Submitted by स्मितागद्रे on 16 November, 2009 - 09:09
अशी हवी शाळा जिथे मुळीच नको परिक्षा
नको वह्या, पुस्तक ,नको अभ्यासाची शिक्षा
अशी हवी शाळा जिथे असतील भरपूर खेळ
टीचरना ही गोष्टी सांगायला भरपूर मिळेल वेळ
अशी हवी शाळा जिथे डब्यात चालेल खाऊ
रोज रोज पोळीभाजी चा च मुळीच नसेल बाऊ
अशी हवी शाळा जिथे किल्ल्यावर पिकनिक नेतील
महाराजांच्या गोष्टी टीचर किल्ल्या वरच शिकवतील
अशी हवी शाळा जिथे होमवर्क देणार नाहीत
अभ्यास केला नाही तरी टीचर पनीश करणार नाहीत
खरच अशी मिळेल का "तोतो चान" सारखी शाळा ?
मग कधी सुद्धा येणार नाही शाळेत जायचा कंटाळा.
गुलमोहर:
शेअर करा
अगदी बरोबर! माझी मुलगी कधी
अगदी बरोबर! माझी मुलगी कधी कधी डायरी लिहिते.आहे आठ वर्षांचीच पण मोठ्या माणसाचा आव आणते.सुट्टी संपली की शाळेत जाताना नाराज असते,तिने तिच्या तथाकथित सिक्रेट डायरीत लिहिले आहे की का मुलांना शाळेतच जावे लागते? टी.व्ही. आहे, टाटा स्काय आहे,इंटरनेट आहे,पुस्तके आहेत मग शाळेत का जायचे? तिला तुमची शाळा नक्कीच आवडेल.सगळ्याच मुलांना आवडेल.
खूप छान. मुलांच्या खुषीला
खूप छान. मुलांच्या खुषीला पारावार उरणार नाही अशी शाळा मिळाली तर.
तोतो चान सारखी शाळा हवी अस
तोतो चान सारखी शाळा हवी अस स्वप्न आहे माझ्या पण लेकीच.
"तोतोचान" (तेत्सुको कुरोयानागी) हे एका जपानी लेखिकेने स्वानुभवावर लिहिलेल पुस्तक आहे. सगळ्या पालकांनी वाचण्यासारख आणि मुलांना वाचुन दाखवण्या सारख
बहुतेकांनी वाचल असेलच, नसेल तर अगदी आवर्जुन वाचा आणि आपल्या पिल्लांना वाचुन दाखवा
स्मि मस्त कविता. "तोतोचान"
स्मि मस्त कविता. "तोतोचान" सुरेख पुस्तक आहे.
स्मिते....छान.
स्मिते....छान.
आहे, अशी शाळा आहे. कोणाला
आहे, अशी शाळा आहे. कोणाला माहिती पाहि़जेय. मला संपंर्का.
मस्त कविता काही गंमत गाणी इथे
मस्त कविता
काही गंमत गाणी इथे पहा
अमोल
व्वा छानच असेल ती शाळा छान
व्वा छानच असेल ती शाळा
छान आहे कविता !
छान
छान
मस्त
मस्त
मस्तच!!!!!
मस्तच!!!!!:स्मित:
मस्तच नेहमी सारखी
मस्तच नेहमी सारखी
कविता आणि शाळा दोन्ही मस्त.
कविता आणि शाळा दोन्ही मस्त.
बालकविता छान >>> आणि आपल्या
बालकविता छान
>>> आणि आपल्या पिल्लांना वाचुन दाखवा
माझ्या पिल्लानं १ल्या १०-१५ पानांतच तोत्तोचानला मूर्खात काढायला सुरूवात केली होती. (असं कधी असतं का? शाळेत काय चिमण्यांशी बोलतो का आपण? वगैरे वगैरे) आणि २ दिवसातच त्याला ते पुस्तक वाचून दाखवण्याचा नाद मला सोडून द्यावा लागला होता.