Submitted by नादिशा on 30 August, 2020 - 07:29
एरव्ही खवा आणला, की खव्याचे वेगवेगळे मोदक बनवता येतात. यावर्षी कोरोना मुळे बाहेरून काही आणायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागतात. आज पण एका वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले ... अगदी कमीत कमीत साहित्यामध्ये, त्यामुळे कमी खर्चात, सोपी पद्धत , त्यामुळे चटकन होणारे. त्याची रेसिपी share करते आहे.
1) 2 वाट्या शेंगदाणे बारीक गॅस वर करपू न देता, छान भाजून घेणे.
2) थंड झाल्यावर चोळून त्याची साले काढून टाकणे.
3) मिक्सर वर त्यांचे चिकट होईल, असे कूट करून घेणे.
4) हे तयार झालेले कूट, मिल्क पावडर अर्धी वाटी , पिठीसाखर पाऊण वाटी, थोडी वेलचीपूड सगळे एका ताटामध्ये घेऊन नीट एकत्र करून घेणे.
5) मग मोदकाच्या साच्यामध्ये घालून मोदक बनवणे . प्रत्येक मोदकाच्या मध्यभागी एकेक चेरी stuff करणे.
6) एवढ्या साहित्यामध्ये 25 मोदक बनतात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
ही पाकृ (आणि आधीची सुद्धा) ललितलेखन या विभागात आली आहे.
कृपया "पाककृती आणि आहारशास्त्र" या विभागात हलवा.
नाविन
नाविन्यपूर्ण रेसिपीज आहेत मोदकाच्या.. आवडल्या..
फोटो द्या ना..
धन्यवाद मन्या. प्रयत्न करते
धन्यवाद मन्या. प्रयत्न करते आहे फोटो टाकण्याचा, पण जमत नाहीये. काही ना काहीतरी problem येतो आहे. पुन्हा प्रयत्न करून पाहते.
गणेशोत्सवाच्या काळात
गणेशोत्सवाच्या काळात उत्सवातील स्पर्धेतल्या नियमांत बसणाऱ्या रेसिपी टाकून त्या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून न देण्याचं काय कारण ??? जर स्पर्धेत भाग घ्यायचा नसेल तर मग अश्या रेसिपी उत्सव संपेपर्यंत न पोस्ट करता थांबण अशक्य आहे का ??!!
मी स्पर्धेत भाग घेण्यासाठी
मी स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाही बनवले. दरवर्षी च वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवते रोज गणपतीला नैवेद्याला.हटके रेसिपी आहेत माझ्याकडे. त्या सर्वांशी share कराव्यात. सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत. कुणाला रेसिपी आवडली, तर करून पाहतील, एवढाच माझा हेतू आहे. त्यामुळे मी पोस्ट केले.
फक्त मी नवीन आहे, त्यामुळे या पाककला विभागात टाकल्या पाहिजेत, हे माहिती नव्हते मला.
फोटो

वा वा जमलं फोटू टाकायला
वा वा जमलं फोटू टाकायला
आता स्पर्धेसाठी वेगळे 2-3 नग मोदक बनवूनच टाका
गणेशोत्सव काळात, स्पर्धेतील
गणेशोत्सव काळात, स्पर्धेतील नियमात बसणार्या रेसीपी टाकू नयेत असा ठळक नियम वा बंधन अॅडमिनचा कुठेच जाहिर नसताना, त्या अधिकाराने दुसर्या कुणी भलत्याने येवून , कोणावर डाफरायचे कारण काय? एवढी दादागिरी कशाला ती?
-गणपतीचे दिवस आहेत, प्रत्येकजण करतच असेल त्याच्या घरी काही ना काही, टाकली कृती तर काय फरक पडतो.
-आणि, मुळात, स्पर्धेचे नियम सर्वांनाच माहितच असावे , विशेष करून नवीन आयडीना, हे गृहित का धरले आहे?
-कोणाला स्पर्धेत नसेल भाग घ्यायचा तर ठिक आहे ना, ते स्वातंत्र्य असावे सर्वांनाच.
आणि सर्वात शेवटी, स्पर्धा हि एक प्रत्येकाची स्वतःची कला दाखावायची वा चुणूक दाखवायची गोष्ट आहे, कोणी का टाकेना पाककृती, त्याने दुसर्या कोणाच्या कलाकुसरीवर काय फरक पडतो?
ज्याच्या कडे , कला आहे , तो नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने सादर करेलच.
उगाच काहीही लॉजिक नसताना, दादागिरी करायची नाहितर स्वतःचे नियम स्वतःच दुसर्यावर लादायची विचित्र सवय.
——
गणपतीच्या काळात, घेवु द्यावा दुसर्यांना आनंद..
नादिशा,
नादिशा,
छान आहेत पीनट-चेरी मोदक. मस्त कल्पना आहेत.
छानच आहेत संकल्पना. मी पण
छानच आहेत संकल्पना. मी पण रव्याचे बेसनाचे डिंकाचे मोदक करून बघीन. साचा हवा मात्र.
गणपतीच्या काळात, घेवु द्यावा
गणपतीच्या काळात, घेवु द्यावा दुसर्यांना आनंद... झंपी+११११
मी स्पर्धेत भाग घेण्यासाठी
मी स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाही बनवले. दरवर्षी च वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवते रोज गणपतीला नैवेद्याला.हटके रेसिपी आहेत माझ्याकडे. >>>> तुम्ही स्पर्धेसाठी बनवलेले नसले तरी तुम्ही शीर्षकात "स्पर्धेसाठी नाही" असं लिहिताय त्या अर्थी मायबोलीवर स्पर्धा सुरू आहेत आणि ह्या पाकृ त्यात बसू शकतात ह्याची तुम्हांला जाणीव आहे असं दिसतय. असाही विचार करून बघा की अश्या प्रकारच्या रेसिपींचा कोणीतरी प्रवेशिका म्हणून विचार करत असेल आणि त्यांना आता त्या टाकता येणार नाहीत आणि टाकल्या तरी "आधारीत" चा शिक्का बसेल! हे म्हणजे मुद्दाम पेपर फोडल्यासारखं झालं.
पूर्वी काही उत्सवांमध्ये संयोजकांनी स्पर्धा संपेपर्यंत स्पर्धेच्या नियमांवर आधारीत पाककृती नुसत्या प्रकाशित करू नका अशी विनंती वजा सुचना नियमांमध्ये लिहिली होती. नियम, विनंती वगैरे असली नसली तरी औचित्य म्हणून काही प्रकार असतो. मायबोलीवरच्या उपक्रमात प्रवाहात सामिल व्हावं आणि नसेल तर व्हायचं तर उपक्रम संपेपर्यंत थांबावं, उगाच सवता सुभा उघडू नये असं मला वाटतं. ओपन फोरम आहे, त्यामुळे तुम्ही पाकृ कधीही प्रकाशित करूच शकता आणि मी ही माझं मत (कोणाला पटणारं असो वा नसो) व्यक्त करूच शकतो. असो.
गणेशोत्सव आहे, लोक मोदक
गणेशोत्सव आहे, लोक मोदक बनवणार, त्याच्या पाकृ शोधणार, एकमेकांना शेअर करणार. त्याकरता मायबोली हे एक व्यासपीठ आहे. केवळ स्पर्धा सुरू आहे म्हणुन हे थांबवलं तर तो पर्यंत उत्सव संपून जाईल.
गणेशोत्सव सुरू होण्या आधीच लिहा म्हटलं तरी आता होतंय तेच होणार.
कुणी आपली युनिक पाकृ स्पर्धेत उतरवली काय किंवा स्पर्धेत भाग न घेता लिहिली काय, परिणाम तोच इतर कुणी तीच पाकृ देऊ शकणार नाही. केवळ काही पदार्थ कॉमन आहे म्हणुन पाकृ स्पर्धेतून बाद होईल असेही वाटत नाही.
तसेच या पाकृ वरून काही आयडिया सुचून कुणी वेगळी पाकृ बनवेल याची शक्यताही नाकारता येत नाही.
मग काय फरक पडतो स्पर्धेवर याने?
>>>> कुणी आपली युनिक पाकृ
>>>> कुणी आपली युनिक पाकृ स्पर्धेत उतरवली काय किंवा स्पर्धेत भाग न घेता लिहिली काय, परिणाम तोच इतर कुणी तीच पाकृ देऊ शकणार नाही. <<<<
अगदी++११११
माझ्या पाककृतीने, कोणाची पाककृती बाद होईल ह्याचा विचार करत बसणार? हास्यास्पदच आहे.
हे असले, नसते विचार तर कलेवर बंधन आणण्यासारखं आहे.
स्पर्धा आहे, आव्हानात्मक , उत्स्पुर्तापुर्ण आणि कलेला चालना देणारी हवीच, मग त्याशिवाय ती काय मजा.
खरा स्पर्धक आणि कलाकार ह्या असल्या फालतु विचाराने खचित होत नाही.
जग, स्पर्धात्मक आहे, त्यामुळे आव्हान असणारच.
स्पर्धेला आव्हानत्मक बनवण्यसाठी रुल्स सुद्धा आहेत ना? मग ते रुल्स तरी कशाला ठेवलेत?
तुनळीवर, खच्चून पान मोदक ते शेंगदाणा मोदक ते ह्यांव ते त्यांव मोदक रेसीपी पडल्यात.
“तुनळी बघायचं बंद करा ज्यांना भाग घ्यायचय अशीही सुचना/रुल्स करायचा मग“
बहुतेक रेसीपी, इथून तिथोन कॉपी केलेल्याच असतात.
इथे मायबोलीवर तरी, कितीजणं, माहितीचा स्त्रोत लिहितात आणि क्रेडिट देतात?
आता, स्पर्धेत पारंपारीक मोदकाची रेसीपी चालेल लिहिलय ना... त्यावर बंदी नाही आणली मग? त्याने कोणाचे डोके चालायचे बंद नाही होणार? त्याच्यात कसली आलीय कलात्मक्ता असं नाही वाटले कोणाला?
पण इथे मायबोलीवर सहजसाध्य आहे म्हणून , काहितरी मुद्दे घुसडायचे. उगाच काहितरी खुसपटं काढायची.... प्रकार आहे हा.
छान आहेत मोदक.
छान आहेत मोदक.
छान आहेत मोदक
छान आहेत मोदक
वादही मजेशीर
बहुधा मानव पृथ्वीकर यांनीही हस्तक्षर स्पर्धेत एंट्री न देता एक फाँट फोडला होता.
>>>>वादही मजेशीर
>>>>वादही मजेशीर
बहुधा मानव पृथ्वीकर यांनीही हस्तक्षर स्पर्धेत एंट्री न देता एक फाँट फोडला होता.<<<
कायच्या कै होतं ते, पेपर फोडणे वगैरे म्हणणे.
आता, इतक्या सुंदर मोदकांच्या स्पर्धेतील एन्ट्रीज आल्यात. क्रीयेटीव एन्ट्रीज देणारे , कलाकार असताना ,स्पर्धेदरम्यान अशी पाककृती लिहु नका, तसे करु नका वगैरे म्हणणं अचाट होतं. असो.
हुशार लोकांची डोकी नेहमी चालतातच. ढ लोकांचे काम नाहीच आहे.
आक्षेप कळला नाही.
आक्षेप कळला नाही.
छान कृती नादिशा.... सुगरण आहात...