
४ जुड्या कंटोळी (उभी चिरुन, धुवुन)
२ कांदे
१ टोमॅटो
अर्धा चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता
थोडे हिंग
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
ओल खोबर पाव वाटी (खवुन)
२ चमचे तेल
चवि पुरते मिठ
प्रथम तेलात वरील फोडणी घालावी व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. कांदा शिजला की त्यावर आल लसुण वाटणाची पेस्त घालावी. थोड परतून त्यात हिंग, हळद, मसाला घालावा. जरा परतवुन त्यावर चिरलेली कंटोळी घालावीत. परतवुन ही भाजी वाफेवर (झाकणावर पाणी ठेउन) शिजवावी. शिजली की त्यात टोमॅटो चिरुन घालावा, मिठ घालावे. परत थोडावेळ शिजत ठेवावे. आता भाजी शिजली की त्यात ओल खोबर घालून परतवून गॅस बंद करावा.
ह्या भाजीत बटाटा ही घालता येतो. तसच कंटोळी कडधान्यात घालता येतात. आमटीत घालता येतात. पिवळी कंटोळी जुन असतात. जर आतुन लालसर झाली असतील तर घेउ नये.
जागू, आज मला कर्टुली
जागू, आज मला कर्टुली मिळालीयेत. करून बघते आणि इथे लिहिते भाजी बद्दल.
मस्त लागते शांकली ही भाजी,
मस्त लागते शांकली ही भाजी, आणि उद्या फोटो टाक भाजीचा.
आमच्याकडे कटरले म्हणतात.
माझ्या वडीलाना फार आवडते ही
माझ्या वडीलाना फार आवडते ही भाजी. ते पण 'फागलं ' या नावानेच ओळखतात.
जागू, आर्या, भाजी मस्त झाली
जागू, आर्या, भाजी मस्त झाली होती. पण सध्या माझ्याकडे कॅमेरा नाहीये, त्यामुळे फोटो नाही काढता आले.
मी ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केली. ओलं खोबरं,लसूण,मिरच्या आणि कोथिंबीर वाटून बारीक चिरलेल्या कर्टुल्यात घातली आणि वरून कढिलिंब घालून फोडणी दिली. अजून एका वेगळ्या पद्धतीने पण मी ही भाजी करते. फोडणी करून त्यातच बारीक चिरलेली कर्टुली,कोरडं खोबरं,वाटलेला लसूण घालून परतून करते. दोन्ही प्रकाराने भाजी छान होते. ह्यावेळी घरात नेमके टोमॅटो नव्हते. उद्या परवा परत कर्टुली आणून आता तू दिलेल्या पद्धतीनेपण करून बघीन.
शांकली तुला खर वाटेल का मी
शांकली तुला खर वाटेल का मी अजुन ह्यावर्षी कंटोळी आणलीच नाहीत. अग हल्ली बाजारातच जात नाही मी त्यामुळे अशा रानभाज्या आणता येत नाही. कारण त्या मार्केटमध्ये वेगळ्या ठिकाणी बसतात आणि सध्या मिस्टरच मार्केटिंग करतात त्यामुळे त्यांना रानभाज्यांमधल कळत नाही. भाजीवाल्याकडच्या नेहमीच्या भाज्या ते घेऊन येतात.
आता उद्या त्यांच्याबरोबर फेरी मारण्याचा विचार आहे बाजारात. मग घेउन येईन सगळ्या भाज्या.
बाकी सगळ्यांची भाजीची नावे छान आहेत.
कर्टोली / काटली असे कोकण
कर्टोली / काटली असे कोकण भागात म्हणतात या भाजीला...
याची विविध प्रकारे भाजी ची रेसिपी वाचली...
# आमच्या कडे याचे भरीत करतात...
# कर्टोळी कोवळी पाहिजेत...ती कूकर ला लावून वाफवून घ्यावी..दही , साखर ,मीठ मिक्स करून त्याला हिंग जिरे तूप याची फोडणी द्यायची...वरून कोथंबीर ...आणि त्यात वाफवेली कटली, स्मॅश करुन, त्यातली बी काढून टाकावी, या दह्यात मिक्स करावी...सोपी आणि चविष्ट भरीत होते...
काटलि कमी प्रमाणात मिळाली../
काटलि कमी प्रमाणात मिळाली../ आणल्यावर काही खराब झाली असतील / कोवळी नसतील...अश्या वेळी, आपण कूकर ला भात लावतो, त्यात ती घालून भात लावावा...
Pages