माझ वय ५०+ , घरात मोजून तीन माणस. मी माझी पत्नी आणि आई. एकच मुलगी आहे तिच लग्न झालेल आहे.
गेले चार वर्षे बायकोचा सेक्स मधला इंटरेस्टच संपला आहे. हे अगदी नैसर्गीक ही असेल की मेनोपॉझ नंतर स्त्रियांच्यात असे बदल होतात. खुप मनधरणी करुन मिळालेले सुख पुर्वीसारखे नसते. या विषयावर चर्चा करुन काही औषध उपचार करु यासाठी पत्नी तयार नाही.
मी योगाभ्यास नियमीत करतो परंतु देहवासना कमी होत नाही. किंबहुना ती आहे तितकीच आहे.
माझ्या आयुष्यात बायको शिवाय दुसरी स्त्री कधीच आली नाही. आता केवळ यासाठी कुणाशी संबंध जोडताना भिती वाटते. पैशासाठी कुणी आपल्याला ब्लॅकमेल करेल किंवा हॉटेल /लॉजेस मधे जाणे सुध्दा मनाला असुरक्षीत वाटते.
एकट्या स्त्री शी असे संबंध प्रस्थापीत करावेत जी तिच्या स्वतःच्या घरात एकटी रहाते हा विचार मनात येतो.
पण समाज, कुटुंब समाजातली आपली पत, नातेवाईक यांचा विचार करुन मी थांबतो. अशी स्त्री ही अजुन मिळालेली नाही.
मनात अजुनही प्रश्नआहेत्च. हे बरोबर आहे का? ही समस्या माझ्या सारख्या अनेक पुरुषांची असेल. मग ते काय पर्याय शोधतात ?
हस्तमैथुन प्रकार आहे की..
हस्तमैथुन प्रकार आहे की...कशाला पाहिजे सेक्स...
यावर पुर्वी डॉ शशांक सामक
यावर पुर्वी डॉ शशांक सामक यांचे प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रम असत. चाळीशीनंतरचे कामजीवन असे काहीतरी नाव होते. त्यात अशा अनेक गोश्टींबद्दल भाष्य असायचे. वय वाढल्यावर कामवासना सर्वसाधारणणे कमी होते. संपत नाही. व्यक्तिनुसार त्यात काही कमी अधिक फरक असतो. सामाजिक लैंगिक व्यवस्थापन हा विषय अनैतिकतेच्या पारंपारिक व घट्ट रुजलेल्या कल्पनांमुळे तसाच दुर्लक्षिला गेला आहे. तुमचे काहीही चुकत नाहीये.
छान धागा काढलात. यावर खुली
छान धागा काढलात. यावर खुली चर्चा होणे अवघड. पण मायबोलीवर होऊ शकते. हा तुमचा एकट्याचा वैयक्तिक प्रश्न नाही तर एकूणच समाजाचा आहे वा असू शकतो. यात पुरुषासोबत स्त्री चा देखील विचार व्हावा. पुरुषाचा रस संपला वा कमी झाला तर तिने काय करावे. या केस मध्ये पुरुषांना बाहेरून सेक्स पार्टनर मिळवणे अवघड असते, स्त्रियांना ते तुलनेत सोपे असावे असे वाटते. पण पुरुष वेश्यागमन करू शकतात. तसेच बदनामी ब्लॅकमेलिंग याची भिती स्त्रियांना जास्त असते. पण एखादे सो कॉल्ड अनैतिक प्रकरण पकडले गेल्यास स्त्री पलटी खायची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुरुष मार खायची शक्यता जास्त असते.
एकूणच बरेच पैलू आहेत. पण हे नंतर आले. मूळ प्रश्न हाच की आपल्या समाजव्यवस्थेत यासाठी काहीच सोय नाहीये. दोघांपैकी एकाचा सेक्स ईण्टरेस्ट संपला वा कमी झाला तर दुसरयाने संयम बाळगावा, हस्तमैथुन करावे, कुढत मन मारत जगावे हाच एक पर्याय आपण शिल्लक ठेवलाय. बाकी सारे पर्याय कायद्याने गुन्हा वा नितीमत्तेची कसोटी लावता अनैतिक ठरवले आहेत.
यावर खुली चर्चा होणे अवघड. पण
यावर खुली चर्चा होणे अवघड. पण मायबोलीवर होऊ शकते. >>>>>
असं काही नाही इथेही थोर संस्कृती रक्षक आहेत बरेच
तसे असल्यास आणखी घनघोर चर्चा
तसे असल्यास आणखी घनघोर चर्चा होईल. अगदीच एकतर्फी होणार नाही.
पण मला वाटतेय काळ बदलतोय. आणि नितीमत्त्तेच्या जुनाट कल्पना घेऊन आपण आयुष्य रेटू शकत नाही हे लोकांना कळू लागलेय.
(No subject)
तुम्ही तुमची बाजू मांडलीत.
तुम्ही तुमची बाजू मांडलीत. अशीच पत्नीचीही काहीतरी बाजू असेल. ती नक्की काय आहे? म्हणजे चर्चा करुनही औषधोपचाराला तयार नाही यात ' मला मनासारखे सुख मिळावे म्हणून तू औषधोपचार ' असा थोडा जरी रोख असेल तर पत्नीचे मन वळवणे कठीण. मुळात पत्नीशी भावनिक जवळीक किती घट्ट आहे? सहज येता जाता प्रेमाचा स्पर्श / मिठी, पायावर पाय टाकून निवांत टिवी बघणे-वाचन, गाणी ऐकत साधे कडलिंग असे फिजिकल अफेक्शन नात्यात आहे की नाही? 'मी आणि पूर्वी सारखे सुख' या ऐवजी आपल्यातील हा दुरावा नाहिसा कसा होईल, पुन्हा नव्याने जवळीक होण्यासाठी आपण काय करु या , तुझ्यातील बदलामुळे तुला काही डिसकंफर्ट होतो का? तुला सुख मिळावे म्हणून मी काय करु ? अशा रोखाने चर्चा केलीत का? माझ्यावर नवर्याचे आजही तितकेच प्रेम आहे, मला सुख मिळावे म्हणून तो धडपडतोय ही भावना पत्नीच्या मनाला उभारी देइल, निदान गायनॅकशी याबद्दल बोलून पुढे काय याबद्दल मार्गदर्शन घेणे इतपत पत्नीच्या मनाची तयारी होईल. अजून एक म्हणजे औषधोपचार असे म्हटले तरी ती काही मॅजिक पिल नव्हे, वरवर बघता जरी पत्नीचा इंटरेस्ट संपणे ही समस्या असली तरी प्रश्न तुमचा दोघांचा आहे तेव्हा समउपदेशनही दोघांचे आवश्यक हे स्वतःला समजवा. कारण बेडरुमबाहेर आपण जोडीदाराशी कसे वागतो ते देखील याबाबतीत खूप प्रभाव टाकते.
बाकी यावर उपाय म्हणून विवाहबाह्य संबंध असा विचार केल्यास - हे पत्नीच्या परवानगीने की पत्नीपासून लपवून करणार ? पत्नीपासून लपवून केल्यास तो ताण सोसणार आहे का? हेल्थ रिस्क कशी मॅनेज करणार? कायद्याचे काय? म्हणजे एकट्या रहाणार्या स्त्रीने नंतर लग्नाचे आमिश दाखवून ..... वेगैरे आरोप केल्यास काय? अशा संबंधातून उद्या भावनिक गुंतवणूक झाल्यास काय करणार? किंवा काही महिन्यांनी 'मनासारखे सुख नाही' म्हणत दुसर्या स्त्रीने तुम्हाला नाकारल्यास ते झेपेल का?
स्वाती, ditto
डबल पोस्ट
सुंदर पोस्ट स्वाती
सुंदर पोस्ट स्वाती
स्वाती, ditto
स्वाती, ditto
किती छान पोस्ट लिहीली आहेस. अगदी परिपूर्ण विचार. मला इतकं मुद्देसुद नसतं लिहिता आलं.
पत्नीशी भावनिक जवळीक किती घट्ट आहे? सहज येता जाता प्रेमाचा स्पर्श / मिठी, पायावर पाय टाकून निवांत टिवी बघणे-वाचन, गाणी ऐकत साधे कडलिंग असे फिजिकल अफेक्शन नात्यात आहे की नाही? >>>> दिवसभरातले हे येता जाता घडुन जाणारे जवळकीचे क्षण स्त्रीपुरुष शारीरिक नात्यासाठी आणि एकूणच उत्तम वैवाहिक जीवनासाठी फार महत्वाचे असतात. आणि अगदी किसिंग वगैरे नाही, पण आईवडीलांची जवळीक (ज्यातुन त्यांचं एकमेकांवरचं प्रेम दिसुन येतं) मुलांच्या भावनिक सुरक्षिततेसाठी आणि हेल्दी मानसिक वाढीसाठी पण गरजेचं असतं.
स्वाती यांची पोस्ट फार आवडली.
स्वाती यांची पोस्ट फार आवडली. नॉन सेक्श्युअल इंटिमसीला खरच खूप महत्व असते. आपण जोडीदाराला काय बोलतो, कसे वागतो, आदर देतोका?, त्याला पहील्यांदा प्रेफरन्स देतो का .................. हे फार महत्वाचे मुद्दे असतात. पण त्याखेरीज 'स्वभाव' हा एक ठळक मुद्दाही असतो. उदा - कदाचित पत्नीला घरात पसारा असेल तर रिलॅक्स होता येत नसेल. काहीजण असतात पर्फेक्शनिस्ट. कदाचित मेनापॉझमुळे/नंतर त्यांचा योनीमार्ग कोरडा पडत असेल, आग होत असेल, फिझिकल डिसकंफर्ट असेल. अशा वेळी तिला समजुन घेतले पाहीजे. स्वभावाचं बोलाल तर काही लोक कुढेही असतात. काय लागलं ते बोलून दाखवता येत नाही पण एखादा अपमान जिव्हारी लागल्याने मिटून जातात. माझी एक मैत्रीण आहे तशी. त्यांना स्पष्ट बोलायला एनकरेज करा. कधी काही नाजूक क्षणी काही अपमान झाल्याने मिटून जायला झालेले आहे का?
----------- वृश्चिक राशीच्या लोकांना अशा प्रकारची अतिसंवेदनशीलता प्रचंड असते. मग वॄ-चंद्र/ वृ-स्टॅलिअम /वृ-सूर्य ..... .... एकंदर वृश्चिकेशी निगडीत आहे. जरी वृश्चिक 'सेक्सी रास' असण्याबद्दल सु/कुप्रसिद्ध आहे तशी ती फार सरळ-सोपी रास नाही. जिव्हारी लागलेल्या अपमानाने फ्रिजिडीटी येउ शकते. क्षमा करणं हा वृश्चिकेचा स्वभाव नाहीच नाही. लैंगिकता मग ती फ्रिजिडीटी या स्वरुपानेही वृश्चिक राशीत मॅनिफेस्ट होउ शकते. ........ सॉरी ज्योतिष मधे आणलं पण अशा केसेस माहीती आहेत.
अजुन एक मस्त उपाय म्हणजे प्रत्येक महीन्यात एक रात्र 'डेट नाईट' ठेवा. त्या रात्री सिनेमा-कॉमन केअरफ्री विषयावर गप्पा-रेस्टॉरंटमध्ये डिनर किंवा पिझ्झा नाईट. नो प्रेशर, नो एक्स्पेक्टेशन्स. फक्त एकमेकांचा सहवास एन्जॉय करायचा. हवा तर त्या डेटस करता स्पेशल एक पर्फ्युम आणून ठेवा. अन्य दिवशी तो वापरायचाच नाही. त्यामुळे त्या सुगंधाशी एक आनंदी, केअरफ्री नातं/ सहवास असे समीकरण तुमच्या मेंदूत वायर होइल, निगडीत होइल. मला वाट्तं हा जो मी तुम्हाला सांगते आहे तो रामबाण उपाय सिद्ध होइल.
अर्थात तुमची कुचंबणा होते आहे हे स्पष्ट आहेच. पण कदाचित सुवर्णमध्य गाठता यावा. मला अजुन स्पष्ट लिहीता येत नाहीये पण तिला अॅक्च्युअल इन्टरकोर्स न करता, तुम्हाला रिलीफ देता यावा. असो. फार बोलले असेन तर .... माफ करा.
प्रघांनी त्यांच्या कमेंटने आईस ब्रेक केला आणि स्वाती यांनी उत्तम पोस्ट लिहल्याने माझी भीड चेपली.
>>>>>>>>>बाकी यावर उपाय म्हणून विवाहबाह्य संबंध असा विचार केल्यास ................... तुम्हाला नाकारल्यास ते झेपेल का?>>>>>>>>>>> अत्युत्तम अॅनॅलिसीस!!! अफाट!!!
अजुन एक - १ तास ५ मिनीटे तुमचा वावर आहे. 'रंगिला' नावाचा आय डी आहे. आणि ही पहीली पोस्ट आहे तीही एका सेन्सिटिव्ह विषयावरची. तेव्हा शंका येते की मुद्दाम तुम्ही खोडसाळपणा करताय का? तसे असेल तर यु शुड बी अशेम्ड ऑफ युअरसेल्फ. हा फोरम आहे म्हणजे सूचक आय डी घेउन, संवेदनशील पोस्टस टाकायच्या व मग पोबारा करायचा आणि गंमत पहात बासयचे असा काही उद्देश्य असेल तर घृणास्पद आहे.
बाकी तसा उद्देश्य नसेल तर वरील बोलणं तुम्हाला लागायचे कारण नाही.
गुड जॉब सामो.
गुड जॉब सामो.
नवा आयडी आणि तो ही सूचक नावाचा इज रेड फ्लॅग.
का कोण जाणे पण मला हा आयडी
का कोण जाणे पण मला हा आयडी परिचित वाटतोय.
सामो - धागाकर्ता जाऊद्या
सामो - धागाकर्ता जाऊद्या
तुमच्या आणि स्वाती यांच्या पोस्ट खरचं खूप छान आहेत
एक अतिशय खासगी आणि टाबु विषयावर अतिशय चांगली चर्चा होत आहे आणि महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत
त्यामुळे अजिबात वाईट वाटून घेऊ नका
मला कबुतरवाली गोष्ट आठवली, हे
मला कबुतरवाली गोष्ट आठवली, हे वाचून.
अमित ,आशुचँप धन्यवाद.
अमित ,आशुचँप धन्यवाद.
स्वाती यांची पोस्ट फार आवडली.
स्वाती यांची पोस्ट फार आवडली. नॉन सेक्श्युअल इंटिमसीला खरच खूप महत्व असते.
+७८६
मात्र समस्या त्यापलीकडची असली तर काय?
अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास, (प्रत्येक पोस्ट खरे तर स्पष्टच बोललेली असावी या धाग्यावर)
पतीपत्नीच्या नात्यात रोमान्स असणे फार गरजेचे. तो दैनंदिन जीवनात दिसणेही गरजेचे. पण बेडरूमची गरज वेगळी असू शकते. तिथे आवश्यक असा सेक्स ड्राईव्ह प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आणि अश्या विजोड जोडप्यात एकाची उपासमार होऊ शकते तर त्याचवेळी दुसरयाला बळजबरी झाल्यासारखे वाटू शकते. अमुकतमुक दिवशी मूड नाही हे समजून घेणे वेगळे आणि मुळातच आवड भिन्न असणे वेगळे.
लग्नाआधी जोडीदाराला सेक्सची आवड केवढी आहे हे खुलेपणाने विचारणे अरेंज मॅरेजमध्ये तर सोडा कित्येक लव्हमॅरेजमध्येही चाचपले जात नाही.
किंबहुना खरया प्रेमात थोडी ना हे सेक्स वगैरे बघितले जाते या समजाखालीच मने जुळतात.
अर्थात कुठल्याही जोडप्यात सर्वच आवडी कधीच जुळत नाही. पण त्या प्रत्येक बाबीत प्रत्येकाला आपली आवड स्वतंत्रपणे जपता येते. उदाहरणार्थ एकाला ईंग्लिश ॲक्शन चित्रपटाची आवड आहे, एकाला हिंदी मराठी विनोदी आवडतात तर दोघे आपापल्या आवडीचे चित्रपट आपल्या सवडीनुसार बघू शकतात. शाकाहारी मांसाहारी जोडपे असेल तर ते सुद्धा आपल्या सोयीने आपल्या आवडीचा आहार खाऊ शकतात.
ईथे तशी काहीच सोय नाही. जे काही करायचेय ते एकत्रच, नाही करायचेय तरी एकत्रच. अन्यथा तो व्यभिचार समजला जातो. खुशाल समजा. पण उपाय काय?
तळटीप - माझी हि वा कुठलीही पोस्ट धागाकर्त्याच्या समस्येवर नाही. ती फेक आहे हे मी गृहीत धरले आहे.
आणि त्याहून महत्वाची गोष्ट - मी ईथे कुठल्या एका बाजूची वकिली करत नसून अश्या केसेसम्ध्ये सहानुभुती दोन्ही बाजूंना असायला हवी या मताचा आहे.
अरे त्या व्यक्तीला सेक्स हवेय
अरे त्या व्यक्तीला सेक्स हवेय.. त्याला रोमान्स करायला का शिकवताय...
अनुप जलोटा चा आदर्श घ्या रंगीला.. एखादी विशी पंचवीशीतली बघा...
अरे त्या व्यक्तीला सेक्स हवेय
अरे त्या व्यक्तीला सेक्स हवेय.. त्याला रोमान्स करायला का शिकवताय...
>>>>
यातून सेक्सकडे बघायचा समाजाचा दृष्टीकोण समजतो
याला आणि माझ्याच वरच्या पोस्टला धरून मला एक अजून उदाहरण आठवले,
आता या केसमध्ये सेक्सबाबतची ईच्छा ओढ आसक्ती वगैरे भिन्न आहे. पण एखाद्या जोडप्याचे सेक्शुअल ओरिएंटेशनच वेगळे असेल तर. म्हणजे त्यातला एक स्ट्रेट न असता समलिंगी असेल तर..
तर त्या जोडप्याला बघा संसारात हल्काफुलका रोमान्स फुलवून जमतेय का ते असा सल्ला नक्कीच मिळाला नसता.
मला वाटते तेच ईथेही लागू. जे नॅचरली असते ते बदलणे वा त्यावर फार कंट्रोल करणे ईतके सोपे नसावे.
सामो यांनी चांगले सोल्युशन
सामो यांनी चांगले सोल्युशन सुचवले आहे.. पण त्यातही लेखकाच्या बायकोची इच्छा असेल तर होऊ शकेल...
स्वाती२ यांच्या पहिल्या
स्वाती२ यांच्या पहिल्या पोस्टमधल्या पहिल्या परिच्छेदातल्या गोष्टी या विषयातल्या प्रशिक्षित तज्ज्ञ लोकांनी लिहिलेल्या लेखनात वाचल्या आहेत. त्यामुळे कोणी काहीही म्हणत असलं तरी त्या विचारात घ्याल अशी आशा आहे.
त्यांच्या च दुसर्या परिच्छेदातल्या प्रश्नांच्या यादीत एक भर - समजा तुमच्या पत्नीला हवे असलेले सुख तुमच्याकडून मिळत नाहीए. ते सुख तिने लग्नाबाहेर शोधलं तर तुम्हांला चालणार आहे का? ( तिला हवं ते द्यायला मी समर्थ आहे, वगैरे वाक्य बाजूला ठेवू. तिला नक्की काय हवं आहे, इथून सुरुवात होते. पुन्हा पहिला परिच्छेद.)
हे साहेब वयानुसार टकलू,पोट
हे साहेब वयानुसार टकलू,पोट सुटलेले ओंगळवाणे झाले असतील तर बायकोचा कसा सेक्समध्ये इंटरेस्ट राहील.शेपमध्ये रहावे,जमल्यास केसरोपण करुन घ्यावे,यंग दिसावे व यंग वागावे.
पुरुष व स्त्री तरुण भिन्नलिंगी व्यक्ती कडे आकर्षीत होतात हे सत्य आहे.त्यामुळे दोघांनीही ३५ नंतर तरुण दिसण्याकडे वागण्याकडे कल ठेवला पाहिजे.
स्वाती2, उत्तम प्रतिक्रिया
स्वाती2, उत्तम प्रतिक्रिया आहे
लोकस्त्ता चतुरंग ५ जाने २०१३
लैंगिकतेचे शमन की दमन?
लोकसत्ता चतुरंग १२ जाने २०१३
लैंगिकतेचे शमन हवेच
या मंगला सामंत यांच्या लोकसत्ता मधील लेखात सामाजिक लैंगिक व्यवस्थापनाची एक वेगळी गरज अधोरेखित केली आहे. अनैतिकता व लैंगिकता यांचा पुनर्विचार केला पाहिजे. अजूनही आपल्याला र.धो. कर्वे, आगरकर पचले नाहीत.
सेक्स बद्द्ल नकारात्मक भावना
सेक्स बद्द्ल नकारात्मक भावना निर्माण होणे किंवा सेक्स ची ईच्छा च न होणे ह्याला मानसिक आणि शारीरिक अशी दोन कारण असतात असे मला वाटत .
पार्टनर आपल्याला सुख देवू शकत नाही किंवा त्याची इच्छाच नसते हे मानसिक कारण झाले.
जोडीदार विषयी अशी भावना एकदा पक्की झाली की आपले जोडीदार विषयाचे attraction संपते.
आणि हे चक्र तोडायचे असेल तर संवाद महत्वाचा.
धागा काढुन रंगीलाकाका गायब
धागा काढुन रंगीलाकाका गायब झालेत. नेहमीप्रमाणे जनता राहिली सल्ले देऊन. माबोवरचा ट्रेंड झालाय हा.
सामो - धागाकर्ता जाऊद्या
सामो - धागाकर्ता जाऊद्या
तुमच्या आणि स्वाती यांच्या पोस्ट खरचं खूप छान आहेत...+१.
ते निळजी का अनिळजी हेच का?
ते निळजी का अनिळजी हेच का?
एवढे ड्यु आयडी काढून पासवर्ड बरे लक्षात राहतात.
आमचा एक आयडी हिस्टरी डिलिट केल्यावर पासवर्ड रिसेट करायला लावतो. (पुअर मेमोरी यू नो)
त्यांच्या च दुसर्या
त्यांच्या च दुसर्या परिच्छेदातल्या प्रश्नांच्या यादीत एक भर - समजा तुमच्या पत्नीला हवे असलेले सुख तुमच्याकडून मिळत नाहीए. ते सुख तिने लग्नाबाहेर शोधलं तर तुम्हांला चालणार आहे का?
>>>>
तरीच म्हटले हा प्रश्न अजून आला कसा नाही
हा प्रश्न हमखास येतो कारण पुरुषांनी लग्नानंतर बाहेर संबंध ठेवले तर एकवेळ चालेल पण स्त्रियांनी ठेवले तर आणखी मोठा गहजब हा विचार या समाजात रुजला आहे.
समाजाची मानसिकता खरेच खूप बदलायची आहे.
एवढे ड्यु आयडी काढून पासवर्ड
एवढे ड्यु आयडी काढून पासवर्ड बरे लक्षात राहतात. Uhoh
>>>
पासवर्ड प्रत्येकाला वेगळा ठेवायची गरज नसते.
आणि मेल आयडी कुठेही लिहून ठेवता येतो.
माझे ऑर्कुटला ८०+ आयडी होते. दोनच पासवर्ड होते. एक माझ्या ओरीजिनल प्रोफाईलला आणि एक ईतर सर्व प्रोफाईलला.
मेल आयडींची एक एक्सेल होती. ती माझ्या जीमेलला अपलोड होती
बाकी हा आयडी माझा नाही आणि कोणाचा असेल या शोधात मला रसही नाही
सर्वांना धन्यवाद ! मी चर्चा
सर्वांना धन्यवाद ! मी चर्चा सोडुन गायब झालो नाही तर वाचत आहे. मला अपेक्षा होती की ५०+ मायबोलीकर त्यांचे अनुभव व पर्याय सांगतील पण व्यर्थ. माझ्या पिढीत असलेला भिडस्थ पणा सर्वांनाच आहे असे दिसते. किंवा
१) एकतर ५०+ जोडप्यांना असले प्रश्न सतावत नाहीत ते त्यांचे कामजीवन आनंदाने उपभोगत आहेत.
२) त्यांना प्रश्न होते पण त्यांनी पर्याय शोधला आहे पण सांगावासा वाटत नाही.
३) ५०+ जोडप्यांना खासकरुन स्त्रीयांना फ्रिजीडीटी वगरे होत नसते. हा पोस्ट कर्ता उगाच नाहीते लिहीतो.
४) मायबोलीवर ५०+ कुणीही नाही. हाच एक दिवटा इकडे घिरट्या घालतोय.
५)
बाकी मी कुणाला तरी शंका आहे की ढेरपोट्या आहे म्हणुन माझा बायकोचा माझ्यातला इंटरेस्ट संपला असेल पण तस नाही हो. मी मुळच्या पोस्ट मधे योगाभ्यास करतो असे लिहले आहे.माझे वजन प्रमाणात आहे.
-- स्वाती २ यांना वाटणारे सगळे प्रश्न मलाही पडले आहेत.
-- संवेदनशिल प्रश्नांवर सल्ला मागण्यासाठीच तर हा फोरम आहे ना ? मी व अन्य कुणीही अश्लिल शब्द वापरलेले नाहीत.
वाट पाहतो काही पर्याय कुणी सुचवेल याची
Pages