गणेशोत्सवात दरवर्षी मी काजू मोदक करतो. यंदा मायबोली गणेशोत्सवात मोदकांचीच स्पर्धा असल्याने काहीतरी वेगळे करणे भाग होते.
बिस्किटांपासून करायचा हा सोप्पा केक अनेकदा केला आहे. कुठल्याशा कुकरी शोमध्ये मारी बिस्किटापासून करंजी केलेली पाहिली होती. तेव्हा बिस्किटांचा मोदक नक्कीच करता येईल असं वाटलं. नेटवर शोधलं तेव्हा अनेक रेसिपीज दिसल्या. त्यांच्यावर नजर फिरवली आणि बिस्किट मोदकांचा बेत पक्का केला.
साहित्य
१. पार्ले जी १०० ग्रामचा पुडा
२ हाइड & सीक १०० ग्रामचा पुडा
३ दूध
४ पिठीसाखर
मोदकाचा साचा
क्रमवार कृती
१. दोन्ही पुड्यांतली अर्धी अर्धी बिस्किटं घेतली. त्यांचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड करून घेतली.
२ पिठीसाखरेचा दगड झाला होता. तोही मिक्सरमध्ये फिरवून बारीक पूड केली.
३. थोडं दूध कोमट करून घेतलं. आणि बिस्किटांच्या चुर्यात थोडं थोडं घालत मिश्रण ढवळत राहिलो. इतकं करूनही अचानक मिश्रण पातळ झालं.
४. काजू मोदकांचा अनुभव गाठीशी असल्याने त्यात मिश्रणात पिठीसाखर घालून ते घट्ट होतंय का हे पाहिलं.
५. हाइड & सीक मधलं चॉकलेट आणि बाकी पदार्थांचा संयोग होऊन मिश्रण घट्ट होत होतं. काट्याला जड लागत होतं. पण तरीही मळता येईल, गोळा करता येईल इतकं कोरडं नव्हतं.
६ मग दोन्ही पुड्यांतली उरलेली बिस्किटं मिक्सरमध्ये फिरवून आधीच्या काल्यात ती पूड घातली. आता मिश्रण जास्तच कोरडं झालं.
चित्रपट मालिकांत पहिल्यांदाच कणीक मळणारी व्यक्ती कधी पाणी, कधी पीठ घालत राहते आणि मोठ्ठा राडा करते तसे होण्याची चिन्हे दिसू लागली. (इथे पिठाचा डबा डोक्यावर उपडी होण्याची भीती नव्हती, एवढंच) थोडंसं दूध आणखी घातलं , पिठीसाखर घातली आणि काटा बाजूला ठेवून मिश्रणात हात घातला. तेव्हा ते जरा हाताळण्याजोगं झालं.
तेवढ्यात आठवलं की नुसत्या फायनल प्रॉडक्टचे फोटो पुरेसे नाहीत. म्हणून बोटे आणि हात चाटून स्वच्छ केले आणि त्या होऊ घातलेल्या गोळ्याचा फोटो काढला.
फोन हातात घेतल्यावर मायबोलीवर बागडणे अनिवार्य असते त्यामुळे त्यात काही मिनिटे गेली. तोवर गुमान पडून असलेला गोळा आवाक्यात आला.
मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात मिश्रण भरून मोदक तयार केले. ते बर्यापैकी मॉइस्ट होते आणि बाहेर पाऊसही पडत होता म्हणून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले.
या मोदकांना व्हाइट चॉकलेटमध्ये बुडवून जरा ग्लॅमरस करायचा बेत होता. पण तेवढ्यात मायबोलीवर बिस्किट मोदकांची कृती आलेली दिसली. तेव्हा आधी ही कृती लिहून काढली.
क्लोज अप
मोदक उरले आणि व्हाइट चॉकलेट डेकोरेशन यशस्वी झालं तर ती स्टेप आणि फोटो वाढवण्यात येतील.
अरे वा, बरेच उपद्व्याप केलेत
अरे वा, बरेच उपद्व्याप केलेत की. पण फायनल प्रॉडक्ट ब्येस दिसतय. प्रोसेस चं वर्णन पण झकास
धनुडी प्लस १
धनुडी प्लस १
सुंदर
सुंदर
चोको वाला पदार्थ असताना हाताला लागलेली कणिक बोटे चाटूनच स्वच्छ करायची असते.
ती स्पॅच्युला ने खरवडून ताटात काढणं वगैरे हा अक्षम्य अपराध असतो.
(मनातः या मोदकांचा तळ व्हाईट चॉकलेट मध्ये बुडवल्यास कसलं मस्त काळं पांढरं आणि खायला छान लागेल ना?आता असं काहीतरी करावंच लागेल घरी.)
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय
छान दिसत आहेत.
छान दिसत आहेत.
छान दिसतायत!
छान दिसतायत!
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय.
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय. +1
छान दिसताहेत
छान दिसताहेत
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय.
फायनल प्रोडक्ट क्यूट दिसतेय. ....+1.
>> इथे पिठाचा डबा डोक्यावर
>> इथे पिठाचा डबा डोक्यावर उपडी होण्याची भीती नव्हती, एवढंच) >>
>>मिश्रणात हात घातला. तेव्हा ते जरा हाताळण्याजोगं झालं. >>
भारी लिहिलंय भरत आणि मोदक पण छान दिसताहेत.
छान दिसताय्त! व्हाइट चॉकलेट
छान दिसताय्त! व्हाइट चॉकलेट कोटिंग मस्तच दिसेल!
भरत, फायनल प्रॉडक्ट खरंच खूप
भरत, फायनल प्रॉडक्ट खरंच खूप छान दिसतंय.
व्हाइट चॉकोलेट प्रयोग जरुर करा. निम्मा निम्मा डार्क - व्हाइट रंग खूप खुलुन दिसेल.
छान लिहीलं आहे.
हाइड & सीक १०० ग्रामचा पुडा >> हा ब्रॅन्ड बघायला हवा पुढच्या भारत वारीत.
शुगोल, इंग्रो मध्ये मिळतो
शुगोल, इंग्रो मध्ये मिळतो हाईड अँड सीक. आमच्या इथे वॉलमार्टातही मिळतो सो तुमच्याकडे नक्की सापडेल.
मस्तच
मस्तच
छान दिसताहेत
छान दिसताहेत
छान दिसताहेत
छान दिसताहेत
क्युट मोदक आणि खुसखुशीत लिखाण
क्युट मोदक आणि खुसखुशीत लिखाण!
मस्त आहेत मोदक.
मस्त आहेत मोदक.
व्हाईट चॉकोलेटमध्ये घाला नक्की.
साचा चालणार आहे का ह्या स्पर्धेसाठी ? चालणार नव्हता ना आधी ?
पग्या , उकडीच्या मोदकाना
पग्या , उकडीच्या मोदकाना चालणार नाही साचा .
मस्त लिखाण आणि मोदक पण.
मस्त लिखाण आणि मोदक पण.
आवडले.
सुंदर पार्ले मोदक. कृती फारच
सुंदर पार्ले मोदक. कृती फारच मनोरंजक.
छान दिसतायत मोदक!
छान दिसतायत मोदक!
छान दिसताहेत. लिहीलेय आणखी
छान दिसताहेत. लिहीलेय आणखी छान.
छान लिहिले आहे. मोदकही छान
छान लिहिले आहे. मोदकही छान झाले आहेत. सोपे वाटत आहेत. कसलेही कुकिंग नाही ते फार आवडले. खालून दुसरा फोटो हर्षिजच्या किसेस सारखा यम्मी दिसतोय !
छान दिसतायत.
छान दिसतायत.
वाह मस्तच.
वाह मस्तच.
मस्त दिसतायत मोदक,
मस्त दिसतायत मोदक,
बनवायला सोप्पे , फायरलेस कुकिंग वगैरे #ऍड करा खाली
लिहिण्याची पद्धत बिस्किटांइतकीच खुसखुशीत
मोदक मस्त दिसतायत. मला तर
मोदक मस्त दिसतायत. मला तर चॉकलेट मोदक वाटले आधी..अंजीर मोदक पण असेच दिसतात..
छान दिसत आहेत ‘खटाटोप मोदक’.
छान दिसत आहेत ‘खटाटोप मोदक’.
(पण पार्ले जी + हाइड&सीक + पिठीसाखर म्हणजे भलतंच गोग्गोड होईल हे प्रकरण अशी धास्ती वाटते आहे. काहीतरी खरमरीत उताराही सांगून ठेवा. )
गोड नाही झाले. पिठीसाखर खूप
गोड नाही झाले. पिठीसाखर खूप कमी वापरली आहे. चॉकलेटची चव dominant आहे.
Pages