तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.
आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!
वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.
आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.
चला तर मग.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:
दिवेलागणीचा अहवाल
मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)
कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..
१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.
२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच )
३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. घ्या आणि माझा राग राग करू नका.
४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.
५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.
७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.
९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....
१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.
११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....
१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.
१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.
१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का
१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ?
१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे.
१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)
१८. जेम्स बॉन्ड यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती.
१९. संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका
२०. काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.
२१. मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
धन्यवाद मानव , it was a killer !!
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किल्ली म्हणजे आठव्या घरात
किल्ली म्हणजे आठव्या घरात चंद्र व सूर्य असावेत. डीप असशील नक्कीच.
किल्ली म्हणजे आठव्या घरात
दुकाटाआ (माउसचा प्रॉब्लम आहे राव)
अतुल पाटील 38
अतुल पाटील 38
आमच्याकडे २५ ला ४५ म्हणतात
आमच्याकडे २५ ला ४५ म्हणतात Lol >> मला कधीपासून ३५ पण बेस ६ मध्ये असला पीजे मारायचा होता.
>> अतुल पाटील व्ही बी लहान
>> अतुल पाटील व्ही बी लहान आहे. २५-२६ फार तर.
हे शक्यच नाही (या म्हणण्याला आधार आहे पण मी तो सांगणार नाही इतक्यात)
सामो बिग हग, मी तुम्हाला पण
सामो बिग हग, मी तुम्हाला पण मेल करते, पण इकडे नाही सांगणार
>>>सामो , मी पण अजिबात भोळी
>>>सामो , मी पण अजिबात भोळी नाही.. थोडी लबाडच असेल हवं तर Proud>>>> हाहाहा
>>>सामो , मी पण अजिबात भोळी
दुकाटाआ
अमितव
अमितव
काल तुम्ही माझे कमी केले नाही म्हणून मी आज तुमचे वाढवणार आहे.
अमितव 52
अमितव ३८?
अमितव ३८?
अमितव ३८?
या शिंच्या माउसमुळे मी रजा घेते आहे. कॅरी ऑन मंडळी. वाचनमात्र असेन.
वीरूपाजी - ३८-३९, बुकमार्क
वीरूपाजी - ३८-३९, बुकमार्क स्पर्धेची एन्ट्री नसती पहिली तर अजून कमी लावलं असतं Lol
Submitted by ए_श्रद्धा >> जाऊ द्या, तुमचा पार्टीचा चान्स गेला.
--
म्हाळसाजी धन्यवाद.
--
वीरु - ४४
Submitted by सामो
>> नाही ओ सामोताई.
--
वीरू 34
Submitted by मी_अस्मिता >> पार्टीला या आठवणीने.
पिकल्या पानाचा देठ की हो
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा गाणं म्हणतो मी! हाकानाका
३४ ला खुदूखुदू
३४ ला खुदूखुदू
४४ हे काय बाहूली
तर रेंज गवसली आहे....
कुठल्या प्रांतातले हो तुम्ही?
कुठल्या प्रांतातले हो तुम्ही?
25 म्हणजे 30
45 म्हणजे 25
भारीच आहे कि Lol >>>> हो ना मृणाली कशाले काय म्हनू नइ ,त्याचं नवीनच प्रमाण सूरू केलं अतुल पाटलांनी
व्हिबी मी तुझं वय ओळखलं का बरोबर २ पानावर लिहीलय ३१.
आणि किल्ली साडे ३०
सामो, एक प्रतिसाद २२ वेळा
सामो, एक प्रतिसाद २२ वेळा येऊ शकतो तर तुमचा दोनदा आला तर काय होते , येऊ द्या तुमचे प्रतिसाद
>> मला कधीपासून ३५ पण बेस ६
>> मला कधीपासून ३५ पण बेस ६ मध्ये असला पीजे मारायचा होता. Lol
>> Submitted by अमितव on 15 September, 2020 - 18:56
ज्जे ब्बात
वीरू - मला बी येऊ द्या की .
वीरू - मला बी येऊ द्या की . तसं पण इथलं वय Negotiable असतंय .
धनुडी, नाही
धनुडी, नाही
अतुल तुमचा दुसराही अंदाज चुकलाय
पोरांच्या बुकमार्क मुळे घात
पोरांच्या बुकमार्क मुळे घात झालायं , बऱ्याच जणांचा
>> अतुल पाटील 38
>> अतुल पाटील 38
>> Submitted by मी_अस्मिता on 15 September, 2020 - 18:55
माझे फोटोतले वय अगदी अचूक ओळखलेत __/\__
हो का ? म्हणजे 42 ?
हो का ?
म्हणजे 42 ?
माझा फोटो लेटेस्ट होता हो , म्हणून वाटलं
<<<मीन फार अध्यात्मिक रास आहे
<<<मीन फार अध्यात्मिक रास आहे. समर्पण, संपूर्ण शरणागती, जल तत्होतेपरमात्म्यात, भक्तीत, पूर्ण विलीन होते. पण भोळसट असतात असे ऐकून आहे. >>>
सामो, मी मीन राशीचा..
लोकहो ते 80 मी सदस्यनामसाठी
लोकहो ते 80 मी सदस्यनामसाठी म्हणून घेतलं होतं फक्त.
पिन्कि तुम्ही 24- 25
पिन्कि तुम्ही 24- 25
>>>लोकहो ते 80 मी
>>>लोकहो ते 80 मी सदस्यनामसाठी म्हणून घेतलं होतं फक्त.>>> हाहाहा पण तुम्ही ८० सालातल्या असाल हो ना?
>>>लोकहो ते 80 मी
दुकाटाआ
>>>सामो, मी मीन राशीचा..>>>
>>>सामो, मी मीन राशीचा..>>> ज्जे बात!
मी अस्मिता आणि म्हाळसा - 37
मी अस्मिता आणि म्हाळसा - 37 किंवा 38
मृणाल - 35
श्रवू आणि किल्ली - 28
मला टॅब करत फक्त कीपॅड वापरुन
मला टॅब करत फक्त कीपॅड वापरुन सिंगल कमेंट देता येतेय. युहु!! नो दुकाटाआ
Pages