श्रीगणेश बुकमार्क स्पर्धा - कु. विजयालक्ष्मी (गट अ, वय ३ वर्षे १० महिने)

Submitted by मनिम्याऊ on 30 August, 2020 - 07:39

पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : ३ वर्षे १० महिने

खरंतर बुकमार्क स्पर्धेत भाग घ्यायचा विचार माझा होता. ब गटात. आज फ़ुरसत मिळाली आणि क्राफ्टचा डबा उघडला. पण आई काही करायला लागली की लुडबूड करण्याचा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क असतो. तेव्हा आधी तिने बनवलेला बुकमार्क दाखवते.

साहित्य
रेडिमेड कपड्यान्चे प्राईस टॅग पुठ्ठे
आईचा जुना कुडता
कात्री
फब्रिक ग्लू
फैब्रिक कलर
भेंडी
हिरवा मार्कर पेन

जूना कुडत्याचे कापड कापून प्राईस टॅग वर चिटकवले. त्यावर फैब्रिक कलरनी भेंडीचे छापे मारले. मार्करने दांड्या रंगवल्या

पालकाची मदत
कापड योग्य आकारात कापून देणे, भेंडी चिरून देणे.

बाकी चिटकवा-चिटकवी, डिझाईन काढणे, रंग संगती तिची.
तल्लीन होऊन काम सुरु आहे
IMG_20200830_160830.JPGIMG_20200830_162452.JPG

Happiness is...
IMG_20200830_161056.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं गोड आहे
आणि शेवटचा फोटो तर एकदम प्राईझ विनिंग स्माईल.

बुकमार्क एकदम छान !! किती लहान आहे ही त्यामुळे एका जागी बसून काहीतरी छान बनवले तिने ह्यानेच मी इंप्रेस झाले. खूप गोड बाळ ! बाळाला शाब्बासकी.

कसलं गोड आहे
आणि शेवटचा फोटो तर एकदम प्राईझ विनिंग स्माईल. >>> अगदी अगदी. शाबासकी तिला.

सगळ्यांचे मनापासून आभार. तिला प्रतिसाद वाचून दाखवले. शाब्बासकी ऐकून खूप खुश झाली आहे. म्हणाली सगळ्या तुझ्या फ्रेण्ड्सना Big Thank you. आणि मोठ्ठी स्माईल.. Happy

खूप छान बुकमार्क!

गोड मुलगी आहे, आवडली मला! मला मुलीची हौस, पण एक मुलगाच आहे, हिला पाठवता का माझ्याकडे Happy

मस्तच झालाय बुकमार्क.
बुकमार्क मध्ये लहान गट , मोठ्या गटा पेक्षा जास्त क्रिएटिव्ह वाटतोय ह्यावेळी.

Pages