![tomato bharit](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/10/12/tomato-bharit.jpg)
लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
छान असेच ढब्बू मिरचीचे होते
छान
असेच ढब्बू मिरचीचे होते
रेसिपि मस्त आहे.. हि अशीच
रेसिपि मस्त आहे.. हि अशीच रेसिपि सैफ अली खान ‘शेफ’ चित्रपटात अगदी अमृतसरमधे जाऊन बनवतो ते आठवलं.. आणि मेक्सिकोत माझी मेड लाल ऐवजी हिरव्या टोमॅटोची अशीच एक चटणी बनवायची..तीही अप्रतिम लागायची
मस्त
मस्त
३१३ प्रतिसाद!
२१३ प्रतिसाद!
मायबोली टॉप फाइव रेसिपीज जाईल हे.
काल अवन मध्ये भाजून केले,
काल अवन मध्ये भाजून केले, कोथिंबीर नसल्याने वगळून केले, छान झाले. यापूर्वी गेस वर भाजून केलेले आहे तेही ही छान च होते.
छान
छान
मी टोमॅटोच्या फोडी परतून मऊ भाजीचटणीभरीत करतो , त्यात मटारही घालायची
Pages