तर झालेय असे, कि माझ्याकडे आणि माझ्या मामेसाबांकडे एवढ्यातल्या एवढ्यात आसपास अनेक लग्नाळू मुला मुलींची स्थळे व माहीती गोळा झालेली आहे. योगायोग म्हणा किंवा काहीही.. पण एका जवळच्या मैत्रीणीकडे आणि तिच्या आईकडेही अशीच बरीच स्थळे व त्यांची माहीती गोळा झालेली आहे. त्यात कोणत्या मुलामुलींच्या अपेक्षा एकमेकांशी मॅच होतात ते शोधून शोधून आम्ही एकमेकांना पाठवतो आहोच. पण या सगळ्यात काही वेळ द्यावा लागतो आहे आणि हे सगळे एफर्ट्स अन-ऑर्गनाईझ्ड पद्ध्तीने चालू आहेत.शिवाय आमच्याकडे असलेल्या कोणाच्याच अपेक्षेत न बसणारे पण अनेकजण आहेत.
तर या सगळ्यात एक सुसुत्रता यावी, आमचा परीघ विस्तारावा, शक्य असेल तर मैत्रीणीच्या आईला आणि माझ्या मामेसाबांना त्यांच्या कुटाण्यासाठी काही मोबदला मिळवून द्यावा या सर्व उद्देशाने आम्ही सर्व जातीजमातीच्या मराठी मुलामुलींसाठी एक वधू वर सुचक मंडळ सुरु करण्याचा विचार करत आहोत.
तर नाव काय ठेवावे, फॉर्म मध्ये कायकाय माहीती भरून घ्यावी, आत्ता चालू असलेल्या वधू वर सुचक मंडळांमधले तुम्हाला आवडणारे एखादे फिचर कोणते, स्वतःचे असे मंडळ असते तर त्यात काय वेगळे करायला आवडले असते या अनुषंगाने तुमचे सल्ले/ सुचना स्वागतार्ह आहेत.
हे मंडळ सुरुवातीचे काही महीने विनाशुल्क असणार आहे. त्यामुळे सुरु झाल्यावर मा. अॅडमीन यांच्या परवानगीने नाव कळवेनच. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला नाव नोंदणी करायची असल्यास नक्की सांगावे.
खेरीज, सहज शक्य असेल तर एखादे चांगले नाव सुचवाल का? आम्ही जी जी नावे शोधली (पार लगीनसराई पासून बाशिंग पर्यंत आणि ऋणानुबंध पासून रेशीमगाठी पर्यंत) त्या सगळ्या नावांनी ऑलरेडी वधू वर सुचक केंद्र आहेत. (तुमच्या मनात कोणतेही नाव आले तरी <नाव> आणि पुढे matrimony टाकून बघा. ऑलमोस्ट सगळी नावे कोणी ना कोणी वापरत आहेत.
सुचना/सल्ल्यांसाठी अॅडव्हान्समध्ये धन्यवाद !!!
पंजाबी / हिंदी चालणार का?
पंजाबी / हिंदी चालणार का?
रब ने बना दी जोडी
इंग्रजी चालणार असेल तर एका
इंग्रजी चालणार असेल तर एका वेब सिरीजचे नाव आहे ते घ्या -
मेड इन् हेवन
संस्कृत हवे तर -
संस्कृत हवे तर -
ताराबलं (कुणी याचं तारांबळ असं विडंबन करु नये) चंद्रबलं
दांपत्ययोग परिणय
दांपत्ययोग
परिणय
रुखवत.
रुखवत.
साहचर्य लग्न घटिका
साहचर्य
लग्न घटिका
सारीपाट
सारीपाट
सप्तपदी तुम्हाला शुभेच्छा !
सप्तपदी
जीवनसाथी
मैत्र
साहचर्य
माधुर्य
ऋणानुबंध
अनुबंध
मांगल्य
-------
तुम्हाला शुभेच्छा !
सारीपाट लोल!
सारीपाट लोल!
सोयरीक matrimony (मला तरी सापडलं नाही)
सूचना: अनेक लोक matrimonial चा tinder सारखा वापर करतात. म्हणजे यात कोणतेही विचार न करता लाईक पाठवणं, अवास्तव अपेक्षा लिहिणं ते विकृत गोष्टींपर्यंत सगळं आलं.
मी अशी साईट चालवली असती तर साधारण, वास्तव अपेक्षा जाणून घेऊन फक्त जोडप्याला ब्लाइंड chat आणि ब्लाइंड डेटचा option ठेवला असता. भारंभार गर्दी गोळा करण्याऐवजी खऱ्या गरजू आणि intrested लोकांनाच access मिळेल अशी सोय केली असती
परिपूर्ण वधूवरसूचक मंडळ.
परिपूर्ण वधूवरसूचक मंडळ.
( माहिती आहे की हे लाल पितांबर सारखे वाटते आहे )
साधं नाव काही द्यावं जसं -
साधं नाव काही द्यावं जसं - 'मामीकडंची स्थळे'. वेबसाईटस वर अनेक उमेदवार असतातच, त्यांचे अल्गोरिदम मॅच इ तंत्रज्ञान असते. वेगळं काय? तर इथे हरवलेला 'मध्यस्थ' मामी परत आणत आहे. विवाह मंडळाच्या नावात मामीकडून स्थळ सुचवले गेले ह्या 'ह्युमन आस्पेक्ट'वर भर असावा.
एक आयडीया: फॉर्म २ असावेत - एक उमेदवाराने भरलेला आणि एक परिवाराने भरलेला. मग दोन्ही वाचून मामी फी नुसार ५-१५ स्थळे दरमहा सुचवतील असे काही बिझनेस मॉडेल असावे. मामींचा लोकसंग्रह व त्यांचा अशा जुळवा-जुळवीतील अनुभव यासाठी लोक निश्चित फी भरतील. "दि मार्व्हलस मिसेस मेझल" ह्या सिरीज मध्ये तिची आई अशीच विवाह मंडळ सुरू करते ते आठवले.
खूप शुभेच्छा. (लिहीलेलं नाही पटलं तर द्या सोडून.)
'मध्यस्थ' वधूवरसूचक मंडळ
'मध्यस्थ' वधूवरसूचक मंडळ
नमस्कार !!!
नमस्कार !!!
आपल्या आसपासच्या लग्नेच्छुक मराठी मुलामुलींसाठी आम्ही सुरु केले आहे "लग्नयोग मराठी वधू वर सुचक मंडळ".
३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करणार्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत* मोफत सेवा.
(* ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत किंवा तुमचे लग्न जुळेपर्यंत यापैकी जे आधी होईल ते)
आमचा युएसपी :
१. संपूर्णत: ऑनलाईन सुविधा. कोव्हिड काळात तुम्हाला कुठेही घराबाहेर पड्ण्याची गरज नाही.
२. तुमचे नाव व जन्मतारीख आमच्या सदस्यांशिवाय कोणालाही सांगितले जाणार नाही.त्यामुळे प्रोफाईल वाट्टेल त्याला फॉरवर्ड केली जाऊन आपली सर्व माहीती जिथेतिथे पब्लिक होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होईल.
३. वर किंवा वधूची माहिती पोस्ट करण्यासाठी डेडिकेटेड दिवस. आठवड्याचे सगळे दिवस ग्रुपमध्ये ल़क्ष ठेवण्याची गरज पडणार नाही.
३. अॅडमीन ओन्ली व्हॉट्सअॅप ग्रुप जिथे स्थळांव्यतिरिक्त अन्य जंक पोस्ट होणार नाही. ७ दिवसांनी सगळ्या प्रोफाईल्स आपोआप डिलीट होतील त्यामुळे मेसेजेस डिलीट करण्याची अॅडिशनल कटकट नाही.
४. दिवस - वार इत्यादी लक्षात ठेवून ग्रुपवर आपली माहीती टाकण्याची जबाबदारी आमची. तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही.
५. तुमच्या आवडीनिवडी जाणून घेईल असा विस्तृत फॉर्म. तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीच्या स्वभावाची जास्तीत जास्त माहिती तुम्हाला होईल अश्याप्रकारे आमचा फॉर्म बनवलेला आहे.
कॉन्टॅक्टः ८८५६८३४१७८ / ८८५६८३४१७९
ईमेल - लग्नयोग२०२१@जिमेल.कॉम (लग्नयोगचे स्पेलिंग एल ए जी एन वाय ओ जी)
फेसबुक पेजः https://www.facebook.com/Lagnyog2021
उठाठेव
उठाठेव
अभिनंदन पीयू
अभिनंदन पीयू
मस्त नाव. अभिनंदन आणि
मस्त नाव. अभिनंदन आणि शुभेच्छा पियु.
अभिनंदन आणि शुभेच्छा. नाव पण
अभिनंदन आणि शुभेच्छा. नाव पण छान आहे.
"सावधान " वधू वर सूचक मंडळ1
"सावधान " वधू वर सूचक मंडळ1
शुभेच्छा.
शुभेच्छा.
सहीच. अभिनंदन लग्नयोग टीम!
सहीच. अभिनंदन लग्नयोग टीम!