सर्वप्रथम मनीमोहोर यांचे खास आभार. त्यांच्या उकडीच्या पाककृतीमुळे माझं काम एकदम सोप्पं झालं. कारण मोदकांसाठी आणलेली पिठी गणेश चतुर्थीचे मोदक करतानाच संपली होती. त्यांची उकडीची कृती अत्यंत सोपी आहे. मी प्रथमच केली आणि चांगली जमली.
आता सुकुर मोदक या नावाविषयी. या मोदकांच्या आतलं सारण हे सुकुरउंडे (सुकरुंडे) या कारवारी/कोकणी पदार्थात वापरलं जाणारं सारण आहे. ते गोल असतात म्हणून उंडे, हे मोदक आहेत म्हणून मी सुकुर मोदक असं नाव दिलंय मला सुकुर या शब्दाचा अर्थ माहिती नाही.
सुकुर मोदकांसाठी लागणारं साहित्य-
सारणासाठी
१ वाटी चण्याची डाळ,
१ वाटी ओला नारळ,
दीड वाटी चिरलेला गूळ
जायफळाची पूड स्वादापुरेशी,
सुकामेवा- बदाम, पिस्ते वगैरे आवडीनुसार.
पारीसाठी
अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ,
अर्धी वाटी बासमती तांदूळ,
दीड वाटी पाणी
एक छोटा चमचा तूप,
एक छोटा चमचा तेल,
चिमूटभर मीठ.
सारणाची कृती
चण्याची डाळ दुप्पट पाणी घालून कुकरला १५ मिनिटं शिजवून घेतली. त्यात गूळ आणि नारळ घालून पुरण शिजवून घेतलं. शेवटी जायफळाची पूड घातली. पुरण वाटायचं नाही. ढवळताना डाळ जेवढी मोडते तेवढी पुरे. सुकामेवा जाडसर तुकडे/ काप करून घेतले. पुरण गार करत ठेवलं.
आता उकड.
(ही उकड मी मनीमोहोर यांच्या कृतीने केली आहे. पिठी वापरून पारंपरिक पद्धतीने केली तरी अर्थातच चालेल)
उकडीसाठी दोन्ही प्रकारचे तांदूळ एकत्र करून, धुवून रात्री भिजत ठेवले. सकाळी ते पूर्ण निथळून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून (यासाठी दीड वाटीतलंच पाणी वापरलं) अत्यंत बारीक, गंधासारखे वाटले. दीड वाटीपैकी उरलेलं पाणी या वाटलेल्या तांदुळात घातलं. मीठ, तेल आणि तूप घालून ते मिश्रण नॉनस्टिक पॅनमध्ये घालून सतत ढवळत राहून शिजवलं. थोडं घट्ट झाल्यावर झाकण ठेवून दोन वाफा काढल्या.
उकड हाताला सोसेल इतकी गार झाल्यावर थोडी मळून घेतली. छोटे गोळे करून आपण नेहमी मोदकाची पारी करतो तशी पारी करून, आत पुरण भरून मोदक केले.
ही उकड थंड झाली तरी मोदक व्यवस्थित करता येतात, पारीला चिरा वगैरे अजिबात जात नाहीत. फारशी मळावीही लागत नाही.
नेहमीसारखे मोदक करून वाफवून घेतले.
सोबत तूप्/दूध/ नारळाचं दूध घ्या नाहीतर नुसतेच खा ..आपापल्या आवडीनुसार
नाव मस्त आणि रेसिपी पण
नाव मस्त आणि रेसिपी पण
वावे एकदम युनिक पद्धत आहे,
वावे एकदम युनिक पद्धत आहे वेगळी पद्धत आहे, (भाडिपाच्या अनि सारखं
) छान लागतील सुकर मोदक.
कडबू आमच्या कडे पण करतात, पुरण भरून केलेली कणकेचा करंजी. आमच्या कडे हे उकडतात. मला एवढं खास आवडत नाही.
ममोची उकडीचे पद्धत एकदम हिट आहे. (मी माझ्या सगळ्या बहिणी मैत्रिणींना सांगितली आहे. त्यांना पण माहितीये कि माबोचा परिवार
)
सुंदर.
सुंदर.
शेवटचा फोटो छान दिसतोय.
मला पण एकदा अशी उकड करुन बघायची आहे पण फसेल की काय अशी भिती वाटते.
सुंदरच वावे.
सुंदरच वावे.
मला पण एकदा अशी उकड करुन
मला पण एकदा अशी उकड करुन बघायची आहे पण फसेल की काय अशी भिती वाटते.>>>>> ममो सांगेलच तुला, पण मीही सांगते कि बिनधास्त ट्राय कर. अजिबात बिघडत नाहीत मोदक, मी एका वाटीचे करून बघितले होते आधी. ८ मोदक झाले आणि फुटले नाहीत छान झाले. उकड छान होते.
सगळ्यांना धन्यवाद _/\_
सगळ्यांना धन्यवाद _/\_
उकडीच्या सोपेपणाबद्दल अजिबात शंका बाळगू नका. गंधासारखं वाटणं आणि शिजवताना सतत ढवळणं या दोन गोष्टी फक्त सांभाळायच्या!
मोदक मस्त दिसतायत. रेसिपी आणि
मोदक मस्त दिसतायत. रेसिपी आणि त्यातली माहिती मस्त. नामकरण आवडलं.
अरे वा! छान वाटतंय हे पुरण
अरे वा! छान वाटतंय हे पुरण+ओले खोबरे सारण.
कल्पना छान आहे.
गणपतीत केलेलं पुरण उरलं तर खोबर्याच्या सारणाबरोबर डीप फ्रिजमधे ढकलून १५-२० दिवसांनी दोन्ही एकत्र करून मोदक करायचे
नुकतीच पं. महादेवशास्त्री
नुकतीच पं. महादेवशास्त्री जोशींची 'घररिघी' ही कथा वाचनात आली. त्यात 'शकुनउंडे' या पदार्थाचं नाव आलं. मुगाचं पुरण करून त्याचे उंडे करून ते तांदुळाच्या पातळ पिठात बुडवून तळायचे. ही कथा कोकण/गोवा परिसरातली आहे.
सहज 'सूपशास्त्र' पुस्तकात पाहिलं तर त्यातही शकुनउंडे नावानेच हा पदार्थ आहे, पण मुगाच्या पुरणाचे उंडे उडदाच्या डाळीच्या पातळ पिठात बुडवून तळायचे आहेत.
पुलंच्या 'खाद्यजीवन'मध्ये त्यांनी पुरणाचे कारवार-सीमेवर सुकुरउंडे होतात असं म्हटलंय.
सुकुरउंडे करताना पुरणात ओलं खोबरंही घालतात, जे शकुनउंडे करताना घालत नव्हते असं दिसतंय. पण सुकुरउंड्यांचं मूळ कदाचित शकुनउंड्यांमध्ये असावं.
Pages