तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..
पण आता भानूप्रतापचा पूर्ण हिरा ठाकूर झालायहो.. पूर्वी, सकाळी उठून फक्त माठभर प्यायचं पाणी भरत एकीकडे चहा टाकायचे बिचारे.. आता सासू उठण्यापूर्वी एकीकडे माठ, चहा आणि लगेहात रात्री घासलेली भांडीही जागच्या जागी ठेऊन देतात..बरं, ती भांडी रात्री त्यांनीच घासलेली असतात हे सांगायची गरज आहे का?..नुसता म्हणजे नुसता छळ चाललाय त्यांचा आणि ह्या सगळ्या कामाच्या मोबदल्यात त्यांची नाश्त्याची साधीसुधी मागणीही सहजासहजी पूर्ण होत नाही.. मागणी पण काय तर चमचाभर तूप सोडून बनवलेले फक्त ४-५ क्रिस्पी डोसे, त्याच्या सोबत फोडणी घालून बनवलेली दोनच वाट्या नारळाची चटणी.. बास..इतकं मिळाले तर सोबतीला असलेले इतर पदार्थ, जसं की लुसलूशीत ४-५ इडल्या आणि गरमागरम सांबार, ते अगदी कसलीही कुरकूर न करता खातात.. आता सांबार म्हटल्यावर एखाद-दुसऱ्या मेदू वड्याची मागणी केली तर कुठे काय बिघडतंय.. पण सासू मात्र ह्या माफक मागण्या तीच्या कपाटातल्या दोन सोन्याच्या पाटल्या मागितल्या सारखे भाव आणत पूर्ण करते.. आता बघा, एकीकडे वडे तळले जात असताना एखादीने न सांगता दुसऱ्या गॅसवर काॅफी चढवली असती..पण नाही..ते ही सासऱ्यांनाच सांगावं लागतं..आणि त्यावर काॅफी आवडल्यास “अर्धा कप अजून मिळेल का?” असं विचारायचीही सोय नाही.. जीथे घरी राहून लोकांची वजने ८-१० किलोने वाढलीएत तीथे सासऱ्यांच्या वजनात जेमतेम ५ चीच भर पडली आहे.. असो ..म्हणतात ना.. भगवान के घर देर है अंधेर नही ..
मी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.. सून ३ वर्षांनी आली म्हणून सुरवातीचे काही दिवस सासूने माझे जोरदार लाड पुरवले आणि सासऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले..माझ्याकडूनही छान भरलेल्या ताटाचे फोटो खाऊगल्लीच्या धाग्यावर टाकण्यात आले.. आणि शेवटी व्हायचं तेच झालं .. गाववालो, ये जो मायबोली है ना, मायबोली ..यहाके एक बुढ्ढे मामाने बिचमे भांजी मारके नजर लगादी..ॲंड तबसे मै किचन मे बर्तन घिसींग, ॲंड घिसींग ॲंड घिसींग.. (मानव आता तरी तुमचं वयं सांगा)
आता कालचीच गोष्ट घ्या.. तब्बल तीन वर्षांनी आम्ही बाप-लेक तंगड्या पसरून तारे जमीन पे बघत होतो .. आमचा आराम बघून लगेचच कुठूनतरी जळका वास येऊ लागला.. सासूने टेबलावर लाडू-चिवडा तर सोडा पण साधी चहा-काॅफी न ठेवता, ४ खोबऱ्याच्या वाट्या किसायला आणि किलोभर कांदे कापायला आणून दिले.. आम्हीही नाराजी व्यक्त न करता रात्री जेवायला कोंबडी असणार म्हणून कापायची कामगिरी झटपट पार पाडली .. पण एवढ्यावरंच समाधान मानेल ती सासू कसली.. एऱ्हवी तीचे जेवण बनवण्याची प्रोसेस फारच पद्धतशीर.. पद्धतशीर बोले तो.. उगाच एखादं जास्तीचं पातेलं, वाटी, चमचा ..काही म्हणजे काहीच धुवायला निघणार नाही.. वापरलेली भांडी तेव्हाच्या तेव्हा विसळून एक तर पुन्हा वापरली जातात किंवा जागच्या जागी ठेवली जातात..पण आता सून भांडी घासणार म्हणून कोरोनाच्या काळात धूळ खाऊन जाडजूड झालेले कपाटातले राखिव टोपही मैदानात उतरवले.. नाही नाही म्हणता दिवाळीची साफसफाई आत्तापासूनच सुरू झाल्याचा फील आला.. आमटीचा टोप, कुकरचे डबे, कणिक मळलेली परात, कोशिंबीरीचे भांडं, किसणी, चाकू, चमचे,कलथे .. हे सगळं जणू कमीच म्हणून शिजवलेलं जेवण डायनिंग टेबलावर मांडण्यासाठीची वेगळी भांडी आणि हे ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले..”आदमी पाच और बर्तन पचास..बहोत नाईंसाफी है” असं अगदी ओरडून बोलावसं वाटत होतं.. पण शेवटी “सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन” म्हणत सगळी भांडी खळखळून घासली,धुतली आणि पुसून ठेवली..
एनीवेज, वो सेर तो हम सवासेर.. उद्या माझा आणि सासऱ्यांचा एस्केप प्लॅन ठरलाय.. सासूची आणि कुंभकर्णाची रास एकच..म्हणून उद्या दुपारी ती झोपली रे झोपली की मुलींना नवऱ्यावर ढकलायचं, मास्क लावायचा, ग्लव्ह्ज चढवायचे, गाडीची चावी घ्यायची आणि भुर्र उडून जायचं.. थेट राम मारूती रोड गाठायचा, राजमाता वडापाव खायचा..तीथून उपवनला चक्कर टाकून वाटेत सासूसाठी थोडीशी चाफ्याची फुलं उचलून घरी आलं की सासू पण खिशात..त्यानंतर “आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही” असं टिळकांच्या शैलीत ठणकावून सांगायचं आणि सरळ खाली वाॅकसाठी निघून जायचं.. एवढा साधा सोप्पा प्लॅन आहे.. तो सक्सेसफुल होईल एवढीच आशा.
आजच्या साठी एवढंच .. तर मंडळी घासताय ना? असेच घासत रहा.. उप्स हसत रहा.. चला हवा येऊ द्या
.
.
.
लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला
आमेन! खुसखुशीत आहे.
आमेन! (टिळकशैली साठी)
खुसखुशीत आहे.
तुम्ही खुप छान लिहीता
तुम्ही खुप छान लिहीता म्हाळसाजी. लेख आवडला.
डिशवॉशर नाही का तुमच्या कडे?
डिशवॉशर नाही का तुमच्या कडे?
मस्त
मस्त
तुम्ही खुप छान लिहीता
तुम्ही खुप छान लिहीता म्हाळसाजी. लेख आवडला.
Submitted by केशव तुलसी on 6 October, 2020 - 11:45>> दोन तास नाशिक हायवे वर अडकले होते .. त्याचाच परिणाम
डिशवॉशर नाही का तुमच्या कडे? Happy>> अमेरिकेत आहेओ.. ठाण्याच्या घरी नाहीए
म्हाळसा मस्त खुसखुशीत लिहिलंय
म्हाळसा मस्त खुसखुशीत लिहिलंय.
सध्या आम्ही पण घिसिंग मोडमध्ये. आज कमी आहेत भांडी असं म्हणावं तर त्या जेम्सच्या गोळ्यांची ऍड आहे तसा ढीग साचतो पुढच्या दोन तासात
Mast लिहिलंय
Mast लिहिलंय
सासरेबुवांना दिला का वाचायला
सासरेबुवांना दिला का वाचायला लेख. नक्की वाचायला द्या. बिचारे तासभर रडत बसतील.
सासरेबुवांना दिला का वाचायला
सासरेबुवांना दिला का वाचायला लेख. नक्की वाचायला द्या. बिचारे तासभर रडत बसतील.>> अजून नाही दिला.. त्यांची आय पि एल चालू आहे.. मॅच चालू असताना अन्नाचा घास तोंडात जातोय का नाकात जातोय त्याचंही भान नसतं त्यांना.. त्यात लेख कुठे वाचायला देऊ
सासूबाईंनी पुडिंग बनवून दिलं
सासूबाईंनी पुडिंग बनवून दिलं तर भांडी घासायला काही वाटणार नाही
मस्त लेख
कुणितरी भांडी घासायच्या बेसिन ला अक्षयपात्र म्हटल्याचे आठवलं
अरेरे असे हाल होताहेत होय!
अरेरे असे हाल होताहेत होय! पण हे मी त्या फोटोंचे कौतुक केल्याने नव्हे तर मला बुढ्ढा समजल्याने झालेले दिसतेय. (तरीच मी विचार करत होतो, माझी नजर कुणालाच लागत नाही, मग असे कसे झाले असेल बरे).
चूक सुधारा प्रॉब्लेम सुटेल
देव तुमच्या सासूबाईंना पंचवीस माणसांची भांडी घासण्याचे बळ आणि हुरूप देईल.
म्हळसा मस्त खुसखुशीत लिहिलंय.
म्हळसा मस्त खुसखुशीत लिहिलंय..
वर्णिता भांड्याचा ढिगाला घाबरून खाऊगल्लीवर जायचे कमी केले..
मस्त , खुसखुशीत झालाय लेख,
मस्त , खुसखुशीत झालाय लेख, म्हाळसा!
तुमचा राम मारुती रोड प्लान तसाच्या तसा ,म्हणजे वॉक पर्यंत , पार पडला का ते पण सांगा.
भांडी घासणे सोपे काम आहे पण
भांडी घासणे सोपे काम आहे पण घासलेली आणि धुतलेली भांडी जागच्या जागी लावणे जास्त त्रासदायक...
आम्ही आज जेवणार नाही, आम्ही
आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही
हसता हसता रडवलं या वाक्याने
आमच्याकडेही आज मला भूक नाही तर आज मी जेवण बनवणार नाही.. असं ऐकायला मिळते प्रॅक्टीकली हे कर्रेक्ट असले तरी इमोशनली अत्याचार आहे
बाई दवे,
त्या टिळकांच्या ओरिजिनल कथेत शेंगांची टरफले फायनली उचलली कोणी याचा उल्लेख आहे का?
तुम्ही प्रतिसादात भांड्यांचे काय झाले मग हे नक्की सांगा
म्हाळसादेवी, तुमचा आजचा प्लॅन
म्हाळसादेवी, तुमचा आजचा प्लॅन सुफळ संपूर्ण झाला का?
खुप छान लिखाण.... चला हवा येउ द्या ..पेक्षा खुसखुशीत.....
भारीच लेख म्हाळसा...
भारीच लेख म्हाळसा...
ये न्याय नही अन्याय हे.. अमेरिकेहून आलेल्या लोकांना पाय सुद्धा जमिनीवर टेकवू न द्यायची संस्कृती आहे आपली...
तू पण ठणकावून सांगून टाक.. चांगले स्क्रोच ब्राईट आणि विम लिक्वीड जेल दिलं तरच्च मी भांडी घासेन...
मस्त लिहिलंय एकदम कथनशैली
मस्त लिहिलंय एकदम कथनशैली खूप छान
>> सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन
ओहह्हो
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
काय मग शेवटी आज बर्तन घिसिंग
काय मग शेवटी आज बर्तन घिसिंग की नाय घिसिंग
पण हे मी त्या फोटोंचे कौतुक
पण हे मी त्या फोटोंचे कौतुक केल्याने नव्हे तर मला बुढ्ढा समजल्याने झालेले दिसतेय >> त्या वयाच्या धाग्यावर तुम्ही वय टाकले असते तर हा दिवस नसता बघावा लागला :p अजूनही वेळ गेलेली नाही
भांडी घासणे सोपे काम आहे पण घासलेली आणि धुतलेली भांडी जागच्या जागी लावणे जास्त त्रासदायक>> अनुभवाचे बोल .. पण मी काय म्हणते.. भांडी धुतल्यानंतर जागच्या जागी ठेवणे गरजेचे आहे का? ह्या एकमेव कारणासाठी डिशवाॅशर फार आवडतो.. डिशवाॅशर-> सिंक->पुन्हा डिशवाॅशर ..मला अशीच सायकल जास्त आवडते
त्या टिळकांच्या ओरिजिनल कथेत शेंगांची टरफले फायनली उचलली कोणी याचा उल्लेख आहे का?>> वाऱयाबरोबर उडून गेली
अमेरिकेहून आलेल्या लोकांना पाय सुद्धा जमिनीवर टेकवू न द्यायची संस्कृती आहे आपली>> साफ खोटंय हो.. आमच्या घरीतर कपाटाच्या,पलंगाच्या खालून कचरा काढून घेताना ”थोडा और, थोडा और“ म्हणत अगदी जमिनीवर लोळवतात
खुसखुशीत लेखन हे आठवले.
खुसखुशीत लेखन
हे आठवले. A picture speaks a thousand words !
(No subject)
तरीच, मलाही प्रश्ण पडतो,
तरीच, मलाही प्रश्ण पडतो, खाउगल्लीवर इतके पदार्थ बनवल्यावर, भाण्डी घासतं कोण?
एकदम खुसखुशीत लेख, म्हाळसा .
एकदम खुसखुशीत लेख, म्हाळसा .
अस्मिता भारी आहे हे.
जबरदस्त कमबॅक म्हाळसा, इतके
जबरदस्त कमबॅक म्हाळसा, इतके दिवस तुला मिस करत होतो. तू इथे येउन सिक्सरच हाणलीस की. वाक्या वाक्याला चिमटे आणि कोपरखळ्या! मजा आली. (तुझं ह्या सगळ्यांशी असलेलं बॉंंडिंग आवडतं. )
आता दुप्पट उत्साहाने भांडी घासेन.
अस्मिता पण ऐकत नाही
पण सासू फावल्या ( रिकामा
पण सासू फावल्या ( रिकामा नव्हे) वेळात काय करते?
--------
सासऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.
म्हाळसा मस्त खुसखुषीत लिहिलत
म्हाळसा मस्त खुसखुषीत लिहिलत
मजेदार लिहिलय..
मजेदार लिहिलय..
मनातली व्यथा मांडलीएस म्हाळसा..
सासरी गेले कि माझ्या हि वाट्याला सकाळ-संध्याकाळ एक बकेट बर्तन येतात. आपल्यासारखे किचन सिंक नाहीये तिथे, जुनी वाडा टाईप घरं, सगळा भांड्याचा टब उचलायचा,अंगणात जायचं, त्या छोट्या हौदातुन पाणी काढायचं आणि मग सुरु करायचं घीसिंग एन्ड घीसिंग.
अस्मिता मस्तच
वा! मस्त लिहीलायत!!
वा! मस्त लिहीलंय!!
Pages