बर्तन घिसींग.. ॲंड घिसींग..ॲंड घिसींग

Submitted by म्हाळसा on 6 October, 2020 - 11:23

तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..
पण आता भानूप्रतापचा पूर्ण हिरा ठाकूर झालायहो.. पूर्वी, सकाळी उठून फक्त माठभर प्यायचं पाणी भरत एकीकडे चहा टाकायचे बिचारे.. आता सासू उठण्यापूर्वी एकीकडे माठ, चहा आणि लगेहात रात्री घासलेली भांडीही जागच्या जागी ठेऊन देतात..बरं, ती भांडी रात्री त्यांनीच घासलेली असतात हे सांगायची गरज आहे का?..नुसता म्हणजे नुसता छळ चाललाय त्यांचा आणि ह्या सगळ्या कामाच्या मोबदल्यात त्यांची नाश्त्याची साधीसुधी मागणीही सहजासहजी पूर्ण होत नाही.. मागणी पण काय तर चमचाभर तूप सोडून बनवलेले फक्त ४-५ क्रिस्पी डोसे, त्याच्या सोबत फोडणी घालून बनवलेली दोनच वाट्या नारळाची चटणी.. बास..इतकं मिळाले तर सोबतीला असलेले इतर पदार्थ, जसं की लुसलूशीत ४-५ इडल्या आणि गरमागरम सांबार, ते अगदी कसलीही कुरकूर न करता खातात.. आता सांबार म्हटल्यावर एखाद-दुसऱ्या मेदू वड्याची मागणी केली तर कुठे काय बिघडतंय.. पण सासू मात्र ह्या माफक मागण्या तीच्या कपाटातल्या दोन सोन्याच्या पाटल्या मागितल्या सारखे भाव आणत पूर्ण करते.. आता बघा, एकीकडे वडे तळले जात असताना एखादीने न सांगता दुसऱ्या गॅसवर काॅफी चढवली असती..पण नाही..ते ही सासऱ्यांनाच सांगावं लागतं..आणि त्यावर काॅफी आवडल्यास “अर्धा कप अजून मिळेल का?” असं विचारायचीही सोय नाही.. जीथे घरी राहून लोकांची वजने ८-१० किलोने वाढलीएत तीथे सासऱ्यांच्या वजनात जेमतेम ५ चीच भर पडली आहे.. असो ..म्हणतात ना.. भगवान के घर देर है अंधेर नही ..
मी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.. सून ३ वर्षांनी आली म्हणून सुरवातीचे काही दिवस सासूने माझे जोरदार लाड पुरवले आणि सासऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले..माझ्याकडूनही छान भरलेल्या ताटाचे फोटो खाऊगल्लीच्या धाग्यावर टाकण्यात आले.. आणि शेवटी व्हायचं तेच झालं .. गाववालो, ये जो मायबोली है ना, मायबोली ..यहाके एक बुढ्ढे मामाने बिचमे भांजी मारके नजर लगादी..ॲंड तबसे मै किचन मे बर्तन घिसींग, ॲंड घिसींग ॲंड घिसींग.. (मानव आता तरी तुमचं वयं सांगा)

आता कालचीच गोष्ट घ्या.. तब्बल तीन वर्षांनी आम्ही बाप-लेक तंगड्या पसरून तारे जमीन पे बघत होतो .. आमचा आराम बघून लगेचच कुठूनतरी जळका वास येऊ लागला.. सासूने टेबलावर लाडू-चिवडा तर सोडा पण साधी चहा-काॅफी न ठेवता, ४ खोबऱ्याच्या वाट्या किसायला आणि किलोभर कांदे कापायला आणून दिले.. आम्हीही नाराजी व्यक्त न करता रात्री जेवायला कोंबडी असणार म्हणून कापायची कामगिरी झटपट पार पाडली .. पण एवढ्यावरंच समाधान मानेल ती सासू कसली.. एऱ्हवी तीचे जेवण बनवण्याची प्रोसेस फारच पद्धतशीर.. पद्धतशीर बोले तो.. उगाच एखादं जास्तीचं पातेलं, वाटी, चमचा ..काही म्हणजे काहीच धुवायला निघणार नाही.. वापरलेली भांडी तेव्हाच्या तेव्हा विसळून एक तर पुन्हा वापरली जातात किंवा जागच्या जागी ठेवली जातात..पण आता सून भांडी घासणार म्हणून कोरोनाच्या काळात धूळ खाऊन जाडजूड झालेले कपाटातले राखिव टोपही मैदानात उतरवले.. नाही नाही म्हणता दिवाळीची साफसफाई आत्तापासूनच सुरू झाल्याचा फील आला.. आमटीचा टोप, कुकरचे डबे, कणिक मळलेली परात, कोशिंबीरीचे भांडं, किसणी, चाकू, चमचे,कलथे .. हे सगळं जणू कमीच म्हणून शिजवलेलं जेवण डायनिंग टेबलावर मांडण्यासाठीची वेगळी भांडी आणि हे ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले..”आदमी पाच और बर्तन पचास..बहोत नाईंसाफी है” असं अगदी ओरडून बोलावसं वाटत होतं.. पण शेवटी “सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन” म्हणत सगळी भांडी खळखळून घासली,धुतली आणि पुसून ठेवली..
एनीवेज, वो सेर तो हम सवासेर.. उद्या माझा आणि सासऱ्यांचा एस्केप प्लॅन ठरलाय.. सासूची आणि कुंभकर्णाची रास एकच..म्हणून उद्या दुपारी ती झोपली रे झोपली की मुलींना नवऱ्यावर ढकलायचं, मास्क लावायचा, ग्लव्ह्ज चढवायचे, गाडीची चावी घ्यायची आणि भुर्र उडून जायचं.. थेट राम मारूती रोड गाठायचा, राजमाता वडापाव खायचा..तीथून उपवनला चक्कर टाकून वाटेत सासूसाठी थोडीशी चाफ्याची फुलं उचलून घरी आलं की सासू पण खिशात..त्यानंतर “आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही” असं टिळकांच्या शैलीत ठणकावून सांगायचं आणि सरळ खाली वाॅकसाठी निघून जायचं.. एवढा साधा सोप्पा प्लॅन आहे.. तो सक्सेसफुल होईल एवढीच आशा.

आजच्या साठी एवढंच .. तर मंडळी घासताय ना? असेच घासत रहा.. उप्स हसत रहा.. चला हवा येऊ द्या
.
.
.
लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला Happy

Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसादांसाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.

पण सासू फावल्या ( रिकामा नव्हे) वेळात काय करते?
--------
सासऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.
Submitted by Srd on 6 October, 2020 - 20:56>>
फावला वेळ आणि रिकामा वेळ यात काय फरक आहे?

चांगले स्क्रोच ब्राईट आणि विम लिक्वीड जेल दिलं तरच्च मी भांडी घासेन >> लिक्विड सोपवर विश्वास नाही सासूचा.. जो पर्यंत व्हिम बारने सूनेचे हात सोलत नाही तो पर्यंत भांडी स्वच्छ घासली आहेत याची खात्री नाही पटणार.

लोकहो, लेखावरून प्रेरीत होऊन तुम्ही भांडी घासायला सुरूवात नका करू. काही तरी भन्नाट एस्केप प्लॅन्स सुचवा..

सीमंतिनी - असं असेल तर भांड्यांशी संवाद साधावा लागेल Happy

“पल भर ठहर जाओ
दिल ये संभल जाए
कैसे तुम्हे रोका करूँ
मेरी तरफ आता हर गम फिसल जाए
आँखों में तुम को भरूं
बिन बोले बातें तुमसे करूँ
'गर तुम साथ हो...
अगर तुम साथ हो”

डेंजर आहे Happy
केळीच्या पानावर जेवा.त्याने कोलेस्टेरॉल, वजन, बीपी कमी होतं असं व्हॉटसप पोस्ट बनवून आधी फिरवायचं Happy
आपोआप स्विच होईल

ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले
>>> अगदी...अगदी.
आणि रात्री ते गरम करण्यासाठी दुसरी भांडी Uhoh

सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन,
गर तुम साथ हो>>> Rofl

Dishes... they will literally be there for you >>>>
@सीमंतिनी Proud Proud

एक नम्बर लेख!
<<सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन<< हे भारी Rofl

डेंजर आहे 
केळीच्या पानावर जेवा.त्याने कोलेस्टेरॉल, वजन, बीपी कमी होतं असं व्हॉटसप पोस्ट बनवून आधी फिरवायचं 
आपोआप स्विच होईल

नवीन Submitted by mi_anu on 7 October, 2020 - 10:33
>>>>
त्याने कोरोना ला आळा बसतो अशी आवई उठवायची. मग नक्कीच स्विच होईल.

म्हाळसाबाई, अहो तुमच वाढलेले वजन कमी काराचे म्हणूनच साबा तुम्हाला जास्तीची भांडी धुवायला देत असतील. कष्ट करा बर जरा. चांगला व्यायाम असतो. Happy . आई असती तर म्हणला असता, किती काळजी करते हो माय माझी. Happy

सध्या मी आत्मनिर्भर झालोय. त्यामुळे मी करायच्या भितीने घरात वेगवेगळे पदार्थ आधिच बनवले जातात. Happy
छान लेख.

अनु, पाफा छान आयडिया.
नाही मिळाली केळीची पानं तर डिस्पोजेबल प्लेट्स (म्हणजे घातू नको, स्टेनलेस स्टील तर मुळीच नको) मध्ये तुळशी पत्र ठेवून जेवलं तरी तेवढंच परिणामकारक ठरतं, बरं का.

ओ म्हाळसा केव्हाच सांगितलंय वय मी त्या धाग्यावर एकदा निवांत जाऊन शोधा तिथे.

भांडी घासताना मनाकडेही लक्ष दे हो श्याम. जशी भांडी निर्मळ होतात तसेच मनही निर्मळ व्हावे बरे. घास घीस, घास घीस हा ताल मनात धरून श्वासाची लय साधावी. मग आपोआप कोहम सोहम अशी
एकतानता येईल बरे. भांडी घासून धुवून झाल्यावर तुझे पाय मी पदराने पुसून देईन हो.

५०

सासुबाई नाहीत ना मायबोलीवर??

नवीन Submitted by वीरु on 7 October, 2020 - 13:58
>>>
रोमात पण असु शकतात. त्यातून म्हाळसाक्का डिप्या वर डिप्या बदलताहेत अन धागाही पहिल्या पानावर आहे. Biggrin

>>> ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले
>>> अगदी...अगदी.
आणि रात्री ते गरम करण्यासाठी दुसरी भांडी<<<
+११११११११११
आणि सकाळच रोजच फ्रीझ आवरा, आहेच काम. लॉकडीउनच्या सुरुवातीच्य काळात , गच्च भरलेले फ्रीझ ( वस्तु मिळणार नाही ह्या भितीने), त्यात डोकं घालून शोधत बसा..

म्हाळसाबाई, अहो तुमच वाढलेले वजन कमी काराचे म्हणूनच साबा तुम्हाला जास्तीची भांडी धुवायला देत असतील. >> विक्रमसिंह - अहो वजनापेक्षा उंचीचा जास्त प्रॅाब्लेम आहे ओ.. माझी उंची ५’६” आणि इथला किचन कट्टा ३’ त्यामुळे फारच वाकून भांडी घासावी लागतात.

सध्या मी आत्मनिर्भर झालोय. त्यामुळे मी करायच्या भितीने घरात वेगवेगळे पदार्थ आधिच बनवले जातात>> काहीही हं.. ते पुडींग करायचं अजून राहीलंय बघा

@अनु, पाफा, मापृ - केळीच्या पानाची आणि तुळशीपत्राची आयड्या भारी आहे Happy

@हीरा - प्रतिसाद एकदम भारी Lol

रोमात पण असु शकतात. त्यातून म्हाळसाक्का डिप्या वर डिप्या बदलताहेत अन धागाही पहिल्या पानावर आहे >> हे रोमात काय असतं ते विसरले बघा मी.. और रही बात डिप्या की तो डिप्या बदल बदल के तुमको नही पिड्या तो नावाची म्हाळसा नाय Lol

सीमंतिनी, मानवदादा आणि हीरा Lol
यामुळे मला फलाहार व उपासतापास यांचे महत्त्व कळले आहे , हातात एक एक अँपल व केळ फेकायचे व दूध द्यायचे,
अन्नावरची वासना भांड्यामुळे उडून गेली असे नको ना व्हायला Wink
अहो वजनापेक्षा उंचीचा जास्त प्रॅाब्लेम आहे ओ.. माझी उंची ५’६” ... सेम पिन्च , लटकल्यासारखे वाटते मला वेताळासारखं भारतातल्या आमच्या सिंकवर Lol
सिंक विक्रम मी वेताळ Lol

Pages