साहित्य
पारीसाठी-
१) २ भांडी (अंदाजे पाव किलो) बासमती तांदूळ पिठी - घरी करणार असाल तर बासमती तांदूळ धुवून, खडखडीत वाळवून पीठ करावे. मी तयार पीठ वापरते.
२) पीठा इतकेच पाणी
३) १ चमचा लोणी किंवा तेल
४) चिमूटभर मीठ
सारणासाठी-
५) २ नाराळांचा चव ( अंदाजे ३ भांडी) ताजा खोवला असेल तर उत्तम - खोबरं खोवताना चॉकलेटी, पाठीचा भाग घ्यायचा नाही. पांढरं शुभ्र खोबरं घ्यावं.
६) गूळ - २ भांडी (गोडाच्या आवडीप्रमाणे वाढवा/ कमी करा) चिरून किंवा जरा बारीक करून घ्यावा.
७) वेलदोड्याची पूड
कृती:
१) गूळ, खोबरं एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. गूळ पातळ झाल्याने आधी सारण पातळ असेल. साधारण आठ ते दहा मिनिटात घट्ट होऊ लागले की झाले असे समजा. अधून मधून हलवत रहा. योग्य घट्ट झालं की त्यात वेलदोड्याची पूड घाला.
सारण आदल्या दिवशी करून फ्रीजमधे ठेवता येइल. मी सारणाचा फोटो काढायचा विसरले.
२) जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या. त्यात लोणी/ तेल आणि चवीपुरतं मीठ घाला. पाणी चांगले रटरट उकळले की पिठी घाला आणि भराभर हलवा. सगळं नीट मिक्स होऊ द्या. भरभर हलविण्यासाठी काविलथ्याची किंवा मोठ्या चमच्याची/ डावाची मागची बाजू जास्त बरी पडेल. आत्ता वर झाकण ठेऊन एक दणदणीत वाफ येऊ द्या आणि आच बंद करा. (अर्धा ते एक मिनिट.) जास्त वेळ राहिला तर उकड कोरडी होईल.
३) उकड गरम असतानाच तेल, पाणी लावून चांगली मळून घ्या. मी फूड प्रोसेसर वापरते. आता छोटा गोळा घेऊन तो परत छान मळून घ्या. उकड जितकी चांगली मळली असेल तितका मोदक वळायला सोप्पा. हाताला किंचित तेल लावून वाटी चा आकार द्यायला सुरुवात करा. सगळीकडून समान आणि पातळ पारी झाली की साधारण एक चमचा सारण भरा बोटांनी पारीच्या कडेवर निऱ्या घाला. जितक्या निऱ्या जवळ जवळ येतील तितका नंतर मोदक सुबक दिसेल. सगळ्या निऱ्या झाल्या की नाजूक हाताने त्यांना एकत्र करा. मोदक वळून पूर्ण करा.
४)पातेल्यात पाणी घेऊन वर चाळणीत मोदक ठेऊन वाफवून घ्या. भावाला बहिण हवी म्हणून करंजी पण करायची पद्धत आहे.
निर्या करताना...
असे सगळे मोदक करुन १५ मिनिटे वाफवून घ्या.
हे काही आकार केले त्याचे फोटो
गणपती, डबल मोदक आणि फोटो सेशन
मुरड घालून केलेला वाटीतला मोदक
२१ कळ्यांचा मोदक करताना आणि वाफवल्यावर
मोदक करंजी यांची अजुन एक मांडणी..
सगळे डिझायनर मोदक एकत्र
वाह
वाह
सुंदर दिसतायत फुल मोदक, डबल डेकर, बाप्पा आणि सगळेच
मुरड एकदम चित्र काढल्या सारखी परफेक्ट आहे
(गटणे मोड ऑन: असा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी)
काय सुरेख डिझायनर मोदक आहेत!
काय सुरेख डिझायनर मोदक आहेत! जबरदस्त!
काय गोड मोदक केलेत. बाप्पा तर
काय गोड मोदक केलेत. बाप्पा तर खासच.
काय गोड मोदक केलेत. बाप्पा तर
काय गोड मोदक केलेत. बाप्पा तर खासच.
खूप छान. मोदक उचलून तोंडात
खूप छान. मोदक उचलून तोंडात टाकावासा वाटतोय
सगळ्यात शेवटचा फोटो जबरदस्त आहे.
डिझायनर मोदक प्रचंड सुरेख
डिझायनर मोदक प्रचंड सुरेख आहेत . शेवटचा फोटो एकदम जबरदस्त ..
सुरेख मोदक.
सुरेख मोदक.
फूड प्रोसेसर मध्ये मळताना तेल आणि पाणी घालत रहायचे का अधूनमधून?
सुर्रेख सगळे मोदक!! तो
सुर्रेख सगळे मोदक!! तो वाटीतला मोदक कसा केलास? आणि गणपतीच्या आकाराचा? डबलडेकर मोदकही भारीच.
सगळे डिझाईनर मोदक,21 कळ्यांचा
सगळे डिझाईनर मोदक,21 कळ्यांचा मोदक,बाप्पा ...सुगरणपणाचे निदर्शक.प्रेझेंटेशनही सुरेख.
अफलातून!
अफलातून!
मी अनु म्हणाली तसे एकदम आखीव रेखीव आहे.फक्त आवडला नाही तो गणेश.तोही सुरेख आहे,तरीही उकडले जाणार इ. इ..
21 पाकळ्यां चा मोदक बाबौ .जेमतेम 13 जमल्या.21 म्हणजे उंटाच्या बु डख्याचा मुका घेण्यासारखे होय.
खुपच सुंदर आणी सुबक.
खुपच सुंदर आणी सुबक. गणपतीबाप्पा मस्तचं.
अगग ___/\___साष्टांग दंडवत गो
अगग ___/\___साष्टांग दंडवत गो
काय सुरेख केलयस सगळच
२१ पाकळ्यांचा मोदक, मुरडीचा मोदक, सुबक कळ्यांचा साधा मोदक, डबलडेकर मोदक, मुरडीची करंजी इतकच नाही तर चक्क गणपती बाप्पाही । अवाक झालेय बघुन
सगळच सुबक। गुळही बाप्पाच्या आकारात। ते गुलाबी फुल, खालच्या पिटुकल्या ताटल्या...
फोटो, ॲरेंजमेंट सगळच क्लासी लुक मधलं!
कृतीपण छान लिहिलीयस। सारण किती गच्च भरलयस
जियो। माझ्याकडून तुला पहिला नंबर
पैला नंबर! वाट बघतच होते
पैला नंबर! वाट बघतच होते की साक्षी आणि उत्सुकतेने धागा उघडला .... अप्रतिम! शब्द नाहीयेत कौतुक करायला.... Simply great
सुरेख
सुरेख
अरे वा.. काय मस्त झालेत मोदक.
अरे वा.. काय मस्त झालेत मोदक.. २१ पाकळ्यांचा तर अप्रतिम.. मोदक ठेवलेल्या ताटल्यासुद्धा फारच क्युट आहेत
खूपच सुंदर
खूपच सुंदर
वा! This is piece of art.
वा! This is piece of art.
<<अफलातून!
<<अफलातून!
मी अनु म्हणाली तसे एकदम आखीव रेखीव आहे.फक्त आवडला नाही तो गणेश.तोही सुरेख आहे,तरीही उकडले जाणार इ. इ..
21 पाकळ्यां चा मोदक बाबौ .जेमतेम 13 जमल्या.21 म्हणजे उंटाच्या बु डख्याचा मुका घेण्यासारखे होय.>> +१२१
प्रथम पारितोषिक पात्र.. किती तो सुबक पणा, किती सुंदर करणं.. प्रसन्न वाटलं पाहून
इतके प्रतिसाद बघून खूप छान
इतके प्रतिसाद बघून खूप छान वाटलं. धन्यवाद सगळ्यांना.
काही फोटोंवर वॉटर मार्क टाकलाय आत्ता.
अवल ताई, खूप गोड प्रतिसाद आणि थँक्यु वॉटर मार्क बद्दल सांगितलंस म्हणून
फूड प्रोसेसर मध्ये मळताना तेल आणि पाणी घालत रहायचे का अधूनमधून? >> तेल चमचाभर वाटलं तर एकदाच घालायचं. पाणी नाहीच लागत. पण उकड घट्ट वाटली तर थोडं घालायचं. हाताने परत मळून घेताना हाताला तेल लावून घ्यायचं
काय सुबक डिझायनर मोदक आहेत !
काय सुबक डिझायनर मोदक आहेत !
अफलातून. माझा साष्टांग दंडवत.
अफलातून. माझा साष्टांग दंडवत.
फारच सुंदर
फारच सुंदर
जबरदस्त
जबरदस्त
सुंदर आहेत सर्वच मोदक !
सुंदर आहेत सर्वच मोदक !
अप्रतिम अपुरा शब्द यासाठी
अप्रतिम अपुरा शब्द यासाठी त्यामुळे नि:शब्द, स्तब्ध वगैरे वगैरे.
साष्टांग दंडवत साक्षी तुला.
एक नंबर. सगळेच प्रकार मस्त.
एक नंबर.
सगळेच प्रकार मस्त.
सुबकपणा, सादरीकरण सगळंच
सुबकपणा, सादरीकरण सगळंच अप्रतिम!
परवा फोन वरुन फोटो बघि तले
परवा फोन वरुन फोटो बघि तले. उत्तमच झाले आहेत. माझे विनिन्ग प्रवेशिकेचे मत तुम्हालाच आहे. जबरदस्तच काम.
वा!! अप्रतिम झालेत सगळेच!!
वा!! अप्रतिम झालेत सगळेच!!
एक नंबर!
एक नंबर!
सगळेच मोदक एकदम मस्त!
२१ कळ्यांचा मोदक करताना आणि वाफवल्यावर>> __/\__
Pages