चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेले लघुरुप.
भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते.
यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.
उदा. BB ROY of Great Britain has Very Good Wife हे विद्युत रोधकांवरील रंगपट्टे लक्षात ठेवण्यासाठीचे वाक्य प्रसिद्ध आहे.किंवा इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी तांनापिहिनिपांजां
असे बरेच शब्द तुम्ही ऐकले असतील.काहीवेळा बनवलेही असतील.
तर मग येऊ द्यात अशी 'स्मृती सहायक लघुरुपे'. संग्रह होऊ द्या.ज्ञानसाठा वाढवायला मदत करुया. _/\_
जांतांनाहिपांनिपि पेक्षा
जांतांनाहिपांनिपि ऐवजी तांनांपिहीनीपाजा असं शिकवलं तर ते इंद्रधनुष्यातील रंगंच्या क्रमाने होतं.
आद्याक्षरांची लघुरूपे अजून
आद्याक्षरांची लघुरूपे अजून अशी आठवत नाहीत.
पण शाळेत असतांना 'जीवनसत्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग' हे कसे पाठ केले होते ते सांगते.
जीवनसत्व 'अ' - रात'आं'धळेपणा
जीवनसत्व 'ब'- 'बे'रीबेरी
जीवनसत्व 'क' - 'स्क'र्व्ही
जीवनसत्व 'ड' - मु'ड'दूस
आद्याक्षरांची लघुरूपे अजून
आद्याक्षरांची लघुरूपे अजून अशी आठवत नाहीत. >>> + १००० .
पण काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी , काही वाक्य किन्वा कविता पाठ करायचो
ऑल सिल्व्हर टी कप्स
ऑल सिल्व्हर टी कप्स
ऑल साईन टॅन कॉस वेगवेगळ्या चरणात पोझिटिव्ह
कंचेभागुबेव किंवा BODMAS
कंचेभागुबेव किंवा BODMAS
श्री बालाजीची सासु
श्री बालाजीची सासु
पेरुचा पापा
All People Seem To Need Data
All People Seem To Need Data Processing - OSI लेयर्स
यमताराजभानसलगा - मराठी व्याकरणात मध्ये वृत्त आणि लघु गुरु ओळखायला
पेरूचा पापा आता मोरूचा पापा झालंय (मास्क साठी पण काही तरी ऍड करावं लागेल)
श्री बालाजीची सासु - हे नाही कळलं
श्री बालाजीची सासु हे
श्री बालाजीची सासु हे भुलाबाई / भोंडल्यातली खिरापत (खाऊ) ओळखण्यासाठी.
श्रीखंड बासुंदी लाडु जिलेबी चिवडा साखर(खडी)फुटाणे सुकामेवा
यमुनाबाईआगासीनचावाडास्वाहा...
यमुनाबाईआगासीनचावाडास्वाहा.... या शिव्या आहेत.
येता मास जसा तताग शार्दूल
येता मास जसा तताग शार्दूल विक्रीडीत
म स ज स त त ग असा लघु गुरू क्रम
या म स ज वगैरे प्रत्येक अक्षराला एक शब्द असतो, जो शब्द वाचून आपल्याला लघु गुरू चा क्रम कळतो.
ननमयय गणांनी | मालिनी वृत्त होते |
(इथे गुगल ऑटो करेक्ट ने ऱ्हस्व दीर्घ गंडवलेले असू शकतील)
मनाचे श्लोक वाले भुजंग प्रयात वृत्त
म्हणावे तयाला भुजंग प्रयात
क्रमाने चा येती य चारी गणात
इथे य म्हणजे 'यमाचा' म्हणजे लघु गुरू गुरू
म्हणून मनाच्या श्लोकात प्रत्येक ओळीत
लघु गुरू गुरू लघु गुरू गुरू लघु गुरू गुरू लघु गुरू गुरू
असा क्रम
सध्या इतकेच आठवतेय
शुक्रतारा बहुतेक देवप्रिया वृत्त
गालगागा गालगागा गालगागा गालगा
पेरुचा पापा यातला शेवटचा पा
पेरुचा पापा यातला शेवटचा पा कशाचा?
पाकीट पास(लोकल किंवा बस चा)
पाकीट पास(लोकल किंवा बस चा)
A आंध्र
A आंध्र
p प्रदेशाची
s एस
t टी
n नांदेड
d डेपोत
p पोचली
APstndp ही osi model मधल्या protocols ची नावं आहेत
Application, presentation, session, transport, network, datalink, physical
Top to bottom क्रमाने
ना मग अल सी पस कल अर
ना मग अल सी पस कल अर
हे काय ओळखा पाहू
किल्ली हे लेयर्स चे मस्त आहे
किल्ली हे लेयर्स चे मस्त आहे.मला शिकताना माहीत हवे होते
पाकीट पास(लोकल किंवा बस चा)>>
पाकीट पास(लोकल किंवा बस चा)>> अरे हो, थँक्यू.
ना मग अल सी पस कल अर
ना मग अल सी पस कल अर
हे ओळखलं नाही का
उत्तर
मेंडेलिव्ह च्या आवर्त सारणीतील मूलद्रव्ये
तिसरी ओळ
Resistors colour coding
भूगोल अभ्यास करताना देशाची वैशिष्ट्ये इ लक्षात ठेवण्यासाठी acronym बनवत असू
स्वीलो : स्वीडनमध्ये लोखंड
सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम
सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम कॅल्शियम,बाकीची आठवत नाहीत.
सर्व छान आहेत.
सर्व छान आहेत.
आता एक वैद्यकीय अभ्यासातले भारी सांगतो.
आपल्या मनगटाच्या भागात आठ छोटी हाडे असतात. त्यांची नावे ओळीने लक्षात ठेवण्यासाठी आम्ही खालचे वाक्य लक्षात ठेवले होते.
She Looks Too Pretty
Try To Catch Her !
प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर हे त्या हाडाच्या नावाचे पहिले अक्षर आहे
आत्ता लगेच आठवत नाहीये पण अशा
आत्ता लगेच आठवत नाहीये पण अशा बऱ्याच युक्त्या असायच्या माहिती लक्षात ठेवण्यासाठी.
My very educated mother just showed us nine planets हे ग्रहमालिका लक्षात ठेवण्यासाठी वापरतात हे एकच आठवलं पटकन.
मला तर महीन्यात किती दिवस
मला तर महीन्यात किती दिवस येतात ते अजुनही पटकन आठवत नाही. पालथ्या मुठीच्या नकल्स ( हाडे) वरती ३०-३१-३०-३१ करावे लागते
बाकी बरेच लोक एक इंग्रजी कविता पाठ करतात ब्वॉ
दिशा लक्षात ठेवायला पण एक
दिशा लक्षात ठेवायला पण एक होते...मला नेमके आठवत नाहीये... कुणाला आठवते का??
मृणाली, मराठीतून दिशा?
मृणाली, मराठीतून दिशा? इंग्रजीमध्ये news म्हणून लक्षात ठेवता येतात आणि मधल्या दिशांना वेगळी नावेच नाहीत त्यामुळे ती लक्षात ठेवायची गरज नाही.
कि हे डे का मि ग्रँ लि डे से
कि हे डे का मि ग्रँ लि डे से मि मि
गणितातले परिमाण long form विचारू नका
पापु पाणीपुरी हे विसरत नाही कधीच.
आता आठच ग्रह. नेपच्यून
आता आठच ग्रह. नेपच्यून शेवटला.
प्लूटो , एरिस हे dwarf planets.
हो मराठी मधे,आठ ही दिशांंसाठी
हो मराठी मधे,आठ ही दिशांंसाठी..मी आठवले कि लिहिते.
दिशांसाठी हे एक सापडले शोधून.
दिशांसाठी हे एक सापडले शोधून.
उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवैद्य पक्वान्नाचा वाढावा.
छान धागा, मृ ते उद्या इडलिंबू
छान धागा, मृ ते उद्या इडलिंबू पुजेला आणूया , दत्ताचा नैवेद्य परत वाटुया असं आहे.
मी लिहिपर्यंत मानव यांचे आले
मी लिहिपर्यंत मानव यांचे आले पण वेगळे आहे. आम्ही हे म्हणायचो.
Pages