लॉकडाऊनकाळात अमेझॉन / नेटफ्लिक्सवरील काही मालिका पाहून झाल्या. त्यापैकी काही आवडल्या. तर अश्याच एका आवडलेल्या मालिकेबद्द्ल काही लिहिलेले..
......................................................................................................................................................................................................................
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीमुळे आणि शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमुळे ज्यूबद्दलच कुतूहल आहेच . मोठ्या प्रमाणात नरसंहार होऊनही चिवटपणे जगत राहण्याच्या त्यांच्या कृतीच कौतुक वाटत.. याच ज्यूंच्या घेत्तोतील पोलादी पडद्याआड असलेल्या जगाची झलक दाखवायच काम Unorthodox नावाची नेटफ्लिक्सवरील सिरीज करते.
ब्रूकलिन नावाच्या अमेरिकेतील शहरात नवीन लग्न झालेली एस्टी शापिरो नावाची ज्यूईश तरुणी आपल्या नवऱ्याबरोबर राहतेय. चालरीतीप्रमाणे चारचौघीसारख लग्न झालेलं. नव्या नवलाईचा भर ओसरून गेल्यावर सगळेच बाळाच्या प्रतिक्षेत ( हम्मम ! Sounds familiar know ) .स्त्रियांना मखरात बसवून त्यांच्याकडून कौटुंबिक , प्रजोत्पादनाची काम करवून घेणं हा जगभरातील तमाम धर्माचा एकमतीय अलिखित नियम . एस्टीची सटमार हासिडीक कम्युनिटीही त्याला अपवाद नाही. किंबहुना दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या ज्यू नरसंहारानंतर 'योग्य वयात लग्न होऊन मुलं जन्माला घातलीच पाहिजेत ' च हमरिंग सतत कम्युनिटीतिल मुलींवर केलं जातंय आणि त्याही त्या योग्य आहेत असच मानत आहेत.जोडीला Husband is King च पालुपद आहेच. एस्टीही त्याला अपवाद नाही.. त्यामुळे अर्ध्या वाटेवर संसार मोडून गेलेल्या आईला ती स्वतःच्या वडिलांच्या व्यसनाधीनतेच कारण ठरवते ते ही आईची बाजू ऐकून न घेताच.
याअतिपुराणमतवादी असलेल्या सटमार हासिडीक कम्युनिटीत दुहेरी आयुष्य जगत असलेल्या एस्टीची कुंचबून जगण्याची धडपड चालूच आहे. एकीकडे स्वतःला समाजाच्या आदर्श पत्नीच्या व्याख्येत फिट बसवायच आहे तर दुसरीकडे भाडेकरूकडे असलेल्या पियानोचे स्वरही खुणावत आहेत अश्या कात्रीत एस्टी सापडते . बर समाजाचा कट्टरपणा इतका की कोणालाही साधं यू ट्यूब बघण्याची देखील परवानगी नाही . ते ही अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही . कोशर सर्टिफिकेट असलेलं अन्न , घेत्तोत राहून आपल्या परंपरा जपण्याचा असलेल्या दुराभिमानाने व्यक्तीस्वातंत्र्य नावाच्या मूल्याला कधीच केराची टोपली दाखवलेली आहे. धनाढ्य सासर , नवरा असूनही एस्टी खुश नाही (इकडच्या भाषेत खायला प्यायला ल्यायला बेसुमार असूनही सुख बोचतेय ही गत ) . कुठेतरी काही कमी आहे , आपली ओळख स्वतःलाच झालेली नाही अस तिला सारख वाटत . त्यात सासू आणि नवऱ्याच्या त्याचबरोबर उरलेल्या समाजाचा मुलं होण्यासाठीचा दबाव आहेच . शेवटी हा ताण असह्य होऊन काही साठवलेले पैसे घेऊन एस्टी शापिरो पळून जायचं ठरवते आणि ते प्रत्यक्षात आणते . मात्र ती पळून जाते ज्यूच्या इतिहासात खलनायक असलेल्या जर्मनीत ! तिचा समाज सहजासहजी तिचं पळून जाण स्वीकारत नाही . तिच्या नवऱ्याला परत आणायच्या कामगिरीवर पाठवलं जातं ..या प्रवासात तिची तिला नव्याने ओळख होतेच . पण स्वतःच्या मर्यादांची , न कळत स्वतःही फॉलो करत असलेल्या ज्यूंच्या कट्टर तेचीही जाणीव होते. एस्टीच्या या जाणीव नेणिवेचा प्रवास म्हणजे Unorthodox ..
समाजात होत असलेल्या घुसमटीतून पळून जाणं इतपत या मालिकेची ढोबळ स्टोरीलाईन नक्कीच नाही. या प्रवासात एस्टीच्या स्वतःच्या समजुतीना हादरे बसतात .उदाहरणार्थ जर्मनीत गेलेल्या एस्टीला तिचा नव्याने ओळख झालेला मित्र समुद्रापल्याड असलेला एक बंगला दाखवतो . तो तोच बंगला असतो जिथ नाझीच्या बैठका होऊन हॉलोकास्टला आकार दिला जातो . तो बंगला बघून एस्टी हादरते . आपल्या मारल्या गेलेल्या नातेवाईकांची आठवण होऊन तिच्या अंगावर शहारे येतात . पण तरीही ती पाऊल पुढे टाकते . त्या समुद्रात स्वतःला झोकून देतेच पण ज्यूईश परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर टक्कल करून चढवलेला तिचा केसांचा विगही फेकून देते . ह्या मुक्ततेचे बंध मग एस्टीला इस्त्रायलमध्ये वाढलेल्या एमिलीच्या ' अजून किती दिवस हॉलोकास्टमध्ये रमणार आहोत, कुरवाळत बसणार आहोत ' या प्रश्नाला उत्तर देताना विचार करायला बळ देतात .
मात्र एस्टी ही एक हाडांमासांची बाई आहे. लहानपणापासून झालेले ज्यूईश संस्कार इतक्या सहजपणे मोडायला ती धजावत नाही . त्यामुळे गरोदर आहे कळल्यावर ती अबोर्शनचा पर्याय नाकारते. मुळाना हादरे बसत असतानाच तिला त्यातलं जुनं सगळंच टाकून द्यायचं नाहीये पण नवीनही स्वीकारायच आहे. हा तिचा प्रवास अत्यन्त तरलतेने दाखवला आहे. एस्टीचे पहिल्यांदाच जीन्स घालतानाचे , लिपस्टिक लावायचे , क्लबात जायचे प्रासंगिक तुकडे स्क्रीनवर देखणे ठरलेत ते यामुळेच.. स्वतःच्या मर्यादित असलेल्या अक्षर ओळखीचं , कचकड्याच्या श्रीमंतीचं बाहेरील उघड्या जगात फार स्थान नाही , स्वतःचा मार्ग स्वतःलाच शोधावं लागेल हे एस्टीच आत्मभानही पडद्यावर सुरेखरित्या उतरलय.
कथेप्रमाणेच दाद द्यायला हवी ती कथेच्या सादरीकरणला . अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीच केलेलं डिटेलिंग व्हॅल्यू ऍडीशन करतं. सिरीजमध्ये दाखवलेली shtreimels (fur hats), payots (side locks) ते हासिडीक ज्यूंची स्पेशलाईज्ड घर बघून दिग्दर्शक , निर्माते यांच्या मेहनतीला १०० टक्के मार्क्स द्यायलाच हवेत . अगदी ज्यूंच लग्न , त्यांच्या अंग घुमवत म्हणलेल्या प्रार्थनाही साग्रसंगीतपणे दाखवल्यात. उच्च निर्मितीमूल्ये असलेली ही मालिका त्यामुळेच प्रेक्षणीय बनते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या मालिकेच्या निर्मात्या ,दिग्दर्शक , पटकथालेखक , वेशभूषा संकल्पक सगळ्या स्त्रियाच आहे. त्यामुळेच की काय एक नजाकतीदार अनुभव पाहायला मिळतो
शेवट काहीसा अपेक्षित असला तरीही तो घिसापिटा होत नाही तो सादरीकरणामुळेच . सर्वच कलाकारांची कामे उल्लेखनीय आहेत . विशेष उल्लेख करायला हवा तो एस्टीची भूमिका केलेल्या Shira Haas हिचा . काहीवेळेला संवादापेक्षा तिचे डोळे बोलतात . ते इतकं प्रभावीपणे तिने केलेय की आताच्या आत जाऊन तिला एक घट्ट मिठी मारावी अस वाटू लागतं. आपण पळून का आलो याच कारण सांगतानाचा “God expected too much of me. Now I need to find my own path.” तिचा मुद्राभिनय अतिशय सुरेख . सहकलाकारांनीही उत्तम साथ दिलेली आहे . तिच्या नवऱ्याची भूमिका केलेल्या amit rakavh या अभिनेत्यानी बायकोला साथ तर द्यायचीये पण समाजाला पण फॉलो करायचंय ही द्विधा भूमिका पडद्यावर उत्तमरित्या साकारलीये.
एकंदरीत चिरपरिचित नसलेल्या ज्यूंच्या आयुष्याचे अपरिचित तुकडे या मालिकेत पाहायला मिळतात . प्रगत असूनही हा समाज परंपरांना इतका घट्टपणे चिकटून आहे ते ही व्यक्तीस्वातंत्रांचा , स्त्रियांच्या भावनांचा बळी देऊन . ते पाहून तुलनेने अप्रगत असलेल्या इतर मानवी समाजात इतकी कट्टरता , इतका अन्याय का याच उत्तर सापडू लागत . नकळतपणे आतून हलायला होतं..तर एक देखणी तरीही आतून अस्वस्थ करणारी ही मालिका मस्ट वॉच कॅटेगरीत टाकायलाच हवी.. ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहता येईल .
वाह जाई , खुपच सुंदर परिक्षण
वाह जाई , खुपच सुंदर परिक्षण , माझ्या अनआॅर्थोडाॅक्स स्वभावाशी रीलेट करु शकले म्हणुन जास्तच आवडले , मलाही पियानोची आवड आहे आणि जर्मनीलाच जायचंय. ही नायिका मला माझ्यासारखीच व्यक्तिस्वात्र्याला प्राधान्य देणारी वाटली.
छान लिहिलय..
छान लिहिलय..
उत्कंठावर्धक परीक्षण. बघितलीच
उत्कंठावर्धक परीक्षण. बघितलीच पाहिजे. प्राईमवर आहे की नेटफ्लिक्सवर?
कविता , मृणाली , माझे मन
कविता , मृणाली , माझे मन धन्यवाद .
मालिका नेटफ्लिक्सवर आहे . लिहिते तस वर.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मस्त ओळख.
मस्त ओळख.
पाहिली आहे. छान आहे. ह्यात
पाहिली आहे. छान आहे. ह्यात जशी ज्युईश लोकं दाखवली आहेत तशी आजही आहेत अस्तित्वात. उदा- ती लग्नाआधी ज्या मिकवात जाते तसा माझ्या घरापासून ५ मिनिटांवर आहे.
बघायला हवी
बघायला हवी
बघतो.
बघतो.
मस्त ओळख.
मस्त ओळख.
छान ओळखं, स्वतंत्र बुद्धी
छान ओळखं, स्वतंत्र बुद्धी असलेल्या अशा नायिका आवडतातच त्यामुळे आवडणार हे . धन्यवाद. (अवांतर/समांतर याच कारणामुळे मी रविंद्रनाथ टागोरांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचते/ बघते. )
छान माहिती!
छान माहिती!
छान माहीती.
छान माहीती.
छान ओळख.
छान ओळख.
नेटफ्लिक्स सध्या बंद आहे, अजून कुठे ही मालिका आहे का शोधतो.
किती छान लिहीलय, काल शोधली ही
किती छान लिहीलय, काल शोधली ही मालिका. बघेन नक्की. थँक्यू
वावे, ललिता , सायो , विनिता ,
वावे, ललिता , सायो , विनिता , अमित , कुमार ,अस्मिता , फारएन्ड , आसा, मानव , धनुडी धन्यवाद .
जरूर बघा आणि कसे वाटले ते कळवा .
Thanks for your review. then
Thanks for your review. then I watched in one day. best series.
छान परीक्षण!
छान परीक्षण!
वैशाली , सनव धन्यवाद
वैशाली , सनव धन्यवाद
वैशाली , सिरीज आवडली बघून छान वाटले .
या मालिकेला यावर्षीचा Emmy Outstanding Directing for a Limited Series, Movie or Dramatic Special पुरस्कार मिळाला आहे
खूपच आवडली मालिका. छान
खूपच आवडली मालिका. छान सुचवल्या बद्दल धन्यवाद. नायिकेचा अभिनय उच्चतम आहे.
मस्त ओळख. बघते. काहीतरी
मस्त ओळख. बघते. काहीतरी चांगलं शोधत होतेच बघण्यासाठी.
थँक्यू जाई , Esty शी ओळख करून
थँक्यू जाई , Esty शी ओळख करून दिल्या बद्दल. आवडली पण लगेचच संपली
धन्यवाद ओळख करून दिल्या बद्दल
धन्यवाद ओळख करून दिल्या बद्दल. आवडली मालिका, एका दिवसात पाहून संपवली.
बघितली आणि एकदम आवडली. शेवट
बघितली आणि एकदम आवडली. शेवट जरा आणखी परिणामकारक वठायला हवा होता असं वाटलं. पहिले तीन भाग बघून झोपल्यावर तो विषय डोक्यात रहातो पण शेवटचा एपिसोड झाल्यावर असं फिलिंग आलं नाही. कदाचित परत विल्यम्स बर्गची व्हिज्युअल दाखवायला हवी होती... किंवा काय माहीत नाही.
इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख करून दिल्याबद्दल आभार!एक
ओळख करून दिल्याबद्दल आभार!एक मुद्दा खटकला: गरोदर व्हायचं नसत अन परंपरांचा जोखड झुगारायला ती जर्मनीला पळते, अन तिकडे जाऊन गरोदर होते
म्हणजे थोडक्यात स्वैर आचार?
तुम्ही बघा आणि मग लिहा रॉनी!
तुम्ही बघा आणि मग लिहा रॉनी!
आणि स्त्री ने स्वतःच्या मनाप्रमाणे (आणि समाजाच्या मना विरुद्ध) वागण्याला स्वैराचार म्हणण्याची प्रथा काही नवीन नाहीच.
रॉनी , मला वाटत तुम्ही सिरीज
रॉनी , मला वाटत तुम्ही सिरीज बघावी. म्हणजे तुम्हाला गरोदरपणाची टाइमलाईन समजेल.
तरीपण तुमच्या माहितीसाठी : एस्टी शापिरोला आपण गरोदर आहोत हे ब्रूक्लिनमध्येच समजत. आणि ते ती तिच्या नवऱ्याला सांगायला जाते. तर तिचा नवरा तिचं काहीही ऐकून न घेता घटस्फोट देणार अस सांगतो. त्यानंतर एस्टी बाहेर पडते.
आता ठरवा कोणाचा स्वैराचार ते ! बाकी सिरीज न बघता स्वैराचार वगैरे म्हणणे म्हणजे धाडसाचे काम
अमित, हो! शेवट जरा टिपिकल आहे. पण ही सत्यकथा असल्याने इतर वेगळा शेवट दाखवायचा तसा काही पर्याय नव्हता.
भाग्यश्री , रचना, श्रद्धा
भाग्यश्री , रचना, श्रद्धा सिरीज आवडली हे वाचून छान वाटले.
सुमुक्ता , जरूर बघ सिरीज
नाही नाही, शेवट आहे तो छान
नाही नाही, शेवट आहे तो छान आहे दुसरा काही योग्य ठरलाच नसता. फक्त त्याचा परिणाम मनावर ठसवायला थोडी कमी पडली वाटलं.
हो , हे ही मान्यच
हो , हे ही मान्यच