सिनेमा रिव्ह्यू - ये साली आशिकी!!

Submitted by अजय चव्हाण on 13 June, 2020 - 18:38

खरंतरं ह्या सिनेमाविषयी काय लिहू आणि कसं लिहू हा प्रश्न पडलाय कारण लिहण्यासारखं भरपूर असलं तरी ते गाळणं जास्त महत्वाचं वाटलं. असो, तरीही लिहण्याचं प्रयत्न करतो अगदीच लिहल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा रिव्ह्यू.

सिनेमाच्या शिर्षकावरून सिनेमाच्या कथेची कल्पना थोडीफार येते आणि आपण काही अंदाज बांधायला सुरूवात करतो. सुरूवातीचे काही मिनिटे आपल्या कल्पनेप्रमाणे/ अंदाजाप्रमाणे सिनेमात अगदी तसचं घडतं जातं पण मध्यंतरानंतर सिनेमा आपल्याला असा जोराचा झटका देतो ना की, डोक्याला शाॅट लागलाच म्हणून समजा. डोक्याला शाॅट म्हणजे किक लागते आणि पछाडल्याप्रमाणे हा सिनेमा आपण डोळ्यांत जीव आणून पाहतो.

'बदला' ह्या संकल्पनेवर जगभरात कित्येक चित्रपट प्रदर्शित होतात आणि बहुतांशी त्याच त्याच साचेतले असतात पण हया सिनेमासाठी एकच असा वेगळा साचा बनला होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

"साहिल मेहरा" हाॅटेल मॅनेजमेंटचा स्टुंडट आहे आणि तो पार्ट टाईम एका कॅफेत कामदेखिल करत असतो. साहिलच्या काॅलेजात आणि आयुष्यात मिती नावाची मुलगी येते आणि हळूहळू दोघांत मैत्री होते आणि नंतर प्रेमही होतचं. प्रेमात आकंठ बुडालेला साहिल मितिबाबतीत खुपच सेंसटिव्ह होतो आणि साहिल इतरवेळी चांगला मुलगा जरी असला तरी त्याला प्रचंड राग असतो इतका की तो स्वतःला आवरूच शकतं नाही आणि ह्याच त्याच्या दुर्गुणामुळे त्याची काॅलेजमध्ये इमेज खराब होते आणि हयामुळेच बरचं काही त्याला सोसावंदेखिलं लागतं. एकेदिवशी अचानक मिती साहिलवर बलात्कार करायचा प्रयत्न केला असा आरोप करते आणि ते सिद्धही होतं आणि केसदरम्यान असं कळतं की, साहिलने लहान असताना आपल्या वडिलांचा खून केलेला असतो आणि म्हणूनच काही वर्षे त्याने मेंटल असायलेंन्समध्ये काढलेली असतात आणि हिच पार्श्वभूमी, गोळा केलेले सबळ पुरावे आणि त्याच्या शिक्षक, मित्र-मैत्रणीच्या जबानीवरून कोर्ट साहिलची रवानगी परत मेंटल असायलेंन्समध्ये करते.

images (10).jpeg

त्यादिवशी नक्की काय घडलं होतं? खरंच साहिलने तसा प्रयत्न केला होता का? साहिल वडिलांचा खून का करतो? मितिने त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला फसवलं असतं का? आणि जर फसवले असेलच तर का? पुढे साहिल सुटतो का? पुढे काय होतं? ह्या सार्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहा.

दिग्ददर्शक चिराग रूपारेल, अभिनेता वर्धन पुरी (अमरिश पुरीचा नातू) अभिनेत्री शिवलिका ऑबेराॅय, सहाय्यक अभिनेता जेसी लिव्हर (जाॅनी लिव्हरचा मुलगा) ह्यांचा पहिलाच चित्रपट पण तरीही चित्रपटात पाहताना हे सगळे नवखे वाटत नाही.

वर्धन पुरी ह्याचा हा पहिलाच सिनेमा जरी असला तरीही सिनेमात त्याने अगदी कमाल केलीय. एक सर्वसाधारण मुलगा ते एक सनकी हे कॅरेक्ट्रर ट्राॅन्झक्शॅन त्याने लिलया पेललयं. सुरूवातीला वर्धन थोडासा आधीच्या शाहिद कपूरसारखा वाटतो पण नंतर नंतर त्याचं स्वंतंत्र अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही. अभिनेत्री शिवालिका ऑबेराॅय हिनेदेखिल तोडीस तोड अभिनय केला आहे. साधीसुधी मिती ते आतली एक स्वतंत्र उलगडत गेलेली मिती हे जे करेक्टर डेव्हपमेंट आहे हे तिने अतिक्षय सुंदर रितीने हाताळलयं.. फक्त तिचा चेहरा आणि डोळे घडोघडी जॅकलीन फर्नाडिसची आठवण करून देतात. जेसी लिव्हरच्या वाटेला फारशी भूमिका नसली तरी त्याने ठाकठिक काम केल असलं तरी आपल्या पित्याप्रमाणे अभिनयाची उंची गाठण्यासाठी अजून त्याला अवकाश आहे.

सिनेमाचं बजेट कमी असल्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी जरी असल्या तरी कमीत कमी एडींटगमध्ये दिग्ददर्शक चिराग रूपारेलने सिनेमा अगदी योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवलाय. पहिल्याच चित्रपटात इतकं खुप सांभाळून घेतलं आहे. हे प्रकर्षाने जाणवतं. सिनेमातलं पार्श्वसंगीत आणि गाणी रटाळ आहेत आणि ती लक्षातही राहत नाही फक्त शेवटी शेवटी एक रॅप आहे ते मात्र फक्कड जमलयं..

पात्रे :

1. साहिल - वर्धन पुरी.

2. मिती - शिवलिका ऑबेराॅय

3. वेणूगोपाल - जेसी लिव्हर

4. अनुज - रूसलान मुमताज ( पाहुणा)

5. छेन्नू बाबू -सतिश कौशिक (पाहुणा)

का पाहावा : परत तेच म्हणेन डोक्याला शाॅट लागून घेण्यासाठी.

कुठे पाहता येईल - Zee5

IMDb Rating - 7.9

माझं मानांकन - **** आऊट ऑफ फाईव्ह.

टिप : रिव्ह्यू लिहताना मूळ मुद्दा आणि काही बर्याच बाबी स्पाॅयलर टाळण्यासाठी मुद्दाम गाळल्या आहेत तर कमेंट करताना त्या गोष्टींचा उल्लेख करू नये. नंतर धागा परत संपादित करून "त्या" चर्चा करण्यासाठी खुला करण्यात येईल जाणकरांनी याची नोंद घ्यावी आणि माझ्या ह्या आगाऊपणाबद्दल क्षमा असावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे पाच वाजत आले ईथे. झोपायची वेळ झाली. आधी आला असता धागा तर अजच पाहिला असता..
येनी वेज, चित्रपट चांगला आहे असे आईकून आहे. बघायला हवा. झी फाईव्हचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद.

मी पण आजच पाहीला आणि पाहिल्यानंतर लगेच रिव्ह्यू लिहून पोस्ट केलं...

ॠन्मेऽऽष कमीत कमी तुम्हाला झोप तरी येते..हे ही नसे थोडके.
हमें देखो -

इसी मौकेपर इस नाचीझ के दो अल्फाज.. जरा गौर करलो..

कुछ तो बातें है जो हमे निंद नही आती
बरसो दफनाए हुए ख्वाबो की आत्मा तो नही भटकती??

यादें आती है, बाहें तरसती है..
जाने किसके लिए ये निगाहें बरसती है..

बरसने के बूॅदे भिगाती नही जलाती है..
जाने कौनसी मंझिले हमें बुलाती है..

कौनसी दबें उलझने और कुछ अजनबी बाती..
थक गये नैन मगर कंबख्त नींद नही आती.

मुवी बघितल्यावर कसा वाटला ते नक्की सांगेल.

अजयदा, वाह! बहोत खुब!
शायरी आवडली..

@ऋन्मेष, असंच लिहा की राव काहीतरी.. छान लिहिता..

पाहिला थोडा थोडा करत अखेर
ऊतकनठावरधक आहे
हिरो दाढी वाढली की थोडा शाखा सॉरी शहिद दिसतो
हिरोईन ट्रेडिशनल काड्यात अनुष्का दिसते.

पोरं प्रेमात वेडी होतात हेच खरे

अमरीश पुरीच्या नातवासाठी तरी नक्की बघणार.>>>

असं म्हणू नका ताई, चित्रपटातील घराणेशाहीला पाठिंबा दिल्याचा आरोप होईल तुमच्यावर

ज्यांनी दिलीपकुमारचा दास्तान किंवा अमिताभ बच्चनचा दो अंजाने पाहिला आहे त्यांची साफ निराशा होणार आहे. इतरांकरिता वन टाईम वॉच आहे.