साधारण चारपाच वर्षांपूर्वीचा किस्सा. मित्रासोबत एका बॅंकेत गेलो होतो. मित्राचेच काम होते. मला त्यातले कळते, असे त्याला उगाचच वाटत असल्याने मला सोबत म्हणून नेले होते. पण माझे आपले अवांतर निरीक्षण चालू होते. सहज नजर एका मुलीवर पडली. अडकली. ओळखीची वाटली. नजरानजर होताच तिच्याही चेहरयावर ओळखीचे भाव आले. पण नेमके कुठली ओळख ते आठवेनासे झाले. अश्यात अनोळखी मुलीकडे बघून हसायचे तरी कसे. कसेबसे चेहरयावर आलेले ओळखीचे भाव आवरले आणि वोह कौन थी? हे आठवू लागलो. अगदी बालवाडीपासून शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, मित्र, नातेवाईक, शेजारपाजार, ऑर्कुट, फेसबूक ते व्हॉटसपग्रूप ईतक्या ठिकाणी आपण ओळखी बनवत वावरलो असतो की यातून एखादा ओळखीचा चेहरा नेमका कुठला हे आठवणे अवघडच. पण चेहरा गोड होता, त्यामुळे डोक्याला ताण द्यायचा नाद सुटतही नव्हता. ती मुलगीही बहुधा याच प्रयत्नात होती. पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघून अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होती. पण माझे बॅडलक ईतके खराब की तिलाही मी कोण हे आठवत नव्हते.
ईतक्यात मित्राचे नाव पुकारले गेले. त्याने माझ्या हातात एक कागद आणि पेन कोंबले. रुनम्या हे एवढे अॅप्लिकेशन लिही जरा, मी आलोच तेवढ्यात, असे म्हणून स्वत: पळाला. झाली बोंब. ती सुद्धा दुहेरी. एकीकडे ईंग्लिश दुसरीकडे हस्ताक्षर. तिसरीकडे ती मुलगी, जिचा विचार आता बॅकफूटला गेला होता. डीअर सर मॅडम रिस्पेक्टेड पर्सन टू हूमसोएवर ईट मे कन्सर्रन.. मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती. जे वाक्य चांगले तयार होत होते ते विसरायच्या आधी पटापट लिहीत होतो. ईतक्यात कोणीतरी पाठीमागून डोकावतेय असे वाटले. मागे वळून पाहणार तोच पाठीवर थाप पडली..,
"अरे ऋन्मेऽऽष गधड्या ओळखलेस का?.."
तीच मुलगी. आता बहुधा तिला माझी ओळख पटली होती. पण कशी?
तसे तिने मी लिहीत असलेल्या कागदाच्या चिटोरयाकडे बोट दाखवले. मी गोंधळून गेलो, त्यावर मी माझे नावही लिहीले नव्हते, मुळात ते लेटरच मी मित्राच्या वतीने लिहीत होतो. त्यावरून कसे ओळखले??
तर अक्षर...!
"अक्षर गधड्या, आजही तसेच आहे. मेल्या माझा सोमवार बुडला तुझे हे कोंबडीचे पाय बघून.. (फिदीफिदी)"
"आठवतेय तुला, बाई तुझी वही वर्गात फिरवायच्या, ‘अक्षर कसे नसावे’ हे आम्हाला दाखवायला. त्यामुळेच ते पक्के लक्षात राहिले. आणि मग आमच्याकडे वही आली की आम्हीही तुझी फिरकी घ्यायला मुद्दाम ते वेडेवाकडे वाचायचो. कसली धम्माल होती ती.."
आता मलाही ती आठवली. ती माझी ईयत्ता चौथीतली मैत्रीण होती. फेसबूकवर अॅड होती, पण ती फेसबूक फारसे वापरायची नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पाहिल्यावर चेहरयाने ओळखणे दोघांनाही अवघड गेले. आज मात्र ईतक्या वर्षांनीही माझे अक्षर पाहून तिला माझी खात्रीपूर्वक ओळख पटली होती.
नुकतेच काही दिवसांपूर्वी जागतिक हस्ताक्षरदिन होता. सुंदर हस्ताक्षर जमणारे फेसबूक व्हॉटसपवर आपले स्वलिखित काहीबाही मिरवत होते. त्यात आपले चिकन तंदूरीचे फोटो कुठे टाकायचे म्हणून मी शांतच होतो. पण आज एके ठिकाणी वाचनात आले की ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते. उदाहरण म्हणून स्वत:कडेच पाहिले आणि हे लॉजिक एकदम पटले. त्यानिमित्ताने हा किस्सा आठवला. तो न लाजता शेअर करायची हिंमतही आली. आणि आता विषय निघालाच आहे तर चार मुक्ताफळे आणखीही उधळावी म्हणतो.
तर आम्ही कोंबडीचे पाय म्हणून हिणवले जाणारे नॉस्टॅल्जिक नाईटीज पिढीतल्या त्या गटाचे प्रतिनिधीत्व करतो ज्यांनी द्रष्टेपणा दाखवत हे आधीच ओळखले होते की काही वर्षातच हाताने लिहीण्याचा काळ संपणार आहे. कॉम्पुटर आणि मोबाईलचे युग येणार आहे. सारे काही टकटक बोटांचा खेळ असणार आहे. ज्याचा टायपिंग स्पीड जास्त, त्याचा लिहायचा वेग जास्त. आणि ज्याच्याकडे छान छान फॉंट असणार, त्यानेच टाईपलेले अक्षर छान दिसणार. आज लोकांच्या घरात मोबाईलचे चार्जर चटकन हाताला लागतील अश्या जागी सापडतील. पण काही लिहायची वेळ आल्यास पटकन पेनपेन्सिल सापडणे अवघडच. आजच्या तारखेला शब्दकोडी आणि सुडोकूही ऑनलाईनच सोडवणारी लोकं काही लिहीत असतील तर ते म्हणजे फक्त स्वाक्षरी. आणि ती देखील हळूहळू डिजिटल होतेय. तसेही ज्याचे अक्षर घाण, त्याचीच स्वाक्षरी महान. कारण ज्याची स्वाक्षरी गिचमिड, त्याचीच कॉपी करणे अवघड. सुंदर अक्षर असणार्यांचा एक जागतिक हस्ताक्षर दिवस असतो. पण ऊरलेले तीनशे चौसष्ट दिवस आमचेच असतात.
अक्षरावरून स्वभाव समजतो असे म्हणतात. स्वभावाला औषध नसते असेही म्हणतात. मग अक्षराला तरी कसे असावे? पण तरीही आयुष्यातील उमेदीची खेळायची मौजमजा करायची वर्षे या अक्षर सुधारायच्या नादात फुकट गेली. रोज उठा, दात घासा, आंघोळ करा, आणि अक्षर सुधारायला पाच पाने लिहून काढा. हा दर उन्हाळी सुट्टीचा ठरलेला उपक्रम. त्याशिवाय क्रिकेट खेळायला सोडायचेच नाहीत. एवढी मेहनत जर ईंग्लिश सुधारायला घेतली असती तर ऑक्सफॉर्डची आख्खी डिक्शनरी पाठ झाली असती. आज लाईफ बनली असती. पण सरावानेही अक्षर सुधारायचे नव्हतेच. कारण वहीपुरते चांगले लिहीले जायचे. पण परीक्षेची वेळ आली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दर उत्तरपत्रिकेवर अक्षर सुधारावे हा ठरलेला शेरा.
लिहायचा स्पीड मात्र माझा अफाट होता. बाई जे बोलायच्या ते रेकॉर्ड केल्यासारखे कागदावर ऊतरवून काढायचो. गणिताच्या बाईंनी फळ्यावर गणिते लिहून शिकवली आणि नंतर ती मुलांना वहीत कॉपी करायला सांगितली की ती सर्वात पहिले संपवून मी मुद्दाम शीळ वाजवत बसणार हे नेहमीचेच. मग फळा पुसायचे मानाचे कामही माझ्यावरच सोपवले जायचे. माझ्या अक्षराची किर्ती सर्वदूर पसरली होती. स्टाफरूममध्येही चर्चा व्हायची. एकदा मधल्या सुट्टीत मला स्टाफरूममधून बोलावणे आलो. भितभीतच गेलो. त्याकाळी स्टाफरूममध्ये तशीच जायची पद्धत होती. ईतिहासाच्या बाई पेपर तपासत होत्या. पण मी लिहिलेला ईतिहास त्यांना वाचता येत नव्हता. कुठलाही चष्मा चढवून त्या ईतिहासाचा अर्थ लागत नव्हता. तेव्हा आमच्या गणिताच्या क्लासटीचर बाईंनी त्यांना सल्ला दिला की त्यालाच बोलाव आणि त्याच्याकडूनच वाचून घे. तेवढे माझे एक चांगले होते. माझे अक्षर मला वाचता यायचे. चटचट वाचून दाखवले. भले स्वत:चेच का असेना, एवढे घाणेरडे अक्षर हा पोरगा पटपट कसे वाचतोय या कौतुकाने सारे शिक्षक माझ्याकडे बघत होते. जणू मी संस्कृतचे श्लोकच धडाधडा म्हणत होतो.
शालेय जीवनात अक्षराने प्रसिद्धी, मनस्ताप, सुखद दुखद आठवणी सारे काही दिले. तोच वारसा घेऊन कॉलेजला गेलो. आपले ईंग्लिशचे अक्षर आणखी गचाळ आहे हा शोध तिथे लागला. परकीयच भाषा ती. मातृभाषा लिहू न शकणारा मुलगा ती कशी आत्मसात करणार. वाईट गोष्ट म्हणजे ईंग्लिशमध्ये लिहीलेले माझे मलाच काही दिवसांनी वाचता यायचे नाही. पण कॉलेजमध्ये कधी स्टाफरूममधून बोलावणे आले नाही. त्यांचे ते वाचायचे अर्थ लावायचे आणि मार्क्स द्यायचे. जोपर्यंत अपेक्षित मार्क्स मिळत होते. प्रसंगी टॉपरही येत होतो, तोपर्यंत मलाही अक्षराचे मग काही पडले नव्हते.
वालचंदला असताना मात्र एका परीक्षेच्या वेळी एका सुपरवायझरने माझी ईज्जतच काढली होती. लिहीता लिहीता माझ्या हातातून पेपर खेचून घेतला आणि म्हणाला की हे काय लिहिले आहे, कोण वाचणारे हे, काय चेक करणार, तुला तरी वाचता येतेय का? नसेल काही येत तर नको लिहू, उगाच का टाईमपास करतोय??... मला पेपर चालू असताना वाद घालायचा नव्हता. मी पेपर परत घेतला आणि शांतपण एवढेच म्हणालो की सर मी असेच अक्षर काढून गेल्यावेळी टॉपर आलेलो. विचारा ईथे कोणालाही... आणि त्याच्या चेहरयावरचे भाव न टिपता पुन्हा झरझर पेपर लिहू लागलो. सोबतचे मित्र मात्र नंतर खुश झाले होते. तो सुपरवायझर हॉस्टेलमधील एक हलकट मुलगा होता आणि मी छान अॅटीट्यूड दाखवत त्याला ऊलटे उत्तर दिले असे मित्रांना वाटत होते.
मला नक्की आठवत नाही की मी त्याला नक्की कोणत्या टोनमध्ये प्रत्युत्तर दिलेले. पण येस्स, कसेही असले तरी ते आपले अक्षर असते, एक आपुलकी जिव्हाळा त्याबद्दल असतोच. तोच जिव्हाळा जो आपल्या कुरुप पोराबद्दलही आईबापांना असतो. त्यामुळे मस्करी होत राहते आम्हा कोंबडीचे पायवाल्यांची, आम्हीही ती एंजॉयच करतो.पण त्या पलीकडे जात जर कोणी त्यावरून अवहेलना करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला सडेतोड प्रत्त्युत्तर दिले जाऊ शकतेच
(No subject)
सापडली २०१८ ची ऑफिस डायरी.
सापडली २०१८ ची ऑफिस डायरी.
घरी पोरीला खेळायला आणलेली
कारण ३६५ पैकी फक्त १५ पाने भरली होती.
त्यापैकी चारेक पानांचे फोटो टाकतो टिपून..
फोटो डकवण्याआधी तळटीप
फोटो डकवण्याआधी तळटीप डोक्यावर लिहितो ...
मला जवळून ओळखणारे असे म्हणतात की माझे ईंग्रजी अक्षर मराठीपेक्षा तेरा ते चौदा पटींनी सुंदर आहे. त्यात जर ते कॅपिटॉलमध्ये लिहिले असेल तर वहीसुद्धा आनंदाने कवेत तरंगायला लागते. ईतके ते सुंदर दिसते.
अर्थात तरीही जेव्हा पहिल्यांदा माझ्या गर्लफ्रेंडने माझे ईंग्लिश अक्षर पाहिले होते तेव्हा ती तेरा ते चौदा तास खळखळून वेड्यासारखे हसत होती. कारण ती कॉन्व्हेण्ट मिडीयमची आणि ईंग्रजी जोडाक्षरे लिहिणारी होती. त्यामुळे तिला माझे सुटे सुटे ईंग्रजी अक्षर लहान मुलासारखे वाटत होते.
पुढे याच लहान मुलातील निरागसपणा तिला भावला आणि तिने माझ्याशीच लग्न करायचा निर्णय घेतला. त्यामुळे मलाही तिच्याशीच करावे लागले. वाईट अक्षराची ईतकी मोठी किंमत आजवर या पृथ्वीतलावर कुठल्या पुरुषाने चुकवली नसेल
असो, येऊद्यात फोटो......
पण लक्षात ठेवा, फक्त बघायला म्हणून टाकतोय. वाचायला नाही
..
..
..
..
..
इतके पण काय वाईट नाहीये.
इतके पण काय वाईट नाहीये.
मला वाटतय पेन चांगला नसावा.
या महत्वाच्या नोंदी आहेत.
या महत्वाच्या नोंदी आहेत. त्यामुळे वाचनेबल होण्यासाठी मी माझा बेस्ट देतो.
हा कोणता फॉन्ट आहे?
हा कोणता फॉन्ट आहे?
ऋफॉन्ट
ऋफॉन्ट
एखादाच फोटो नमुन्यादाखल पुरे
एखादाच फोटो नमुन्यादाखल पुरे होता की.
डॉक्टर व्हायचेस ना.
डॉक्टर व्हायचेस ना.
एखादाच फोटो नमुन्यादाखल पुरे
एखादाच फोटो नमुन्यादाखल पुरे होता की.
>>>
अक्षर खराब आहे पण तरी दरवेळी बदलत नाही. सारखेपणा आहे असं कोणी तोंडदेखलं कौतुक करावे या हव्यासापोटी चार टाकले.
डॉक्टर व्हायचेस ना..
डॉक्टर व्हायचेस ना..
>>>>
मला लहानपणी सगळे हेच म्हणायचे तेव्हा मला खरेच वाटायचे की खराब अक्षर असणारेच डीक्टर होतात. त्यामुळे मी चुकूनही ते चांगले करायची मेहनत घेतली नाही.
मग पुढे जाऊन जेव्हा समजले की डॉक्टर व्हायला मेडीकल वेडिकल सायन्स वायन्सचे शिक्षण घ्यावे लागते नुसते खराब अक्षर असून चालत नाही तेव्हा अक्षर सुधारायची वेळ निघून गेली होती
तात्पर्य - हे असे विनोद बालमनाला चुकीचे संदेश देतात. त्यांच्यासमोर जपून करायला हवेत.
बरोबर, करियर निवडायची वेळ
बरोबर, करियर निवडायची वेळ येते तेव्हा बोलायचे.
कौतुक करावे या हव्यासापोटी
कौतुक करावे या हव्यासापोटी चार टाकले.>>>> ते कळले रे.
डॉक्टरांचा अक्षर फक्त
डॉक्टरांचा अक्षर फक्त मेडिकलवाल्याला समजते .
एकदम वातावरण निमिर्ती करून मग
एकदम वातावरण निमिर्ती करून मग फोटो आलेले आहेत.
आणि तरी पण टॉपर, मान गये बॉस
bdw , माझा एक मित्र नेहमी रडायचा कि त्याच अक्षर खराब आहे म्हणून त्याचा टॉप रँक जातो आणि मुलींची अक्षरं चांगली असतात म्हणून त्यांना जास्त मार्क मिळतात. माबो वर आला तर मतपरिवर्तन होईल त्याचं
मी पण पोस्ट करू का कोंबडीचे
मी पण पोस्ट करू का कोंबडीचे पाय वाले अक्षर?
तुमचे अक्षर तर छान आहे ना
तुमचे अक्षर तर छान आहे ना किल्ली
मृणाली, mood नुसार अक्षर
मृणाली, mood नुसार अक्षर बदलतं माझं
ऋ, तुमच्याकडे रंगीत पेन आहेत
ऋ, तुमच्याकडे रंगीत पेन आहेत वाटते, 4 काड्यांची एक च की वेगवेगळे रंग?
mood नुसार अक्षर बदलतं माझं
mood नुसार अक्षर बदलतं माझं Lol.....
माझं अक्षर सेमच राहतं नेहमी.
किल्ली तुमचे सगळे शब्दच नव्हे
किल्ली तुमचे सगळे शब्दच नव्हे तर सगळी अक्षरे पण लागताहेत. तेव्हा तुमच्या अक्षरांना कोंबडचे पाय खिताब लागु होत नाही.
ऋ, तुमच्याकडे रंगीत पेन आहेत
ऋ, तुमच्याकडे रंगीत पेन आहेत वाटते, 4 काड्यांची एक च की वेगवेगळे रंग?
>>>>>
मी जॉबला लागल्यापासून स्वत:चे पेनच घेतले नाहीये. की ऑफिस स्टेशनरीत देते ते सुद्धा घ्यायला गेलो नाही. याच्या त्याच्या टेबलवरून जे मिळेल हाताला लागेल ते उचलतो. लोकांची पेनं हरवली की ते माझ्याकडे शोधत येतात. दहात नऊ वेळा मिळून जाते.
वर्षाला एकच चांगले पेन येते नशिबात जे डायरीसोबत कंपनी देते. ते सुद्धा मी घरी आणून बायकोला देतो. लग्नाआधी गर्लफ्रेंडला गिफ्ट करायचो. मुळात लिहायचीच आवड नाही तर पेनाचे शौक का बाळगा?
तर हे रंगीत पेनही ड्राफ्टसमन चेकर वगैरे लोकांचे असतात ते उचलतो. साधेच असतात. कंपनी देते. त्यामुळे काही हिशोब नसतो. फक्त वेळेला हाती मिळणे गरजेचे.
mood नुसार अक्षर बदलतं माझं
mood नुसार अक्षर बदलतं माझं Lol
Submitted by किल्ली on 8 September, 2020 - 13:42
>>>>>>
शक्य आहे
कारण माझा लिहिताना मूड कायम एकच असतो - काय हे जगातले सगळ्यात बोअरींग काम करतोय मी..
माझा प्रत्येक फॉर्म माझी बायकोच भरते. नाईलाजाने सही तेवढी मला करावी लागते. पण ती घाण चालते.
असं कोणी तोंडदेखलं कौतुक
असं कोणी तोंडदेखलं कौतुक करावे या हव्यासापोटी चार टाकले.
Submitted by ऋन्मेऽऽष >>
तुम्ही उजव्या हाताने लिहिता की डाव्या हाताने.
एक मित्र नेहमी रडायचा कि
एक मित्र नेहमी रडायचा कि त्याच अक्षर खराब आहे म्हणून त्याचा टॉप रँक जातो
>>>>>
माझा रॅन्क सबमिशनमुळे जायचा. लोकांचे टर्मवर्कच्या मार्क्समुळे परसेण्ट वाढायचे. माझे कितीतरी कमी व्हायचे. कारण माझी अटेंडन्स नसल्यातच जमा होती. लेक्चर तर लेक्चर मी प्रॅक्टीकलही बुडवायचो. जे आमच्याकडे ईतर कोणी करायचे नाही. त्यात सबमिशन सगळ्याय शेवटी. दुसरयाचे छापून. जीटी मारून. शिक्षकांना वाचताही येणार नाही ईतके घाण अक्षरात. (वर फोटोतले फार बरे आहे त्यामानाने) अक्षर तर अक्षर मी डायग्रामही ईतके घाण काढायचो की काय वर्णावे. पट्टी वापरणे मी माझा अपमान समजायचो. मुळात ती नसायचीच माझ्याकडे. अगदीच मोठी लाईन मारायची असेल तर वही पुस्तकाची कडा वापरायचो. मी कधी त्या सबमिशनला किंमत द्यायचो नाजी त्यामुळे शिक्षक मला मार्क्स द्यायचे नाहीत. चूक माझीच असायची. बाकी चारचौघात हुशार असल्याचा अहंकार नव्हता. (आजूबाजूला बरीच हुशार मुले असल्याने तो करण्यात काही अर्थही नव्हता) पण मानसिकता अशी होती की पेपरात मार्क मिळवतोय ते पुरताहेत तर सबमिशन करण्यात जीवाचे हाल का करा..
Pages