आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता अवॉर्ड वापसी होणारच आहे तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील कोरोनाला दिलेला पद्मविभुषण पुरस्कार, कोरोना मोदी सरकारला परत करतो का नाही ते पाहायचे आहे.

तसेही यांना मिळालेले अवॉर्ड कुठे यांच्या गुणवत्तेमुळे मिळाले होते, कॉंग्रेसचे पाय चाटून व वशिलेबाजी करुन त्यांनी हे अवॉर्ड मिळवले होते, आता ते परत येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.>>>>>> Proud त्यांना शिमगा करायची सवयच लागलीय त्याला कोण काय करणार? मागे पण असेच धिंगाणे घातले मग तोंडावर पडले. Proud

काल ते यु पि चे मुख्यमंत्री आले होते मुंबैत पोटापाण्याची सोय होते का बघायला... गेले का परत की आहेत अजुन..??

एकवेळ यु पि चे भैय्ये येत होते इथे कामाला ते ठिक होतं आता त्यांचे मुख्यमंत्री पण येऊ लागले म्हणजे कमाल आहे नाकर्तेपणाची Proud

आता अवॉर्ड वापसी होणारच आहे >>>>>>>
अवॉर्ड वापसी गँग वाले फक्त कप बशी माघारी देतात ? की रक्कम पण वापस देतात ?
Happy
ही सगळे नाटके कसं ही करून मिडिया चा फोकस घेण्यासाठी आहेत , चार दिवस चॅनेल वर साहित्यिक
च्या नावाची चर्चा झाली की पुस्तकांच्या शे दोनशे प्रती जास्त खपतील बाकी काही नाही !!!!
त्यांच्या साठी हा सिझनेबल बिझिनेस झाला आहे .
दर वर्षी सरकार शुल्लक कारणांची वाट बघायची , आणि योग्य वेळी अवॉर्ड वापसी वरून कोल हाल माजवून द्यायचा !
जणू काँग्रेस च्या काळात शेतकरी धान्याच्या ऐवजी सोन्याची रास जमा करत होता !

जणू काँग्रेस च्या काळात शेतकरी धान्याच्या ऐवजी सोन्याची रास जमा करत होता !
Submitted by वटवृक्ष on 3 December, 2020 - 06:27 >>

मातीशी नाळ तुटल्यावर विचार कसे बनतात हे वरील प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते..!

तुफान कॉमीक नावे आहेत. तुकडे तुकडे गँग, अ‍ॅवॉर्ड वापसी गँग. आता मुलाकातकार गँग असे नवीन नाव यायला हवे. Proud जे एकमेकांच्या मुलाखती घेऊन लोकांना सतत पकवत असतात. Proud

अनाजी पंतुकड्याची पिलावळ पकत असतील... कारण त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे ना हे सर्व..!! Biggrin

आणि हे कोण ?

रस्तेफोडू गॅंग
दंगल गॅंग
गोडसे गॅंग

Rofl

मातीशी नाळ तुटल्यावर विचार कसे बनतात हे वरील प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते..! >>>>>>>
वस्तुस्थिती सांगायला नाळ जुळलेली असण्याची गरज च काय ?
पवार , नाईक , चव्हाण फक्त यांनाच काम न करता भरघोस शेतीतून उत्पन्न येतं बरं का !
नाही म्हणजे प्रतिज्ञा पत्रात तसे दाखवतात .
बाकी चे शेतकरी मरतात फाशी घेवून ....
म्हणे शेती समृध्द महाराष्ट्र !!!!!

शेती काय असते अन ती कशी करतात यासाठी शेती असावी लागते अन ती तशी करावी/करवून घ्यावी लागते. ज्याला ते जमते ते अगदी भरघोस उत्पन्न घेऊ शकतात. आता ज्यांचा उद्योग फक्त काड्या करण्याशी आहे त्यांना शेती काय कळणार.

बाकी, शेतकरी आत्महत्त्या करतो यासाठी आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे (जो वरील प्रतिक्रियेत दिसला..!) त्यामुळे हे सर्व होत आहे. शेतकर्‍याचा माल घ्यायला बाजारात गेल्यावर ५ रुपयांची कोथिंबीर २ रुपयाला मागणारे भाद्दर जगाला शेतकर्‍यांच्या आत्महत्त्येवर पाल्हाळ लावत बसतात.

शेतकर्‍यांचा कांदा शेतातुन विकायला तयार झाला की ही शेठजी लोकांची गँग भाव पाडुन घेतात.. साठेबाजी करुन सोन्याच्या भावाने विक्री करतात. केंद्र सरकाय शेठजी+भटजींच्या तालावर नाचत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढु लागले की लगेच निर्यातबंदी करुन दुसर्‍या देशांचा कमी किमतीतील कांदा आयात करुन इथे चढ्या भावाने विकतात.

बटाटा, टोमॅटो, लसुण अन त्याच सोबत फळफळावळ यांच्या बाबतीतही सरकारचे धोरण शेतकर्‍याला नागवण्याचे अन शेठजींना रेशीम गुंडाळण्याचेच असते.

त्यामुळॅ कमी शेती असलेल्या छोट्या शेतकर्‍याची गेली ६-७ वर्षं पिळवणुक होऊन तो आत्महत्येकडे वळला आहे हे सत्य चिपाड आलेल्या डोळ्यांना दिसणे अशक्य आहे.

शेती सोबत जोडधंदा म्हणुन गायी-म्हशी पाळाव्यात तर दुधाचे भाव कमी करुन ठेवले आहेत. गोवंश हत्याबंदी सारखे बावळट छाप निर्णय घेऊन म्हातार्‍या गायी-बैले उरावर घेऊन पोसावे लागत आहेत. अशा कितीतरी सरकारी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि त्याविरोधात आता तो संघटीत होऊ पहात आहे.

त्यामुळॅ कमी शेती असलेल्या छोट्या शेतकर्‍याची गेली ६-७ वर्षं पिळवणुक होऊन तो आत्महत्येकडे वळला आहे हे सत्य चिपाड आलेल्या डोळ्यांना दिसणे अशक्य आहे. >>>>>>>
पंख्याची हवा खावून प्रतिसाद दिला की डोळ्यांवर चिपाड येणारच की हो !
पिळवणूक सावकार करतात आणि दुष्काळ किंवा अतिवृष्टी मुळे शेतकरी आत्महत्या करतो पण काँग्रेस प्रेमाची चिपाड आलेल्या डोळ्यांना गेल्या सहा सात वर्षांचे भाजप सरकारच दोषी दिसतंय !

शेतामध्ये जे काही पेरतो ते उगवत नाही, जे उगवतं ते पिकत नाही, जे पिकतं ते टिकत नाही आणि जे काही टिकतं ते विकत नाही. शेतकऱ्याचं आयुष्य हे जुगार झालंय. आयुष्याचे काही पत्ते हे निसर्गाच्या हातात तर काही बाजाराच्या हातात, तरीही अनेक संकटांवर मात करत हार मानेल तो शेतकरी कसला.
दुष्काळ पडला की आज ना उद्या नक्की पाऊस पडेल या आशेवर जगत असतो. फक्त मरत नाही म्हणून जगत असतो. शेतकऱ्यांचं जगणं दुष्काळाच्या, कर्जाच्या, सावकाराच्या, सरकारच्या व आत्महत्येच्या विळख्यात सापडलं आहे. म्हणूनच गेल्या दोन दशकात ३ लाख शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे.
शेतकरी एवढ्या दैन्यावस्थेत का आहेत?
जीवन संपवण्याची वेळ त्यांच्यावर का येत आहे याचा नीट विचार आमचे धोरणकर्ते, राज्यकर्ते, जंत्री, मंत्री कधीच करत नाहीत .
आज भारतातील शेती व शेतकरी संकटाच्या खाईत अडकलेले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था खूप बिकट झाली आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत. शेतीमालाला योग्य हमीभाव नाही, शेतकऱ्याच्या मालासाठी बाजारपेठ व बाजारपेठेतील चढ-उतार पाहून बाजारमाल साठवणुकीसाठी शासनाकडून आर्थिक पाठबळ नाही. शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा नाहीत. दुष्काळाचे सावट , उधारी दारोदारी हात पसरणे, पाण्यासाठी वणवण, पुढाऱ्यांचे दुष्काळी दौरे, अधिकाऱ्यांच्या कागदोपत्री पाहण्या, विरोधकांची तात्पुरती आंदोलने, पोकळ सरकारी योजना, गावोगावी जळणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिता आणि चिंतेत जगणारे शेतकऱ्यांचे कुटूंब ... सगळे काही मागच्या पानावरून पुढे चालू जसेच्या तसे! फक्त मरण येत नाही म्हणून जगायचं! तोट्याच्या धंद्यात म्हणजे शेतीत.
शेतकऱ्याचा जन्मच कर्जातला. जन्मलाय कर्जातच आणि मरतोय पण कर्जातच हेच सत्य.....

बाकी चे शेतकरी मरतात फाशी घेवून ....>>>>>> मग तुम्हाला काय कळते मृदुला? अहो आम्ही १०० कोटीची वांगी पिकवलीत बरं का. मागे नाही आमचे पप्पा ( उडाणटप्पा ) इझ्रायलला गेले होते नवीन तंत्रज्ञान शिकायला ( जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा बरं का ) तेव्हा ते शिकुन आले आणी मग त्यांनी वारसागर्ल म्हणून मलाच ते सर्व शिकवले. Happy आम्ही का शिकवु बरे बाहेरच्या लोकांना ? तरी बरे पप्पा सरकारच्याच खर्चाने उडत उडत तरंगत तरंगत गेले होते. नाहीतर लोक म्हणतील बघा बघा स्वत:च्या खर्चाने गेले, केवढा पैसा असेल यांच्या कडे !

आणखीन एक बरं का, मागे माझे पप्पा जेव्हा तरुण होते ना तेव्हा ते या शेती कायद्यावर भरभरुन बोलले होते की अडते वगैरे कशाला पाहीजेत? शेतकर्‍याला त्याचे सर्व पैसे मिळाले पाहीजे, त्याचा माल डायरेक्ट गिर्‍हाईकाकडे गेला पाहीजे. पण आता पप्पांचे वय झाले ना मग ते विसरले बरं का. वयानुसार आणी काळानुसार बाजार समिती मध्ये त्यांच्याच पक्षाचे अडते बसलेत शेतकर्‍यांना लुटायला, मग पप्पा का नाही बरं विरोध् करणार मोदींना ? चला बै, वेळ झाली समित्यांवर जाऊन लुटायची.

तुमच्या मोदीने आडत शेतकर्‍याच्याच बोकांडी बसवली आहे हे माहिते का वैनी..? बाजार समित्या हटवुन अंबानी-अडाणीला (शेठजींना..!) आणुन बसवल्यावर जास्त पैसे मिळवणार आहेत अशा गोड गैरसमजात असाल तर एकदा तेजस एक्स्प्रेस (रेल्वेचे खाजगीकरण केलेली सेवा) चा प्रवास करुन बघा (लॉकडाऊन पुर्ण उठल्यावर) म्हणजे तुम्हाला पैशांची किंमत कळेल.

काय कप्पाळ कळणार म्हणा.. आयतं मिळालेलं (औरंगजेबाच्या अकबरास) विकुन खाउ बघणार्‍या अनाजी पंतुकड्याच्या विचारधारेचे लोक..!

त्या संज्याची आज लिलावती हॉस्पिटलमधे Angioplasty होती.
वाचाळ संज्याने Angioplasty डॉक्टरकडून करवून घेतली कंपाऊडर कडून ? वडापाव सैनिकांनी याबाबत काही माहिती ?

बाकी चे शेतकरी मरतात फाशी घेवून ....>>>>>> मग तुम्हाला काय कळते मृदुला? अहो आम्ही १०० कोटीची वांगी पिकवलीत बरं का. मागे नाही आमचे पप्पा ( उडाणटप्पा ) इझ्रायलला गेले होते नवीन तंत्रज्ञान शिकायला ( जेव्हा ते कृषी मंत्री होते तेव्हा बरं का ) तेव्हा ते शिकुन आले आणी मग त्यांनी वारसागर्ल म्हणून मलाच ते सर्व शिकवले. आम्ही का शिकवु बरे बाहेरच्या लोकांना ?
>>>>>
खरं आहे !
महाराष्ट्रातील सगळे पुढारी शेतकरी वर्गातून पुढे आले आणि राज्यात वर्षानुवर्ष सत्तेत भाग घेवून शेतकऱ्यांनाच लुटत होते, पण dj यांच्या मते शेतकऱ्यांच्या हलाखीला शेटजी चा भाजप च जबाबदार !
९० टक्के साखर कारखाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या ताब्यात , शेतकऱ्यांच्या जमिनी तारण ठेवून पतपेढी / बँका कडून भरमसाठ कर्जे घेवून तो पैसा पुढाऱ्यांनी स्वतःच्या फायद्या साठी वापरला , नंतर कारखाने आणि बँका ही बंद पाडल्या.
माझ्या ओळखीतील केस म्हणजे पुण्यातील थेवूर चा साखर कारखाना !!!!!!
सगळे संचालक पुढारी लोकं काकाचा हात डोक्यावर असलेले , भरमसाठ कर्ज उचलले , नेहमी प्रमाणे त्या कर्जाला पाय फुटले , बँकांनी केस दाखल केली , कारखाना बंद पडला , शेवटी कारखान्याची जमीन विकून कर्ज फेडण्याचा कोर्टाचा निर्णय , सगळ्या संचालक च्या नावांनी वॉरंट होते , पोलिसांना ते कधीच सापडले नाहीत , शेवटी केस रफा दफा !
तरी भाजपच जबाबदार !!!!!

पंधरा दिवसां पूर्वीच मराठवाड्यात शेतकऱ्याने विजयसिंह का कोणाच्या तरी नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.
इतकी निर्लज्ज निगरगट्ट पुढारी जमात यांच्या डोळ्यांना कधीच दिसली नाही .
आणि वर या परिस्थितीला भाजप च जबाबदार !

या परिस्थितीला भाजप च जबाबदार !
नवीन Submitted by वटवृक्ष on 3 December, 2020 - 08:20 >> ++++१११

मान्य केलेत हे एक बरे झाले. उशीरा क होईना सत्य काय ते कळाले म्हणायचे..!

केंद्र सरकाय शेठजी+भटजींच्या तालावर नाचत असल्यामुळे >>>>>> भटजी लोक केव्हापासुन आडते बनले? ऐकावे ते नवलच.

भटजी लोक केव्हापासुन आडते बनले? ऐकावे ते नवलच.>> काहीही हां रश्मी..वैनी..!

अहो, भटजी जसं म्हणतील तसं सरकारचं वागणं सुरु आहे ना... मंदीर बनवा (मग पोटापाण्याची सोय आपोआप झाली..!), गोवंश भाकड झाला तरी घरीच मरेपर्यंत उरावर जबाबदारी घ्या (म्हणजे मग मंदीरात अभिषेक.. चला.. दुध-दही-लोणी-तुपाची सोय झाली..!), इतर धर्मियांना टार्गेट करा (म्हणजे आपोआप मारझोड करण्यासाठी ठरावीक जातींतील एक पिढी कोर्ट केसा लागुन उमेदीची वर्षं वाया गेल्याने भिकेकंगाल बरबाद होणार अन त्यांची मालमत्ता यांचे मित्र शेठजी कवडीमोलाने घेणार..!) ई..ई..

अजुन बरंच आहे पण आता जेवण करणार आहे.. या जेवायला.

या परिस्थितीला भाजप च जबाबदार !
नवीन Submitted by वटवृक्ष on 3 December, 2020 - 08:20 >> ++++१११

मान्य केलेत हे एक बरे झाले. उशीरा क होईना सत्य काय ते कळाले म्हणायचे..!

Submitted by DJ.. on 3 December, 2020 - 08:23
>>>>>>>>>>>>>
" आणि वर या परिस्थितीला भाजपच जबाबदार "
असे उपहासात्मक माझे वाक्य असताना तुम्ही काटछाट करून " या परिस्थितीला भाजपच जबाबदार " असे चिटकवून मस्त चलाखी दाखवली .
शोभाता बरं भ्रष्टाचारी काँग्रेसी / राष्ट्रवादी समर्थक !
Lol
तुमच्या आमदार , खासदार ,सरपंच, मंडळी नी पण अशीच काटछाट करून गरीब शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेवून बँका , पत पेढ्या कारखाने , ग्रामीण विकास सोसायट्या बुडवल्या होत्या .
पक्षाचे नेतृत्व च जर आयुष्यभर स्वतःच्या तुंबड्या भरत असेल तर कार्यकर्ते का नाही भरणार ?

Pages