आई वडील होतांना

Submitted by पूजा जोशी on 27 August, 2020 - 04:31

आई वडील होतांना - प्रस्तावना

लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना आपण आपले अभिनय कौशल्य पणाला लावतो. आई सारख दिसायची धडपड करतो. ओढणी कंबरेला गुंडाळून, पदर सावरत चिमुरड्या बाहुलीला कडेवर घेऊन 'उगी उगी रडू नकोस, शहाणी माझी बाळ. बाबा लवकर येईल घरी.खाऊ आणेल ' अस समजावत बाल्कनीत फेर्‍या मारतो. किती घाई असते नाही आपल्याला आईचा रोल करायची? आणि कित्ती सोपा वाटतो तो रोल.

खरी मजा तेव्हा येते जेव्हा reel life चे एक एक कंगोरे real life मधे उलगडायला लागतात. अमुलाग्र बदल ह्याची शब्दशः प्रचिती येते. कोण होतीस तू? काय झालीस तू? असा प्रश्न पडतो.

माझ्या सारख्या घोडे बेचके झोपणार्या ची आई झाल्या नंतर इतकी सावध झोप होवू शकते असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

रोज सकाळी ५.३० ला उठून मी स्वयंपाक घरात मुलाचा डबा बनवते, अहो आश्चर्यम् .

आपल्या खाण्यापिण्याच्या वेळाच नाही तर सवयही बदलते. बुळबुळीत वाटणारी भेंडीची भाजी बोट चाटून खातो आपण.

साडीवर एवढासा ही डाग पडू न देणारे आपण त्याच साडीवर मुलाने गाळलेली लाळ मिरवत फिरतो.

भाषा व तिचा टोन काहीच्या काही बदलतो. ह्या पेक्षा अधिक पटीने बदल होतो तो स्वभावात. स्वतःला कणखर रांगडे समजणारे पुरुष, स्वतःच्या मुलाला vaccination देताना डोळ्याच्या कडा पुसताना दिसतात.

येणार या भागांमध्ये काही स्वानुभव शेअर करीन तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग

त्या मातीच्या गोळ्याचे सुंदरशा फुलदाणीत रुपांतर झाले की होणार्‍या समाधानाची सर त्या लुटुपूटूच्या भातुकलीला कधीच येणार नाही

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या सारख्या घोडे बेचके झोपणार्या ची आई झाल्या नंतर इतकी सावध झोप होवू शकते असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते >> माझाही पूर्वी १८ तास झोपायचा रेकाॅर्ड होता.. आता सलग ६ तास झोपले तर शप्पत

आपल्या खाण्यापिण्याच्या वेळाच नाही तर सवयही बदलते. बुळबुळीत वाटणारी भेंडीची भाजी बोट चाटून खातो आपण.

लग्नानंतर, मुले होईपर्यंत काहीच स्वयंपाक न येणारी मी, आता मुलांना आवडतील म्हणून छान छान पदार्थ बनवते तेव्हा मलाच माझे आश्चर्य वाटते.

अजून एक गंमत. आधी खाण्यापिण्याचे प्रचंड नखरे आणि चोचले असणारे पुरूष बाबा झाल्यावर ताटात येईल ते मुकाट्याने खातात.