'स्मृती सहायक'

Submitted by केअशु on 28 October, 2020 - 23:40

चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेले लघुरुप.

भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते.

यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.
उदा. BB ROY of Great Britain has Very Good Wife हे विद्युत रोधकांवरील रंगपट्टे लक्षात ठेवण्यासाठीचे वाक्य प्रसिद्ध आहे.किंवा इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी तांनापिहिनिपांजां

असे बरेच शब्द तुम्ही ऐकले असतील.काहीवेळा बनवलेही असतील.
तर मग येऊ द्यात अशी 'स्मृती सहायक लघुरुपे'. संग्रह होऊ द्या.ज्ञानसाठा वाढवायला मदत करुया. _/\_

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

संस्कृत मध्ये विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवायला रामरक्षेमधला श्लोक -

रामो राजमणि: सदा विजयते
रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू
रामाय तस्मै नम: ।।
रामान्नास्ति परायणं परतरं
रामस्य दासोSस्म्यहम्‌ ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे
भो राम मामुद्धर

आणि वर आर्या यांनी लिहिलंय तसं शिव्यांसाठी - यमुनाबाई आगाशे, यमुनाबाईचा गडू Happy

Pages