रित्विक - ११ वर्षे
मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचे हेडमास्तर आम्हां सर्व मुलांना शाळेच्या आवारात एक रोपटे लावायला सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावायचे आणि त्या रोपाची जोपासना करायची. हेडमास्तर स्वतः यायचे आणि रोपट्यांचे निरिक्षण करायचे आणि ज्या विद्यार्थाने व्यवस्थित रोपट्याची काळजी घेतलेली असे त्याचे कौतुक प्रार्थनेच्या तासाला सर्वांसमोर केले जायचे. मायबोलीच्या बाल - रोप संवर्धन ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या रोप - संवर्धन उपक्रमाची प्रकर्षाने आठवण झाली.
घराच्या मागील आवारात आम्ही अनेक फळझाडे तसेच फुलझाडे यांची लागवड केली आहे. त्या झाडांच्या देखभाली मध्ये मुलगा आम्हांला नेहमीच मदत करतो. काळ्या आईची मशागत केली तसेच निसर्गावर मनापासून प्रेम केलं तर आपल्या ओटीतलं दान ते माणसांच्या पुढ्यात
भरभरून टाकल्याशिवाय राहत नाही हे सत्य आहे. ह्या बाल- रोप संवर्धन उपक्रमातून मुलाला ह्या साऱ्या गोष्टींची थोडी फार का होईना पण जाणीव व्हावी म्हणून उपक्रमात भाग घेण्यास उद्युक्त केले आणि निश्चितच त्याला ह्या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळेल तसेच निसर्गाप्रती त्याच्या मनात प्रेम निर्माण होईल अशी आशा मनी बाळगते. सदर उपक्रम राबिवल्याबद्दल संयोजक मंडळाला मनपूर्वक धन्यवाद.
मुग, मटकी, चवळी च्या बिया मातीत पेरल्या
मातीच्या गर्भातून बाहेरील जगात डोकावू पाहणारे इवलेसे रोपे..
पावसामुळे सूर्य किरणे न मिळाल्याने काही बियांनी कच खाल्ला.
हिरवी रोपे...
वाढणारी रोपे
अरे वा, छान रोपं आलीयत.
अरे वा, छान रोपं आलीयत. शाब्बास रित्विक.
तुमच्या शाळेतील रोपांचा उपक्रमही स्तुत्य आहे.
वा मस्त वाढलंय. शाब्बास
वा मस्त वाढलंय. शाब्बास रित्विक.
ऑक्टोबर पर्यंत शेंगा पण येतील कदाचित.
@धन्यवाद मानवजी..
@धन्यवाद मानवजी..
खरचं खूप छान उपक्रम होता शाळेचा पण पुढे शाळेचे वर्ग वाढले आणि शाळा वाढवली त्यामुळे आम्ही मुलांनी लावलेली झाडं ही तोडली.
@ धन्यवाद अनुजी..
नंतर मागच्या आवारात नेऊन ठेवायला पाहिजेत म्हणजे रोपे चांगली वाढतील.
छान रित्वीक..
छान रित्वीक..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता तुम्हा सर्वांचे बघून मला पण मुलाला रोप लावायला प्रोत्साहन दिले पाहिजे वाटायला लागले आहे. दोन बाल्कनी आहेत कुंडया ठेवायला.
धन्यवाद मृणाली...
धन्यवाद मृणाली...
मुलाला खरचं प्रोत्साहन दे
मुलाला खरचं प्रोत्साहन दे मृणाली...
खूप छान. तुमच्या घराच्या
खूप छान. तुमच्या घराच्या आसपासचा भाग ही छान हिरवा आहे
खुपच छान! शाब्बास रित्विक..
खुपच छान!
शाब्बास रित्विक..
अरे वा! छान रोपं आली आहेत.
अरे वा! छान रोपं आली आहेत. शाब्बास रित्विक.
धन्यवाद Sparkle, वीरुजी, कविन
धन्यवाद Sparkle - हो, आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे.
धन्यवाद वीरुजी,
धन्यवाद कविन.
शाबास रित्त्विक . छान काम
शाबास रित्त्विक . छान काम केलेस
तुझे नाव सुद्धा छान आहे
धन्यवाद जाई...
धन्यवाद जाई...
बाल शेतकरी
बाल शेतकरी रित्त्विकचे कौतुक. अवजारांची सुद्धा तोंडओळख होईल.
खुप छान. रित्त्विकचं
खुप छान. रित्त्विकचं मनःपूर्वक अभिनंदन!!
धन्यवाद किशोरजी..
धन्यवाद किशोरजी..
धन्यवाद सनव...
खूप छान. तुमच्या घराच्या
खूप छान. तुमच्या घराच्या आसपासचा भाग ही छान हिरवा आहे. शाब्बास रित्विक.
धन्यवाद अस्मिता...
धन्यवाद अस्मिता...
मस्त रित्त्विक, छान रोपं
मस्त रित्त्विक, छान रोपं तरारलित.
शाब्बास रित्विक, छान आहे
शाब्बास रित्विक, छान आहे रोपटे.
धन्यवाद वर्णिता...
धन्यवाद वर्णिता...
धन्यवाद कमला...
छान रित्विक.
छान रित्विक.
मस्त! आज लक्षात आला हा धागा.
मस्त! आज लक्षात आला हा धागा. कुदळवाली पोझ तर मस्तच!
अरे वा!! खूप सुंदर.
अरे वा!! खूप सुंदर.
मनापासून आभार तुमचे अमितव,
मनापासून आभार तुमचे अमितव, सिमंतिनी आणि सामो.
सही, मस्तच. रित्विक शाबासकी
सही, मस्तच. रित्विक शाबासकी.
किती छान परीसर आहे, कुठे राहता तुम्ही, लकी आहात.
वाचलं बोईसर, मस्तच परीसर.
धन्यवाद अन्जू..
धन्यवाद अन्जू..
हो ,बोईसर ला राहते.. अणूविकास वसाहत.
छान..आजूबाजूचा परिसर पण मस्त.
छान..आजूबाजूचा परिसर पण मस्त..!
मस्तच रुपाली.
मस्तच रुपाली.
मेन प्लँट आहे तिथे नवरा जाऊन आला दोन वर्षापुर्वी. हिंदी दिवस होता तेव्हा आमंत्रण होतं त्याला. खूप strict आहे सर्व आणि ते स्वाभाविक आहे म्हणा, मोबाईल वगैरे मेन गेट वर watchman कडे ठेवायला लागतात. पण ह्या निमित्याने त्याला बघायला मिळालं, तिथलं काम समजलं.
हो.. माझे पती नोकरीला आहेत
हो.. माझे पती नोकरीला आहेत मेन प्लांट ला scientific asst. म्हणून . केंद्र सरकारी प्रकल्प असल्याने खूप security आहे. तुमचे पती कॉलनी त आले होते का? की प्लांटमध्ये गेले होते?
खूप छान कार्यक्रम असतात इथे.. तुमच्या पतींना पण अभिनंदन सांगा .. परत येणार असाल तर दोघे पण या.. फक्त मला कळवा..
नाही कॉलनीत नाही, ती दूर
नाही कॉलनीत नाही, ती दूर आहेना तिथून.
त्या प्रकल्पातर्फे हिंदी दिवसानिमित्य, विविध istitute मधल्या लोकांना आमंत्रण होतं. त्यात SBI तर्फे माझा नवरा आणि अजून काही जणांची निवड झालेली.
माझे पती नोकरीला आहेत मेन प्लांट ला scientific asst. म्हणून >>> वाह मस्त.
परत येणार असाल तर दोघे पण या.. फक्त मला कळवा.. >>> धन्यवाद.
Pages