Submitted by नादिशा on 29 September, 2020 - 00:40
वेगवेगळ्या सणांना, दिनविशेषांना मी काढलेल्या ह्या रांगोळ्या आहेत.
ही वरची रांगोळी अक्षय तृतीयेला काढली होती.
ही हनुमान जयंतीला काढली होती.
ही शिवजयंती ला काढली होती.
ही होळीची रंगांची उधळण करणारी रांगोळी.
ही महाशिवरात्री ची रांगोळी.
ही मागच्या वर्षी विजयादशमी दिवशी काढलेली रांगोळी.
ही मागच्या वर्षीची दिवाळी ची रांगोळी.
ही देवदीपावली ची रांगोळी.
ही दत्तजयंती दिवशी रेखाटलेली रांगोळी.
ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढलेली वारली शैलीतील रांगोळी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसंगविषय छान आहेत. संकल्पना
प्रसंगविषय छान आहेत. संकल्पना आवडली. रांगोळीतला रेखीवपणा १०-२०% जमला नाही. आवड आणि सवड असेल तर योग्य प्रशिक्षण जरूर घ्या. हातात कला चांगली आहे. डोक्यातील प्रसंगविषय मस्तच.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रशिक्षण घ्यायची इच्छा जरूर आहे, पण वेळेजवळ घोडे पेंड खाते. दवाखाना, घर, पालकत्व, वाचन, लेखन, पाककला, बागकाम, विणकाम, पुष्परचना, सामाजिक काम या साऱ्यात वेळेचे गणित हौशी कलाकार इतपतच राहिले आहे अजूनपर्यंत दुर्दैवाने. पाहूया, भविष्यात योग आला, तर नक्की शिकेन.
सुंदर
सुंदर
दत्ताच्या चेहर्यातलं डिटेलिंग इतकं छान आहे म्हणजे ड्रॉइंग पण सुंदर असेल.
एकदा या रांगोळीतल्या बेसिक शेप कश्या काढायच्या त्याची माहिती/व्हिडीओही इथे अपलोड करा.युट्युब वर संस्कार भारती बरेच व्हिडीओ मिळतील. पण पर्सनल टच वेगळाच.
सगळ्या रांगोळ्या छान. अगदी
सगळ्या रांगोळ्या छान. अगदी सणांना अनुसरून.
तुमच्या हातातच कला आहे।.....
तुमच्या हातातच कला आहे।.....
थँक्स anu, वर्णिता, लावण्या.
थँक्स anu, वर्णिता, लावण्या.
Anu, मी नक्की विचार करेन तुमच्या सूचनेचा.
सुंदर ! मला बोटात रांगोळी
सुंदर ! मला बोटात रांगोळी पकडून एक सरळ रेघ किंवा किंचीतही कोणता आकार काढता येत नाही त्यामुळे प्रसंगानुरूप अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या आहेत, त्याचं विशेष कौतुक वाटलं.
तुम्ही नक्कीच आर्टिस्ट आहात
धन्यवाद मीरा. हौशी कलाकार आहे
धन्यवाद मीरा. हौशी कलाकार आहे हो मी.