अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
आमचा बिट्टू भुभु देखील मूड
आमचा बिट्टू भुभु देखील मूड असला कि नाकाने ढुसण्या देउन मला चेष्टा मस्करी,खेळायला करायला भाग पाडायचा. अस करताना त्याच्या डोळ्यातले खट्याळ मिष्किल भाव माझा ताण कुठल्या कुठे घालवुन टाकायचा. मग आम्ही भुंका भुंकी खेळायचो. तो माझ्यावर भुंकणार मी त्याच्यावर भुंकणार अगदी त्याच्या ष्टाईलने.मग माझ्या अंगावर धाउन येउन माझी मानगुट जबड्यात पकडायचा. बघणा-या ति-हाईताचा थरकाप होत असे. मी पळुन जायला लागलो कि माझी लुंगी पकडून ठेवत असे. जाम पकडायचा. जबड्यातुन सोडायाचाच नाही. लुंगी सोडुन पळुन जाणे हाच एकमेव पर्याय.अशा चेष्टा मस्करीतून
एखादे वेळी लुंगी किंवा चादर फाटत असे. अंथरुणात तर आमच्या दंगामस्तीला उत येई. टर्र कन आवाज झाला कि डोळ्यातला मिश्किलपणाचा भाव जाउन चिंतेचा भाव येत असे. हा भावरंग इतक्या झटकन बदले. ए सॊरी हं! असा अर्थ त्यात मला वाचता येई. मग मी त्याला म्हणे ," मुद्दामुन नाही काही केलं की आमच्या बिट्टुनी. हो ना रे बिट्ट्या? " की लगेच परत तो नी मी खोड्या करायला मोकळे. मात्र त्याचा मुड नसताना मी त्याची चेष्टा केली तर तो दात विचकवुन माझ्यावर गुरकत असे. तरीही मी डिवचत राहिलो तर दुस-या खोलीत निघुन जात असे.मी त्या खोलीत गेलो कि किती माग लागाव माणसाने? अशा अर्थाचा कटाक्ष टाकत तो परत तिस-या खोलीत.मग मात्र मी थांबत असे.
इथले किस्से वाचून माझी भुभु
इथले किस्से वाचून माझी भुभुंंबद्दलची भीती कमी होईल असं वाटतयं.
आशुचॅप माझ्या घरी येणारे
आशुचॅप माझ्या घरी येणारे म्हणतात दोन्ही कुत्र्यांना बांधा mag सांगावे लागते एकच आहे...आवाज खूप जोरदार आहे ना
आणि फुंतरू चं एक वैशिष्ट म्हणजे त्याचे कान आडवे असतात नेहमी बघा फोटोत परत
बी एम सी ऑफिस , परेल मधील
बी एम सी ऑफिस , परेल मधील मांजर , नोव्हेम्बर 2020
त्याचे इतर साथी
यात जी काळी माऊ नाही दिसत ती
यात जी काळी माऊ नाही दिसत ती तुम्ही का
माझ्या बाळाची गंमत पूर्वी एका
माझ्या बाळाची गंमत पूर्वी एका धाग्यावर लिहिली होती. तीच इथे परत एकदा पोस्ट करते. मला हा किस्सा सारखा आठवतो कारण मी छोटी असताना आईची छत्री घेऊन घरभर फिरत असायचे. आईने फोल्ड करायला घेतली की रडु यायचं.
------------------------------------------
पावसाळा संपून महिना झाला तरी आमच्या बिगल बाळाचा रेनकोट टेरेसमध्ये लटकत होता. तो धुवून, वाळवून, घडी पुढच्या वर्षासाठी जपून ठेवायचा प्लॅन अंमलात आणायला आजचा दिवस उगवला. सकाळी मावशींनी धुतलेला रेनकोट त्याने पाहिला नव्हता, पण मी आता घडी घालताना पाहिल्याबरोबर तो लगेच घालण्यासाठी हट्ट चालू झाला. भुंकून आणि अंगावर आणि रेनकोटवर उड्या मारून थांबेल असं वाटलं पण 10 मिनिटं कर्कश ओरडून घर डोक्यावर घेतलं. शेवटी दुपारच्या वेळी शेजाऱ्यांना डिस्टर्ब नको म्हणून रेनकोट घालून दिला. आता गेले 15 मिनिटं बाळ रेनकोट घालून फिरतं आहे. आता बास, आता काढून ठेऊ म्हणून बकलला हात लावल्यावर गुर्र चालू आहे. आता टेरेसमध्ये उन्हात रेनकोट घालूनच पहुडला आहे. Lol
Submitted by मीरा.. on 13 December, 2019 - 16:11
काय एकेक वेडेपणा
काय एकेक वेडेपणा
मजेशीर आहे ! आणिआमचं बाळ
मजेशीर आहे ! आणिआमचं बाळ धुमाकूळ घालायचे रेनकोट घालायचा प्रयत्न केला तर. ३ लोक मिळून पण चढवता यायचा नाही धड. शेवटी सोडून दिला प्रयत्न, येऊ दे भिजून, आल्यावर टॉवेल ने पुसून मग घरात न्यायचे असे सुरु असते. मऊ स्वेटर्स मात्र आवडीने घालून बसतो हल्ली.
फारच गोड किस्से आहेत एकेक.
फारच गोड किस्से आहेत एकेक.
आमचे बोकोबा (पांढरा) खूप हायपर असतात कायम. सुसाट इथून तिथून उड्या म्हणूनच त्याचे नाव मंकी ठेवलेय. दुसरी ब्राऊन सॅमी. ती एकदम शांत आहे. नवीन कोणी आलं की तासन्तास सोफ्याखाली बसलेली असते.
भारी आहे रेनकोटचा किस्सा!
भारी आहे रेनकोटचा किस्सा!
पेट्स भारी आहेत सगळ्याचे, मला त्याबाबतित दुरुन डोन्गर साजरेच म्हणावे लागेल. नो झेप्स प्रकरण आहे माझ्यासाठी.
इकडे ह्या कोविडच्या
इकडे ह्या कोविडच्या महिन्यांमध्ये कुत्रे घ्यायची कसली क्रेझ आली आहे काही कळत नाही. माझ्या माहितीतल्या जवळजवळ १० फॅमिलीजमध्ये कुत्रे आले आहेत. जेन्युईन आवड की पिअर प्रेशर काही कळायला मार्ग नाही. इतरत्रही असं काही बघण्यात आलं आहे का?
हो गं मी पण पाहिलंय.
हो गं मी पण पाहिलंय. लॉकडाऊनमधे करायला काही नाही म्हणून घेत आहेत बहुतेक. आम्ही पण त्याच लाटेतले. आम्हाला तर शेल्टर मधे पपीज अॅव्हेलेबलच नाही म्हणत होते.
हो पपी पँडेमिक असं नाव पण आहे
हो पपी पँडेमिक असं नाव पण आहे त्याला! सुरुवात कशी झाली काय माहित. शेल्टर्स मधे कुत्र्यांचा तुटवडा झाला म्हणे. आमच्या नेबरहुडात २० तरी घरात डॉग्ज आले नव्याने. काहींनी आता हवा म्हणजे हवाच म्हणून जास्त किंमत देऊन, आउट ऑफ स्टेट ड्राइव्ह करून वगैरे आणलेत!! सध्या सगळे घरी आहेत त्यामुळे लाटेत समील व्हायला बेस्ट टाइम आहे हा विचार करत असावेत.
कसली भारी बाळं आहेत ही सगळी.
कसली भारी बाळं आहेत ही सगळी. आमच्या घरातल्या लाडोबाच नाव चिकू.
खिडकीतुन पक्षी बघणे सध्याचा आवडता छंद आहे.
आमच्या गल्लीत टफी अश्या रटाळ
आमच्या गल्लीत टफी अश्या रटाळ नावाचा मोठ्ठा ग्रेट डेन आहे. शेजारी त्याला घेऊन चक्कर मारत होते. मध्ये एका ठिकाणी थांबून दुसऱ्या एका काकांशी बोलू लागले, ते टू व्हीलर वर बसले होते. एकदम टफिला त्याच्या गावठी मित्रांची ग्यान्ग दिसली, आणि तो जोरात पळू लागला, मोमेन्टम मुळे टफिचे काका गाडीवाल्या काकांवर पडले आणि दोन व्यक्ती आणि एक ऍक्टिवा असं ग्राऊंडवर पडलं. दोनी काकांना चांगलंच खरचटलं, पण तितकंच.
आजही टफी वाले काका टफी ची ओळख करून देताना," कुत्रा चांगला ए हो पण जरा डोक्याने कमी आहे" असे प्रेमाने सांगतात.
प्राणी पाळणं आणि त्यांच्यावर
प्राणी पाळणं आणि त्यांच्यावर एवढं प्रेम करणं मला ह्या जन्मात शक्य नाही.
मुलं डॉगी आणुया म्हणतात कधी मधी. पण हे होणे नाही. तुम्हाला पाळतेय तेच खुप आहे. तुम्ही मोठे झाल्यावर काय ते आणा असं सांगितलंय.
बाकी ओडीनचे आणि इतर पेट्स चे किस्से खरंच मस्त आहेत.
सर्वांना (बाळांना आणि
सर्वांना (बाळांना आणि पालकांना) दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुलं डॉगी आणुया म्हणतात कधी
मुलं डॉगी आणुया म्हणतात कधी मधी. पण हे होणे नाही. >> एकदा पुनर्विचार करा. व्हेट चा सल्ला घ्या. घरी पेट असल्याने मुलांच्या वाढीत गुणात्मक फरक पडतो. मुले तिसरी चौथीत असताना घेतल्यास ती कॉलेजला घराबाहेर पडेपरेन्त अतिशय सपोर्ट मिळतो. अर्थात आईचे काम वाढते व घराची स्वच्छता व पालकांचा चॉइस हे महत्वाचे मुद्दे आहेत. प्रेम माया शेअरिन्ग केअरिन्ग निसर्गाशी जोडलेले नाते व ऑनलाइन जगात वावरणार्या लहान मुलांना ऑफलाइन जग व त्यातील जगताना येणारी चॅलेंजेस. एक ते दोन तास कंप्लीट ऑफलाइन वेळ ( वॉकीज वाला) हे फायदे आहेत.
आईचे काम वाढते व घराची
आईचे काम वाढते व घराची स्वच्छता>>>. पर्फेक्ट. आवडच नसेल तर नको ती ब्याद असं होणार. जे मला नकोय.
नेपाळ मधे भुभुदेवाची दिवाळीत
नेपाळ मधे भुभुदेवाची दिवाळीत दुसर्या दिवशी पूजा केली जाते. ही पहा बातमी
https://www.cntraveller.in/story/nepal-diwali-time-worship-dogs/
बिच्चारे भूभूज!
बिच्चारे भूभूज!
अम्हीओडिन ला घेऊन अलिबागला
अम्हीओडिन ला घेऊन अलिबागला आलोय
आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र बघितला त्याने
इथे नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे
आल्यावर सगळ्यांना प्रतिसाद आणि इथला अनुभव टाकतो
तोवर सगळ्यांना शांततामय आणि फटाकेमुक्त दिवाळी च्या शुभेच्छा
अरे वा मस्त एंजॉय!
अरे वा मस्त एंजॉय!
. तुम्हाला या बाळांचा त्रास
. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.>>>>> हे महत्वाचे. मी फेबुवर एक गोड भुभु गळ्यात happy Diwali अशी पाटी घालून Say No to Crackers असा संदेश देणारे एक गुगलवरचे चित्र दिवाळी शुभेच्छा म्हणून घाउक स्वरुपात सर्वांना पाठवला त्यातील एका परिचिताची शुभेच्छांना उत्तर म्हणून शुभेच्छा पाठवायच्या ऐवजी एक अनपेक्षित कडवट प्रतिक्रिया आली. झक मारली अन कुठून शुभेच्छा दिल्या असे झाले. ते श्वानद्वेष्टे निघाले. I have not heard any dog (or any animal) dying because if firecrackers. But heard, seen, read in papers of people dying because of dog bite. Many cases of dogs attacking children. Recently one child was attacked and one of his legs was amputated.
Shall we kill all dogs in this world? अशी प्रतिक्रिया दिली. साध्या शुभेच्छा पाठवल्या तर हे उत्तर. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती
अरे बापरे!
अरे बापरे!
Ref Prakash post. If
Ref Prakash post. If something like this happens to you. Step back immediately. Take Ten minutes to cool off. Look at your dog and remember it is a positive relationship. Don't engage with negative mindsets you can't convert them . Go for a walk possibly .
अमा, मी नंतर शांतपणे संगीत
अमा, मी नंतर शांतपणे संगीत ऐकत बसलो. पण ही मानसशास्त्रीय नोंद ही अभ्यासकांपर्यंत पोहोचवली.
अवघड आहेत लोकं
अवघड आहेत लोकं
ओडीन इकडे सगळ्यात जास्त
ओडीन इकडे सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय
समुद्र बघून नाचला नुसता
इतका खेळला पाण्यात की नंतर बाहेर येईना
कसा तरी आणला ओढून
जिथे राहतोय तिथं मस्त हिरवळ आहे, चिकन खाऊन मस्त हिरवळीवर झोपा काढतोय, लोळतोय
इथल्या लोकल भुभु आणि माऊ वर भुंकून जरब बसवून झालीये
संध्याकाळी फिरायला गेल्यावर मोकळा सोडला की कानात वारं शिरल्यागत धावतोय
बोटीत बसून कुलाबा किल्ल्यावर
बोटीत बसून कुलाबा किल्ल्यावर जाताना पण काही त्रास दिला नाही
एकदम नेहमीचे असल्यासारखे बोटीत उडी मारून बसला
पलीकडे गेल्यावर उतरला
मजा आली तिथं गेल्यावर, तिकीट काढताना तिथला माणूस म्हणाला कुत्र्यांना परवानगी नाही
मी म्हणलं घरच्यांना की तुम्ही जाऊन या आम्ही इथं बसतो बाहेर
आणि आम्ही असे बापूडवाणे बसलेले बघून त्यांनाच दया आली
म्हणे तुमच्या जबाबदारी वर नेणार का? कोणाला काही त्रास देणार नाही ना
म्हणलं नाही देणार
आणि खरोखरच नाही दिला, मस्त किल्ला बघत हिंडला
उलट एक ग्रुप आलेला त्यांच्या सोबत फोटो वगैरे पण काढून घेतला
फुल सेलिब्रिटी झालेला
Pages