देव पावला तर

Submitted by बोकलत on 5 October, 2020 - 14:06

मी लहानपणी आपल्या देवांचे कार्यक्रम बघायचो. खासकरून रविवारी सकाळी आठ ते अकरा या वेळेत. त्यामध्ये बरेच जण म्हणजे ऋषीमुनी, राक्षस, माणसं तप करायचे आणि देवाला प्रसन्न करायचे. देव त्यांच्यासमोर प्रसन्न होऊन हवा तो वर मागायला लावायचा. मग प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार हवा तो वर मागून घ्यायचे. माझीही खूप ईच्छा होती की आपण पण देवाला प्रसन्न करून आपल्याला हवा तो वर मागायचा. मी टीव्हीमध्ये दाखवल्याप्रमाणे जप करायला सुरुवात केली होती. जमेल तेव्हा जप करायचो पण अर्थातच कडक तपश्चर्या नसल्याने देव कधी प्रसन्न नाही झाला. आता या वयात पण मला वाटतंय कधीतरी देव माझ्यावर प्रसन्न होईल आणि बोलेल वत्सा बोल काय पाहिजे. तर चुकून असं झालंच तर गोंधळ नको उडायला म्हणून मी काय मागायचं याची लिस्ट तयार करत आहे. त्यातला कोणतातरी एक वर मी मागणार आहे. तुम्ही पण तुमची काय लिस्ट असेल ती डकवा इथे तेव्हडीच मला मदत.
१. मी भारताला पाचवेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देईन.
२. मी भूतकाळ आणि भविष्यकाळात जाऊ शकतो.
३. मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ दे.
४. मला सुपरमॅनसारखी आकाशात उडण्याची शक्ती पाहिजे.
५. मी या ब्रह्मांडात कुठेही टेलिपोर्ट होऊ शकतो.
अजून आठवतील तेव्हा ही लिस्ट परत अपडेट करेल.
६. माझ्याकडे एक जादूची थाळी पाहिजे ज्यात मी मागेन तो पदार्थ लगेच यावा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

देवावर विश्वास नाही, पण धाग्याचा उद्देश लक्षात घेऊन कुणी विश ग्रँट करतेय असे गृहीत धरून माझी एकच एवढीच यादी:

१. मला इच्छामरण मिळू दे.

@मानव पृथ्वीकर, मला पहिल्यापासून संशय होता तुम्ही अश्वत्थामा आहात.
@हाआ, कोणताही येऊ दे, आपल्याला वर मिळाल्याशी मतलब.
@किल्ली, खरं आहे Lol मी पण हा पर्याय ऍड करणार होतो पण जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षे या वराचा फायदा होऊ शकतो. म्हणून कॅन्सल केला.
@sonalisl, सगळ्यांसाठी नाही. देव बोलेल तुमच्यासाठी मागा फक्त मी तुम्हाला प्रसन्न झालोय.
@बादशहा, जेव्हा तुम्ही बोलाल मला पाच वर द्या तेव्हा तुमचा एक मागायचा संपेल ना? मग तुमच्याकडे पाच वर असतील पण मागू शकणार नाही.

मी मागेन की माझ्या पुढच्या सात आणि मागच्या शिल्लक असलेल्या पिढ्या माझ्या सारख्याच निरोगी, सुदृढ , सशक्त, 14 विद्या आणि 64 कलांमध्ये निपुण आणि सुखी समाधानी, आनंदी असल्या तरीही तुझ्या भक्तीचा विसर आम्हा कोणाला कधीही पडून देऊ नकोस.

किंवा मागेन

मी जेव्हा जेव्हा सुखात आणि आनंदात असें तेंव्हा तेंव्हा तुझं नाव माझ्या मुखात येऊ देत आणि माझ्या मुखातून तुझे नाव कधीही जाऊ नये

इच्छा मरण मिळु दे म्हणजे मला असे नाही म्हणायचंय की जो पर्यंत मी इच्छा करत नाही तो पर्यंत मरु नये. असेल नशिबात लौकर मरण तर असेल. पण स्वतःच्याने स्वतःचे होत नाहीय, दुसऱ्यावर अवलंबून आहे अशी वेळ येऊ नये, इतकं वय / शारीरिक अवस्था होईपर्यंत जगू नये. यासाठी मी जेव्हा इच्छा करेन तेव्हा मरण आलं पाहिजे. त्या आधी आलं तर हरकत नाही.

मृणाली Lol
मानव , खरं आहे.
किल्ले : तथास्तू : रियाला पण तथास्तू मीच म्हणते Happy

मानव, तुमचा प्रायोपवेशन चा विचार आहे का? ( on serious note)>>>> नाही हो पाफा, तुम्ही कुठेतरी नेताय त्यांच्या इच्छेला. तसं कुठे म्हणताएत ते. परावलंबी जीवन नको एवढंच म्हणाले

अच्छा. अजून ती वेळ यायला भरपूर वेळ असल्याने कधी एवढ्या डिटेलमध्ये विचार नाही केला.
पण परावलंबी होई पर्यंत जगू नये अशी मनोमन तीव्र इच्छा आहे.

मृणाली Lol
रिया यांची wish ही मस्त आहे. असं पटकन सुचायला हवं.

एकच इच्छा! जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या समोर उभ्या असलेल्या पर्यावरणाच्या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव होऊ दे आणि त्यातून कमीतकमी हानीचा पर्याय शोधून सगळे मानवी जग हे अधिक शाश्वत रितीने चालू लागू देत!

माझी इच्छा ,
इथल्या सद्हेतुने कामना केलेल्या सर्वच इच्छांंची पूर्तता होवो Happy
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

धन्यवाद बोकलत Happy

जिज्ञासा, खूप चांगली, महत्वाची आणि अत्यन्त गरजेची इच्छा.
आणि तसे होणे हेच मानव जातीच्या हिताचे आहे.
पर्यावरण परत एकदा उभे राहील पण मानवजात नष्ट होऊन (सोबत अनेक प्रजाती नष्ट होऊन) निदान स्वतःला वाचवायला ही सुबुद्धी मानवजातिला होऊ दे.

जिज्ञासा, खूप चांगली, महत्वाची आणि अत्यन्त गरजेची इच्छा. +1
ही इच्छा वाचूनच मला वरची इच्छा लिहावी वाटली.
You inspired me जिज्ञासा Happy

1.प्रत्येक माणसाच्या अंगात स्वच्छता( स्वतः/परिसर) अगदी इतर चांगल्या सवयी प्रमाणे भिनलीच पाहिजे
2. कुणाही मनुष्य/प्राणी यांना वेदना सहन कराव्या लागू नये
( शारीरिक+मानसिक)

आणि एक खूप स्वार्थी वर,फक्त स्वतः पुरता
कितीही/काहीही खाल्लं तरी वजन वाढू नये

माझी साधी इच्छा आहे.. जेवण झालं की चुटकी वाजवताच ताटं, भांडी आपोआप धुऊन पुसून जागेवर गेली पाहीजेत.

सगळंच चुटकी वाजवून झालं तर किती मज्जा येईल. चुटकी वाजवली की पदार्थ ताटात. चुटकी वाजवली की क्षणात हव्या त्या लोकेशनला. बस चुटकी वाजवता आली की झालं.
जिज्ञासा, मानव प्रतिसाद छान.

मग देव म्हणेल चुटकी वाजवली की सरळ पोट भरल्या।जाईल असे करतो ना. कशाला हवेत ती भांडी आणि त्यांच्या जागा.

@हाआ, कोणताही येऊ दे, आपल्याला वर मिळाल्याशी मतलब.>>>>
असं नाही होत ना बोकलत.
प्रत्येक देवाची पॉवर वेगवेगळी असल्याने तुम्ही ज्या देवाला वर मागताय त्याच्या आवाक्यातलीच नसली तुम्ही मागताय ती गोष्ट तर तो काय देणार!
बांधावरचा म्हसोबा पिकापाण्याची राखण करुन बरकत देऊ शकेल पण तो 'सर्वे भवन्तु सुखिनः'साठी हरीईठ्ठल लागेल.

आमच्या बांधावरचा म्हसोबा प्रसन्न होऊन वर माग म्हणाला तर मी त्याला 'आमच्या शेजारचा नाम्या मुका होऊ दे' हा वर मागेल कारण तो त्याच्या वावरातून ट्रॅक्टर नेता-आणताना [दुसरी वाट नसल्यानं] बडबड करत असतो.
डोहातला वेताळ पावला तर त्याला आमच्या जनावरांवर वरच्या आखाड्यातून केलेले करणीचे प्रयोग चालू नये यासाठी ठोस तोडगा मागेन.
विठ्ठल पावला तर त्याच्याकडे परमार्थासाठी नाम मागेन.
साईबाबा पावले तर त्यांच्याकडे 'बायकोला बुद्धी दे' मागेन.
आणि
.
.
.
आपले वेमा 'वर माग' म्हणाले तर त्यांच्याकडे माझा पहीला आयडी मागेन. Proud

मी माझे बालपण परत मागीन..

ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी

न दुनिया का ग़म था न रिश्तों के बंधन
बड़ी खूबसूरत थी वो ज़िंदगानी

भूतकाळात जाऊन काही चुका सुधारता याव्या अशी इच्छा मागावी का.. की lesson learnt म्हणून राहू द्याव्या.
बोकलत . U r right.. आधीच लिस्ट बनवून रेडी ठेवायला हवी Happy

हायला हा धागा बकेट लिस्ट कडे झुकायला लागलाय.

@ मानव आणि धनुडी, रसरशीत जीवन जगलेल्या, कुठल्याही इच्छा आकांक्षा बाकी नसलेल्या माणसाला, एखाद्या ठराविक ध्येयाला वाहून घेतलेल्या इसमाला कार्यपुर्तीनंतर रितेपणा येतो. Maslow's need hierarchy theory च्या self actualization स्टेप नंतर प्रायोपवेशन च्या स्टेज खुणावते.
असो,
@ मानव तुम्ही कोरोना काळातील तुमच्या वडिलांचा हॉस्पिटल चा अनुभव शेअर केला होता. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असावी ही अपेक्षा आणि प्रार्थना. तुमचा इथला प्रथम प्रतिसाद वाचून तुम्ही वडिलांकडे बघून प्रतिसाद टाकला असावा अशी शंका मनाला चाटून गेली, म्हणून हा लेखन प्रपंच.
(प्रतीसाद फार पर्सनल वाटल्यास इग्नोर करा.)

Pages