total posts in Finance Ministry: 1008
Muslim-Christian: 952
Hindu: 56

▪️ Total posts in planetary ministry: 409
Muslim-Christian: 377
Hindu: 32

▪️ Total Posts in Ministry of Labor: 74
Muslim-Christian: 70
Hindu: 4

▪️ Ministry of Chemical-Petrochemicals Total Posts: 121
Muslim-Christian: 112
Hindu: 9

▪️Governor-Lt. Governor Total Posts: 27
Muslim-Christian: 20
Hindu: 7

▪️ Ambassador abroad: 140
Muslim-Christian: 130
Hindu: 10

▪️ University Vice Chancellor: 108
Muslim-Christian: 88
Hindu: 20

▪️ Posts of Principal Secretary: 26
Muslim-Christian: 20
Hindu: 6

▪️ High Court Judges: 330
Muslim-Christian: 326
Hindu: 4

▪️ Supreme Court Judges: 23
Muslim-Christian: 20
Hindu: 03

▪️ IAS Officer: 3600
Muslim-Christian: 3000
Hindu: 600

▪️PTI Total Posts: 2700
Muslim-Christian: 2400
Hindu: 300

Since 1947, no government has ignored and violated the constitution in this way, there are no other castes, superior, honest, qualified, experienced and hardworking than the eyes of the government ...Was this not against the violation of law and constitution?

Forwarded as received

>>>>पण सारी चीड व्यक्त करूनसुद्धा धर्म, संस्कृती आणि राष्ट्र याविषयी त्यांचे प्रेम पूर्णपणे कायम होते.

धर्म आणि संस्कृतीबद्दल फार मोठी उडी झाली. अत्यंत सिलेक्टिव्ह, म्हणजे फक्त ते एक भाषण इतकेच बाबासाहेबांचे साहित्य वाचल्यास असे मत होईल. He didnt hold any punches in annihilation of caste .अवर्ण आणि दलितांसाठी चेंबर ऑफ हॉरर्स असं ते धर्माचे वर्णन करतात.

हाथरस मधे सरकारनं काय केलं?
सीबीआय कडे चौकशी दिली.

काश्मीर मधे 370 रद्द होण्या अगोदर होणारे अत्याचार मान्य आहेत का ?

शेवटी Forwarded as received असे disclaimer टाकले की अक्षरशः काहीही खपवता येते.

ViKu was arrested on Dubai airport in 2002 with 2 kg of cocaine and 5 kg of gold.
After the arrest, he called up Robert Vadra and extricated himself with some help from Indian government.
-Forwarded as Received.

दत्तोपंत ठेंगडी व डॉ आंबेडकर यांचे विचार इतके diametrically परस्परविरोधी होते की रिड्ल्स सारखे पुस्तक वर वर चाळले आहे शांनाही हा किस्सा खरा वाटणार नाही. हा किस्सा एकतर खोटा आहे किंवा मग अतिशय मसाला भरलेला आहे.

वाल्मिकी समाजाबद्दाल भाजपाला उतू आलेले प्रेम आईचे नसून पुतना मावशीचे आहे. एरवी दलित/ आदिवासी समाज फक्त foot soldiers किंवा cannon fodder म्हणून हवा असतो. उर्वरीत भारतात असलेल्या त्या समाजाच्या हाल आपेष्टांवर द वायर हे तथाकथित फुर्रोगामी वृत्तपत्रच सातत्याने लिहित असते.

https://bombayhighcourt.nic.in/jshow.php

Mumbai high court judge

म्हणजे ते वरचे फॉरवर्ड कितपत खरे , लक्षात येते

उलट , मुस्लिम आणि दलित हे सरकारी नोकरीत लोकसंख्येच्या प्रमाणात नाहीत , हेच सिद्ध झाले आहे

100 % हिंदूराष्ट्र होते , तेंव्हा कुठे पुष्पक विमान निर्यात करत होते म्हणे ?

ViKu was arrested on Dubai airport in 2002 with 2 kg of cocaine and 5 kg of gold.
After the arrest, he called up Robert Vadra and extricated himself with some help from Indian government.
-Forwarded as Received.

विकु दंडवत घ्या Lol

<हाथरस मधे सरकारनं काय केलं?
सीबीआय कडे चौकशी दिली.<

मुलीच्या कुटुंबाला धमकावलं, कोंडून ठेवून मुलीचा मृतदेह जाळला (त्याला अंत्यसंस्कार म्हणत नाहीत ) त्यांच्यावर पाळत ठेवली , फोन टॅप केले, बलात्कार झालाच नाही असे सांगितले, गावात दहशत पसरवणार्‍या सवर्ण सेनेला पूर्ण मोकळीक दिली. सवर्ण सेनेचा माणूस धमक्या देत असलेल्या व्हिडियोत पोलिसही दिसतोय.

आणि फुरोगामी मीडिया तर ठीक, पण ओपी इंडिया, रिपब्लिक, स्वराज्य वाल्यांनी काही ओपिनियन पीस सोडून लिहिले का ? मग यडच्याप मीडियाचा फुरोगामी मीडिया एवढाच हात म्हणायला पाहिजे.

बाकी सरकारला पण माहिती कोट करायला न्यूजलोन्ड्री वापरावी लागते, रिपब्लिक आणि ओपी चालत नाही, यातच काय ते आले.

ठेंगडी हे आंबेडकरांचे स्विय सहायक होते या थापा आहेत का सत्य हे शोधण्याच्या प्रयत्नात दोन महत्वाच्या लिंक मिळाल्या. प्रा. नरके यांनी छान मुद्दे मांडले आहेत.

https://theprint.in/opinion/no-ideological-synergy-between-ambedkar-and-...

https://theprint.in/opinion/ambedkar-was-not-impressed-by-rss-or-in-alli...

प्रा हरी नरके हे प्राधयपक तसेच संशोधक आहेत, त्यांनी ५०+ पुस्तकांचे लेखक-संपादक केले आहे. त्यांचा ब्लॉग अभ्यासण्यासारखा आहे,
https://harinarke.blogspot.com/

तो अमक्याचा स्वयंपाकी होता , हा तमक्याचा स्वीय पी ए होता , बाबासाहेबांच्या नजरेतून इस्लाम , ओवेसीच्या नजरेतून अजून कुणीतरी , जिनाचे गांधीबद्दल विचार , नेहरूंचे संघाबद्दल तारीफ करणारे उदगार ( कोणत्या तरी प्रोग्रॅमला बोलावून काढलेले वगैरे) इ इ
भाजपाना असे संदर्भ बरोबर सापडतात , मग ते त्यातून अशा गोष्टींचा आधार घेत अरबी सुरस कादंबर्या , ताष्कंड फाईल्स , मनमोहन मुवि , गोडसे ठो ठो , वगैरे कलाकृती जन्माला घालतात
भाजपे अशा पोथ्या पसरवून टाकण्यात पटाईत आहेत

Pages