
भाग १२ - https://www.maayboli.com/node/77267
"शेखावत, तू?" पांडे आश्चर्याने म्हणाला.
"हो मीच. मीच ते मारेकरी पाठवले होते."
"इतक्या लवकर वार करशील असं वाटलं नव्हतं." डिसुझा म्हणाला.
"नाही डिसुझा, लवकर नाही, उशीर झालाय. सहा भुतं, नाशिकवर राज्य, इत्यादी इत्यादी... पण आपण होतो तरी काय? दादासाहेबांचे प्यादे. त्यांनी हलवलं तसं आपण हलायचो. कधीच हे बोचतय. आता दादासाहेब गेले, मग आपण काय? त्यांच्या पोराच्या हातातले प्यादे की पुतण्याच्या?
त्यादिवशी गाडीत आपण होतो. दादासाहेबांनी बॉम्ब फेकला, आपल्याला तर नीट कळलंही नाही काय झालं. पण आपली इमेज झाली ती झालीच. आपणही ती तोडली नाही. मात्र हातात काय उरलं? शेलारांच्या राशी आपण भरत गेलो. कारखाना दादासाहेबांचा, माणसं दादासाहेबांची..."
शेखावत बोलायचा थांबला, मात्र कुणीही एक शब्द बोललं नाही.
"मला खुर्ची नको, पण माझं राज्य मलाच पाहिजे!"
"साला, एवढ्या गोळ्या चालूनही तो वाचला कसा?"
"नशीब!"
"नशीब नाही, दादासाहेबाचा पोरगा आहे. इतक्या लवकर मरणार नाही."
"शेखावत, पण तू त्याला का उडवतोय? खुर्ची तर संग्राम चालवेल. त्याचा काय संबंध?"
"त्याला उडवलं असतं, तर संग्राम आपसूक उडवला गेला असता."
"म्हणजे?"
शेखावत हसला...
"जे शूटर मी पाठवले होते ना, त्यांच्या खिशात युवाशाखेची ओळखपत्रे होती..."
सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले...
"शेखावत, हरामी!!!" डिसुझा मोठ्याने हसला.
"आता फक्त बघता राहायचं, खेळ सुरू झालाय. कोण कुणाचा जीव घेतं ते. चियर्स!"
काही ग्लास हवेत उंचावले गेले.
◆◆◆◆◆
"खानसाहेब, आज वाड्यावर जायचं नाही का?"
खान विषण्ण हसला.
"उधर अभी कुछ नही बचा!"
बेगम जरा चिंताग्रस्त झाली.
"तुम्हाला कुणी काही बोललं का?"
"नाही. काही नाही."
"खानसाहेब," बेगम त्यांच्याजवळ बसली. "असं मायूस होऊन कसं चालेल? कालच पोरावर हमला झाला. तुम्हाला थांबायला हवं त्याच्यासोबत."
"बेगम, तो हमला मी केला, असं म्हणतायेत वाड्यात." खान विदीर्ण चेहऱ्याने म्हणाला.
"अल्ला!" बेगम प्रचंड आश्चर्यचकित झाली.
तेवढ्यात एक मुलगा तिकडून धावत आला.
"खानसाहेब, एक मोठी खबर आहे. मारेकऱ्यांची ओळख पटली."
"काय?" खानसाहेब ताडकन उठले.
"हो, दोघेही उत्तर प्रदेशातून आले आहेत. पण..."
"पण काय?"
"त्यांच्या खिशात ओळखपत्रे मिळाली. त्यावरून ओळख पटली."
"बरं, दाखव."
त्याने ओळखपत्रे पुढे केली.
'युवाशाखा!!'
खानाचा चेहरा काळवंडला...
●●●●●
"मला माझे बाबा दिसतात."
"हम्म. कसे दिसतात?"
"स्वप्नात येतात, भास होतात."
"ओके, फक्त दिसतात, की काही करतातही?"
"ते या जगात नाहीयेत. तर कसं काय करतील?"
डॉक्टर हसले. "नाही म्हणजे, असं जाणवतं कधीकधी."
"नाही, फक्त स्वप्न आणि भास!"
"बरं. काय म्हणतात तुमचे बाबा? म्हणजे काही असंबद्ध बडबडतात, की?"
"नाही, स्पष्ट बोलतात पण कधीकधी संगती लागत नाही."
"बरं, आता अलीकडे काय म्हणाले होते, सांगू शकाल?"
"मोक्षा खाली वाक!!!!"
"अच्छा. मग?"
"मग मी खाली वाकलो."
"आणि काही झालं?" डॉक्टर हसले.
"हो."
"काय?"
"गोळीबार झाला माझ्यावर..."
डॉक्टरने मोक्षकडे निरखून बघितले.
"हे बघा, असे भास होत असतात. असं काहीही झालेलं नाहीये. बघा, तुमच्या अंगावर एकतरी जखम आहे का? नाही. आपण तुमची चांगली ट्रीटमेंट करू."
"बाबांमुळे मी वाचलो."
"बरं," डॉक्टर कुजकट हसला. "काही गोळ्या लिहून देतो. त्या घ्या. पूर्ण नाव काय म्हणालात?"
"मोक्ष राजशेखर शेलार!!!"
"काय?" डॉक्टर उडालाच.
"मोक्ष राजशेखर शेलार!!!"
"म...माफ करा...मी...मी तुम्हाला ओळखलं नाही. मी चांगल्या गोळ्या लिहून देतो. माफ करा... दादासाहेबांना माझा नमस्कार सांगा पुन्हा दिसले तर..." डॉक्टरची भंबेरी उडाली.
मोक्षने कपाळाला हात लावला.
◆◆◆◆◆
मोक्ष खोलीत विचार करत बसला होता.
"मोक्षसाहेब. बाहेर एक माणूस आलाय. तुम्हाला भेटायचं म्हणतोय."
'कोण,' मोक्षने मानेनेच प्रश्न केला.
"माहिती नाही. पण तुम्हालाच भेटायचं म्हणतोय."
"बरं. सगळी तपासणी घेतलीस?"
"हो. काहीही धोकेदायक नाही."
"बरं पाठव आत."
तो पोरगा बाहेर निघून गेला.
थोड्यावेळाने एक माणूस आत आला.
भेदक घारे डोळे, गोरा रंग, पोपटासारखं लांब नाक, खूप जास्त उंची, खुरटी वाढलेली दाढी आणि कुडता पायजमा व खांद्याला लावलेली शबनम असा त्याचा वेष होता.
"बसा."
मोक्ष म्हणाला.
"मी पिंगळा.." अतिशय खोल गूढ आवाजात तो म्हणाला.
मोक्ष हादरलाच.
"काय काम होतं?" त्याने विचारले.
"मी ना, भविष्य सांगतो. भूतकाळही सांगतो. कधीकधी वर्तमानकाळाचं भान सुटतं." तो म्हणाला.
"कोड्यात बोलू नका." मोक्ष शांतपणे म्हणाला.
"कोड्यात बोलतच नाहीये. अहो, काळाचं ज्ञान असलं, तर सर्व कोडी सुटतात. आता हेच बघा ना, भूतकाळाचा शोध घेत आम्ही काल स्मशानभूमीत गेलो होतो, तर आम्हाला हे सापडलं."
"काय?"
"हे. अरे विसरलोच. एक मिनिटं हं."
त्याने शबनममध्ये हात घातला.
आणि त्यातून एक कवटी बाहेर काढली!!!!!
क्रमशः
मस्तच.....
मस्तच.....
पण आता उत्सुकता वाढलीये...
पुढचे भाग लवकर टाका
अज्ञातवासी,
अज्ञातवासी,
एक जेन्यूईन प्रश्न विचारतो आहे.
तुम्ही चांगले लिहिता पण अशी नोट्स काढल्यासाख्या स्टाईलमध्ये कथा लिहिण्याची शैली तुम्ही का वापरता आहात? (तुम्ही मोबाईल वर लिहित असलात तरी पोस्ट करण्याआधी त्यावर योग्य सोपस्कार जरूरी आहेत)
त्यामुळे ना कथेला फ्लो येतो ना काही वाचल्याचे समाधान मिळते. वरचेवर कथा कादंबर्या वाचणारे वाचक असतील तर ही शैली मॉकिंग आणि लेझी वाटते आणि वाचवत नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
पटलं तर बघा किंवा ईग्नोर मारा.
@लावण्या - धन्यवाद
@लावण्या - धन्यवाद
@हाब - धन्यवाद. तुम्ही चक्क माझी कथा वाचताय हे वाचून छान वाटलं.
टू बी फ्रॅंक, हा फॉरमॅट मला आवडतोय. एपिसोडिक! प्रत्येक घटना, त्यातून दुसऱ्या घटनेत ट्रांजीशन हे मला लिहायला आणि मेबी वाचकांना समजायलाही सोपं जातं असेल. येस, यात पारंपरिक स्टोरीटेलिंगचे अनेक फॉरमॅट मी वापरत नाहीये. नो अलंकारिकता, जास्त कल्पनाविस्तार नाही. स्ट्रेट टू द पॉईंट आणि वास्तवाच्या जवळ जाणारं. मुख्य म्हणजे यात स्पीड खूप राखता येतोय. त्यामुळे मेबी ही नोट्स शैली, किंवा गटणे शैली वाटू शकते, पण मला ही आवडतेय.
सो, thanks, but ignored.
आणि मला कुठेही मॉकिंग वाटत नाही, किंवा स्टोरीटेलिंग मध्ये laziness जाणवलं नाहीये.
(पण लेखक प्रचंड lazy आहेत, हे मी कबूल करतो व त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो.)
आपल्या सल्ल्यासाठी अनेक धन्यवाद! वाचत राहा.
ओके! कळाले. पुलेशु.
ओके! कळाले.
पुलेशु.
सगळ्या भागांना प्रतिसाद देत
सगळ्या भागांना प्रतिसाद देत नाही आला पण मस्तच चालू आहे कथा.... पुलेशु...
हाही भाग आवडला. मस्त
हाही भाग आवडला. मस्त
जबरदस्त!
जबरदस्त!
अजिबात भरकटत वैगेरे नाही कथा. इतकी पात्र आहेत पण गोंधळ उडत नाहीये अजिबात!
पु. भा. प्र.
हा फॉरमॅट मला आवडतोय.
हा फॉरमॅट मला आवडतोय. एपिसोडिक! प्रत्येक घटना, त्यातून दुसऱ्या घटनेत ट्रांजीशन हे मला लिहायला आणि मेबी वाचकांना समजायलाही सोपं जातं असेल. येस, यात पारंपरिक स्टोरीटेलिंगचे अनेक फॉरमॅट मी वापरत नाहीये. नो अलंकारिकता, जास्त कल्पनाविस्तार नाही. स्ट्रेट टू द पॉईंट आणि वास्तवाच्या जवळ जाणारं. मुख्य म्हणजे यात स्पीड खूप राखता येतोय. त्यामुळे मेबी ही नोट्स शैली, किंवा गटणे शैली वाटू शकते, पण मला ही आवडतेय.>>> मला पण हा format आवडतोय.
जास्त कल्पनाविस्तार असणार्या कथा वाचताना (कधी कधी) खूप कंटाळा येतो. मी तर अनेक paragraphs skip करतो...
खूपच मोठी कथा होणार असेल तर
खूपच मोठी कथा होणार असेल तर To the point गेल्याने grip राहील कदाचित.. पण विस्तारभयास्तव जर असे लिहित असाल तर हाब यांच्या प्रतिसादावर विचार करूच शकता, अज्ञात. हेमावैम.
पण वाचायला छान वाटतंय, हे ही तितकंच खरं.
पुढील भागासाठी शुभेच्छा!
छान आहे हा भाग पण...आता
छान आहे हा भाग पण...आता पिंगळा काय सांगणार???उत्कंठा......
@chashmish - धन्यवाद!
@chashmish - धन्यवाद!
@च्यवनप्राश - धन्यवाद!
@गार्गी - धन्यवाद! अजून तर अनेक पात्रे बाकी आहेत!
@पद्म - धन्यवाद! मीसुद्धा अनेक कादंबऱ्या शेवटाकडे जाताना अनेक पॅराग्राफ स्कीप केले आहेत. मोनोलॉग वाचताना कंटाळा येतो.
@गौरी12 - कथा खूपच मोठी होणार आहे, त्यामुळे पॉईंटवाईज गेलेलं चांगलं राहील.
@मृणाली - धन्यवाद. पिंगळा लवकरच आख्यान सुरू करेल
पिंगळा म्हणजे?
पिंगळा म्हणजे?
गार्गी, fyiphttps://blogs
गार्गी, fyip
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/anwat-watevarche-prawasi/p...
छान भाग!!
छान भाग!!
पिंगळ्याबद्दल नाविन्यपूर्ण माहिती ही मिळाली..
धन्यवाद अज्ञातवासी!
धन्यवाद अज्ञातवासी!
स्मशानजोगी / मसणजोगी सुद्धा असाच काहीसा प्रकार आहे ना?
हो, पण ही वेगळीच जमात आहे असं
हो, पण ही वेगळीच जमात आहे असं वाटतं
Fyip
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/anwat-watevarche-prawasi/s...
@रुपाली - धन्यवाद!!!
@रुपाली - धन्यवाद!!!
हो, पण ही वेगळीच जमात आहे असं
हो, पण ही वेगळीच जमात आहे असं वाटतं >> अच्छा. धन्यवाद
मस्तच.....
मस्तच.....
पण आता उत्सुकता वाढलीये...
पुढचे भाग लवकर टाका -- +111
@मेघा - धन्यवाद
@मेघा - धन्यवाद
मस्तच झालाय हा भाग पण.
मस्तच झालाय हा भाग पण.
मला पण अतिविस्तारवाल्या कथा वाचवत नाही. हाच फॉरमॅट मलाही आवडतोय
@abasaheb - धन्यवाद!
@abasaheb - धन्यवाद!
सर तुम्हची कथा पाटिलv/s पाटिल
सर तुम्हची कथा पाटिलv/s पाटिल कधी पूर्ण
वाचतेय
वाचतेय
तुम्हची अर्धवट कथा पाटिल v/s
तुम्हची अर्धवट कथा पाटिल v/s पाटिल कधी वाचायला भेटेल
@संज @सुखदा धन्यवाद.
@संज @सुखदा धन्यवाद.
नातीगोती नंतर पाटील vs पाटील लिहायला सुरुवात करतो
..