पाककृती स्पर्धा ३ - फास्टफूड स्पर्धा- डोसा बाइट्स - साक्षी

Submitted by साक्षी on 1 September, 2020 - 10:54

साहित्य :
१) डोश्याचं पीठ - ७-८ मोठे चमचे
२) बीटाचा रस - २ चमचे
३) पालकाचा रस - २ चमचे
४) उकडलेले बटाटे - २
५) सांबार मसाला - १ मोठा चमचा
६) चीज स्प्रेड - ४ चमचे
७) तेल - २-३ चमचे (१ चमचा बटाट्याला, थोडं डोसे घालायला)
८) चवीपुरते मीठ

कृती :
१) डोश्याचं पीठ तीन भांड्यांमधे घ्या. एकात गुलाबी रंगासाठी बीटाचा रस, एकात हिरव्या रंगासाठी पालकाचा रस घाला.
२) उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून मीठ चोळून ठेवा. तेलावर बटाटे थोडे परतून त्यावर सांबार मसाला घाला. मसाल्याचं पूर्ण कोटिंग फोडींना झालं पाहिजे. ही बटाटा भाजी भांड्यात काढून घ्या.
३) एक रंगाच्या पीठाचा डोसा घाला. डोसा झाला की ताटलीत घेउन त्याला लगेच चीज स्प्रेड लावा. अर्धा चमचा बटाटा भाजी घाला. डोसा अर्धा दुमडून घ्या. चीज स्प्रेड मुळे छान इन्टॅक्ट राहिल. डोसे फार कुरकुरीत करू नका, नाहितर दुमडताना तुकडा पडेल.
४) असे सगळ्या रंगाचे डोसे करुन घ्या. सुरीने अर्धे करुन घ्या.
५) टूथपिक लावून किंवा फ्रुट फोर्क देऊन सर्व्ह करा.

यात हवी ती व्हेरिएशन्स करता येतील. बटाटा न घालता फक्त चीज स्प्रेड लावून दाट सांबार डीप म्हणून देता येइल.

लास्ट मिनिट एन्ट्रि असल्यामुळे हा एकच फोटो काढता आला.
IMG_2197.JPG

रंग थोडे अजुन घालायला हवे पण घरात उपलब्ध सामान आणि वेळ यात इतकंच जमलं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लागतील हे.. डोसा म्हटले की सोबत बटाटा, नारळ चटणी, सांबार वगैरे हवंच.. मग ईतर प्रयोग करावेत. ते चायनीज स्टाईल कोबी सिमला नूडल्स फूडल्स चॉप्सी डोसे फार बोअर होतात मला

डोसा म्हटले की सोबत बटाटा, नारळ चटणी, सांबार वगैरे हवंच.. मग ईतर प्रयोग करावेत. ........... नाही रे.पनीर चिली डोसा,मी आणि माझी मैत्रीण दोघींचा आवडता होता.सोबत सांबार असायचे.त्यानंतर फ्रूटसॅलड वुईथ आईसक्रीम.odd combination aahe.pan Worli chya eka हॉटेलमध्ये हे इतके अफलातून मिळायचे की आ ताही खावेसे वाटते.

Sorry साक्षी !
ते डोसे फार छान आहेत.मला जास्त आवडली ती डिश.