इथे सॉफ्टवेअरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या. मलाही सल्ला मिळेल अशा आशेने धागा काढतीये.
मी ११ वर्ष जावा डेव्हलपर म्हणून काम केलं आहे. काही पर्सनल कारणांमुळे तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. आता परत नोकरी सुरू करायची आहे. सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतर काही करणार नाही, हे नक्की. कोडींग, लॉजिक माझं पॅशन आहे.
पण तीन वर्षांच्या गॅप मध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत - मार्केट आणि वैयक्तिक आयुष्यातही.
मला घराकडे, बाळाकडे दुर्लक्ष न करता काम - जॉब करायचा आहे. जावा ओपन सोर्स असल्याने स-त-त शिकणे कधीच थांबत नाही. अर्थात कुठल्याही technology मध्ये आपण कायम विद्यार्थी असणार हे मला मान्य आहे. पण ज्यांनी जावा मध्ये काम केले आहे त्यांना माहिती असेल की UI पासून, Database, memory- performance सगळं काही यात येतं आणि ते सतत बदलत राहत. मी फक्त बॅकेण्ड / फ्रंट एंड मध्ये काम करेन असं सांगूनही इतर काम येत असतातच. आणि आपल्याला आले पाहिजे ही अपेक्षा असतेच हे गेल्या 11 वर्षांत मी भारतात आणि भारताबाहेरही अनुभवले आहे. मी बॅकेण्ड डेव्हलपर आहे म्हणून मी json किंवा ext JS च्या चेंजवर काम करणार नाही, हे कुठेही चाललं नाही. Senior Developer म्हणून बेसिक सगळं केलंच - आलंच पाहिजे अशाच वातावरणात मी राहिले आहे. रात्री जागून, चुकत माकत शिकून वेळ निभावून नेली आहे. (ज्यांना कामाच्या सीमारेषा आखता येऊन काम करता आले आहे , ते लकी लोक आहेत. मी त्यांपैकी नाही) पण आता अशा वेळी शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताकत कमी पडेल, हे जाणवते. याशिवाय performance tuning/ CI च्या नवीन पद्धती, एनवेळाचे चेंजेस, production issues वगैरे वगैरे म्हणलं की अंगावर काटा येतोय. 11 वर्ष खूप मन लावून प्रचंड काम केलंय. पण आपण पोलिटिक्स मध्ये तग धरू शकणार नाही, हेही माहिती आहे.
या सगळ्या background वर मी कुठली तरी थोडी तरी boundry असलेली नवी technology शिकावी आणि त्यात काम करावे असं ठरवत आहे.
१. एका बाजूने वाटते की नवीन काही शिकण्यापेक्षा इतकी वर्षे ज्यात काम केले ते पुन्हा करणे सोपे जाईल का. पण वरचा सगळा विचार आला की जावा नकोच असं वाटतं.
२. त्यातल्या त्यात Boundary असणारी technology बघावी असा विचार करते आहे. Salesforce किंवा RPA - Blue Prism, UI path वगैरे बघावं का ? कोणी यापैकी कशावर काम करतं का?
३. ऑटोमॅशन Testing हा कदाचित त्यातल्या त्यात सोपा आणि नोकरी मिळायला जमणारा मार्ग वाटतो. पण त्यात माझी लॉजिक / नवीन क्रीएशनची भूक कदाचित भागणार नाही. अर्थात सध्या हे सेकंडरी आहे.
इथे खूप experience असलेले बरेच लोक आहे. तुमच्या सल्ल्यांच्या प्रतीक्षेत.
त.टी. १. माझ्या करिअर आणि नोकरीला घरून पूर्ण पाठींबा आहे. नवरा स्वयंपाक करणे, इतर कामे, बाळाला मालिश करून अंघोळ वगैरे सगळं काही करतो. मेथी, तुरीचे दाणे सारख्या किचकट भाज्यासुद्धा एकटा निवडतो. पण मलाच आता unlimited शारीरिक आणि मानसिक कष्ट नको वाटत आहेत. Boundry मध्ये असणारे कष्ट करावेच लागतात, त्याला माझी ना नाही.
२. जावा मध्येच मला शांत , न फाटलेला प्रोजेक्ट मिळाला तर त्याहून भारी काहीच नाही. पण मला कोणी सोन्याच्या ताटात अशी नोकरी आणून देईल असं अजिबात वाटत नाही.
Selenium with Java या जॉब ला
Selenium with Java या जॉब ला पुष्कळ डिमांड आहे. आणि ऑटोमॅशन हे भरपूर challenging फील्ड आहे
११ वर्षे जावा चा अनुभव आहे
११ वर्षे जावा चा अनुभव आहे म्हणजे प्रॉडक्ट/टेक्नॉलॉजी कंपन्यांमधे आधी शोधा. तेथे चांगली संधी असेल. आणि पॉलिटिक्स वगैरेशी फारसा संबंध येणार नाही
जावा मधे जर आता संधी मिळत नसतील तर पायथॉन, स्पार्क वगैरे मधे बघा. क्लाउड मधे अॅमेझॉन (AWS), मायक्रोसॉफ्ट (Azure), गूगल (GCP) वगैरे ज्या सर्विसेस सध्या प्रमोट करत आहेत त्या वापरणार्यांना स्पार्क्/स्काला, पायथॉन/जावा लागते. पुढची काही वर्षे हे कॉमन असेल.
बा़की जावा येणार्या व्यक्तीला सेल्सफोर्स मधे वेगळे काही शिकावे लागणार नाही. इथे सेल्सफोर्स म्हणजे force.com - प्लॅटफॉर्मवर लिहीणे जाणारे कोड म्हणत आहात हे गृहीत धरतो. जावा अनुभवावरून ते जास्त जवळचे आहे - अक्षरशः एका दिवसांत तेथे तुम्ही कोडिंग करू शकाल. VisualForce वगैरेंची माहिती बघितलीत तर लगेच लक्षात येइल. मी हार्डकोअर जावा मधे नाही पण मलाही सहज जमले.
दुसरे म्हणजे C# - मायक्रोसॉफ्ट क्लाउड मधे याचा उपयोग होईल. हे ही पुन्हा जावावाल्यांना काहीच जड नाही.
जावा मी देखील सोडली.. आता
जावा मी देखील सोडली.. आता स्कोप देखील नाहीय.. जावास्क्रिप्ट ला जास्त स्कोप आहे... टाईप स्क्रिप्ट, नोड, रियाकट js.
बँकेण्ड जावा कोड आजकाल गो लँग मध्ये मोव्ह होत आहेत... परफॉर्मन्स मुळे...
डेव्ह ओप्स मध्ये जा.. डिमांड पण आहे आणि जमेलही..
ऑटोमेशन टेस्टिंग ( SDE) चांगला पर्याय आहे...
मी सध्या सेल्सफोर्स शिकत आहे.
मी सध्या सेल्सफोर्स शिकत आहे. प्रोजेक्टमध्ये आवश्यकता भासल्याने सर्टिफिकेशन्स करण्यास सांगितले आहे. सर्व मटेरियल उपलब्ध आहे ट्रेलहेडवर. ॲडमिन आणि ॲप बिल्डर ही सर्टिफिकेशन्स केलीत तर जॉब्स मिळतात. सोबत जीसीपी किंवा ॲझ्युरचे सर्टिफिकेशन करा. सर्टिफिकेशन हा कळीचा मुद्दा आहे. २०२१ मध्ये क्लाऊडवर प्रचंड जॉब्स उपलब्ध असतील. तुमच्या अनुभवाच्या बळावर सेल्सफोर्समध्ये जॉब मिळणे सहज शक्य व्हावे कारण आर्किटेक्चर व ॲपेक्स कोडिंग तुम्हाला सहजी जमू शकेल.
शुभेच्छा!
punekarp , धन्यवाद. Selenium
punekarp , धन्यवाद. Selenium with Java चे कोर्सेस बघते.
फारएण्ड - मला python येते. तुम्ही बरेच पर्याय सुचवले आहेत. बघते.
च्रप्स - गो लँग बद्दल माहिती नव्हते. डेव्ह ओप्सच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. डेव्हलपर आणि टेस्टरच्या तुलनेत हे जॉब्स कमी असावे. 2016च्या आसपास मी आमचं प्रोजेक्ट jenkins वर टाकलं होतं.
Production ची war , deployment च्या स्टेप्स वगैरे मीच द्यायचे. Developer कडून करवून घ्यायच्या कामांना किती dev ops resources लावतील किंवा एका dev ops कडून अनेक प्रोजेक्ट्स करवून घेत असतील, असा माझा अंदाज. त्यामुळे competition आणि त्यामुळे पॉलिटिक्स असू शकते या विचाराने मी तो पर्याय बाजूला ठेवला. सध्या कसं काम चालतं कल्पना नाही.
पुंबा - धन्यवाद. ट्रेलहेड पाहते. सर्टिफिकेशन हा कळीचा मुद्दा आहे - या सल्ल्याबद्दल आभार.
Think about SAP Hybris - your
Think about SAP Hybris - your Java background will be helpful.
तुमच्या एकंदर प्रोफाईल वरून
तुमच्या एकंदर प्रोफाईल वरून तुम्हाला असलेले जावा स्किल्स इतर अनेक पर्यायांसाठी लिव्हरेज करणे फारसे अवघड जाणार नाही. शुभेच्छा !
अनुरनु >> SAP Hybris च्या
अनुरनु >> SAP Hybris च्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. याबद्दल शोधते.
vijaykulkarni >> धन्यवाद. तीन वर्षांची गॅप हा फार मोठा प्रश्न आहे माझ्यापुढे.
तसचं टेकनॉलॉजी बदलली तरी अनुभव नसताना माझा रीझ्यूम कोणी का सिलेक्ट करेल हाही प्रश्न आहे. सर्टिफिकेशन नक्की करेन.
च्रप्स,फारएण्ड, तुम्ही टेकनॉलॉजी बदलली तेंव्हा जॉब मिळवण्यासाठी काही वेगळे केले का?
पीनी, रिसोर्स ची तातडीने गरज
पीनी, रिसोर्स ची तातडीने गरज आहे आणि कोणी मिळत नाहीये अश्या परिस्थिती बऱ्याच येतात.
टेक्नॉलॉजी स्विच बद्दल आत्मविश्वास दाखवा, नीट होमवर्क करा.
3 वर्ष काहीतरी एक्सप दाखवा...
3 वर्ष काहीतरी एक्सप दाखवा... दाक्षिणात्य लोक हेच करतात आणि जॉब पटकावतात...
ज्या नव्या टेक्नॉलॉजी मध्ये जायचे आहे .. जुने प्रोजेक्ट त्याच tech मध्ये दाखवा.. रीसुमे बदला...
इथं शून्य exp असणाऱ्या काही व्यक्ती पहिल्या आहेत ज्या पाच दहा वर्षे अनुभव दाखवूनजॉब मिळवतात...
लक्षात ठेवा... जॉब मध्ये सर्वात कठीण फक्त इंटरव्ह्यू असतो... मस्त इंटरव्ह्यू प्रेप करा...एकदा इंटरव्ह्यू झाला, तुम्ही जॉईन केले , बाकी गोष्टी आपोआप जमत जातील..
जॉबला बांधून घेणं शक्य किंवा
जॉबला बांधून घेणं शक्य किंवा आवश्यक नसेल तर फ्रीलान्सर किंवा अपवर्कसारख्या साइट्सवरून तुमच्या वेळात करता येण्यासारखी कामं कदाचित घेऊ शकाल. तशी कामं करत नॉलेज बेसही वाढवता येईल.
जर पैसे मिळवायचं कंपलशन नसेल
जर पैसे मिळवायचं कंपलशन नसेल तर एखादा ओपन सोर्स प्रोजेक्ट निवडून त्यात कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात करा. तुमची पॅशन साध्य होईल. तुमच्या सोईनुसार काम करायला मिळेल आणि या अनुभवावर पुढे कदाचित दुसरी नोकरी मिळायला सोपे जाईल.
टेक्नॉलॉजी स्विच बद्दल
टेक्नॉलॉजी स्विच बद्दल आत्मविश्वास दाखवा, नीट होमवर्क करा. >>> +१ जावा मधे ११ वर्षांचा अनुभव आहे तुमचा. त्यासारखी दुसरी लँग्वेज, टेक्नॉलॉजी सहज आत्मसात करण्याइतका आत्मविश्वास स्वतःवर ठेवा म्हणजे इण्टरव्यूज मधे तो आपोआप दिसेल.
तुम्ही टेकनॉलॉजी बदलली तेंव्हा जॉब मिळवण्यासाठी काही वेगळे केले का? >>> मी आहे त्या जॉब मधेच हे सगळे केले.
गॅपची चिंता फार करू नका. टेक्नॉलॉजी मधे नवीन गोष्टी येण्याचा वेग खूप असला तरी त्या वापरणार्या कंपन्या इतक्या लगेच प्रॉडक्शन सिस्टीम्स बदलत नाहीत. गॅपबद्दल तुमचे कारणही सबळ आहे.
टेकनॉलॉजी बदलली तरी अनुभव
टेकनॉलॉजी बदलली तरी अनुभव नसताना माझा रीझ्यूम कोणी का सिलेक्ट करेल हाही प्रश्न आहे. सर्टिफिकेशन नक्की करेन.
>> whats ur location?
Our company has drive in between for moms with gaps.
One of my friends company mostly hires returning moms only (u get less salary initially)
टेकनॉलॉजी बदलली तरी अनुभव
टेकनॉलॉजी बदलली तरी अनुभव नसताना माझा रीझ्यूम कोणी का सिलेक्ट करेल हाही प्रश्न आहे
>>>रिस्युम बदलायचा...
Tata group has one such
Tata group has one such initiative for moms returning to work force.
mi_anu >> प्रतिसादाबद्दल
mi_anu >> प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
" टेक्नॉलॉजी स्विच बद्दल आत्मविश्वास दाखवा, नीट होमवर्क करा" - खरंय. गॅपमुळे आता सगळं रिफ्रेश करायला पाहिजे. भरपूर अभ्यास केला तरच आत्मविश्वास येईल.
च्रप्स >> धन्यवाद. इंटरव्ह्यू आणि रेस्युम महत्वाचा हे बरोबर. हवा तसा रिझ्युम बद्दलण्याबद्दल "Cooking resume" अशी टर्म नुकतीच ऐकली. पण मला असं करणं झेपलं आणि निभावताना आलं पाहिजे.
स्वाती_आंबोळे >> धन्यवाद. मी नोकरी सोडली त्यावेळी असा प्रयत्न केला होता. पण तिथेही ओळखी, आधी केलेले फ्रीलान्स प्रोजेक्ट्स लागतात असं लक्षात आलं. त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला नव्हता. आता एकटीला अख्खा प्रोजेक्ट जमेल का याची शंका वाटते. पण प्रयत्न करून पहाते.
व्यत्यय >> धन्यवाद. मला ओपन सोर्स प्रोजेक्ट बद्दल कल्पना नव्हती. कंट्रीब्युट कसं करता येईल ते चेक करते.
फारएण्ड >> मनापासून धन्यवाद.
नानबा >> धन्यवाद. मी पुण्यात असते. 2020 मध्ये बऱ्याच कंपन्यांनी असे ड्राइव्ह बंद केले असे ऐकले होतं. तुमच्या कंपनीमध्ये कसं अप्लाय करता येईल. इंटरव्ह्यू , कोडींग टेस्टस वगैरे होतात का? प्रोसेस काय आहे? तुम्हाला संपर्क कसा साधू?
अमा >> धन्यवाद. तिथे रिझ्युम देईन.
सॉफ्टवेअरमधील नोकरीबद्दल मी
सॉफ्टवेअरमधील नोकरीबद्दल मी काही माहिती देऊ शकणार नाही कारण त्या क्षेत्रात नाही.
tatasecondcareer . com वर जाऊन पहाता येईल तुमच्या आवडीचे काही मिळेल का. गॅपनंतर पुन्हा काम सुरू करण्यासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे त्यांचा.
तुमची आधीची नोकरी जर एकाच ठिकाणी असेल तर तिकडेच
किंवा
"11 वर्ष खूप मन लावून प्रचंड काम केलंय." --- हे बघणारे आणि तुमच्या क्षमतेबद्दल, कामाच्या दर्जाबद्दल खात्री असणारे, तशी हमी तुमच्या भावी एम्प्लॉयरला देऊ शकणारे कोणी गुणग्राहक असतीलच. त्यांची मदत घेऊन पाहिली तर?
सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतर काही करणार नाही, हे नक्की. कोडींग, लॉजिक माझं पॅशन आहे.
पण तीन वर्षांच्या गॅप मध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत - वैयक्तिक आयुष्यातही.
मला घराकडे, बाळाकडे दुर्लक्ष न करता काम - जॉब करायचा आहे.
>>>>
या व तुमच्या इतर priorities आणि limitations लक्षात घ्या. त्याच्यात कशाशी तडजोड किंवा घरच्यांच्या मदतीने मात करता येईल आणि कशावर तुम्ही ठाम आहातच ते ठरवा. तशी कल्पना द्या समोरच्याला म्हणजे पुढे जाऊन त्यांना आणि तुम्हालाही वादाचे, नाराजीचे प्रसंग येणार नाहीत.
२० वर्षे पूर्ण गृहिणी असणारी पण स्वतःला mentally, physically, knowledgewise योग्य फॉर्ममध्ये ठेवणारी जर पुन्हा यशस्वीरीत्या कामाला लागू शकते (सॉफ्टवेअर नव्हे) तर तुमचा ३ वर्षांचा खंड (तोही योग्य कारणासाठी), अजिबात अडथळा ठरणार नाही. सगळे व्यवस्थित होईल. भले वेळ घ्याल थोडा.
अवांतर -- "Cooking resume" दुनिया करते म्हणून आपण का करावे? ज्यांना आपली क्षमता नाही, आहे त्या कौशल्यावर डाळ शिजणार नाही याची खात्री असते, ते करत असतील.
जो शंभर नंबरी आहे त्याने का स्वत:ची विश्वासार्हता पणाला लावावी? तेसुद्धा अजून नव्याने नकार पचवायला लागलेले नसताना... केवळ माझी मार्केट व्हॅल्यू गॅपमुळे कमी झाली आहे या मनातल्या बागुलबुव्यामुळे?
पुढे हे उघडकीस आले तर हुशार, मेहनती आहे पण खोटारडी आहे या इमेजचे काय कराल? हुशार, मेहनती वर फोकस करणारे किती आणि खोटारडीचा गवगवा करणारे किती भेटतील काय माहीत?
हे माझे वैयक्तिक मत आहे, सल्ला नव्हे.
सॉफ्टवेअर नोकर्यात काय होते, practicality काय असते मला कल्पना नाही. म्हणजे मी या / अन्य कुठल्याही परिस्थितीत असले असते तरीही Cooking resume मार्ग चोखाळला नसता, इतकेच नोंदवायचे आहे.
पुढे हे उघडकीस आले तर हुशार,
पुढे हे उघडकीस आले तर हुशार, मेहनती आहे पण खोटारडी आहे या इमेजचे काय कराल? हुशार, मेहनती वर फोकस करणारे किती आणि खोटारडीचा गवगवा करणारे किती भेटतील काय माहीत?
>>> वेगळा धागा होऊ शकेल...
सॉफ्टवेर मध्ये इमेज वगैरे काही नसते...
एक्सपिरियन्स खोटा नाहीच आहे... एक्सप खरा आहे.. प्रोजेक्ट देखील खरा आहे... टेक्नॉलॉजी वेगळी दाखवलीय...
आता उदाहरण देतो...
समजा पिनी यांचा एक प्रोजेक्ट आहे की अमुक तमुक वेब पेज जे एका ui टेक्नॉलॉजी मध्ये आहे त्याचा डेटा ज्या बॅकेण्ड सर्व्हिस मधून येतो त्यात त्यांनी काम केले आहे...
रिस्युम मध्ये बॅकेण्ड आणि फ्रन्टएन्ड दोन्ही टेक्नॉलॉजी टाकायच्या... cicd पण टाकू शकतो...
आणि इन्फ्रा म्हणजे कलाउड, K8 वगैरेही...
काही खोटे बोलतोय? नाही.. हे सगळे त्याच प्रोजेक्त चे एलिमेंट आहेत...
रिस्युम कूकिंग मी त्याला म्हणेन जिथे कामच केले नाहीय आणि एक्सपिरियन्स दाखवला गेला आहे...
प्रोजेक्ट मध्ये चालणाऱ्या
प्रोजेक्ट मध्ये चालणाऱ्या गोष्टी 'मी केल्या' म्हणून सीव्ही मध्ये लिहिणारे बरेच लोक आहेत.ते 'नरो वा कुंजरो वा' अर्ध सत्य आहे. फॉरट्रान किंवा मेटलॅब च्या आयुष्यात फक्त 2 ओळी कॉपी पेस्ट करणारे 'मेटलॅब एक्स्पर्ट' असं लिंकडइन वर लिहितात.
चांगला इंटरव्ह्यू घेणारा हे सर्व नेमके प्रश्न विचारून उघडं पाडू शकतो.
फक्त 'मी काम केलंय' लिहिण्या पेक्षा खरंच ओपन सोर्स प्रोजेक्ट्स वर काम केलेलं जास्त चांगलं.
माझ्या एका प्रोजेक्ट कलीग ने मी आणि अजून एक मुलगा होता त्यांना 'मी तुम्ही केलेलं हे हे काम नवं प्रोजेक्ट मिळवताना स्वतःच्या नावावर लिहिलं आहे' असं सांगितलं.आम्ही दोघांनीही ती कंपनी बदलली असल्याने त्याचं फार काही वाटून घेतलं नाही.
जे काही सी व्ही मध्ये लिहिलं आहे ते स्वतःला खणखणीत पणे आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे, त्यावर काम दिल्यास पुढे 'मला थोडा वेळ लागेल' न म्हणता ते काम पूर्ण केलं पाहिजे.प्रोजेक्ट्स ना नंबर हवेत, डेली स्टेटस हवं.
चांगला इंटरव्ह्यू घेणारा हे
चांगला इंटरव्ह्यू घेणारा हे सर्व नेमके प्रश्न विचारून उघडं पाडू शकतो.>> Completely agreed .. चांगला इंटरव्ह्यू घेणारा अगदी दोन एक प्रश्नांमधेच पकडू शकतो..त्यामुळे फेक एक्स्पिरियंस न दाखवलेलाच बरा.. त्याचबरोबर काही प्रोजेक्ट्समधे Background check करत असतील तर अजूनच वांदे..फेक एक्स्पिरियंस ऐवजी पूर्वीकधी udemy वरचे सर्टीफिकेट्स केले असतील तर ते गॅप फिल करण्यासाठी दाखवा.
अनुभव लिहिते. उपयोग झाला तर
अनुभव लिहिते. उपयोग झाला तर पहा.
मी ७ वर्ष गॅप घेतली होती. नोकरी करायची ठरवली तेव्हा नवीन काही शिकण्यापेक्षा आधी आहे त्यातच प्रयत्न करायचे ठरवले. त्यामुळे एक महिना सतत, ज्यावर काम केले त्याचा अभ्यास केला व सगळे ताजे केले व मगच अर्ज करायला सुरुवात केली. १०० ठिकाणी अर्ज केले. खूप कॉल आले. बहुतेकांनी अरे बाप रे ७ वर्षे गॅप म्हणुन नाकारले. त्यांना म्हटले क्लायंटना तरी विचारा पण उपयोग नाही झाला.
मग केव्हातरी ४ महिन्यांनी २ मुलाखती झाल्या. दोन्ही चांगल्या झाल्या. त्यातल्या एकानी केवळ गॅपमुळे नाकारले (पण मुलाखतीचा अनुभव पदरी पडला ज्याने दुसरी मुलाखत अजुन सोपी झाली). त्या दुसर्याने त्यानंतर ३ महिन्याने नोकरी दिली. त्यांना बहुतेक कोणी मिळाले नसेल.
मग आहे त्या क्षेत्रात ३ वर्ष काम केले. पण एव्हाना कंटाळा आला होता. मग क्षेत्र बदलायचे ठरवले. एक छोटा कोर्स केला व त्यावर युट्युब व्हिडिओ बघुन बघुन खूप सराव केला. आधीच्या अनुभवाचा नकळत उपयोग झाला. (डाटा अॅनॅलेटिक्स वगैरे).
सर्टीफिकेशनला वेळ मिळेना पण कशीबशी एका ओळखीने ईन्टर्न म्हणुन जवळजवळ शुन्य पगारावर एकीकडे नोकरी मिळाली. तिथे ३-४ महिने खर्या प्रोजेक्टवर जरा हात साफ करायला मिळाला. मग पुर्ण पगारावर तिथेच सध्या दुसरे प्रोजेक्ट मिळाले आहे. बघु आता पुढे काय होतंय.
त्यामुळे ज्यावर अनुभव आहे त्यावरील धूळ झटकुन शोधावे किंवा नवीन शिकायचे तर सर्टिफिकेशन करावे. किंवा कुठे ओळख असेल तर तिथे फुकट काम करावे असे मी ठरवले होते.
पण ओळखीने मिळाले तरीही सिद्ध करायला, सरावाला गत्यंतर नाही.
मला पण आहे त्या टेक्नॉलॉजीवर फेरफार करुन अर्ज करायला सुचवले गेले होते पण ते केले नाही कारण ते तत्वात बसत नव्हते, त्यांनी पकडले असते व नवीन क्षेत्रातले सगळे कोपरे माहीती नसताना काय लिहिणार हाही प्रश्न होता.
मी_अनु, म्हाळसा + 1
मी_अनु, म्हाळसा + 1
च्रप्स >> तुम्ही म्हणताय ते खूप लोक करतात. पण माझ्यासाठी अवघड आहे.
कारवी >> प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमचं म्हणणं पोचलं. खाली सविस्तर उत्तर लिहिते.
फेक एक्सपरिइन्स कसा दाखवू शकतात मला कल्पना नाही. त्या फंदात मी पडणार नाही. 3 वर्षांची गॅप दाखवणार आहे.
काहींनी (इथे आणि इतरत्र) मला सल्ला दिला आहे की आधीच्या कंपनीमधले केलेले प्रोजेक्ट्स जावा मध्ये नाही तर दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये दाखव ज्यामुळे रिझ्युम सिलेक्ट होऊन निदान इंटरव्ह्यू पर्यंत पोचता येईल. पण मी_अनु म्हणाल्या आहेत तसं इंटरव्ह्यूमध्ये पकडलं जाण्याची खूप शक्यता असते. थेअरी आणि खऱ्या प्रोजेक्टवर काम करणे यात बराच फरक असतो. त्यासाठी ब्लफ करता येणारी, थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असणारी व्यक्ती हवी. मी मुळातच खूप कॉन्फिडेंट व्यक्ती नाही. त्यामुळे अशी वेळ निभावून नेणं मला जमणार नाही.
मी इंटरव्ह्यू घेत असताना टेक्नॉलॉजी स्वीच करून आलेल्या माणसाला घेतलं नसतं. कारण आमच्या प्रोजेक्ट मध्ये खूप मारामारी असायची. अगदी माणूस बेंचसाठी घेतला तरी प्रोजेक्ट आल्यानंतर त्याला शिकायला वेळ देणे शक्य नसायचे.
याच विचाराने मला प्रोजेक्ट दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये दाखव हा सल्ला मिळाला असणार. ज्यांना ब्लफ करता येते, किंवा अजून काही जुगाड करता येतो ते असं सर्रास करत असतात.
पण याचीच दुसरी बाजू आहे की मला जर खरच प्रॅक्टिकल एक्सपरिइन्स नाही तर मला माझा लर्निंग कर्व्ह इतरांपेक्षा थोडा जास्त असेल आणि ते ऍक्सेप्ट करणारं प्रोजेक्ट मला हवं आहे. त्यामुळे रिटनींग मम किंवा फ्रेशर सारखा जॉब बघायला हवा. मला चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण काम न करता ब्लफ करून ते निभावण्यासाठी अजून सर्कस आणि ताण वाढवायचा नाही.
ज्या ताणापासून सुटण्यासाठी मी जावा सोडून देण्याचा विचार करत आहे, तोच ताण मला वेगळ्या पद्धतीने घ्यायचा नाही.
सुनिधी, इतक्या डिटेल
सुनिधी, इतक्या डिटेल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ते तत्वात बसत नव्हते +1
वर जनरलाइज्ड लिहिताना हे कळीचं वाक्य लिहायचं राहिलं.
आत्ता वरचे प्रतिसाद पुन्हा
आत्ता वरचे प्रतिसाद पुन्हा वाचताना जाणवलं की मी
" पण मला असं करणं झेपलं आणि निभावताना आलं पाहिजे. " लिहिलं आहे.
ते "मला जमणार नाही" या अर्थाने होतं. मी विचारांच्या नादात चुकीचं , उलटं लिहिलं आहे.
लिंक्ड इन प्रोफाइल अप डेट
लिंक्ड इन प्रोफाइल अप डेट करा. अजून केली नसेल तर. त्यात लोक सर्च करतात त्यात एच आर एजन्सीज, नोकरी देणारे लोक सर्च करत असतात त्यांना संपर्क करता येइल परंतू कोणी पैसे मागितल्यास आजिबात देउ नका. अनेक प्रकारचे फ्रॉड चालू असतात नोकरी देतो म्हणून आपली गरज असते आपण व्हल्नरेबल असतो तेव्हा ती काळजी घ्या.
>> मला ओपन सोर्स प्रोजेक्ट
>> मला ओपन सोर्स प्रोजेक्ट बद्दल कल्पना नव्हती. कंट्रीब्युट कसं करता येईल ते चेक करते.
तुम्ही https://opensource.guide/how-to-contribute/ इथुन सुरुवात करु शकता.
या व इतर अनेक लिंक मिळतील शोधलात तर.
https://www.dunebook.com/21-amazing-java-opensource-projects/
https://www.upgrad.com/blog/java-open-source-projects/
तुम्ही ज्याचा आधीच वापर केला आहे त्याचा सोर्सकोड बघायला आणि बदलायला मजा येईल. म्हणजे तुम्ही जर JUnit वापरले असेल तर त्याचा कोड बघा. किंवा सरळ github वर जाउन जावा चे ट्रेन्डींग प्रोजेक्ट्स बघा (https://github.com/trending/java?since=daily) आणि त्यात काही इंटरेस्टींग काम मिळतंय का बघा
Very useful information.
Very useful information. Thank you Vyatyay.
व्यत्यय >> धन्यवाद.
धन्यवाद अमा. काळजी घेईन.
व्यत्यय >> धन्यवाद. खूप महत्त्वाची माहिती आहे. मला फार उपयोग होईल.
सर्वप्रथम हा धाग्यासाठी
सर्वप्रथम हा धाग्यासाठी धन्यवाद पीनी !!
मी सुद्धा याच situation मध्ये आहे . ८ वर्ष Mainframe डेव्हलपर म्हणून अनुभव आहे पण आता ६ वर्षाचा गॅप झाला आहे . इथे IT मध्ये जॉब करणाऱ्या मैत्रीनींची जी धावपळ होते ते बघून नको वाटतो हा IT जॉब .
मी Manual Testing मध्ये switch करायचं ठरवलं .
Mindmajix Tech 6 या इन्स्टिटयूट कडून एक डेमो क्लास arrange केला तर त्यांनीही Manual Testing ला फारसा स्कोप नाही त्यापेक्षा ऑटोमॅशन टेस्टिंग करायला सांगितले त्यात UTF आणि Selenium याचा डेमो दिला . पण परत जावा शिकावं लागणार होतं . परत नविन language शिकण्यापेक्षा ज्यावर काम केले आहे तेच केलेलं बरे असे वाटले . सध्या तोच अभ्यास चालू आहे .
अजून दुसरा काही पर्याय तरी दिसत नाहीये . या धाग्याचे प्रतिसाद वाचून खूप पॉसिटीव्ह वाटतंय . एवढ्या गॅप नंतरही नोकरी मिळेल अशी आशा आहे .
Pages