![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/09/20/IMG-20200828-WA0037.jpg)
या आठवड्या मध्ये अनुक्रमे पहिल्या दिवशी -भावाने लेट रक्षाबंधन निमित्त आणलेले कलाकंद, हल्दीराम डब्बा बंद रसोगुल्ला, दुसऱ्या दिवशी घरी सत्यनारायण पूजेसाठीचा प्रसाद, पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी बाप्पा आगमनानिमित्त रव्याच्या उकडीचे मोदक, गौरी पूजना दिवशी शेजारी काकूंनी दिलेले बेसन लाडू, काल चॉकलेट ब्राउनी मोदक असं सगळा अगदी म्हणजे अगदीचं फारच गोग्गोड झाले, आमच्या गावाकडच्या भाषेत तोंड लईच गोड मचूळ झालाय, कायतर चमचमीत पाहिजे
Red Rose Beetroot Momos Version 1.0
घरात बीट होते.. chinese noodles, rice करण्यासाठी आणलेले सौस, व्हिनेगर होते, मग काय.. घेतेले कि मोमोस करायला..
कृती नेहमीच्या मोमोस सारखीच आहे, फक्त मी गव्हाचं पीठ वापरते, आणि आता त्यामध्ये बीट मिक्सर ला बारीक करून, त्याचा काढलेला रस कणकेत घातला, तेल मीठ घालून मळले.
राहिलेले पल्प/ चोथा, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले मिरची, आलं, लसूण, तेलात परतून अर्धवट शिजवून घ्यायचे. मीठ, सोया सौस, व्हिनेगर टाकून stuffing सारण बनवला.
आणि मोमोस वळले.. बनवले.
(खरं म्हणजे, गाजर बीटरूट हलवा करून, मोदक च्या उकडी मध्ये बीटरस घालून, बीट हलवा मोदक कारायचे आहेत.. Beetroot Halwa Red Modak Version 1.1 coming soon.. महिनाभर तरी खाणार नाहीये गोड.. नंतर बघुयात, असं ठरवलं आहे)
क्रमवार फोटो :
1. तयारी अनुक्रमे बीटच्या रसात मळलेली कणिक, खिसलेले गाजर, तयार केलेले सारण
2. पारी लाटून, मोमोस बनवले
3. पूर्ण झालेला
4. वाफवण्यापूर्वी
5. वाफवल्यावर
6. Plating करण्याचा प्रयत्न
जमलंय का presentation?
हिरवी मिरची कच्ची तुम्हाला झेपत असेल तर खा, मिरी द्या माघारी.
खाली पाण्यात कालवलेले हळद कुंकू नाहीये. Red chilly and Green Chilly Sauce आहे.
वाढणी प्रमाण : इथे तीन पाऱ्या मिळून एक मोमोस आहे, म्हणजे तीन मोमोस मिळून एक. बघा मग.
अत्यंत सुरेख मोमोज्, अगदी
अत्यंत सुरेख मोमोज्, अगदी गुलाबासारखेच. सारण वाफवून घेण्याची गरज नाही का , मगं वेळही कमी लागेल.
Presentation is outstanding !
हिरवी मिरची कच्ची तुम्हाला झेपत असेल तर खा, मिरी द्या माघारी.>>> झेपते दोन्ही, नाही देणार माघारी
.
खूप छान.
Thank you अस्मिता. सारण
Thank you अस्मिता. सारण वाफवायचे. करते update.
सुंदर दिसतंय फार
सुंदर दिसतंय फार
खायलाही मस्त लागेल
क्रिएटिव्हिटी चांगली आहे.
सुरेख.गुलाबाचा आकार तर मस्तच
सुरेख.गुलाबाचा आकार तर मस्तच जमलाय.
वॉव ! काय सुंदर दिसतायत!
वॉव ! काय सुंदर दिसतायत! भारीच क्रिएटिव!
सहीच दिसतय. गुलाबाचा आकार
सहीच दिसतय. गुलाबाचा आकार कसला क्युट आलाय. (खाताना तीनाचा ऐवज असणार ते लक्षात ठेवलं पाहिजे. )
खुपच छान!
खुपच छान!
(प्रेझेटेशन्ला स्टिलच्या एवजी दुसरी प्लेट वापरायला हवी होती, बाकि सग्ळ छान जमलय)
सहीये.. पाककला + हस्तकला
सहीये.. पाककला + हस्तकला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपचं छान दिसताय..गुलाबाचा
खुपचं छान दिसताय..गुलाबाचा आकार तर खुपचं मस्त जमलाय
कलात्मक मोदक! शीतल तुझा
कलात्मक मोदक! शीतल तुझा उत्साह, उरक, कलात्मकता चे खूप कौतुक! ग्रीन चिली सॉस यल्लो दिसतोय.
वा!! खूपच सुंदर कल्पना आणि
वा!! खूपच सुंदर कल्पना आणि दिसतायत सुद्धा छान.
खूप सुंदर, कलात्मक मोदक!
खूप सुंदर, कलात्मक मोमोज!
सुरेख.
सुरेख.
खुपचं छान दिसताय..गुलाबाचा
खुपचं छान दिसताय..गुलाबाचा आकार तर खुपचं मस्त जमलाय<< + १
खूप छान
खूप छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रिएटिव्हटी भारी
क्रिएटिव्हटी भारी
क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे
क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे
कृती, मांडणी आणि एंड प्रॉडक्ट सगळेच मस्त
खूप सुंदर, कलात्मक मोमोज! > +
खूप सुंदर, कलात्मक मोमोज! > + १
@अनु @सुर्यगंगा @maitreyee
@अनु @सुर्यगंगा @maitreyee धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@धनुडी धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<(खाताना तीनाचा ऐवज असणार ते लक्षात ठेवलं पाहिजे.) >> बरोबर.. mention केलंय वाढणी प्रमाण मध्ये
@प्राजक्ता, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<(प्रेझेटेशन्ला स्टिलच्या एवजी दुसरी प्लेट वापरायला हवी होती, बाकि सग्ळ छान जमलय)>> सध्या only healthy kitchen wares n serve wares. 1 वर्ष झाले kitchen update karu. Glass ceramic plate मुलगी मोठी झाल्याशिवाय काढणार नाही.
@ऋन्मेष @अमृताक्षर धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@मंजूताई धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<कलात्मक मोदक! शीतल तुझा उत्साह, उरक, कलात्मकता चे खूप कौतुक! ग्रीन चिली सॉस यल्लो दिसतोय.>> light camera effect. तसाही ग्रीन चिली सौस एवढा ग्रीन कलर नाहीये जरा फिका ग्रीन आहे. म्हणून mention केलंय. हळदी कुंकू वाटायचं नाहीतर
@सई @मानव @देवकी @रुपाली @विनिता @जाई @कविन @आराध्या धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच क्रिएटिव्ह पाककृती आहे.
भारीच क्रिएटिव्ह पाककृती आहे. गुलाबाचा आकार छान आलाय.
खतरनाक
खतरनाक
एक नंबर कलाकृती आहे...
एक नंबर कलाकृती आहे... जबरदस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओहोहो काय सुरेख आणि सुबक
ओहोहो काय सुरेख आणि सुबक दिसतायत ही गुलाबपुष्प. मस्त आयडिया आणि एक्झिक्युशन!
खूप छान! गुलाबाचा आकार
खूप छान! गुलाबाचा आकार परफेक्ट जमलाय.
खुप खुप धन्यवाद सगळ्यांना
खुप खुप धन्यवाद सगळ्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेल्दी आणि हटके बनवलेत,
हेल्दी आणि हटके बनवलेत, गुलाबाचा आकार पण सुंदर जमलाय. करून बघणार नक्की.
वर्णिता धन्यवाद
वर्णिता धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे फार्फार सुंदर दिसताहेत!
हे फार्फार सुंदर दिसताहेत! दंडवत!!
हेल्दी आणि हटके बनवलेत,
हेल्दी आणि हटके बनवलेत, गुलाबाचा आकार पण सुंदर जमलाय. करून बघणार नक्की.+++1111
सही, क्रिएटीव्हीटी जबरदस्त.
सही, क्रिएटीव्हीटी जबरदस्त.
Pages