मायबोलीवर असलेली चित्रे/फोटो प्रताधिकारमुक्त किंवा प्रताधिकार मालकाची रीतसर परवानगी घेऊनच प्रकाशीत करावी असे धोरण आहे. गेल्या काही दिवसात अशी चित्रे / फोटो मिळवणे सोपे झाले आहे. इतकच नाही तर या साईटसवर आता खूप चांगल्या प्रतीचे फोटो आहेत. खालील साईटवरचे फोटो प्रताधिकारमुक्त असून कुठल्याही कारणासाठी ( व्यावसायिक सुद्धा) मोफत वापरता येतात. काही फोटो मोफत वापरता येतात पण जिथून फोटो घेतला त्या साईटचे / फोटोग्राफर चे क्रेडीट द्यावे असा नियम असू शकतो. . त्या त्या फोटोखालचे लायसन्स वापरून त्या चित्राचा/फोटोचा वापर करावा. फक्त एका कारणासाठी फोटो वापरता येत नाही. ते म्हणजे तिथलेच फोटो वापरून त्याच साईटची प्रतीस्पर्धी साईट बनवता येत नाही.
हे सगळे फोटो फुकट असले तरी शक्य असेल तिथे फोटोग्राफरचे नाव द्या. त्याने/तिने फोटो तुम्हाला कुठलाही मालकी हक्क न सांगता फुकट उपलब्ध करुन दिले आहेत तर आपण इतके तरी त्यांच्यासाठी करू शकतो.
१. वि़कीपिडिया: विकिपीडिया आणि त्याचा भाऊ विकिमिडिया कॉमन्स इथे हजारो विषयांवर प्रताधिकारमुक्त चित्रे/फोटो उपलब्ध आहेत. आजघडीला विकिमिडियावर 64,181,739 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रताधिकार मुक्त कलाकृती उपलब्ध आहेत.
२. पिक्साबे इथे १८ लाख प्रताधिकार मुक्त फोटो, चित्रे, गाणी, विडियो उपलब्ध आहेत. इथे एक मुख्य काळजी घायची . ती म्हणजे , बर्याचदा सगळ्यात वरच्या रांगेत कधी कधी प्रताधिकार असणार्या (पण पैसे देऊन परवानगी देणार्या) साइटसच्या जाहिराती असतात. तेंव्हा त्या फोटोवर टीचकी मारून ती पिक्साबे च्या बाहेरच्या साईटवर नाहीये आणि प्रताधिकार मुक्त आहे याची खात्री करून घ्यायची.
३. अनस्प्लॅश "सगळ्यांसाठी फोटो" अशी टॅगलाईन असणार्या या वेबसाईटवर लाखो प्रताधिकारमुक्त फोटो आहेत.
४. मायबोली.सीसी मायबोलीकरांनी जगाला देणगी दिलेले , प्रताधिकारमुक्त फोटो.
५. तुम्ही स्वतः काढलेले फोटो: कायदेशीर दृष्ट्या हे प्रताधिकार मुक्त नाहीत आणि मायबोलीवर प्रकाशित केले म्हणून ते प्रताधिकार मुक्त होत नाहीत. आणि त्या फोटोंचा प्रताधिकार तुमच्याचकडे राहतो. पण तुम्हाला ते स्वत:ला वापरायचे असतील , तर दुसर्या कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही.
६. गुगलने नुकतीच प्रताधिकारमुक्त फोटो /चित्रे शोधायची खास सोय केली आहे. पण त्यासाठी योग्य तो पर्याय निवडणे गरजेचे आहे.
आधी "images" निवडा, मग "Tools" निवडा आणि नंतर "usage rights" वर टीचकी मारून "create common license" निवडा. पण एक महत्चाचे म्हणजे या शोधातून दिसणारे सगळे फोटो / चित्रे व्यावसायिक कामासाठी (commercial use) वापरता येतीलच असे नाही. हव्या असणार्या फोटोवर टिचकी मारून License संंबंधी माहिती खात्री करून घ्या.
७. पेक्सेलस् इथे १० लाखाहून अधीक प्रताधिकारमुक्त फोटो आहेत.
८. बर्स्ट इथेही लाखो प्रताधिकारमुक्त फोटो आहेत. पण त्यांचा बिझनेस आयडिया हा एक वेगळा हटके विभाग , नवीन धंदा सुरु करण्यासाठी नवीन नवीन कल्पना सुचवणारा विभाग आहे.
९. फ्री ईमेजेस इथेही लाखो प्रताधिकारमुक्त ईमेजेस आहेत . पण त्यांचे लायसन्स थोडे वेगळे आहे. बहुतेक व्यावसायिक कामासाठी इथली चित्रे वापरता येतात पण लोगो किंवा ट्रेडमार्क्स साठी नाही. त्यांचे लायसन्स चेक करा.
१०. काबूमपिक्स इथेही लाखो प्रताधिकारमुक्त फोटो आहेत. पण यांचे वैशिष्ट्य म्हणजे हवा तो रंग फोटोत असणारेच फोटो शोधता येतात. एकदा शोधलेल्या फोटोला जुळतील असे रंग , ही साईट सुचवते.
११. स्टॉकस्नॅप.आयो इथेही लाखो प्रताधिकारमुक्त फोटो आहेत. सध्या या साईटवर कुठले फोटो ट्रेंडींग आहेत हे ही इथे दिसते. पण इथे जाहिरात युक्त ईमेजेस (ज्या प्रताधिकार मुक्त नाहीत) यांची थोडी सरमिसळ आहे. तेंव्हा त्या ईमेजवर टिचकी मारून ती स्टॉकस्नॅप च्या बाहेर नेत नाही आणि प्रताधिकार मुक्त आहे याची खात्री करून घ्या.
१२. ग्राटीसोग्राफी. नेहमी सारखे प्रताधिकारमुक्त फोटो इथे आहेतच. पण अगदी वेगळी / विनोदी / व्हिमजीकल चित्रे / फोटो यासाठी एक वेगळा विभाग आहे.
१३. न्यूओल्डस्टॉक अगदी जुने ऐतिहासिक प्रताधिकारमुक्त फोटो असलेली साईट
१४. पिकजंबो इथेही लाखो प्रताधिकारमुक्त फोटो आहेत.
१५. पीएक्सफुएल
१६. क्रियेझीला : इथे फोटो नाहीत पण लाखो क्लिपआर्ट, थ्रीडी इमेजेस, व्हेक्टर इमेजेस आहेत.
१७. ग्राफीक बर्गर
१८. सटल पॅटर्नस
१९. अन्ड्रॉ : हजारो प्रताधिकामुक्त चित्रे (इलस्ट्रेशन्स) , व्हेक्टर इमेजेस
२०. फ्लिकर कॉमन्स : फ्लिकर वरचे प्रताधिकामुक्त फोटो
कृपया ईमेज वापरण्या अगोदर, ईमेज बरोबरचे लायसन तपासून पहावे आणि ते तुमच्या कामासाठी योग्य आहे याची खात्री करावी. हा लेख लिहतांना त्या त्या साईटवर असलेल्या माहितीवर आधारीत लिहला आहे. हा लेख म्हणजे कायदेशीर सल्ला समजू नये.
फोटो क्रेडिट : Nicole Saavedra , unsplash
उपयुक्त.
उपयुक्त.
धन्यवाद अजय! Pixabey आणि
धन्यवाद अजय! Pixabey आणि Wikimedia commons वापरले जाते भरपूर.
याशिवाय विज्ञान विषयाशी संबंधित icons साठी thenounproject.com ही साईट खूप छान आहे. PowerPoint 365 मध्ये देखील चांगले icons असतात.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
धन्यवाद जिज्ञासा , मला
धन्यवाद जिज्ञासा , मला thenounproject.com माहित नव्हती, वर यादीत समावेश करतो. PowerPoint 365 बद्दल थोडी माहिती काढायला हवी . सहसा मायक्रोसॉफ्ट त्यांचे प्रोडक्ट सोडून बाहेर त्यांचे icons वापरायची परवानगी देत नाही .
मायबोली .सीसी साइट इथे सुरू
मायबोली .सीसी साइट इथे सुरू झाली तेव्हा ट्रायल म्हणून दोन चार फोटो मी टाकले होते. पण त्यानंतर त्या साइटवरचे अपलोड बॉक्स गायब झाले. तसेच आता त्यावरची चित्रे शोधून वापरायची कशी? तो पर्याय दिसत नाही. १-२-३-४.... अशी पाने शोधायची?
तो प्रोजेक्ट गुंडाळला असं वाटलं. आता इथे उल्लेख झाल्यावर लिंक उघडून पाहिली. काहीच समजत नाही. अपलोड,डाउनलोड,वापर,शोध इत्यादी. ( मी मोबाईलमधून पाहिलं.) ताजमहालचा फोटो उघडला. पण पेज इन्फो त्रोटक आहे. विकिकॉमन्सला पेज इनफो, exif data, resolution पर्याय सर्व असते तसे नाही. साइटची माहिती सुद्धा दिसत नाही.
----------------
विकीकॉमन्सवर तीस चाळीस चित्रे ( शिल्पकला, हळेबिडू) टाकली आहेत. एक पहिला प्रयत्न म्हणून. पण योग्य tags कसे द्यायचे? काही टिप्स? इतरांना शोधता यावे म्हणून?
thenounproject.com यादीत
thenounproject.com यादीत घातलेली पुन्हा काढून टाकली. त्यांच्या लायसन्स प्रमाणे पैसे दिलेत तरच पूर्ण निर्बंध वापर शक्य आहे. फुकट वापरा साठी क्रेडिट देणे आवश्यक आहे (जे वर यादीतल्या बहुतेक साईट ला लागत नाही.)
पाचवा मुद्दा अजून इस्कटून
पाचवा मुद्दा अजून इस्कटून सांगता का? म्हणजे इथल्या सभासदांनी इथे डकविलेल्या फोटोंवर मायबोलीचा हक्क असतो का?
छान माहिती.
छान माहिती.
मायबोली सीसीच्या प्रश्नाचं
मायबोली सीसीच्या प्रश्नाचं उत्तर?
अजय, बरोबर आहे.
अजय, बरोबर आहे. Thenounproject.com ला फुकट वापरासाठी क्रेडिट द्यावे लागते पण तो मजकूर अगदी छोट्या छापात चित्राबरोबरच डाऊनलोड होतो आणि त्याचा तितका अडथळा जाणवत नाही.
Office365 जर कंपनीने दिले असेल अथवा licensed copy असेल तर त्यातील icons वापरता येतात. अर्थात केवळ Microsoft products साठीच.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
नवीन साईट कळल्या,खूपच उपयोगी,
नवीन साईट कळल्या,खूपच उपयोगी, धन्यवाद
उपयुक्त माहिती!
उपयुक्त माहिती!
उपयुक्त माहिती >+1
उपयुक्त माहिती >+1
उपयुक्त माहिती, धन्यवाद.
उपयुक्त माहिती, धन्यवाद.