झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे - (सेपिया - *)

Submitted by संयोजक on 31 August, 2020 - 10:43

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

आज ची रंग जोडी नेहमीपेक्षा वेगळी आहे. एक रंग (टोन) सेपिया हवा तर दुसरा रंग कुठलाहि चालेल.

https://en.wikipedia.org/wiki/Sepia_(color)

आजचा रंगांचा झब्बू शेवटचा झब्बू आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन धागे झालेत.

सेपीआ रंग कळला नाही. सॅम्पल द्या बरे

DSC00431_2.jpg
ग्रँड कॅन्यन.

येल्लो स्टोन <3 <3 फॉर एवर लव ..

संयोजक - रंग 'वाचण्यात' काय मज्जा? सॅम्पल रंगच हवा कळायला.
मला कळाला आता रंग पण वरचे 3 फोटो पाहिल्यावर

True Sepia..


DSC00431_4.jpg
हा पण यलोस्टोन पार्कमधला.

मस्तच की !
तुम मै और बजरंगबली झालय Happy . तू आणि मीच आहोत.

आहाहा, निरू तुमच्या प्रत्येक फोटो साठी "आहाहा" येतय तोंडून. टारझन ची तर मी फॅन आहेच फोटोत घुसून त्याचे लाड करावेसे वाटतात. आणि सिंह पण किती देखणा.
मै चे ही फोटो मस्त. अरिष्टनेमींचाही फोटो आवडला.

Pages