स्फुट - आत्महत्या

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 September, 2020 - 13:04

क्षुद्र समजून
पायाखाली आलेली
काळी, निरुपद्रवी मुंगी
जेव्हा तू
हेतुपुरस्सर,
त्वेषाने चिरडतोस

तेव्हा

मुंगीच ओढवणार मरण
गृहीतच धरलेल असत !

मात्र

तुझ्यातील माणुसकीच झालेलं निधन

आकस्मिक ओढवलेल मरण म्हणावं ?

की

आत्महत्या ???

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users