अशी हवी शाळा...

Submitted by स्मितागद्रे on 16 November, 2009 - 09:09

अशी हवी शाळा जिथे मुळीच नको परिक्षा
नको वह्या, पुस्तक ,नको अभ्यासाची शिक्षा

अशी हवी शाळा जिथे असतील भरपूर खेळ
टीचरना ही गोष्टी सांगायला भरपूर मिळेल वेळ

अशी हवी शाळा जिथे डब्यात चालेल खाऊ
रोज रोज पोळीभाजी चा च मुळीच नसेल बाऊ

अशी हवी शाळा जिथे किल्ल्यावर पिकनिक नेतील
महाराजांच्या गोष्टी टीचर किल्ल्या वरच शिकवतील

अशी हवी शाळा जिथे होमवर्क देणार नाहीत
अभ्यास केला नाही तरी टीचर पनीश करणार नाहीत

खरच अशी मिळेल का "तोतो चान" सारखी शाळा ?
मग कधी सुद्धा येणार नाही शाळेत जायचा कंटाळा.

गुलमोहर: 

अगदी बरोबर! माझी मुलगी कधी कधी डायरी लिहिते.आहे आठ वर्षांचीच पण मोठ्या माणसाचा आव आणते.सुट्टी संपली की शाळेत जाताना नाराज असते,तिने तिच्या तथाकथित सिक्रेट डायरीत लिहिले आहे की का मुलांना शाळेतच जावे लागते? टी.व्ही. आहे, टाटा स्काय आहे,इंटरनेट आहे,पुस्तके आहेत मग शाळेत का जायचे? तिला तुमची शाळा नक्कीच आवडेल.सगळ्याच मुलांना आवडेल.

तोतो चान सारखी शाळा हवी अस स्वप्न आहे माझ्या पण लेकीच.
"तोतोचान" (तेत्सुको कुरोयानागी) हे एका जपानी लेखिकेने स्वानुभवावर लिहिलेल पुस्तक आहे. सगळ्या पालकांनी वाचण्यासारख आणि मुलांना वाचुन दाखवण्या सारख
बहुतेकांनी वाचल असेलच, नसेल तर अगदी आवर्जुन वाचा आणि आपल्या पिल्लांना वाचुन दाखवा Happy

छान Happy

Happy मस्त

बालकविता छान Happy

>>> आणि आपल्या पिल्लांना वाचुन दाखवा

माझ्या पिल्लानं १ल्या १०-१५ पानांतच तोत्तोचानला मूर्खात काढायला सुरूवात केली होती. (असं कधी असतं का? शाळेत काय चिमण्यांशी बोलतो का आपण? वगैरे वगैरे) आणि २ दिवसातच त्याला ते पुस्तक वाचून दाखवण्याचा नाद मला सोडून द्यावा लागला होता. Sad