पालकत्व रजा - विराट कोहलीचे कौतुक, अभिनंदन आणि आभार

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 December, 2020 - 18:12

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा चालू आहे. २०-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका उरकली आणि मानाची कसोटी मालिका सुरू झाली आहे. कसोटी मालिका मानाची, महत्वाची का असते हे हाडाच्या क्रिकेटप्रेमीला सांगायची गरज नाही. अश्यात चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना होताच उर्वरीत सामन्यांपासून रजा घेत संघाचा कर्णधार आणि सर्वात महत्वाचा खेळाडू मायदेशी परत येणार आहे. आणि याचे कारण आहे पालकत्व रजा. जी अधिकृतरीत्या आमच्या ऑफिसमध्ये अस्तित्वातच नाही. कारण पुरुषाला एका बापाला या प्रसंगी तिथे उपस्थित राहणे आणि त्यानंतरही सुरुवातीच्या दिवसांत कुटुंबासोबत राहणे गरजेचे आहे हा विचारच नाही.

असो, तरी जो तो आपल्या आवडीनुसार, सोयीनुसार, आयुष्यातील आपल्या प्रायोरीटीनुसार ती रजा घेतोच. पण जिथे ती अधिकृतरीत्या मिळतच नाही तिथे ती चार दिवसांपेक्षा जास्त मिळणेही अवघडच असते. हे मी आमच्या ऑफिसमध्येही अनुभवलेय. बायको अ‍ॅडमिट झाल्यावरच रजा घ्यायची पद्धत आहे. मला स्वत:लाही नाईलाजाने तेच करावे लागणार होते, पण सुदैवाने पहिल्या मुलीच्या वेळी बायकोला आदल्या दिवशीच सांगितले की उद्या अ‍ॅडमिट व्हा. आणि मी चक्क ऑफिसमध्ये थाप मारली की आजच तिला अ‍ॅडमिट करत आहेत आणि ऑफिसमधून सटकलो. कारण हा क्षण मला एक दिवस आधीपासून अनुभवायचा होता. त्या क्षणाची एकत्र प्रतीक्षा करणे अनुभवायचे होते. एक शेवटचा दिवस तिचे डोहाळे पुरवायचे होते. जे नशीबाने झाले, पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र परंपरेप्रमाणे आधी बायको अ‍ॅडमिट झाली आणि मगच मी ऑफिसातून लॉग आऊट. अर्थात दोन्ही वेळा डिलीव्हरी नंतर मी छानपैकी आजारी पडत आठदहा दिवसांची सिक लीव्ह टाकली ती गोष्ट वेगळी. पण तरी आपल्याला नवीन बाळाची सोबत मिळावी आणि त्यांच्या आईला आपली सोबत व्हावी म्हणून असे खोटे खोटे आजारी पडावे लागले हे खटकलेलेच.

आज आमच्या एका क्रिकेटच्या व्हॉटसप ग्रूपवर चर्चा चालू होती. कोहलीने असा अर्धा दौरा सोडून जाणे गरजेचे आहे का? त्यावर विविध मते आली.. तीन तीन सामने बुडवणे गरजेचे आहे का? / जाणेच गरजेचे आहे का? / पण तो तिथे जाऊन काय करणार? / सचिनचे वडील गेले तेव्हा तो दुसर्‍या दिवशी वर्ल्डकप खेळायला पुन्हा हजर झालेला (हा तुलनेचा किडा फार असतो काही जणांत, तरी नशीब देशाची रक्षा करणारे जवान नाही कोणाला आठवले) / पहिलीच वेळ आहे, एक्सायटमेंट असेल, दुसर्‍याला नाही जाणार (दुसर्‍यांची प्रायोरीटी आपणच ठरवायची) / अनुष्का शर्मानेच सांगितले असेल, म्हणजे फोर्स केले असेल (सेलिब्रेटी म्हटले की पर्सनल कॉमेंट हक्काने आल्याच) ...

याऊलट,

चांगलेच आहे की फॅमिलीला प्रायोरीटी देतोय, क्रिकेट काय आयुष्यभर खेळायचे आहे / मजा आहे, कॅप्टन आहे, हवे तेव्हा जाऊ शकतोय / त्याची पर्सनल लाईफ आहे, च्याईला आपल्याला काय करायचेय, त्याचे तो ठरवेल ....
अश्या आशयाचे सकारात्मक वा तटस्थ प्रतिसाद देखील आले.

आणि ते तुलनेत जास्त आले Happy

अश्या एखाद्या विषयावरच्या चर्चेत एखाद्या मायबोलीसारख्या संकेतस्थळापेक्षा मला माझ्या व्हॉटसपग्रूपवरचा प्रतिसादात समाजाचे प्रतिबिंब जास्त अचूक वाटते . कारण तिथे कोणी इमेज जपायला आदर्शवादी विचार मांडायचा अट्टाहास करत नाही. साला जे मनात आहे, जे विचार डोक्यात येतात, तेच स्ट्रेट फॉर्वर्ड.. . त्यामुळे आनंदच झाला.

एकूणात आपल्या आसपासचा समाज उदासीन नाहीये या बाबतीत. त्यांना पालकत्व रजा हवीच आहे. या प्रसंगी बरेच जणांसाठी फॅमिलीच प्रायोरीटी असते. पण तरीही ती सिस्टीममध्ये नाहीये. ती हवीच याचा कोणी आग्रह धरत नाहीये. कोणी धरलाच आग्रह तर त्यालाच एकट्याला काय गरज आहे असे सुनावले जातेय, त्याला ईतरांचे उदाहरण दिले जातेय, दोन दिवसांच्या रजेनंतर पुन्हा आपले कामच कसे प्रायोरीटी आहे हे समजावले जातेय. वर आता तर डबल काम करावे लागणार , जबाबदारी वाढली ना असे टोचन दिले जाताहेत....

पण अश्यांना आता उलट सुनवायला एक उत्तर मिळाले आहे.
अरे तो विराट कोहली राष्ट्रीय संघाचे नेतृत्व सोडून जर ब्रेक घेऊ शकतो तर आपण कुठले मोठे रॉकेट सायंटीस्ट आहोत ...
बस्स याचसाठी विराट कोहलीचे कौतुक, अभिनंदन आणि आभार Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ऑफिसात paternity लिव्ह आहे, 5 दिवस म्हणजे 1 आठवडा मिळते. आणि लोक ती घेतात मग भले ऑफिसात तेव्हा कितीही मोठी आग लागलेली असो. ऑफिसात अशा आगी लागलेल्याच असतात, आपण आपली प्रयोरिटी पहावी, जशी कोहलीने पाहिली. Maternity 6 महिने आहे.

आमच्या ऑफिसात भारतात नाहीये पण युरोपात आहे Sad
हा भेदभाव बोलका आहे !
उन के बच्चे बच्चे है हमारे बच्चे क्या खेत मे उगाये गाजर मुली है Sad

आमच्या मुलाच्या जन्माच्या वेळी नवर्याला 1 महिना पालकत्व रजा मिळाली होती.

ऑपरेशन थिएटर मध्ये स्वतः उपस्थित राहणे त्यांच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मुलाची नाळ कापुन त्याला नवर्याने हातात घेतले तो क्षण आम्ही दोघे नवरा बायको कधीच विसरु शकत नाही. त्यांचे आणि माझे डोळे भरुन आले होते.

आमच्या मुलीच्या वेळी हा अनुभव नव्हता घेता आला कारण त्यावेळी मी माहेरी होते. याची खंत त्यांना नेहमीच वाटते.

एक आई म्हणून मला इतकेच वाटते की विराट आणि अनुष्का ने सुद्धा हा क्षण अनुभवावा. कितिही मोठे सेलिब्रेटि असले तरी ती पण माणसच आहेत आणि पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. हे दिवस परत येत नसतात.

100% सहमत.
माझ्या मुलीच्या जन्मावेळी बायकोला दिलेल्या संभाव्य तारखे दरम्यानच प्रचंड मोठ्या वादळाचं भाकीत होतं. रहदारी बःद होण्याची शक्यताही वर्तवली होती. त्यामुळे, तिला दोन दिवस आधीच ॲडमिट करून मलाही तिथंच मुक्काम ठोकावा लागला होता. अर्थात. ऑफिसमध्ये याबाबत कुरकूर न होतां उलट लागल्यास मदतीकरतां अनेक आग्रही सूचनाही दिल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत रजेची सोय असणयाइतकंच असा दिलासा असणं महत्वाचं व साधारणपणे तो असतोही.

माझा अनुभव तर अगदीच ताजा आहे, ह्याच महिन्यातील.

कमी रक्त अन अचानकपणे लो होणारा बिपी यामुळे सी सेक्शन ठरवले होते . मला रक्त चढवावे लागणार माहीत होते पण डॉक्टरने आधी त्याबद्दल काहीच सांगितले नाही. फक्त त्याच दिवशी सकाळी आणा तेव्हा आम्ही सगळी माहिती देऊ सांगितले. अन नेमका तिथेच घोळ झाला. जेव्हा आमच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा नवरा माझ्यासाठी रक्त आणण्यासाठी स्वतः रक्तदान करत होता. ज्यामुळे बाळाला सर्वप्रथम त्याच्या हातात घ्यायचे त्याचे स्वप्न अर्धवट राहिले. अन ती खंत त्याच्या बोलण्यातून जाणवते. अन मलाही तेव्हा तो माझ्यासोबत हवा होता. पॅटर्निटी लिव्ह त्यालापण नाहीये तरी दहा दिवसांची पीएल मिळाली. आमच्या ऑफिस मध्ये काहीजण आठवड्याची पीएल टाकतात तर काही नाही टाकत. खरंतर अश्यावेळी नवरा बायको दोघांसाठी तो क्षण ते सुरवातीचे ते दिवस खूप महत्वाचे असतात. म्हणून किमान दहा पंधरा दिवस का असेना पुरुषांनाही सुट्टी असणे गरजेचे वाटते.

बाकी, विराट कोहली कधीच आवडत नाही पण त्याच्या या निर्णयाचे कौतुक वाटले.

आजकाल कार्पोरेट कल्चर, MNCs मध्येतरी पॅटर्निटी लीव्ह वगैरे अगदीच कॉमन आणि बेसिक पॉलिसी आहे!

अभिनंदन VB !
मला देखील कोहलीचा अ‍ॅटीट्यूड फारसा आवडत नाही. पण फलंदाजी आवडते.
कप्तानीचे निर्णय फारसे रुचत नाहीत, पण हा निर्णय आवडला.

@ सियोना,
ऑपरेशन थिएटर मध्ये स्वतः उपस्थित राहणे त्यांच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मुलाची नाळ कापुन त्याला नवर्याने हातात घेतले तो क्षण आम्ही दोघे नवरा बायको कधीच विसरु शकत नाही. त्यांचे आणि माझे डोळे भरुन आले होते.
>>>
हा भारतातील अनुभव आहे का? आपल्याकडे फार ठिकाणी असे अलाऊड करत नाहीत.

रॉकेट सायंटीस्ट असेल तर paternity लिव्ह घेऊ नये का मग त्याने?
>>>>>>
पॅटर्निटी लीव्ह का... छान मॅटर्निटी लिव्ह घ्यावी.. हल्ली मंगळयान उडवायला बायकाच तर असतात, Happy

आजकाल कार्पोरेट कल्चर, MNCs मध्येतरी पॅटर्निटी लीव्ह वगैरे अगदीच कॉमन आणि बेसिक पॉलिसी आहे!
>>>>
निदान आमच्याकडे तरी नाहीये. वर म्हटल्याप्रमाणे भारतातील आणि युरोपातील ऑफिसला वेगळा नियम आहे. आणि तसेही कॉर्पोरेट म्हणजेच जग नाही. ही हक्काची रजा सर्वच क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मिळायला हवी. . आणि त्या आधी याबाबत जागरुकताही हवी. कोहलीमुळे ती जागरुकता निदान क्रिकेटप्रेमींमध्ये तरी नक्की येईन. किकेटचे वेड असलेल्या आपल्या नवर्‍याला बायकोही हे उदाहरण नक्की देईल Happy

>>आणि तसेही कॉर्पोरेट म्हणजेच जग नाही

नक्कीच!
पण अगदी धागा काढून जाहिर कौतुक/आभार इतकेही हे जगावेगळे किंवा दुर्मिळ नाही इतकच म्हणायचय!

पण अगदी धागा काढून >>> धागा काढणे हि देखील काही फार मोठी गोष्ट नाही Happy

बस्स कौतुकाचा धागाच काढला आहे. यासाठी त्याला भारतरत्न द्यावी अशी मागणी नाही केलीय. मुळात त्याने हे केले याच्या कौतुकापेक्षाही हे कोहलीसारख्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने केल्याने यामुळे थोडी जागरूकता वाढेल अश्या आशावादाने बरे वाटले आहे.

बाकी ज्याच्याकडे जी गोष्ट नसते त्याला मोल कळते. तुमच्या ऑफिसमध्ये पालकत्व रजा मिळत असावी, आम्हाला नाही मिळत म्हणून मोठी गोष्ट वाटली ईतकेच Happy

>>बस्स याचसाठी विराट कोहलीचे कौतुक, अभिनंदन आणि आभार <<
अरे बाबा, यात विराटचं कौतुक कसलं? कौतुकंच करायच असेल तर बिसीसीआयचं कर. त्यांनी केलेल्या पॉलिसीज, आणि सक्सेशन प्लॅनिंगचं. विराटच, काय, सुट्टी आहे, त्याने घेतली. बस्स इतकंच. हां, जर बिसीसीआयची तशी पॉलिसी नसती, आणि विराट बंडखोरी करुन तो बाळंतपणा करता पळुन आला असता तर गोष्ट वेगळी ठरली असती...

राज,
हो बीसीसीआयचेही कौतुक करूया. पण कोहली ज्या लेव्हलला आहे तिथे या बाबतीत नियम काय आहे यापेक्षा त्याचा वैयक्तिक निर्णय काय आहे हे जास्त महत्वाचे असे मला वाटते. कारण नियमात सुट्टी असूनही तो आपल्या कामाला प्राधान्य देणे शक्य होते.
अर्थात तो देखील त्याचा वैयक्तिक निर्णय असता. जर त्याने फॅमिलीला प्राधान्य न देता देशाचे प्रतिनिधीत्व करणे जरूरी समजले असते तर त्या निर्णयाचाही आदरच असता.

पण जर आधी क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय त्याने स्वत:च्या आवडीने आणि कर्तव्यभावनेने न घेता आपण कर्णधार आहोत तर असे महत्वाचा दौरा सोडून गेलो तर क्रिकेटप्रेमी काय बोलतील या दबावातून घेतला असता तर ते चूक झाले असते. त्याने हा निर्णय घेताना तसा विचार केला नाही हे आवडले.

@ऋन्मेष मुलाचा जन्म भारतातील नाही.

मुलीचा जन्म पुण्यात झाला. हॉस्पिटल मधिल डॉ ने तेव्हा सुद्धा नवर्याला ऑपरेशन थिएटर मधे थांबण्याची परवानगी दिली होती.
पण इथे आपली भारतीय मानसिकता दिसते.

'बायकोच्या बाळंतपणात तुझे काय काम' असे घरातून ऐकायला मिळाले त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर हॉस्पिटल मध्ये आले.

लेक खूप लाडकी आहे त्यामुळे तिच्या जन्माच्या वेळी संधी असुन सुद्धा तिथे नव्हतो ही खंत त्यांना नेहमी वाटते.

अभिनंदन VB Happy
पण अगदी धागा काढून जाहिर कौतुक/आभार इतकेही हे जगावेगळे किंवा दुर्मिळ नाही इतकच म्हणायचय +1

धागा लेखक कोण आहे हे पहाता "यासाठी वेगळा धागा काढण्याची गरज नव्हती" हे नमूद करण्याचे कष्ट करावे एवढाही काही दुर्मिळ प्रसंग (असा धागा काढणे) नाहीय हा.

'बायकोच्या बाळंतपणात तुझे काय काम' असे घरातून ऐकायला मिळाले त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर हॉस्पिटल मध्ये आले.
>>>>>

हो खरेय, आजही समाजात अशी स्थिती बरेच ठिकाणी आहे.

ज्यांना याची कल्पना आहे त्यांनाच हे समजू शकते. ईतरांना धागा बिनकामाचा वाटला तरी हरकत नाही. धागा काढताना सर्वांशी रिलेट व्हायलाच हवा हे गरजेचे नाही ना.

बाकी कोहलीला वरच्याप्रमाणे कोणी बोलले नाही, वा बोलू शकले नाही, वा त्याने अश्यांकडे दुर्लक्ष करत एक चांगले उदाहरण दिले म्हणूनच हे आभार अभिनंदन वगैरे Happy

हा भारतातील अनुभव आहे का? आपल्याकडे फार ठिकाणी असे अलाऊड करत नाहीत.
>>>
माझा नवरा पूर्ण वेळ होता डिलीवरी रुममधे. माझ्या गायनॅकची काहीच हरकत नव्हती. उलट ती म्हणाली की आम्ही आई किंवा नवर्याला येऊ देतो, सासूला नाही Wink

बायकोच्या बाळंतपणात तुझे काय काम' असे घरातून ऐकायला मिळाले त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर हॉस्पिटल मध्ये आले.
>>>मला तरी यात पूर्ण चूक त्यांचीच वाटत आहे. त्यांना संधी होती भारतात ही, फक्त लोक काय म्हणतील म्हणून ते नाही आले...

उलट ती म्हणाली की आम्ही आई किंवा नवर्याला येऊ देतो, सासूला नाही
>>>>
सूनेला सासू चालत असेल तर येऊ द्यावे की तिला.. किती बदनाम केलेय हे नाते Happy

फक्त लोक काय म्हणतील म्हणून ते नाही आले...
>>>>
लोक नाही, घरचे लोक
बाहेरचे काय बोलतात याची पर्वा न करणे आणि घरचे काय बोलतात याची पर्वा न करणे यात फरक आहे.

मला तरी यात पूर्ण चूक त्यांचीच वाटत आहे. त्यांना संधी होती भारतात ही, फक्त लोक काय म्हणतील म्हणून ते नाही आले...>>> मला कोणाचे उगा नाव घ्यायचे नाही. पण घरचे लोक म्हणजे माझ्या सासरचे लोक.

जळक्या गावस्कर ने परत फालतू ट्विट केला काल विराट ला वेगळे नियम का म्हणून... नटराजन ला का नाही दिली लिव्ह..
अरे अप्लाय केला तर देणार ना.. नटराजन चे करियर सुरू होतेय, त्याला मॅच खेळणे जास्त महत्वाचे वाटले...
सठिया गया है गावस्कर...

गावस्करचे सडेतोड बोलणे बरेचदा पटते. पण हे नाही पटले.

मध्यंतरी विराट कोहली अनुष्कासंदर्भात त्याने जे कॉमेंटरी करताना म्हटलेले त्याला मी सपोर्टच केला होता ईथे.
https://www.maayboli.com/node/76831

पण आता पुन्हा विराटकोहली संदर्भातच त्याला हे बोलायची गरज नव्हती.

नटराजन नवीन खेळाडू आहे. त्याने फॅमिलीआधी करीअरला प्राधान्य दिले. कोहलीने फॅमिलीला प्राधान्य दिले. कोणाचे प्राधान्य काय असावे हे ठरवायचा आपल्याला अधिकार नाही. देशाची सेवा करताना वा देशाचे कर्तव्य बजावताना वगैरे देशप्रेमाचे ढांचे मला तरी फारसे पटत नाही. तसे असते तर मागे राष्ट्रकुलच्या वेळी देशाला पदक मिळवून द्यायला न खेळता दोन टिम बनवून अर्धे पाकिस्तानशी खेळायला गेले आणि ईथे राष्ट्रकुलवालेही पटकन हरून त्यांना जाऊन मिळाले तेव्हा हा भारताचा नाही तर बीसीसीआयचा संघ आहे म्हणत नाटके चालू होती तेव्हा कुठे होते हे गावस्कर वगैरे मंडळी...

दमछाक करणारी आयपीएल विश्राण्ती न घेता जीव तोडून खेळायची आणि त्यातून होणारया दुखापतीमुळे ईटरनॅशनलमधून माघार घ्यायची हे सर्रास जगभरात चालते. आणि त्यात काही गैर नाही कारण आयपीएल पैसा देते. पण तो पैसाही कमवायचा आणि मग उगाच क्रिकेट हा एक व्यावसायिक खेळ आहे हे कबूल करायला काचकूच करायचे. याला अर्थ नाही.

खेळा, पैसे कमवा, त्याबदल्यात आम्हालाही आनंद द्या, स्वत:च्या फॅमिलीलाही वेळ द्या. पण उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवा..

या असल्या लोकांमुळे मुंबई बदनाम होते.. >>>
हम्. अजून राज्याची, भारताची, आशिया खंडाची बदनामी होत नाही का?

Pages