तुम्हास कुठल्या माबो आयडीधारकाचे वय किती आहे असे वाटते? गेस करा पाहू.
आपल्याला कल्पना येईल आपल्याला लोक किती तरुण किंवा किती वयस्क समजतात ते!
वय गेस करतान तेवढे वय का वाटते, हे लिहिणे ऑप्शनल आहे.
आणि हे सर्व खेळमेळीनेच घ्याल यात शंका नाही.
चला तर मग.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धाग्यावर आलेल्या प्रतिसादांचा सखोल अभ्यास करुन त्यावर चिंतन करुन मी_अस्मिता यांनी हा "वय धोरण अहवाल" सादर केला:
दिवेलागणीचा अहवाल
मायबोलीकर आयडींचा सही पकडे है का नक्कीच .... वय धोरण अहवाल
धोरणाचाच अहवाल कारण वयाबाबत अजूनही खात्री नाही ( काही प्रामाणिक लोकं सोडून)
कोणे ऐकेकाळी ( तीन दिवसांपूर्वी ) मानवकाका यांना स्वतःचे वय अवघे त्रेपण असूनही वय २२ ते ५२ मधले मायबोलीकर ताई दादा यांनी काका काका केल्याने मनाला अतिशय उद्विग्नता येऊन त्यांनी हा धागा काढून काय तो सोक्षमोक्ष करायचा ठरवला पण हे गुपित गुपितच राहू द्यायचे असल्याने वरवर ' विरंगुळा' नाव दिले. पण अंतस्थ हेतू मला कळलाच .... दिवे घ्या मानव दादा ..
१. सगळ्या मंडळींना सुशांत केस चा घोर कंटाळा व गणेशोत्सव नंतर आलेला रिकामपणा यामुळे आयते कोलीत मिळाले.
२. तायाबायांना तर हळदीकुंकू टाईप मजा आली तेही पार्लरचा खर्च वाचून म्हणून त्यांचा पाय निघता निघेना. ( मीही यातच )
३. जेम्स बॉन्ड दादा केवळ आयडी प्रमाणे सत्यान्वेशी वाटले बाकी सगळ्यांना फक्त खेळून मजा घ्यायची होती. घ्या आणि माझा राग राग करू नका.
४. मानव दादांनी सहजासहजी उत्तर सांगितले असते तर गुपित उघड झाले असते म्हणून आपणही खेळतच आहोत असेच दाखवत तिनशे प्रतिसादापर्यंत कळ काढली.
५. इथून पुढे वचपा म्हणून जे अध्यात्मिक लिहीत नाहीत त्यांच्या वयात मी +१० भर घालणारे.
६. बऱ्याच जणांनी मिळतंय तर पदरात पाडून घ्या या विचाराने त्यातल्या त्यात बरे वय माझे असे सांगितले.
७. उघड उघड भ्रष्टाचार झालेला म्या पाहिला यासाठी चोकलेट व पार्टी ट्रीट याची लालूच दाखवण्यात आली. व न जमल्यास चोकलेट परत घेतले, पार्टी आहे समजून आलेल्यांच्या तोंडावर दार बंद करण्यात आले.
८. काही तायाबायांना चिकणी चमेली ते 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ' हा जीवनप्रवास क्षणात पहायला मिळाला.
९. काही दादालोकांना कुणीकडून पोटच्या गोळ्या कडून बुकमार्क करून घेतला असे झाले कारण क्षणात त्यांचाही रणबीर कपूर चा जन्माचा अलोक नाथ झाला.
माझेही तसेच पोराने एवढे घाण हस्तलेखन केले आहे तिकडे तर नंबर येणारच नाही पण इकडे ही स्वेच्छा निव्रुत्ती घ्यावी लागली. किती ती लुज लुज सिच्युएशन ....
१०. इथे च माझे आणि अमितव यांचे एकाच वेळेस मैत्री/शत्रुत्व झाले . त्यांना मी सदतीस वेळा अडतीस म्हणूनही माझ्या वयाबाबत ४५+ वर अडून बसले. वर घासाघीस करायला तयार होईनात दादा , मगं मी अन्जुताई आणि VB यांच्या रिक्षात बसले. त्यांनाही मंजुताई यांची सवारी मिळाली.
याचा बदला म्हणून मी त्यांना बावन केले तर 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ' म्हणू लागले ...पण नाही भजन वदवून घेतले तर नावाची .... नाही.
११. संशोधक अतिशय लहान निघाले. इतक्या लहानपणी संशोधन केल्याबद्दल अभिनंदन , पाहिलं नं कसं आहे जग ....
१२. बऱ्याच जणांनी खरीखुरी उत्तरे दिली त्यांचे ही कौतुक.
१३. बऱ्याच जणांनी विपू खणून जुने संदर्भ आठवून उणे दुणे काढले. हा भोचकपणा आहे की उत्तम स्मरणशक्ती मलाही कळत नाही.. मीही त्यातलीच.
१४. एकुणच मला आम्ही जातो डिस्कोला तुम्ही जा काठी घ्यायला ही व्रुत्ती दिसल्याने अत्यंत खेद वगैरे काही झाला नाही. एवढ्या तेवढ्यात खेद होणारे सशाचे काळीज घेऊन मायबोलीवर इतकी वर्ष जिवंत रहाता तरी येईल का
१५. मी खरोखरच तरुण असूनही मी ज्यांना साथ दिली त्यांनी मला वार्धक्य दिले , हे लक्षात ठेवू का ?
१६. काही लोकं आपल्या वयाचा अदांज इतरांना येतोय हे लक्षात यायला लागले की गायब होऊन इकडे तिकडे हिंडून परत येऊन कमी झाले आहे का याची वाट बघत , कळ सोसायचे मगं कमी झाले की आत्ताच तर आलो दाखवायचे.
१७. बऱ्याच जणांनी आपले वय मूळ वयाच्या जितके वजा तितके खूष होऊन दाखवले. पण हा आनंद निखळ निर्मळ वगैरे नसून विकृतीची छटा असलेला 'मोगँबो खूष हुवा' सारखा होता हे मला लगेच लक्षात आले , पण नव्या मित्र मैत्रीणींसाठी कुठे अँसिडमध्ये उडी घ्या म्हणून मी त्यांच्या कलाकलाने घेतले. एकिकडे पार्टी व दुसरीकडे अँसिड असताना कुणीही गरीब व्यक्ती काय निवडणार !! (मी यातच पण दोन्हीबाजूने)
१८. जेम्स बॉन्ड यांनी वारंवार सत्याची आठवण करून दिली त्यासाठी त्यांनी sarcasm असणारे बरेच प्रतिसाद दिले पण सत्य हवं होतं कुणाला उलट सत्याचे बिंग/बिंगो फुटू नये म्हणून तर कसरत चालली होती.
१९. संशोधक आणि इतर तान्ह्या आयडींना बघून मला " ये किसका बच्चा है भई झाले " पण बाळ"कडू" घेण्यासाठी मायबोलीही योग्य जागा आहे हे आठवून मी शांत झाले. मी त्यांना तेहतीस म्हणाले तर त्यांनी काळानिळा इमोजी पाठवला , या तेहतीस आकड्यावर इथे किती लोक पार्टी देत आहेत हा सकारात्मक दृष्टिकोण ठेव , बाळ संशोधका
२०. काही मित्र आयडींच्या अपेक्षेपेक्षा अधिक वयामुळे मला मानसिक धक्का पोचला आहे पण काही आयडी लहान निघाल्याने त्याही बाजूने धक्का बसल्याने मी कुठेही पडले नाही.
२१. मानवदादा यांना 'काका काका' म्हणून ते खरंच कुणाचे काकबळी होते व त्यांना नक्की कुणी 'मामा' बनवले आहे हे कळले असेलच...
एकुणच 'काका मला वाचवा' नंतर 'काका (शब्दापासून) मला वाचवा ' याने इतिहासाची पुनरावृत्ती होते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
धन्यवाद मानव , it was a killer !!
Submitted by मी_अस्मिता on 16 September, 2020 - 20:40
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कटप्पा प्रोफाइल फोटोवरून वय
कटप्पा प्रोफाइल फोटोवरून वय सांगत असाल तर फोटोतले वय अचूक. पण तो बराच जुना फोटो आहे.
कटप्पा ३६
कटप्पा ३६
कटप्पा - ३८
कटप्पा - ३८
कटप्पा 36
कटप्पा 36
आता कुणी अध्यात्मिक लिहिणं
आता कुणी अध्यात्मिक लिहिणं बंद करेल
कुणी सल्ले देणं बंद करेल >>> नक्की???
कटप्पा 38
धनुडी सेम पिंच
धनुडी सेम पिंच
कटप्पा इतके मोठे नसावेत.
कटप्पा इतके मोठे नसावेत. लिहिण्यावरुन ३० असतील वाटतं.
आणि आम्ही 40-45 काय???
आणि आम्ही 40-45 काय???
कटप्पा 31-
कटप्पा 31-
मागच्या वर्षी धागा आला होता त्यांचा.. तिशीनंतर घ्यायची काळजी 30 +1 =31 ...
बरुबर का
च्रप्स - ५०
च्रप्स - ५०
सामो 40
सामो 40
सगळेजण एकमेकांच उट्ट काढताएत
सगळेजण एकमेकांच उट्ट काढताएत ४०, ५०
लिहीण्यावरून वय काय , म्हणून
लिहीण्यावरून वय काय , म्हणून माझा घात झाला
धनुडी
(No subject)
बघा जमलं का
बघा जमलं का
कटप्पा 32
अमितव 38
Mrinali 36
मानव 60
धनुडी 48
सामो 49
वर्णिता 48
VB 30
Bond 28
संशोधक 33
च्रप्स 42
नाही गं वर्णिता ४८ कै च्या कै
नाही गं वर्णिता ४८ कै च्या कै वाटतय.
माझं चुकलय.
मानव ६०???? नो!!
माझ्या बाबतीत चुकले की हो,
माझ्या बाबतीत चुकले की हो, आधीचेच जरा बरोबर होते.
मला वाटायचे लिहीण्यावरून फक्त
मला वाटायचे लिहीण्यावरून फक्त बौध्दिक वय दिसते
नेमकी स्तुती आहे की अवहेलना
Mrunali 34
Mrunali 34
आधीच्या यादीत लोकं खूष होते
आधीच्या यादीत लोकं खूष होते तिच योग्य समजावी
घासाघीस चालल्याने धागा सहस्त्रक पार करणार....
(No subject)
बरोबर आले का , व्वा
बरोबर आले का , व्वा
तेरी भी चुप मेरी भी चुप। मोड on
सामो यांचे वय ६० चुकीचे वाटत
सामो यांचे वय ६० चुकीचे वाटत आहे..
माझ्या मते ५५ - ५८ वाटते...
जाऊ द्या हो वयात काय ठेवलंय.
जाऊ द्या हो वयात काय ठेवलंय.
पण मजा आली गेस करताना.
वय क्कॉय शेवटी मानण्यावर असतं
वय क्कॉय शेवटी मानण्यावर असतं हो!!- असे मानून सुखी होण्याच्या पंक्तीत मी आहे आता.
मानव ६०?
मानव ६०?
आयला माझं वय साठ कोण बोललं?
आयला माझं वय साठ कोण बोललं? मी नाही वाचलं
आयला माझं वय साठ कोण बोललं?
दुकाटाआ
जाऊ द्या हो वयात काय ठेवलंय.
जाऊ द्या हो वयात काय ठेवलंय.
पण मजा आली गेस करताना....+1
मजा आली खेळायला..
मजा आली खेळायला..
धन्यवाद मानव... आणि सहभागी माबोकर.
Pages